राष्ट्रीय

आठवलेंच्या काव्यात्मक शुभेच्छा; संसदेत मोदी, सोनियांनाही आवरेना हसू

सध्या संसदेत लोकसभेचं कामकाज सुरु असून नव्या अध्यक्षांची निवडही झाली आहे. लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांचे खासदार रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीतून अभिनंदन केले. आपल्या कवितेतून आठवलेंनी बिर्ला यांचे स्वागत केले. ‘एका देशाचं नाव आहे रोम ,लोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ कवितेची ही पहिली ओळ उच्चारताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले. नरेंद्र मोदींचे मन विशाल, राहुल गांधी राहो खुशाल असं म्हणताच मोदींनाही हसू लपवता आले नाही. आठवलेल्यांच्या काव्यत्मक शुभेच्छा ऐकल्यानंतर ..

झाकीर नाईकला कोर्टाचा दणका; प्रत्यक्ष हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट काढणार

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईक याला मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने दणका दिला आहे. ३१ जुलैपूर्वी कोर्टात प्रत्यक्ष हजर व्हा, अन्यथा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल असा निर्वाणीचा इशाराच कोर्टाने बुधवारी दिला. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईकविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात यावे यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता.झाकीर नाईक सध्या भारत सोडून मलेशियात आश्रयाला गेला आहे. दरम्यान, गेल्याच महिन्यात त्याने भारतात परतण्यासाठी तयारी दर्शवली होती. परंतु यासाठी त्याने एक अटही घातली होती. ..

मोदींनी EVM वर चर्चा करण्यासाठी बोलावलं असतं तर गेले असते – मायावती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमवर चर्चा करण्यासाठी बोलावलं असतं तर सर्वपक्षीय बैठकीला नक्की गेले असते असं बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे. यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणे म्हणजे गरिबीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. तसंच महात्मा गांधींची १५० वी जयंती ..

चमकी ताप: 'नितीश कुमार परत जा'च्या रुग्णालयांत घोषणा

बिहार,बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये चमकी तापाने थैमान घातल्यानंतर तब्बल १८ दिवसांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्थानिक रुग्णालयांना भेट दिली. यावेळी रुग्णांच्या नातेवाइकांनी नितीश कुमार 'परत जा'च्या घोषणा दिल्या. चमकी तापाचे १०८ बळी गेल्यानंतरही रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्यामुळे, त्यांना योग्य उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांचे कुटुंबीय संतप्त आहेत.  बिहारमध्ये चमकी तापाने थैमान घातलं आहे. मुजफ्फरपूर आणि बदरपूरमध्ये या तापापायी १०८ बालकांचा जीव गेला आहे. पण या तापाला आळा घालण्यामध्ये ..

… तर 2030 नंतर केवळ इलेक्ट्रीक गाड्यांचीच विक्री होणार

केंद्र सरकार सध्या इलेक्ट्रीक गाड्यांची विक्री वाढवण्यावर भर देत आहे. नीति आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर 2030 नंतर देशात केवळ इलेक्ट्रीक गाड्यांचीच विक्री केली जाऊ शकते. 2030 नंतर देशात केवळ इलेक्ट्रीक गाड्यांचीच विक्री केली जावी, असा प्रस्ताव नीति आयोगाने सादर केला आहे.  यापूर्वी नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कान्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2025 पासून देशात केवळ इलेक्ट्रीक टू व्हिलर्स आणि थ्री व्हिलर्सचीच विक्री करण्याच्या सुचना केल्या होत्या. 150 ..

कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून नदीत उतरलेल्या ‘त्या’ जादुगाराचा मृत्यू

कोलकातामधील हुगली नदीत बुडून ४१ वर्षीय जादुगाराचा मृत्यू झाला आहे. चंचल लाहिरी असं या जादुगाराचं नाव असून जादूगार मँड्रेक नावाने ते प्रसिद्ध होते. नातेवाईक, मीडिया, पोलीस आणि अनेक लोकांच्या उपस्थितीत क्रेनच्या सहाय्याने ते नदीत उतरले होते. कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून ते नदीत उतरले होते. पण बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने शोध सुरु कऱण्यात आला होता. अखेर त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर आला आहे. सहा वर्षांपुर्वी २०१३ मध्येही त्यांनी हा स्टंट केला होता. त्यावेळी त्यांना उपस्थितांनी हुल्लडबाजी करत ..

प्लास्टिक बॉटल जमा करा अन् पैसे मिळवा

अहमदाबाद,प्लास्टिक बॉटल जमा केल्यानंतर त्याबदल्यात अहमदाबादमधील नागरिकांना लवकरच पैसे मिळणार आहे. सॉलिड वेस्ट मॅनजमेंट या प्रकल्पासाठी अहमदाबाद महानगरपालिका शहरातील 5 जागांवर रिवर्स वेडिंग मशीन लावणार आहे. जेथे शहरातील नागरिक प्लास्टिक बॉटल जमा करु शकतील.   सूत्रांच्या माहितीनुसार बॉटलच्या आकाराप्रमाणे नागरिकांना प्रति बॉटल एक रुपया देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट विभागाचे संचालक हर्षद सोलंकी यांनी सांगितले की, अहमदाबादमध्ये दिवसाला 3, 200 मेट्रीक टन कचरा जमा होता. ..

डॉक्टरांवर हल्ला केल्यास 10 वर्षे तुरुगंवास

- कायदा प्रस्तावितनवी दिल्ली,वैद्यकीय अधिकार्‍यांना संरक्षण देणारे कायदे तयार करा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना नुकतीच केली आहे. यावेळी त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रस्तावित केलेल्या कायद्याचा मसुदा सोबत जोडला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार वैद्यकीय सेवा देणार्‍या कर्मचारी व व्यावसायिकांवर हिंसक हल्ला झाल्यास तसेच मालमत्तेचे नुकसान केल्यास दहा वर्षांच्या तुरुंगवासाची व पाच लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची तरतूद आहे.   इंडियन ..

वंदे मातरम इस्लामविरोधी! आम्ही ते म्हणणार नाही-सपा खासदार

लोकसभेत वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही ते इस्लाम विरोधी आहे असा दावा समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर्र रहमान बर्क यांनी केला आहे. ते उत्तर प्रदेशातल्या संभल या ठिकाणाहून निवडून आले आहेत. वंदे मातरमच्या घोषणा लोकसभेत दिल्या जात आहेत. वंदे मातरम मी अजिबात म्हणणार नाही. कारण ते इस्लामविरोधी आहे असे बर्क यांनी सुनावले आहे. खासदार शफिकुर्ररहमान बर्क यांनी लोकसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेत सुरू ..

मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सामील होण्यास दीदींचा नकार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवाली होती. ममता बॅनर्जी यांनी इतक्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी फक्त एक दिवस चर्चा करणं पुरेसं ठरणार नाही असं म्हटलं आहे. ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना अनेक विरोधी पक्षांनी डावलली आहे. अनेक नेत्यांनी सरकारने चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीचं ..

भारताची संरक्षण निर्यात दुप्पटीपेक्षा जास्त

नवी दिल्ली,भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत दुप्पटीने वाढ झाली असून ती 11 हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. संरक्षण सामग्रीच्या निर्यातीबाबत तयार करण्यात आलेल्या धोरणांमध्ये आलेली सुलभता आणि देशांतर्गत कंपन्यांच्या वाढलेल्या ऑफसेट प्रोजेक्ट्समुळे अमेरिकेतील बाजारात मिळालेल्या प्रवेशाच्या पृष्ठभूमीवर भारताची संरक्षण सामग्री निर्यात दुप्पटीपेक्षा अधिक वाढली आहे.   2017-18 मध्ये भारताची संरक्षण सामग्री निर्यात 4 हजार 682 कोटी रुपये होती. 2018-19 मध्ये वाढून ती 10 हजार 745 ..

अयोध्या दहशतवादी हल्ल्यातील चार आरोपींना जन्मठेप, एकाची मुक्तता

अयोध्या,अयोध्या येथे २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज विशेष न्यायालयाने आज निकाल सुनावला आहे. या हल्ल्या प्रकरणी पाचपैकी चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे.  अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज प्रयागराज येथील विशेष कोर्टात पाच दहशतवाद्यांविरोधात शिक्षेची सुनावणी झाली. राम जन्मभूमी येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा सुनावली जावी अशी मागणी करण्यात येत होती. 5 जुलै 2005 रोजी सकाळी 9.15 ..

सोनिया गांधी, मुलायमिंसह, बादल, सनी देओल यांचा शपथविधी

नवी दिल्ली,लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांनी आज मंगळवारीही खासदारकीची शपथ घेतली. यात प्रामुख्याने कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमिंसह यादव, सुखबिरिंसग बादल, सनी देओल, भगवंत मान यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब झाल्यानंतर सभागृहात आलेले भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांचे सत्तारूढ सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. आज दुसर्‍या दिवशी माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड आणि कॉंगे्रसचे नेते शशी थरूर यांनीही शपथ घेतली. ..

डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा सुनावणीसाठी खुला

- सर्वोच्च न्यायालयाची भूमिकानवी दिल्ली,डॉक्टरांनी संप मागे घेतला असल्याने, संपाच्या मुद्यावर आता तातडीने सुनावणी घेण्याची गरज नाही; पण रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाढत्या हल्ल्यांच्या अनुषंगाने आम्ही डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरील सुनावणीचा पर्याय खुला ठेवला आहे, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी विशद केली.   डॉक्टरांचा संप आणि त्यांना होणारी मारहाण या मुद्यावर आज आम्ही सुनावणी करणार होतो, पण बंगाल आणि अन्य राज्यांमधील हा संप आता मिटला असल्याने, तातडीने सुनावणी ..

मोदी सरकारचा दणका.. नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या १५ अधिकार्‍यांना सक्तीची निवृत्ती

केंद्र सरकारने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि कस्टम बोर्डाच्या १५ बड्या अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती दिली आहे. यापूर्वीही सरकारने आयकर विभागातील १२ बड्या अधिकाऱ्यांकडून १० जून रोजी राजीनामे मागितले होते. या सर्व अधिकाऱ्यांवर कर्तव्यावर असताना नियमांविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विविध तपास यंत्रणांनी कारवाईची शिफारस केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. ज्या अधिकाऱ्यांना सरकारने पदमुक्त करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये मुख्य आयुक्त, आयुक्त, अतरिरिक्त ..

पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने मारले

अनंतनाग,जम्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरात मंगळवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत भारतीय लष्कराला मोठं यश प्राप्त झालं आहे. पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमधील एक आणि जैश कमांडर सज्जाद भटला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. त्याचसोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आलं आहे.   अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद ..

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात

राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात लोकाभिमुख योजना आणि सवलतींचा धडाका असू शकेल. लांबलेला पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा कृषीउत्पादन आठ टक्क्यांनी कमी होईल, अशी चिंता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आलीय. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बळीराजाला कसा आधार देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.   २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प ..

भारत चीनलाही मागे टाकणार, 8 वर्षातच 'सर्वाधिक लोकसंख्येचा' देश ठरणार

नवी दिल्ली,देशातील वाढती लोकसंख्या ही भारतासमोरील सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना सोयी सुविधा पुरविताना सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या, जगातील क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताचा नंबर लागतो. तर, या यादीत चीन अग्रस्थानावर आहे. मात्र, लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकणार असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.   संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या ..

११ वी ऑनलाईन प्रवेश उद्यापासून

- विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेच्या जागा वाढवल्या ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. यामध्ये शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढल्या आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात जागा वाढवून देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय राज्य सरकारने घेतला ..

जे. पी. नड्डा भाजपाचे कार्याध्यक्ष

अमित शाह राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम   नवी दिल्ली,माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी भाजपाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपा संसदीय पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी पत्रपरिषदेत याबाबतची घोषणा केली. ..

राजनाथसिंहच क्रमांक दोनचे नेते

अमित शाह क्रमांक तीनवर  तभा ऑनलाईन टीम नवी दिल्ली,17 व्या लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात मंत्र्यांच्या ओळख सत्रानेे झाली. यावेळी प्रत्येकाचीच नजर, कोण कोणत्या जागेवर बसणार, याकडे होती. कारण, मंत्रिमंडळाच्या रचनेनंतर सरकारमध्ये क्रमांक दोनवर कोण, याची चर्चा जास्त असते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या जागेवर विराजमान झाल्यानंतर, लोकसभेत भाजपाचे उपनेते असलेले राजनाथसिंह त्यांच्या शेजारच्या आसनावर विराजमान झाले आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शाह बसले. यामुळे मोदी सरकारमध्ये राजनाथ सिंह हेच ..

केवळ दंड भरून करबुडव्यांची सुटका नाही

मुंबई,विदेशात काळा पैसा साठवणार्‍यांसह मोठ्या प्रमाणात कर बुडवणार्‍या लोकांविरुद्ध खटला दाखल करण्याची प्रक्रिया केंद्र सरकार अधिकच कठोर करीत आहे. करबुडव्यांची एक वर्गवारी केंद्राने निश्चित केली असून, या वर्गवारीतील लोकांना केवळ आता दंड भरून स्वतःची सुटका करून घेणे शक्य होणार नाही.   थेट कर कायद्यांतर्गत करचोरी करणार्‍यांविरोधात केंद्र सरकारने 30 पानांची मार्गदर्शक तत्त्वे तयार केले असून, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शुक्रवारी रात्री ही मार्गदर्शक तत्त्वे ..

२०० कोटींचे लग्न पोहचले न्यायालयात

सरकारला अहवाल देण्याचे आदेश   नैनीताल,उत्तराखंडच्या ओली येथे होणार्‍या दक्षिण आफि‘कास्थित भारतीय उद्योगपती गुप्ता बंधू यांच्या मुलांचे लग्न होणार आहे. मात्र, 200 कोटी रुपये खर्च होणार्‍या या विवाहसोहळ्यासाठी उभारलेल्या हेलिपॅडसाठी वृक्षतोड करण्यात आल्याने नैनीताल उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाने याबाबत उत्तराखंड सरकारकडून उत्तर मागवले आहे. विवाहसोहळ्याची परवानगी गुप्ता बंधूंना कोणी दिली, असा सवाल उपस्थित करीत, आजच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ..

लोकसभेत साध्वी प्रज्ञा यांच्या शपथेवरुन वाद, विरोधकांचा जोरदार गोंधळ

भोपाळमधून भाजपाच्या खासदार असणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. मात्र यावेळी विरोधकांचा जोरदार गोंधळ पहायला मिळाला. साध्वी प्रज्ञा सिंह शपथ घेण्यासाठी दाखल होताच, विरोधकांनी त्यांच्या नावावर आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रज्ञा सिंह ठाकूर संस्कृत भाषेत शपथ घेत होत्या. मात्र त्यांनी आपल्या नावाचा उच्चार करताच विरोधकांनी विरोध करत फक्त आपल्या नावाचा उल्लेख व्हावा अशी मागणी केली.  साध्वी प्रज्ञा सिंह यांनी संस्कृतमध्ये सुरुवात करताना म्हटलं की, ‘मैं साध्वी ..

आठवड्याभरात डॉक्टरांचा संप मिटण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेला डॉक्टरांचा संप अखेर मिटण्याची शक्यता आहे. सात दिवसात संप मिटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.   पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला आहे.   तुर्तास डॉक्टर कामावर रूजू झाले आहेत. डॉक्टर आंदोलानवरील आपला निर्णय लवकरच सांगतिल. संप मिटल्याचे डॉक्टरांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. कोलकातामधील डॉक्टरांना पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरातील डॉक्टरही संपावर गेले होते. त्यामुळे देशातील ..

पाकिस्तानी लष्कर आणि ISI वर टीका करणाऱ्या ब्लॉगरची हत्या

पाकिस्तान ब्लॉगर आणि मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान यांची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहम्मद बिलाल खान सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध असून त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका केल्यामुळे ते चांगलेच प्रसिद्ध होते.  रविवारी रात्री मोहम्मद बिलाल खान आपल्या मित्रासोबत बाहेर होते. यावेळी त्यांना एक फोन आला होता. त्या व्यक्तीने मोहम्मद बिलाल खान यांना जवळच्या जंगलात नेलं ..

संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शेअर बाजार कोसळला

मुंबई,देशांतर्गत आणि जागतिक कारणांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार 491.28 अंकांनी कोसळला. बीएसई सेन्सेक्स 491 अंकांनी कोसळून 38,960.79 अंकांवर बंद झाला. NSE निफ्टीही 11672.15 अंकांवर बंद झाला. सलग चार सत्रांमध्ये शेअर बाजारात घसरण सुरु आहे. ऑईल आणि गॅस सेक्टर सोडून बँकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारचे पहिलेच लोकसभा अधिवेशन सुरु झाले आहे. याच दिवशी शेअर बाजार जवळपास 500 अंकानी कोसळला आहे. ..

फोटोशॉप केलेला फोटो समजणार; ॲडोबीचे नवे टूल

चांगले इमेज एडिटींग सॉफ्टवेअर्स आणि अॅप्सची सध्या चलती आहे. त्यामुळे एखादा फोटो खरा आहे की एडिट करण्यात आला आहे, हे ओळखणे अनेकदा कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन अॅडोबीने खास टूल तयार केले आहे. ज्याच्या मदतीने एडिट करण्यात आलेला फोटो ओळखता येणे शक्य होणार आहे.   युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेतील संशोधकांच्या सहकार्याने अॅडोबीने हे नवे टूल तयार केले आहे. सध्याच्या काळात एडिट करण्यात आलेले फेक व्हिज्युअल आणि फोटो अनेकदा वायरल होत आहेत. हे फोटो खरे की खोटे हे ठरवणे हे अशक्य असते. मात्र, ..

उपचारानंतर चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांना रुग्णालयातून सुटी

चेन्नई,दाक्षिणात्य चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीकडे नियमित लक्ष ठेवून आहेत. हृदयविकारावरील उपचारानंतर मणिरत्नम यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आहे.   हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने सुरुवातीला त्यांना मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना चेन्नईला हलवण्यात आले. चेन्नईतील अपोलो रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर ..

बिहारमध्ये उष्मघातामुळे १८४ जणांचा मृत्यू, ३० जूनपर्यंत शाळा बंद; १४४ कलम लागू

बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भीषण परिस्थिती असून उष्मघातामुळे आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्वकाळजी म्हणून ३० जूनपर्यंत सरकारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केलं आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान कोणतंही सरकारी अथवा खासगी बांधकाम, मनरेगा, सांस्कृतिक कार्यक्रम तसंच उघड्या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.  उष्मघातामुळे लोकांचे मृत्यू होत असल्याने परिस्थिती भीषण होत चालली आहे. आतापर्यंत उष्मघातामुळे ..

पश्चिम बंगालमध्ये आता शिक्षकही उतरले रस्त्यावर

पश्चिम बंगालमध्ये आठवडाभरापासून डॉक्टरांचे आंदोलन सुरू असताना, आता येथील शिक्षक संघटना देखील आपल्या विविध मागण्यासांठी रस्त्यावर उतरल्या आहेत. शिक्षकांनी अन्य मागण्यांबरोबर वाढीव वेतनाची देखील मागणी केली आहे. तर, कोलकातामधील बिकाश भवन समोर आंदोलनासाठी उतरलेल्या शिक्षकांमध्ये व पोलिसांमध्ये वाद झाल्याने वातावरण तणावग्रस्त बनले आहे.   बंगालमदील एसएसके, एमएसके आणि एएस या शिक्षक संघटनांचे शिक्षक विविध मागण्यासांठी सोमवारी शिक्षण मंत्र्यांची भेट घेण्यास निघाले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना ..

ममता बॅनर्जी यांची वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रतिनिधींशी चर्चा

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या डॉक्टर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारकडून आता आंदोलक डॉक्टरांना एक नवा प्रस्ताव देण्यात आला आहे. ज्यानुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन प्रतिनिधींशी चर्चा करण्यास तयार आहेत.  पश्चिम बंगालमध्ये एकूण १४ वैद्यकीय महाविद्यालयं आहेत आणि मुख्यमंत्री बॅनर्जी या महाविद्यालयांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींशी बैठक करणार आहेत. ही बैठक आज दुपारी ३ वाजता राज्य सचिवालयात होणार आहे. डॉक्टर प्रतिनिधींची ही बैठक ..

डॉक्टरांचा आज देशव्यापी संप

कोलकाता येथे ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत आयएमएने आज संप करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करा, डॉक्टरांना सुरक्षा पुरवा अशा मागण्या प्रामुख्याने करत हा संप पुकारण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजेच २३ तासांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद रहाणार आहेत. ज्याचा फटका सामान्य रूग्णांना बसू शकतो. मार्ड, परिचारिका संघटना या सगळ्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. या संपामुळे देशभरातील ..

तापाचा कहर! बिहारमध्ये ९६ बालकांचा मृत्यू

बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात ‘अॅक्यूट एन्सेफलाइटिस सिंड्रोम’ (एईएस) या आजाराने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आता ९६ वर पोहचला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अद्याप पर्यंत पिडीत रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची भेट न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व वैद्यकीय अधिका-याना शक्य तितक्या सर्व उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.   याशिवाय मुख्यमंत्रा नितीश कुमार यांनी या आजारामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबीयास चार ..

कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून नदीत उतरलेला जादूगार गायब

कोलकातामधील हुगली नदीत बुडून ४१ वर्षीय जादूगार बेपत्ता झाला आहे. कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून हुगली नदीत उतरलेला जादूगार पाण्यात बुडाला असल्याची भीती व्यक्त होत असून त्यांचा शोध सुरु आहे. चंचल लाहिरी असं या जादुगाराचं नाव असून जादूगार मँड्रेक नावाने ते प्रसिद्ध आहेत. नातेवाईक, मीडिया, पोलीस आणि अनेक लोकांच्या उपस्थितीत क्रेनच्या सहाय्याने ते नदीत उतरले होते. पण बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने शोध सुरु कऱण्यात आला. अद्यापही शोध सुरु असल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे  चंचल लाहिरी ..

विरेंद्र कुमार यांनी घेतली हंगामी अध्यक्षपदाची शपथ

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाआधी विरेंद्र कुमार यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आधी राष्ट्रपतींची भेट घेऊन विरेंद्र कुमार यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी पार पडला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, दुष्काळ या महत्त्वाच्या प्रश्नांवर अर्थसंकल्पीय ..

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवार सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र या चकमकीत तीन जवान देखील जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.    या ठिकाणी अजुनही चकमक सुरू आहे. शिवाय या भागात आणखी दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता असल्याने परिसरात शोध मोहीम सुरू आहे.   दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती, दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्याने चकमकीस ..

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात उपचार सुरु

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयाशी संबंधित आजाराने ते त्रस्त आहेत त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही प्रसारमाध्यमांनी मणिरत्नम यांना कार्डिअॅक अरेस्ट आल्याचा दावा केला आहे तर काहींनी हा दावा फेटाळला आहे. सध्या त्यांच्यावर चेन्नई येथील अपोलो रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मणिरत्नम यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ट्विटरवरू शेअर करण्यात आली आहे.  मणिरत्नम हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं ..

विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा: मोदी

लोकशाहीत विरोधकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांना किती मतं मिळाली? ते आकडे किती आहेत याचा विचार विरोधकांनी सोडून द्यावा. अनेकदा अनेक विरोधी पक्षाचे खासदार अशा प्रकारे मतं मांडतात की त्यातून खूप काही चांगल्या गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात. तर्काच्या दृष्टीने बोलणाऱ्या प्रत्येकाला संधी दिली जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजपासून दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिले अधिवेशन पार पडते आहे. या अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याचवेळी ..

आमचे सरकार भ्रष्ट शासन देणार- आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

अमरावती: नुकत्याच आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या पी. पुष्पा श्रीवानी यांची जीभ घसरली आहे. आंध्रप्रदेशात भ्रष्ट सरकार द्यायचे आमच्या सरकारचे लक्ष्य आहे, असे वक्तव्य त्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.आमच्या सरकारचे लक्ष्यच राज्यात भ्रष्ट शासन देण्याचे आहे, असे त्या म्हणाल्या. वास्तविक पाहता पुष्पा यांना भ्रष्टाचारमुक्त शासन म्हणायचे होते. मात्र, त्यांच्याकडून भ्रष्टाचारी शासन म्हटले गेले. पुष्पा या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या मतदार संघात आल्या होत्या. त्यावेळी ..

भारत-म्यानमार सीमेवर 72 बंडखोरांना अटक

नवी दिल्ली, भारत आणि म्यानमारच्या लष्कराने ‘ऑपरेशन सनराईज’अंतर्गत 16 मे पासून सीमावर्ती भागात संयुक्त मोहीम राबवत मणिपूर, नागालॅण्ड आणि आसाममध्ये सक्रिय असलेल्या बंडखोरांचे असंख्य अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ही कारवाई तीन आठवडे चालली, अशी माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी आज रविवारी दिली. कारवाईदरम्यान किमान 72 बंडखोरांना अटक करण्यात आली.   ‘ऑपरेशन सनराईज’चा पहिला टप्पा तीन महिन्यांपूर्वी भारत-म्यानमार सीमेवर राबवण्यात आला. या कारवाईदरम्यान ईशान्येतील ..

आयईडी हल्ल्याच्या धमकीनंतर जम्मू-काश्मिरात वाढवली सुरक्षा

श्रीनगर,दहशतवादी झाकिर मुसाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारखा हल्ला करण्याची शक्यता आहे. हल्ल्याच्या धमकीची माहिती मिळाल्यानंतर राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलिसांनी हवाई मार्गावर विशेष लक्ष ठेवले आहे.   जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारखा हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पाकिस्तानने भारत आणि अमेरिकेला दिली आहे. भारताला ही माहिती मिळताच राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये हा हल्ला होऊ शकतो, ..

आमचे सरकार भ्रष्ट शासन देणार

- आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली   अमरावती,नुकत्याच आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या पी. पुष्पा श्रीवानी यांची जीभ घसरली आहे. आंध्र प्रदेशात भ्रष्ट सरकार द्यायचे आमच्या सरकारचे लक्ष्य आहे, असे वक्तव्य त्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.आमच्या सरकारचे लक्ष्यच राज्यात भ्रष्ट शासन देण्याचे आहे, असे त्या म्हणाल्या. वास्तविक पाहता पुष्पा यांना भ्रष्टाचारमुक्त शासन म्हणायचे होते. मात्र, त्यांच्याकडून भ्रष्टाचारी शासन म्हटले गेले. पुष्पा या उपमु‘य..

भारतात भरपूर नोकऱ्या, पण पगाराची समस्या; इन्फोसिसच्या माजी सीएफओंचे मत

बंगळुरु,भारतात रोजगार निर्मितीवरून विरोधी पक्षांनी गेल्या निवडणुकीत मोदी सरकारवर टीकेची झोड उठविलेली होती. मात्र, इन्फोसिसचे माजी सीएफओ आणि गुंतवणूकदार टी. व्ही. मोहनदास पै यांनी भारतात नोकऱ्या नाही तर पगाराची समस्या असल्याचे म्हटले आहे. भारतात नोकऱ्या उपलब्ध आहेत. मात्र, कमी पगारामुळे पदवीधारक तयार नसल्याचे सांगत बेरोजगारीच्या आकड्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी तयार होत नाहीत. ..

काँग्रेसच्या लोकसभेतील नेत्याविषयी अद्याप अनिश्चितता; सोमवारपासून संसदेचे अधिवेशन

नवी दिल्ली,17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक विस्कळीत झालेले दिसत आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र विरोधी पक्षांकडून अशा प्रकारचे कुठलेही पाऊल उचललेले दिसून आले नाही.   लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकते, असे राज्यसभा खासदार पी.एन. पुनिया यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला ..

पुन्हा पुलवामासारख्या हल्‍ल्‍याची धमकी; ॲलर्ट जारी

नवी दिल्ली, जम्‍मू काश्मीरमध्ये आईडी स्‍फोटाची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट लागू करण्यात आला आहे. पाकिस्‍तानने पुलवामामध्ये हल्‍ल्‍याच्या धमकीची माहिती भारत आणि अमेरिकेला सांगितली आहे. दहशतवाद्‍यांना झाकिर मूसाच्या हत्‍येचा बदला घ्‍यायचा आहे. याची माहिती मिळताच जम्‍मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर जम्‍मू काश्मीर पोलिसांकडून राजमार्गावर कडक नजर ठेवली आहे. पाक..

बालाजी चरणी तब्बल ६ किलो सोन्याचे हात अर्पण

तिरुपती,येथील बालाजी मंदिरात भगवान वेंकटेश्‍वराला तामिळनाडूतील एका उद्योगपतीने सोन्याचे हात अर्पण केले. ‘अभय हस्तम’ आणि ‘काती हस्तम’ या हातांचे वजन प्रत्येकी सहा किलो आहे. त्यांची किंमत 2.25 कोटी रुपये आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानकडून सांगण्यात आले की हे हात सकाळच्या पूजेवेळी देवाला अर्पण करण्यात आले.   तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील व्यावसयिक थंगा दुराई यांनी हे सोन्याचे हात अर्पण केले आहेत. त्यांनी सांगितले, मी लहानपणापासूनच वेंकटेश्‍वराचा भक्‍त ..

बिहारमध्ये मेंदुज्वरामुळे मृतांचा आकडा ८४ वर; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा तातडीचा दौरा

मुझफ्फरपूर,बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये ॲक्युट इन्सेफलायटिस सिन्ड्रोम (एईएस) या मेंदूज्वराने थैमान घातले असून यामध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून ८४वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. या आजाराची लागण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तरीही यावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, या बिकट परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुझफ्फरपूरच्या तातडीच्या दौऱ्यावर असून या आजाराची माहिती घेत आहेत. दरम्यान, ..

गोव्यात भीषण अपघात; तीन ठार

 पणजी,गोव्यातील चोपेम-सिओलीम मार्गावरील पुलावर झालेल्या दोन कारमधील भीषण अपघातात पेर्णेम येथील तीन जण जागीच ठार झाले आहेत.  महाराष्ट्रात नोंदणी असलेली एसयुव्ही कार बार्देस आणि पेर्णेम तालुक्याला जोडणाऱ्या पुलावर एका बसला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या कारवर आदळली. यामध्ये एका कार्यक्रमाला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीत मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत एसयुव्हीचा चालक पळून गेला होता. अपघातानंतर एसयुव्हीला आग लागली. यामध्ये एसयुव्ही ..

अध्यादेश आणून राम मंदिर बनवा; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

अयोध्या,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सहकुटुंब शिवसेनेच्या 18 खासदारांसह अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत अयोध्येचा दौरा केला आहे. पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेनंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापला आहे. राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच अशी आग्रही मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतली आहे.  रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ..

जात, धर्म, आर्थिक स्तर न पाहता 'सीनिअर सिटीझन'ना पेन्शन

- बिहार ठरलं पहिलं राज्यआयुष्याच्या संध्याकाळी सगळ्याच आजी-आजोबांना एक हक्काचा आधार हवा असतो. शरीर थकलेलं असतं, मनालाही उमेद हवी असते आणि काही जणांना आर्थिक पाठबळही गरजेचं असतं. अशाच ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहारमधील नितीशकुमार सरकारनं 'युनिव्हर्सल ओल्ड एज पेन्शन स्कीम' सुरू केली आहे. त्या अंतर्गत, जात, धर्म किंवा आर्थिक स्तर न पाहता ६० वर्षांवरील ज्येष्ठांना सरकार दरमहा पेन्शन देणार आहे.  देशातील अनेक राज्यांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना आहेत. परंतु हे निवृत्तीवेतन केवळ दारिद्र्यरेष..

महिलांच्या मोफत मेट्रो प्रवासाला 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा विरोध

नवी दिल्ली,दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मास्टरस्ट्रोक मारला. दिल्लीत मेट्रो आणि बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपच्या या प्रस्तावित योजनेला 'मेट्रो मॅन' अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी विरोध दर्शवला आहे. ई श्रीधरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं असून या प्रस्तावाला विरोध करावा असं आवाहन केलं आहे.   'सर, मी तुम्हाला विनंती करतो, महिलांना मेट्रोत मोफत ..

वायू वादळाचा धोका टळला

गुजरातकडे येणारे वादळ आता ओमानकडे सरकल्याने येथील लोकांना असलेला धोका टळला आहे त्यामुळे ज्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते त्यांनी आता त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास हरकत नाही, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी शुक्रवारी सांगितले.  अरबी समुद्रातील हे वादळ पश्चिम दिशेने ओमानकडे निघाले आहे त्यामुळे वादळाचा धोका टळल्यानंतर मुख्यमंत्री रूपानी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात ज्या २.७५ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते त्यांना घरी जाऊ देण्यास हिरवा कंदिल देण्यात ..

मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार :संजय राऊत

नवी दिल्ली,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही उपस्थित राहणार आहेत. अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.   लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठं यशही मिळालं आहे. त्यामध्ये शिवसेनेला 18 जागांवर विजय ..

घरावर बॉम्ब फेकला; टीएमसीचे दोन कार्यकर्ते ठार

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरू झालेल्या हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. मुर्शिदाबाद जिल्ह्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या घरावर बॉम्ब फेकून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. खैरूद्दीन शेख आणि सोहेल राणा अशी मृत्युमुखी झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. या हत्येला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.   मुर्शिदाबादमध्ये अज्ञातांनी या कार्यकर्त्यांच्या घरावर बॉम्ब फेकल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाला. आम्ही झोपलो होतो. अचानक ..

जनगणनेच्या माहितीचे पहिल्यांदाच ऑनलाइन संकलन

देशात 2021 मध्ये जनगणना करण्यात येणार असून पहिल्यांदाच जनगणनेच्या माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 या कालावधीत देशातील काही ठराविक जिल्ह्यांतील गावांमध्ये आणि शहरांमध्ये याची प्री टेस्टदेखील करण्यात येईल.  आगामी जनगणनेमध्ये काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 11 जून या कालावधीत पुण्यातील यशदा येथे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ..

...आणि या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींच्या डोक्यावर धरली छत्री

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीसाठी किरगिझस्तान येथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाटयाला एक वेगळा सन्मान आला. राजधानी बिश्केक येथे पोहोचल्यानंतर किरगिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष सूरॉनबे जीनबीकोव्ह यांनी समारंभपूर्वक मोदींचे स्वागत केले. त्याचवेळी तिथे पाऊस सुरु झाला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष सूरॉनबे जीनबीकोव्ह यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरली होती.  या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले. सरकारी कार्यक्रमांमध्ये अचानक पाऊस सुरु ..

चंद्राबाबूंना विमानतळावर VIP सुरक्षा नाकारली

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते एन. चंद्राबाबू नायडू यांची शुक्रवारी मध्यरात्री गन्नवरम विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानापर्यंत जाण्यासाठी त्यांना व्हीआयपी सुविधा नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य प्रवाशांसारखे बसमधून प्रवास करावा लागला. या घटनेमुळे टीडीपीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. भाजप आणि वायएसआर काँग्रेस सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप टीडीपीने केला आहे.   तेलुगु देशम पार्टीचे प्रमुख असलेल्या चंद्राबाबू यांना विमानापर्यंत जाण्यासाठी ..

दिल्लीतील १० हजार डॉक्टर आज संपावर

नवी दिल्ली,पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या दिल्ली मेडिकल असोसिएशन (DMA) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. १७ जून रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याची घोषणा या संघटनेने केली आहे. या संपाला पाठिंबा देत एम्ससह दिल्लीतील १८ हॉस्पिटलमधील १० हजारांहून अधिक डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत कामावर न येण्याची अटच डॉक्टरांनी ठेवली आहे. पश्चिम बंगालमधील ७०० डॉक्टरांनी आतापर्यंत ..

रामविलास पासवानांच्या लोकजनशक्तीमध्ये बंडखोरी

नवी दिल्ली,केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या एलजेपी अर्थात लोकजनशक्ती पार्टीमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी एलजेपी सेक्युलर नावाचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांमध्ये पक्षाच्या माजी खासदारांपासून महासचिवांपर्यंतचा समावेश आहे. एलजेपीचे राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा यांच्यासमवेत एलजेपीचे 116 पदाधिकारीही पक्षातून बाहेर पडले आहेत.    जे पक्षात एका दिवसापूर्वीच सहभागी झाले, त्यांनाही पक्षाकडून तिकीट देण्यात ..

धावत्या रेल्वेत महिलेची प्रसूती ; टीटीई बनला 'रँचो'

नवी दिल्ली : अमीर खानचा 'थ्री इडियट्स' सिनेमात रँचो या पत्राने आपत्कालीन परिस्थितीत व्हॅक्युम क्लिनरने डिलेव्हरी केली होती. अशीच एक घटना काळ घडली आहे. रेल्वेच्या दिल्ली विभागात टीटीई (Travelling Ticket Examiner) म्हणून कार्यरत असणाऱ्या एच एस राणा यांनी धावत्या रेल्वेत कुणीही डॉक्टर उपलब्ध नसताना काही प्रवाशांच्या मदतीने  एका महिलेची प्रसुती पार पाडण्यात मोलाची मदत केली.  राणा यांच्या या मदतीमुळे महिलेची सुखरुप प्रसूती  झाली. भारतीय रेल्वेनेही या घटनेची दखल घेत टीटीई राणा यांचे ..

आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, चंद्रपूरचा कार्तिकेय देशात पहिला

नवी दिल्ली,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी (आयआयटी) प्रवेशसाठीची आयआयटी-जेईई Advanced प्रवेश परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत नागपूरच्या कार्तिकेय गुप्ताने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील असलेला कार्तिकेय या प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत एका खासगी प्रशिक्षण संस्थेच्या निवासी हॉस्टेलमध्ये दोन वर्षं स्थायिक झाला होता.  जेईई मुख्य सामायिक प्रवेश परीक्षेत कार्तिकेय गुप्ता याने १०० पर्सेटाइल ..

पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर,जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ..

युपीए सरकारमुळे 'चांद्रयान -2'चे प्रक्षेपणाला उशीर

-इस्त्रोचा माजी अध्यक्षांचा आरोपनवी दिल्ली,भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते जी. माधवन नायर यांनी यूपीए सरकारवर गंभीर आरोप केले आहे. चांद्रयान-2 प्रक्षेपण करण्याची योजना 2012 मध्ये झाली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी याबाबत निर्णय घेण्यास विलंब केला. त्यामुळे चांद्रयान-2 चे प्रक्षेपण सात वर्षांनंतर झाले, असे जी. माधवन नायर यांनी म्हटले आहे.  केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अनेक योजनांवर जोर देण्यात आला. यामध्ये ..

जेडीयू तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात

पाटणा, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकाचा विरोध करणार असल्याचे जाहीर केले आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि बिहारचे मंत्री श्याम रजक म्हणाले, जनता दल युनायटेड तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात आहे. तिहेरी तलाक हा एक सामाजिक मुद्दा आहे. हा समाजात बसून सोडवला पाहिजे. रजक म्हणाले, राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात मत दिले आहे. जेडीयूच्या या निर्णयाने भाजपाला धक्का बसला आहे. सध्या भाजपा राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष असला तरी ..

जम्मू-काश्मीरः पुलवामातील अवंतीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरः पुलवाम्यातील अवंतीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा..

पश्चिम बंगालमधील घटनेविरोधात देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर

नवी दिल्ली,पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ दिल्ली मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनांकडून शुक्रवारी (14 जून) राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग, अन्य विभाग आणि शैक्षणिक दिनक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला ..

छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपूर,छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आहे. कांकेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ही चकमक पार पडली अशी माहिती नक्षलवादी विरोधी अभियानाचे महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली. ताडोकी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या मालेपारा आणि मुरनार गावांच्या दरम्यान असणाऱ्या जंगलात ही चकमक पार पडली.  राज्य पोलीस महासंचालक (नक्षलवादी विरोधी अभियान) गिरधारी नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी विरोधी मोहिम राबवली जात असताना गस्त पथकावर नक्षलवाद्यांनी ..

मुख्यमंत्री ममतांच्या अल्टिमेटमनंतरही डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

पश्चिम बंगालमध्ये बुधवारपासून सुरू असलेले डॉक्टरांचे आंदोलन थांबत नसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना तातडीने कामावर रूजू होण्यास सांगितले होते, शिवाय यासाठी चार तासांची मुदतही दिली होती. मात्र डॉक्टरांनी त्यांचा आदेश न जुमानता सामुहिक राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय डॉक्टारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयास तसेच रूग्णालयास पुरेशी सुरक्षा पुरवली जावी, एनआरएस रूग्णालयात१० जुन रोजी डॉक्टरांवर हल्ला करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली ..

स्वतःच्या अंतराळस्थानक निर्मितीची भारताची योजना : इस्रो

महत्वाकांक्षी चांद्रयान-२ चे काऊंडाऊन सुरु झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यातही आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी म्हटले आहे.  हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘गगनयान’ मोहिमेचा पुढील भाग असेल असेही डॉ. सिवन यांनी स्पष्ट केले आहे. अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला ‘गगनयान’ कार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. ..

हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह सापडले

इटानगर,बेपत्ता झालेल्या एएन३२ विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात आढळले आहे. बचाव दलाने याची पुष्टी केली असून या विमानात असणारे सर्व १३ जवान शहीद झाले आहेत. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष मिळाल्याच्या ठिकाणी आज सकाळी १५ सदस्यीय बचाव पथक दाखल झाले होते.   मंगळवारी, भारतीय हवाई दलाच्या एएन ३२ या विमानाचे अवशेष सियांग जिल्ह्यात आढळून आले. अपघाताचे ठिकाण अतिशय उंचावर आणि घनदाट जंगलात आहे. त्यामुळे विमानाचे अवशेष असलेल्या ठिकाणी पोहचणे हे आव्हानात्मक काम होते.    अपघातात ..

मुलाच्या शाळेची फी भरण्यास पैसे नसल्याने कुटुंबाने केली आत्महत्या

चेन्नई,खासगी शाळांचे पेव फुटल्याने गेल्या काही काळात शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मुलांच्या शाळेची फी आणि अन्य खर्च भागवताना अनेक कुटुंबे मेटाकुटीस येतात. दरम्यान, तामिळनाडूतील नागापट्टणम जिल्ह्यामधील वेलिपायम येथे मुलाच्या शाळेची फी जमा करण्यास पैसे नसल्याने एका जोडप्याने आपल्या ११ वर्षीय मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या जोडप्याने मुलाच्या शाळेची फी जमा करण्यासाठी पैसे उधार घेतले होते. मात्र हे पैसे परत करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मुलासह ..

MeToo प्रकरणी नाना पाटेकरांना दिलासा; पुरावेच नाहीत

मुंबई,कथित विनयभंगाप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर याच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असा स्पष्ट उल्लेख असलेला बी समरी अहवाल ओशिवरा पोलिसांनी कोर्टात दाखल केल्याने नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकरांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर देशभरात 'MeToo' ही चळवळ सुरू झाली होती. या तक्रारीनंतर नाना पाटेकर अडचणीत आले होते.   अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यासह, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्दिकी आणि राकेश सारंग यांच्याविर..

हवाई दलाच्या अपघातग्रस्त ‘एएन-३२’ विमानातील सर्व १३ जणांचा मृत्यू

आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर बेपत्ता झालेल्या हवाईदलाच्या अपघातग्रस्त एनएन-३२ विमानाचा संपूर्ण सांगाडा गुरूवारी शोध पथकाला हाती लागला. यातील सर्व १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. वायुसेनेकडून याबाबत माहिती देण्यात आली असुन, वायुसेनेच्या टि्वीटर वर अधिकृतरित्या याबाबत कळवण्यात आले आहे. गुरूवारी शोधपथक अपघातग्रस्त विमानाच्या ढिगा-याजवळ पोहचले होते. या ठिकाणी त्यांना कोणाच्याही मृतदेहाचे अवशेष मिळाले नाही. त्यामुळे या विमान अपघातात सर्व १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे ..

प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनवा

- काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणीरायबरेली,युपीएच्या अध्या सोनिया गांधी बुधवारी रायबरेली या (12 जून) त्यांच्या लोकसभा मतदार संघात दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीदेखील उपस्थित होत्या. सोनिया यांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीयादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांना 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी मांडली.&nbs..

आंध्रात आमदारानं घेतली मुख्यमंत्र्याच्या नावानं शपथ

अमरावती,नेत्याची मर्जी राखण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरचा घाम स्वत:च्या रूमालानं पुसणं, चपला उचलणं, नेत्याची देवळं बांधणं असे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. आंध्रातील एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीनं या सर्वांवर कडी केली आहे. या महाशयांनी थेट मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावानं आमदारकीची शपथ घेण्याचा पराक्रम केला आहे. आंध्रातील या प्रकारामुळं राजकारणातील 'होयबा' संस्कृतीची जोरदार चर्चा देशात रंगली आहे.   श्रीधर रेड्डी असं या आमदार महाशयांचं नाव असून ते नेल्लोर मतदारसंघातून वायएसआर काँग्रेसच्या ..

मोबाइल गेम कमाईत पबजीचा स्ट्राइक

मुंबई,मोबाइल गेमिंग विश्वात खळबळ माजवणाऱ्या पबजी गेमने कमाईतही बाजी मारली आहे. इतर मोबाइल गेमपेक्षा पबजीने सर्वाधिक कमाई केली आहे. चीनसोडून इतर देशांमध्ये पबजीचे दररोज ५ कोटी अॅक्टीव्ह युजर्स आहेत. तर, ४० कोटींपेक्षा जास्त वेळा हा गेम डाउनलोड करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार, पबजीने मागील महिन्यात १४६ मिलियन डॉलरची कमाई केली आहे.   मागील वर्षी पबजी मोबाइल गेमने ७०० मिलियन डॉलरची कमाई केली होती. अनेक मोबाइल इन-गेम पर्चेस असतात. इन-गेम लूकसाठी स्कीन आणि वेशभूषेसाठी खर्च करतात. पबजीने आपले ..

‘सकाळी 9.30 पर्यंत ऑफिसला पोहोचा, घरून काम करू नका’; मोदींचे मंत्र्यांना आदेश

पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपल्या निवासस्थानातून काम न करण्याचा सल्ला देच संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणताही दौरा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वत:च्या कार्यशैलीचे उदाहरण दिले. जेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबर ..

सोनिया गांधींनी मतदारांचे मानले आभार

रायबरेली,उत्तर प्रदेशात भाजपने काँग्रेसचा सणसणीत पराभव केला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी अमेठीमध्ये पराभूत झाले; पण रायबरेलीतून यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून आल्या. या विजयाबद्दल सोनिया गांधी यांनी बुधवारी रायबरेलीला भेट देऊन मतदारांचे आभार मानले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कन्या व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही होत्या.  रायबरेलीपासून अमेठी जवळ असूनही सोनिया व प्रियांका गांधी या तिथे जाण्याची शक्यता नाही. सोनिया व प्रियांका गांधी यांचे बुधवारी सकाळी विमानाने फुरसतगंज येथे ..

केंद्रात उपसचिव, संचालक पदे भरणार खासगी क्षेत्रातून

नवी दिल्ली,नोकरशाहीच्या रचनेत (ब्युरोक्रॅटिक हायरार्की) निर्णय प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी उपसचिव आणि संचालकांची पदे खासगी क्षेत्रातून भरण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. सामान्यत: ही पदे सरकारी नोकरांतून म्हणजे भारतीय प्रशासन सेवेसारख्या (आयएएस) गट-अ मधून, तसेच केंद्रीय सचिवालय सेवेत बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांतून भरली जातात.  कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (डीओपीटी) सचिव सी. चंद्रमौली यांनी संबंधित अधिकाºयांना उपसचिव आणि संचालक या पातळीवर ..

राज्यसभेतील भाजपचे पीयूष गोयल उपनेते

नवी दिल्ली,केंद्रीय रेल्वे व वाणिज्य, उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेतील भाजपच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याआधी हे पद केंद्रीय मंत्री रविप्रसाद यांच्याकडे होते. मात्र, ते आता लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागी गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्यसभेतील भाजपच्या नेतेपदी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत आहेत. पीयूष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते भाजपचे माजी खजिनदार आहेत. बिहारमधून लोकसभेवर निवडून आलेले भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांची ..

बिग बींनी फेडले २,१०० शेतकऱ्यांचे कर्ज

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंय. या शेतकऱ्यांचं कर्ज फेडल्याची माहिती स्वत: अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.   सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या बिग बींनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना लिहिलं आहे की, 'मी दिलेलं वचन पूर्ण केलं. बिहारमधील २,१०० कर्जबाजारी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि वन टाइम सेटलमेंट (OTS) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली. याशिवाय, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही ..

केंद्र सरकार ONGC ची गोल्फ मैदाने विकणार

नवी दिल्ली,केंद्र सरकारने ओएनजीसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला देशभरातील एकूण १८ गोल्फ मैदाने विकण्याच्या सूचना केल्या आहेत. ही मैदाने कंपनीच्या आधिकाऱ्यांना गोल्फ खेळण्यासाठी, तसेच आपल्या व्यवसाय भागीदारांच्या पाहुणचारासाठी वापरण्यात येत होती. शिवाय डिपार्टमेट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटने (दीपम) ही मालमत्ता 'असुरक्षित मालमत्ता' म्हणून घोषित केली आहे.   दीपमने नुकताच सरकारी विभाग आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेसच्या जमिनी आणि इतर असुरक्षित मालमत्ता कोणत्या आहेत ..

वायूची वादळ’वाट’ बदलली; परंतु गुजरातवरील धोका कायम

‘वायू’ चक्रीवादळामुळे गुजरातवर निर्माण झालेला धोका काहीशा प्रमाणात कमी झाला आहे. 150 किलोमीटर प्रति तास वेगाळे गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी जवळून जाणार आहे. त्यामुळे गुजरातवरील धोका काहीसा कमी झाला असला तरी पूर्णत: संपला नाही. हे चक्रीवादळ वेरावळ, पोरबंदर आणि द्वारकाजवळून जाणार असून या भागांमध्ये जोरदार पावसाची शत्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यादरम्यान आपात्कालिन परिस्थितीच..

कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आज तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. शिवाय मंत्रीमंडळाने जम्मू – काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजुरी दिली आहे.  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, मुस्लिम महिलांचा विचार करून मोदी सरकार आगामी संसद सत्रात तीन तलाकचे विधेयक सादर करेल. अध्यादेशाचं कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात ..

सपा नेत्याच्या घरावर सीबीआयची धाड, खाण घोटाळा प्रकरण

नवी दिल्ली,खाण घोटाळा प्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते गायत्री प्रजापती यांच्या घरावर सीबीआयने धाडी टाकल्या आहे. याप्रकरणी दिल्ली आणि उत्तरप्रदेशातील 22 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली. तसेच, सीबीआयकडून अमेठीतील गायत्री प्रजापती यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आहे.   अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय खाण घोटाळ्याची चौकशी 2016 पासून करीत आहे. याप्रकरणी सीबीआयने अज्ञात आरोपींसह सरकारी अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी ..

एएन-32 चा शोध घेण्यासाठी पथक अपघातस्थळी

-वायुदल, लष्कर आणि गिर्यारोहकांचा समावेशनवी दिल्ली,अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात कोसळलेल्या वायुदलाच्या एएन-32 मालवाहू विमानातील वायुदलाचे कर्मचारी बचावल्याची शक्यता गृहीत धरून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय वायुदल, लष्कर आणि गिर्यारोहक सहभागी झाले आहेत. एएन-32 विमान एका डोंगरावर कोसळले. ढगांमुळे दृष्यता कमी असल्याने ते कोसळले असावे. विमानाच्या अवशेषाची छायाचित्रे समोर आली असून, यामध्ये ते डोंगर ओलांडण्याच्या स्थिती असतानाच कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील ढगांमुळे दृष्यता नसल्याने ..

नक्षलवाद्यांनी जाळला नऊ कोटींचा तेंदुपत्ता

-छत्तीसगडमध्ये हैदोसगारियाबंद,गारियाबंद जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये ठेवलेला नऊ कोटी रुपयांच्या तेंदुपत्त्याच्या साठ्याला नक्षलवाद्यांनी आग लावल्याची माहिती अधिकर्‍यांनी आज बुधवारी दिली. नवामुंडा गावात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी हैदोस घातल्याची माहिती विभागीय वनअधिकारी जे. आर. भगत यांनी दिली.   महिला नक्षलवाद्यांचा समावेश असलेल्या 12 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री तीन सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतल्यावर वनविभागाच्या तीन गोदामांना आग लावली. या गोदामांत 1700 ..

वैमानिकरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी यशस्वी

बालासोर,भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करीत विकसित केलेल्या आवाजापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करणार्‍या पहिल्या वैमानिकरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी आज बुधवारी ओडिशाच्या तटवर्ती भागात यशस्वी झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली. आवाजापेक्षा जास्त वेगाने मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यासाठी भारताने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात हे विमान अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.   बंगालच्या उपसागरातील डॉ. अब्दुल कलाम ..

गुजरातमध्ये येत्या 12 तासात 'वायू' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

मुंबई,अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून अवघ्या 630 किमी दूर आहे. मुंबईच्या किनारपट्टीला वायू वादळाचा धोका नाही. तरीही मच्छिमारांनी आज आणि उद्या खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गुजरातमध्ये हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तेथे हाय अलर्ट जारी केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित स्थानी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वायू चक्रीवादळ सध्या किनारपट्टीपासून 630 किमी अंतरावर असून येत्या 12 ..

बार काउन्सिलच्या अध्यक्षाची कोर्टाच्या आवारात हत्या

उत्तर प्रदेश बार काउन्सिलच्या अध्यक्ष दरवेश यादव यांची सहकारी वकिलानेच आग्रा न्यायालयाच्या आवारात गोळया झाडून हत्या केली. दोन दिवसांपूर्वीच दरवेश यांची बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. आग्रा जिल्हा न्यायालयात कार्यक्रमासाठी येत असताना त्यांच्यावर गोळया झाडण्यात आल्या.  मनिष असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. अध्यक्षपदी निवड झाल्याने दरवेश यादव यांच्या स्वागतासाठी ..

मदरशांमध्ये गोडसे, प्रज्ञासिंह जन्माला येत नाहीत : आझम खान

रामपूर, मदरशांमध्ये नथुराम गोडसे किंवा प्रज्ञासिंह ठाकूर जन्माला येत नाही, अशी बडबड समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली आहे. देशातील मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील वक्तव्य केले आहे. नथुरामच्या विचारांचा प्रचार करणारे लोकशाहीचे शत्रू आहेत, हे प्रथम लोकांना सांगायला हवे. जे दहशतवादी घटनांमधील आरोपी आहेत, त्यांना सन्मान देणे गैर आहे, असेही ते म्हणाले.   केंद्र ..

‘राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील’ : रणदीप सुरजेवाला

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील अशी माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली असून काँग्रेस नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी काँग्रेस नेते वारंवार राहुल गांधींची भेट आहेत. मात्र राहुल गांधी आपल्या मतावर ठाम असल्याचं कळत होतं. पण सुरजेवाला यांनी राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.  काँग्रेस ..

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPFचे पाच जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतावाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. अनंतनाग बस स्थानकाजवळ झालेल्या या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत.   या अगोदर जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. शिवाय गोळीबारात एक जवान जखमी देखील झाला होता. पाकिस्तानच्या गोळीबारास भारतीय सैन्याकडून सडतोड प्रत्युत्तर देण्यात आले होते...

...तरीही मोदी टाळणार पाकिस्तानची हवाई हद्द

किर्गीझस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी दिली असली, तरी देखील पाकिस्तान मार्गे न जाण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. पाकिस्तानची हवाई हद्द टाळून पंतप्रधान ओमान, इराण आणि मध्य आशिया अशा लांब पल्ल्याच्या मार्गाने बिश्केकला पोहोचणार आहेत. बिश्केकमधील एससीओ संमेलन येत्या १३ आणि १४ जून असे दोन दिवस होत आहे.   भारताने पाकिस्तानकडे पंतप्रधानांच्या ..

पश्चिम बंगालमध्ये संघर्ष शिगेला

पश्चिम बंगालमध्ये आज भाजपा कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. राज्य सरकारचा निषेध करत बिपीन बिहारी गांगुली मार्गावरून लाल बाजारच्या दिशेने निघालेल्या व आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या शिवाय पाण्याचे फवारे देखील सोडले. यामुळे येथील परिस्थिती अधिकच चिघळताना दिसत आहे. आंदोलकांकडून हातात भाजपाचा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ ही घोषणा देत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.  भाजपा कार्यकर्त्याच्य..

'या' तारखेला 'चांद्रयान-२' अवकाशात झेपावणार

हैदराबाद,भारताच्या महत्त्वाकांक्षी व बहुप्रतीक्षित 'चांद्रयान-२' या मोहिमेची तारीख आज भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केली. त्यानुसार, येत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचे 'चांद्रयान-२' अवकाशात झेपावणार आहे. 'चांद्रयान-२'च्या निमित्ताने अवघ्या दहा वर्षांत 'इस्रो' दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे.  'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली. याचवेळी या मोहिमेशी संबंधित माहिती देणारी एक वेबसाइटही आज लाँच करण्यात आली. 'चांद्रयान-१'च्या ..

ममता बॅनर्जींच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक

कोलकाता,लोकसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार आणखीनच वाढला आहे. सत्तापक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तिघांच्या राजकीय हत्या झाल्या आहेत. त्यावरून तृणमूल काँग्रेस तसेच भाजपा हे एकमेकांवर आरोप करीत आहेत.   दरम्यान, आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनादरम्यान जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. तसेच, यावेळी आक‘मक ..

उष्माघातामुळे चार रेल्वे प्रवाशांचा मृत्यू

- केरळ एक्सप्रेसमधील घटनाआग्रा,देशात वाढत्या तापमानामुळे उष्णतेचे प्रमाणही वाढले आहे. उष्माघातामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात बाहेर उघड्यावर राहणार्‍यांचे प्रमाण जास्त असले तरी एका वृत्तानुसार रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही उष्णतेचा फटका बसून चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तरप्रदेशातील आग्रा ते झाशी मार्गादरम्यान केरळ एक्सप्रेसमधील स्लीपर कोचमध्ये प्रवास करणार्‍या चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर भारतात वाढत्या तापमानाने उच्चांक ..

नीरव मोदीसाठी मुंबई मध्यवर्ती कारागृहात ‘बराक क्रमांक १२’चा कक्ष

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीसाठी ऑर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेली खोली अर्थात ‘बराक नं. १२’ तयार ठेवण्यात आली आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार आहे. राज्याच्या गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.   जर नीरव मोदीला मुंबई मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार असेल तर सुरक्षेबाबत या कारागृहाची स्थिती काय आहे आणि त्या ..

कैलास मानसरोवर यात्रेला प्रारंभ

- जयशंकर यांची घोषणानवी दिल्ली,वार्षिक कैलास मानसरोवर यात्रेला आज मंगळवारपासून औपचारिक प्रारंभ झाला असल्याची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज केली. लिपुलेख मार्गाने या यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा भारत आणि चीन यांच्यातील मैत्री व सहकार्याचे संबंध आणखी बळकट करण्यासोबतच, दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये संवादाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे, असे जयशंकर यांनी जवाहरलाल नेहरू भवनात यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.   चीनमधील ..

बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु : ममता बॅनर्जी

कोलकाता,पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती शासन लागू करण्याची तयारी केंद्रात सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला असून, बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याचे आरोप ममतांनी केले आहे. राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेल्या भेटीवर त्या आपली प्रतिकिया देतांना बोलत होत्या.  लोकसभा निवडणुकीत सुरू झालेले भाजप आणि ममता यांच्यातील राजकीय युद्ध थांबायला ..

‘चांद्रयान-2’चा मुहूर्त 9 जुलै!

- इस्रोची तयारी सुरूनवी दिल्ली,भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात्‌ इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेकरिता 9 जुलै हा मुहूर्त निश्चित केला आहे. तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळुरूच्या ब्यालालू येथे या मोहिमेची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.   या मोहिमेवर जाणारे अंतराळयान 19 जून रोजी बंगळुरू येथून रवाना होईल आणि 20 किंवा 21 जून रोजी ते श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर हे अंतराळयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल, अशी माहिती इस्रोच्या अधिकार्R..

नव्या मंत्रिपरिषदेची पहिली बैठक उद्या

- पंतप्रधान मोदी करणार मार्गदर्शननवी दिल्ली,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिपरिषदेची पहिली बैठक उद्या बुधवारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी मंत्र्यांना मार्गदर्शन करतानाच, या सरकारमध्ये त्यांची भूमिका काय असेल, याची कल्पना देणार असून सरकारच्या आगामी पाच वर्षांतील कामांची माहिती ते मंत्र्यांना देणार आहेत.    विशेषत: राज्य मंत्री आणि स्वतंत्र पदभार असलेल्या मंत्र्यांची भूमिका काय असेल, याबाबतची माहिती देण्यासोबतच, केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या विभागातील कनिष्ठ ..

अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली विकासासाठी नव्या संस्थेस मंजुरी

अंतराळातील संकटांचा सामना करण्यासाठी देशाच्या सैन्य दलाचे लष्करी सामर्थ वाढवण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारने एका नव्या संस्थेस मंजुरी दिली आहे. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी ही संस्था अत्याधुनिक युद्धशस्त्र प्रणाली व तंत्रज्ञानाचा विकास करेल.  पंतपतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखील सुरक्षाविषयक कॅबिनेट कमिटीच्या बैठकीत मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी या नव्या संस्थेची माहिती दिली. डिफेन्स रिसर्च एजन्सी (डीएसआरओ) असे नाव असेलेली या नव्या संस्थेला अंतराळातील युद्धशस्त्र ..

ममतादीदींनी पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान बनण्यापासून रोखावे

पाटणा,पश्चिम बंगालमधील  भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद दिवसेंदिवस वाढत असून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल जनता दल युनायटेडच्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान बनण्यापासून ममतादीदींनी रोखावे, असे आवाहन जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी केला आहे.  अजय आलोक म्हणाले की, पश्चिम बंगालमधून बिहारी लोकांना बाहेर काढले जात आहे. आणि तेथे सातत्याने हत्या होत आहेत. ममतादीदींनी पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान होण्यापासून रोखावे, असे आवाहन आलोक ..

इंडिगोकडून 'Summer Sale' ऑफर; 999 रुपयांत करा विमान प्रवास

नवी दिल्ली,इंडिगो या एअरलाइन्सने खास प्रवाशांसाठी समर सेल ऑफरची सुरुवात केली आहे. कमीत कमी खर्चात नॅशनल आणि इंटरनॅशनल टूरची सफर करण्याची संधी इंडिगोने दिली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी 999 रुपयांपासून दर सुरु होणार आहेत तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 3499 रुपये दर आकारण्यात येणार आहे. आजपासून इंडिगोने या ऑफरची सुरुवात केली आहे.  इंडिगोकडून ही ऑफर 11 जूनपासून 14 जूनपर्यंत या कालावधीसाठी देण्यात आली आहे. या कालावधी दरम्यान तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना 26 जून ते 28 सप्टेंबरपर्यंत प्रवास करण्याची ..

बिग बॉसच्या घरात भरणार सदस्यांची शाळा

मुंबई: बिग बॉस दर आठवड्याला घरातील सदस्यांना नवनवीन टास्क देतात. त्यामुळे बिग बॉस नेमका कुठला टास्क सोपवणार याची उत्सुकता नेहमी सदस्यांमध्येही असते. या आठवड्यामध्ये बिग बॉस घरातील सदस्यांवर शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत.    जून महिना नुकताच सुरु झाला आहे... शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते... त्याच जुन्या आठवणींना आणि आपल्यात दडलेल्या लहान मुलाला, निरागसतेला उजाळा देण्यासाठी बिग बॉस हे कार्य घरातील सदस्यांवर सोपावणार आहेत... ज्यामध्ये ..

बेपत्ता विमान एएन-३२ चे अवशेष दिसले; शोधमोहिमेला वेग

इटानगरःभारतीय हवाई दलाचे बेपत्ता विमान एएन-३२ चे अवशेष दिसल्याची माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात हे अवशेष दिसल्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या शोधमोहिमेला वेग आला आहे. भारतीय हवाई दलाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. आसाम येथून ३ जून रोजी एएन-३२ या विमानाने १३ प्रवाशांसह उड्डाण केले होते. यानंतर या विमानाची असलेला संपर्क तुटला होता. भारतीय हवाई दलाने शोधमोहिम सुरू केली होती. मात्र, खराब हवामानामुळे ठोस गोष्ट हाती लागत नव्हती. अखेर हवाई दलाचे हेलिकॉप्टर एमआय-१७ ..

भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड

नवी दिल्ली,टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची १७व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या खासदारांना ते सदस्यता आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. त्यांनी आतापर्यंत सात वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. वीरेंद्र कुमार हे मध्य प्रदेशातील टिकमगडचे खासदार आहेत. त्यांनी सागर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा विजय मिळवला आहे. तर तीन वेळा ते टिकमगड मतदारसंघातून विजयी झाले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे अल्पसंख्याक ..

अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती ढासळली

हैदराबाद, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा छोटा भाऊ आणि एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती खालावली आहे. अकबरुद्दीन यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी समर्थकांना अकबरुद्दीन ओवैसी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केले आहे.   अकबरुद्दीन ओवैसी चंद्रयानगुट्टा येथील आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 2011 मध्ये एका घटनेत अकबरुद्दीन यांच्यावर गोळीबारी करण्यात ..

पत्रकाराची ताबडतोब मुक्तता करा; सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले

नवी दिल्ली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप असलेले पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या अटकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने आज उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. कनोजिया यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे चुकीचेच आहे, मात्र त्यांच्या अटकेचे समर्थन करता येणार नाही. मनाचा मोठेपणा दाखवा, असे सुनावतानाच प्रशांत कनोजिया यांची तत्काळ तुरुंगातून सुटका करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला दिले आहेत.आपण मुख्यमंत्री योगी ..

मुस्लिमांमुळेच राहुल जिंकले : ओवैसी

वायनाडमध्ये मुस्लिमांमुळेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय झाला, तसेच भाजपाला हरवण्याची ताकत प्रादेशिक पक्षांतच आहे, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ते तेलंगणामध्ये एका सभेला संबोधित करत होते...

प्रफुल्ल पटेल ईडीपुढे हजर

 नवी दिल्ली:संपुआ सरकारच्या काळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई घोटाळााप्रकरणी माजी नागरी उड्डयण मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आज सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) येथील मुख्यालयात हजर झाले. सुमारे चार तास त्यांची चौकशी करण्यात आली.पटेल यांना गेल्या आठवड्यातही ईडीने समन्स बजावला होता, पण आधीच ठरलेल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे ते हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा समन्स जारी करण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ते हजर झाले.   ..

दिल्लीत पहिल्यांदाच पारा 48 अंश सेल्सिअसवर

नवी दिल्ली,देशात मान्सूनचा आगमन झालेले असले तरीही देशातील अनेक शहरांमधील तापमान वाढले आहे. राजधानी दिल्लीतील तापमानाने तर आज सर्व विक्रम मोडीत काढले. आज दिल्लीत तब्बल 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान आज नोंदवले गेल्याची माहिती स्कायमेटने दिली. हवामान खात्याने पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले.  मान्सूनपूर्व पावसाचे आगमन लांबल्याने तापमान वाढले आहे. उष्ण वारे वाहत असल्याने दिल्लीकर मेटाकुटीला ..

झारखंडमध्ये बसचा भीषण अपघात; 11 ठार

हजारीबाग, झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत आज सकाळी एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.   मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ..

काही लोक अजूनही पराभवाच्या धक्क्यातच; मोदींचा राहुल गांधींना टोला

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून काही लोक अद्याप बाहेर पडू शकलेले नाहीत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. तर भाजपा आणि घटकपक्ष यांच्या जागांची संख्या ३५० च्या पुढे गेली. काँग्रेसचं या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झालं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरस्कार आणि द्वेष ..

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ३०० किमीवर वादळ उठणार

मुंबई,राज्याच्या पश्चिम किनारपट्टीपासून ३०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात ११ ते १२ जून दरम्यान वादळ उद्भवण्याची शक्यता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. मात्र, हे वादळ किनारपट्टीवर धडकणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस किनारपट्टीवर वादळी वारे वाहतील. समुद्रही खवळलेला राहील. याच सुमारास कोकण आणि मुंबईत मोसमी पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारनं मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा दिला असून मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. साधारणपणे ७ जूनपर्यंत मोसमी पाऊस ..

कठुआ बलात्कार अन् हत्याप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

श्रीनगर,जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर या प्रकरणातील एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पठाणकोट न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गावाचा प्रमुख संजीराम, दोन पोलीस अधिकारी दीपक खुजारिया आणि सुरेंद्र वर्मा, पोलीस हेडकॉन्स्टेबल टिळक राज यांना पठाणकोट न्यायालयाने दोषी ठरवले आहे.  कठुआ येथील एका 8 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले व त्यानंतर तिची ..

दोष फक्त EVM, VVPAT चा नाही निवडणूक अधिकाऱ्यांचाही : शरद पवार

EVM मध्ये गडबड आहे अशी शंका घेणाऱ्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा एक गुगली टाकला आहे. कारण त्यांनी आता म्हटलं आहे की दोष फक्त EVM, VVPAT चा नाही तर निवडणूक अधिकाऱ्यांचाही आहे. ज्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतमोजणीसाठी ही मशीन्स येतात ते अधिकारीही दोषी असू शकतात असं आता शरद पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही या प्रकरणी तंत्रज्ञांशी आणि इव्हीएम तज्ज्ञांशी सखोल चर्चा करणार आहोत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच या सगळ्यांशी चर्चा झाल्यावर आम्ही विरोधी पक्षातल्या नेत्यांशीही चर्चा करू असंही शरद पवार यांनी म्हटलं ..

ठाम भूमिका घेणाऱ्या गिरीश कर्नाड यांची उणीव भासेल: राज ठाकरे

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या निधनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निर्भीडपणे सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घेणाऱ्या ह्या प्रतिभावान कलाकाराची नक्कीच उणीव भासेल. गिरीश कर्नाडांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.  गिरीश कर्नाड यांचे सोमवारी सकाळी बंगळुरुतील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. राज ठाकरे यांनी देखील कर्नाड यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ..

भारताच्या 'या' निर्णयामुळे पाकिस्तानला सर्वात मोठा झटका

नवी दिल्ली,पुलवामा हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमाकर आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आर्थिक व्यवहारात आयात वस्तूंमध्ये घट झाली होती. पाकिस्तानचा खूप कमी माल भारतात येऊ लागला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत सीमा कर वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला होता.   पाकिस्तानकडून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये कापूस, फळे, सिमेंट, पेट्रोलिअम ..

वर्षाला १० लाखांची रोकड काढल्यास कर!

नवी दिल्ली डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकार लवकरच ठोस पाऊल उचलणार असून एका वर्षात १० लाख रुपयांची रोकड वितरित केल्यास त्यावर कर आकारणी करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. व्यवहारातील नोटांचा वापर कमी करून काळ्या पैशाला आळा घालावा याही उद्देशाने सरकार हा निर्णय घेण्याचा शक्यता आहे.   या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या रकमेच्या वितरणासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा प्रस्तावही सरकारच्या विचाराधीन आहे. आधार प्रमाणीकरणामुळे मोठ्या रकमा वितरित करणाऱ्या ..

प.बंगालच्या राज्यपालांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली,पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी भाजपा करण्याची शक्यता आहे. भाजपाचेपश्चिम बंगालमधील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितते की, राज्यातील परिस्थिती नियंत्रणात नाही आहे. त्यामुळे भाजपा राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करु शकते. तसेच, भाजपाची वैचारिक भूमिका राष्ट्रपती शासन विरोधात आहे. मात्र, राज्यात सरकार चालवण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत.  पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान ..

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरूत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.  गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ मध्ये झाला होता. सत्यजित रे यांचे चित्रपट पाहून गिरीश कर्नाड प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ ..

हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणार्‍यास पाच लाखांचे बक्षीस

सोमवारपासून बेपत्ता नवी दिल्ली: हवाई दलाने एएन-32 या विमानाची माहिती देणार्‍यास बक्षीस जाहीर केले आहे. विमानाची माहिती देणार्‍याला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकरिंसह यांनी ही माहिती दिली आहे. या विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान होते.हवाई दलाचे एएन-32 विमान सोमवारी दुपारी बेपत्ता झाले. हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क ..

११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

स्मशानभूमीत मिळाला मृतदेह हमीरपूर: उत्तरप्रदेशमध्ये अलिगडमधील तीन वर्षांच्या मुलीच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असताना उत्तरप्रदेशच्याच हमीरपूरमध्ये एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपी फरार झाले असून, पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. गावात तणावाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.   पोलिसांनी ..

समाजवादी पक्षाला उभारी देण्यासाठी मुलायम सिंह यादव मैदानात

नवी दिल्ली,बसपासोबत महाआघाडीकरूनही लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाला उभारी देण्यासाठी खुद्द मुलायम सिंह यादव मैदानात उतरले आहे. मुलायम सिंह यादव यांनी पक्षाची कमान आपल्या हाती घेतली आहे. सध्या ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटून पक्षाच्या पराभवाची मीमांसा करत आहेत. समाजवादी पक्षाची पुढील रणनितीसाठी बनविण्यासाठी मुलायम सिंह सक्रीय झाले आहे. मात्र पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांची पक्षात काय भूमिका असणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ..

बिहारमध्ये इन्सेफेलाईटिस आजाराने १९ मुलांचा मृत्यू

मुजफ्फरपूर,बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसकेएमसीएच या रुग्णालयात 1५ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर खासगी रुग्णालयांमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  वृत्तसंस्थेशी बोलताना, एसकेएमसीएच मुजफ्फरपूरचे अधीक्षक डॉ. सुनील शाही यांनी शनिवारी रुग्णालयात इन्सेफेलाईटिस या आजाराने ग्रस्त असलेल्या 38 मुलांना दाखल करण्यात आल्याची माहिती ..

विमान प्रवास आणखी महागणार

नवी दिल्ली,नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने भारतीय प्रवाशासाठीच्या हवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शुल्क १३० रुपयांवरून १५० रुपयांवर गेल्यामुळे विमान प्रवास आता आणखी महाग होणार आहे, अशी माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.  आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हेच शुल्क २२५.५२ रुपयांवरून (३.२५ अमेरिकी डॉलर) ३३६.५४ रुपयांवर (४.८५ अमेरिकी डॉलर) नेण्यात आले आहे. स्थानिक प्रवाशांकडून हेच शुल्क १५० रुपये दराने आकारले जाईल, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्..

तामिळनाडूत केंद्र सरकारच्या कार्यालयावरील पाट्यांना फासले काळे

वृत्तसंस्था चेन्नई, तामिळनाडूत हिंदी भाषेच्या विरोधातील मोहीम पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. शनिवारी तिरुचिराप्पल्ली परिसरात बीएसएनएल, विमानतळ, टपाल कार्यालय, रेल्वे स्थानकांच्या कार्यालयावर तसेच अन्य काही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आस्थापनांच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या बोर्डवरील हिंदी नावावर काळे फासण्याचे प्रकार घडले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेचा विरोध वाढला आहे. याची सुरूवात केंद्र सरकारने ..

अमित शाह यांनी बोलावली वरिष्ठ नेत्यांची बैठक; पक्षनेतृत्वाबाबत चर्चा होणार ?

नवी दिल्ली, लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी 13 आणि 14 जून रोजी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक दिल्लीत होणार असून पक्षसंघटनेतील निवडणुकांबाबतही याच चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पक्षसंघटनेतील निवडणुका सर्व राज्यांमध्ये होणार असून हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना यातून वगळण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या ..

बंगालमध्ये भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या

कोलकाता,पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. पश्चिम बंगालच्या 24 उत्तर परगनामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारात तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून तसेच पक्षाचे पाच कार्यकर्ते बेपत्ता असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हिंसाचार पसरवल्याचा आणि आपल्या कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला ..

प्रशांत किशोर ज्या शाळेत शिकले त्या शाळेचे अमित शाह हेडमास्तर

नवी दिल्ली,पश्श्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बंगालचा गड भाजपापासून सुरक्षीत ठेवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र यावर टीका करताना भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी प्रशांत किशोर हे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यापेक्षा मोठे राजकीय रणनितीकार असूच शकत नाही, असा दावा  केला आहे.   भाजपाचे महासचिव व पश्चिम बंगाल प्रभारी असलेले विजयवर्गीय म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या तुलनेत अमित ..

हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस

तभा ऑनलाईन टीम  नवी दिल्ली,हवाई दलाचे एएन-32 हे मालवाहतूक विमान 3 जून पासून बेपत्ता आहे. सोमवारी हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सर्वत्र सुरू केला आहे. मात्र अद्याप या बेपत्ता विमानाचा शोध लागलेला नाही. विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहेत. हवाई दलाने या विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. विमानाची ..

लग्नासाठी 200 हेलिकॉप्टरचे आरक्षण!

- स्वित्झर्लंडहून पाच कोटींची फुलेडेहराडून,दक्षिण आफ्रिकेतील गुप्ता बंधूंच्या दोन मुलांचा विवाह सोहळा औली येथे होणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लग्नासाठी तब्बल २०० हेलिकॉप्टरची बुकिंग करण्यात आली आहे. ८०० कर्मचारी लग्नाची तयारी करीत असून या लग्नावर तब्बल २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.  गुप्ता बंधू म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजय गुप्ता यांचा मुलगा सूर्यकांत याचं आधी लग्न होणार आहे. त्यानंतर अतुल गुप्ता यांचा मुलगा शशांक ..

फरिदाबादेतील खाजगी शाळेला भीषण आग

- शाळा संचालकाच्या पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यूफरिदाबाद,हरयाणातील फरिदाबादमधील एका खाजगी शाळेला आग लागल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी घडली. फरिदाबादमधील डबुआ कॉलनीमध्ये असणार्‍या या खाजगी शाळेला शनिवारी सकाळी सात वाजता भीषण आग लागली. या आगीत शाळा संचालकाची दोन मुले आणि पत्नीचा मृत्यू झाला. सुदैवाने वर्ग सुरू नसल्याने अनर्थ टळला. मागील महिन्यात सूरत येथील खाजगी शिकवणी वर्गाला आग लागून तेथील मुले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.   फरिदाबादमधील एएनडी कॉलनीत ही शाळा आहे. शाळेच्या इमारतीला ..

मार्कांची सूज उतरली: शिक्षणमंत्री

मुंबई,यंदा दहावीची निकालाची टक्केवारी ७७.१० टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीचा निकाल ८९.४१ टक्के लागला होता. त्या निकालाच्या तुलनेत १२.३१ टक्के निकाल कमी लागला. यावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'निकाल घसरल्याने स्वाभाविकपणे काही पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र काही शिक्षण तज्ज्ञांनी या निकालासंदर्भात माझ्याकडे समाधान व्यक्त केले आहे. यंदाचा निकाल म्हणजे गेल्या दहा वर्षात वाढलेली मार्कांची सूज कमी होऊन आलेला निकाल आहे, विद्यार्थ्यांनी निराश होऊ ..

उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी मंदिर होणार नाही: आठवले

दिल्ली,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांना सोबत घेऊन १६ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेच्या या दौऱ्याची रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली आहे. 'उद्धव ठाकरे हे दहावेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल', असं आठवले यांनी म्हटलं आहे.   लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील एकविरा ..

माझ्यासाठी वाराणसी आणि केरळ दोन्हीही सारखेच - नरेंद्र मोदी

तिरुवनंतपुरम,नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले. मात्र दक्षिण भारतातील केरळमध्येभाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळचा दौरा करून तेथील जनतेचे आभार मानले. तसेच माझ्यासाठी केरळ हे तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढी वाराणसी आहे, जे आम्हाला निवडून देतात ते आमचे आहेत आणि ज्यांनी यावेळी आम्हाला निवडून दिले नाही, तेही आमचेच आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.    पंतप्रधान ..

आता रेल्वेमध्ये मिळणार मसाज सर्व्हिस

नवी दिल्ली : यापुढे तासंतास रेल्वेचा प्रवास करतांना तुम्हाला थकवा आला अथवा अंग अखडले तर तुम्ही रेल्वे प्रवासा दरम्यानच मसाज घेऊ शकता. हो हे खरे आहे! आता धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना मसाज करुन घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा खासकरुन इंदूरहून सुटणाऱ्या ३९ ट्रेनमध्ये असणार आहे.   रेल्वे प्रवाशांना मसाजची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाला दरवर्षी जवळपास २० लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो. तसेच, जवळपास ९० लाख रुपयांची अतिरिक्त तिकीट विक्री सुद्धा ..

प्रफुल पटेल यांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली: माजी नागरी उड्डाण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. कारणअंमलबजावणी संचलनालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या आधी मागच्या शनिवारी त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र ईडीसमोर ते हजर झाले नाहीत. आपल्याला पूर्व नियोजित कार्यक्रम आहेत असे कारण त्यावेळी त्यांनी दिले. त्यामुळे आता त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्याप्रकरणी एअर इंडिया ..

गोवा विमानतळ वाहतुकीस बंद; मिग २९ चा ड्रॉप टँक कोसळला

पणजीगोवा विमानतळ काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. विमानतळावर 'मिग २९ के' या लढाऊ विमानाचा ड्रॉप टँक कोसळल्याने आग लागली. या अपघाताच्या कारणास्तव विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली.      दाभोळी विमानतळाहून 'मिग २९ के' या लढाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ड्रॉप टँक अर्थात विमानापासून वेगळी होणारी इंधन टाकी कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये 'मिग २९ के' आणि वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.    ..

नरेंद्र मोदींनी देशात द्वेष आणि विभाजनाचं विष पसरवलं- राहुल गांधी

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तिरस्कार आणि विभाजनाचं विष पसरवलं असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. वायनाड या ठिकाणी ते शुक्रवारपासून दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी आज लोकांशी संवाद साधला. वायनाड या ठिकाणाहून राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कठोर शब्द वापरले. मात्र त्यांनी विभाजन आणि तिरस्कार या दोन गोष्टींचं विष पसरवलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांशी खोटं बोलून निवडणूक ..

यंदा दहावीचा निकाल १२.३१ टक्क्यांनी घसरला

पुणे ,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. दहावीच्या निकालातही कोकण विभागाने बाजी मारली. यंदा गेल्या सात वर्षातील सर्वात नीचांकी निकाल लागल्याचे स्पष्ट झाले. यंदा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला.  यापूर्वी २००७ मध्ये सर्वात कमी ७८ टक्के निकाल लागला होता. निकालात यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल हा १०.६४ टक्क्यांनी अधिक लागला. निकालात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ८८.३८ टक्के तर सर्वात ..

अनंतनागमध्ये चकमक; लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

तभा ऑनलाईन टीम श्रीनगर,काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील मोहीम लष्कराने पुन्हा एकदा तीव्र केली आहे. आज सकाळी अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम शाहबाग लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीला सुरुवात झाली असून, या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.  ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप ताब्यात आलेला नाही. मात्र मृत दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इक्बाल असल्याचे समोर आले आहे. तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. सध्या दोन्ही बाजूनी गोळीबार ..

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर SBIचे ग्राहकांना मोठं गिफ्ट, १ जुलैपासून कर्ज स्वस्त होणार

तभा ऑनलाईन टीमनवी दिल्ली,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सर्वात पहिल्यांदा स्टेट बँकेच्या ग्राहकांना मिळवून देणार आहे. एसबीआयने मार्च 2019मध्ये स्वतःची सेव्हिंग्स डिपॉजिट आणि कर्जाच्या दरांना रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये (रेपो रेट) केलेल्या पाव टक्क्याच्या कपाताचा एसबीआयच्या ग्राहकांना तात्काळ लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून एसबीआय बँकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.  तत्पूर्वी गेल्या महिन्यात ..

प्रतीक्षा संपली; मान्सून केरळमध्ये दाखल

तभा ऑनलाईन टीम मुंबई,गेल्या अनेक दिवसांपासून देशातील नागरिक उकाड्याने त्रासलेले असताना उशिरानेच का होईना मान्सून अखेर आज मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर केरळमध्ये दाखल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते, अखेर आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेरीच 1 जून या मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या अपेक्षित तारखेनंतर ..

कॉंगे्रसमधील वणवा विझवा

- मोईली यांचे राहुल गांधींना आवाहनहैदराबाद,लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देशभरातच कॉंगे्रसमध्ये वणवा पेटला आहे. प्रत्येक राज्यात नेते पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत आहेत, मतभेद उफाळून येत आहेत. पक्षाचे अध्यक्ष या नात्याने हा वणवा विझविण्याची जबाबदारी तुमचीच आहे, तेव्हा तुम्ही शांत न बसता, लगेच हालचाली करा, असे आवाहन कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी आज शुक्रवारी राहुल गांधी यांना केले आहे.   पक्षातील सध्याच्या स्थितीवर आम्ही सर्वच जण चिंतीत आहोत. विशेषत: पंजाब आणि राजस्थानमध्ये ..

मान्सून २४ तासात केरळमध्ये होणार दाखल

नवी दिल्ली,नैऋत्य मोसमी पाऊस येत्या २४ तासात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यापूर्वी पाच दिवस विलंबाने म्हणजे ६ जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होणार असं सांगण्यात आलं होतं. पण आता आणखी दोन दिवस मान्सूनची प्रतीक्षा वाढली आहे.    भारतात केरळच्या किनारपट्टीला धडकून मान्सून दाखल होतो. त्यानंतर तो देशभर आगेकूच करतो. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर पुढील सरासरी सात दिवसात तो महाराष्ट्रात दाखल होतो. दरवर्षी सामान्यपणे १ जूनला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असते.   ..

महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करू या

- कुरेशींचे जयशंकर यांना पत्रइस्लामाबाद,पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शहा मेहमुद कुरेशी यांनी भारतातील समपदस्थ एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आणि दक्षिण आशियात शांततेसाठी पाकिस्तान वचनबद्ध असल्याचे सांगत, काश्मीरसह महत्त्वाच्या मुद्यांवर आपण चर्चा करायला हवी, असे नमूद केले.   भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून आपली नियुक्ती झाली, यासाठी आपले अभिनंदन. आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे आणि त्यासाठी काश्मीरसह सर्वच मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे. भा..

‘त्या’ महिला रिक्षाचालकास आर्थिक मदत -विजय गोयल यांचा पुढाकार

नवी दिल्ली: माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय गोयल यांनी दिल्लीतील पहिल्या महिला रिक्षाचालक सुनीता चौधरी यांना 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. दोन दिवसांपूर्वी सुनीता चौधरी यांची तीस हजार रुपयांची रक्कम पळविण्यात आली होती.आपल्या टि्‌वटमध्ये गोयल म्हणतात, आज सकाळी दिल्लीमधील पहिल्या महिला रिक्षाचालक सुनीता चौधरी यांची 30 हजार रुपयांची कमाई लुटली गेल्याची बातमी वाचून मन सुन्न झाले. माझ्या खासदारकीच्या पगारामधून त्यांना 30 हजारांची मदत करीत आहे. प्रत्येक महिन्याला गरजू लोकांना पगारातून मदत करणार ..

मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या पातेल्यात बसून पूजा

बेंगळुरु उन्हाच्या तीव्र झळांमुळे प्रत्येकजण त्रासलेला आहे. देशात मान्सून लवकर दाखल व्हावा आणि पावसाचं प्रमाण समाधानकारक असावं यासाठी होमहवन करण्यात आल्याचं आपण ऐकलं असेल. पण बेंगळुरुत दोन पुजारी मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या पातेल्यात बसले होते.   बेंगळुरूतील या दोन पुजाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोमेश्वर मंदिरातील दोन पुजारी मान्सून चांगला व्हावासाठी पाण्याने भरलेल्या पातेल्यात बसले आहेत. तर एक पुजारी होमहवन करत आहे. पातेल्यात बसून पुजारी मोबाइलवर अपडेट्स घेत असल्याचंही ..

आणखी चार आमदार भाजपाच्या वाटेवर

      पणजी : काँग्रेसला लागलेली उतरती कळा सध्या तरी थांबायचे चिन्ह दिसत नाहीत.  तेलंगणामध्ये १२ काँग्रेस आमदारांनी टीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता गोव्यातही काँग्रेसला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. गोव्यातील काँग्रेसचे चार आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. काँग्रेस पक्षाचे कुंकळी मतदारसंघाचे आमदार क्लाफासियो डायस यांनी ही माहिती दिली आहे. विकासकामे आणि बेरोजगारांना नोकऱ्या देवू शकत नसल्यामुळे समर्थकांनी पाठिंबा दिल्यास आपण देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार असल्याचं डायस ..

पुलवामात जवानांना मोठं यश, चार दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर,जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षाबलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी (06 जून) रात्री आणि शुक्रवारी (07 जून)सकाळी पुलवामात झालेल्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या एका चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. जवानांनी घटनास्थळावरुन तीन एके 47 जप्त केल्या आहेत. तसेच पुलवामामध्ये सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.  गुरुवारी पुलवामामधील लस्सीपोरा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षाबलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षाबलाच्या जवानांनी लस्सीपोरा ..

उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू

लखनऊ,उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 41 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी (7 जून) उत्तर प्रदेशच्या गृहमंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. वादळामुळे मैनपूरीमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आपत्तीनंतर परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वादळाचा फटका बसलेल्यांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.  वादळामुळे मैनपूरीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर इटाह 3, कासगंज 3, मोरादाबाद, बदायूँ, ..

अभिनेता करण ओबेरॉयची जामिनावर सुटका

एका महिला ज्योतिषावर बलात्कार, तसेच वसूलीच्या आरोपाखाली गजाआड असलेला अभिनेता करण ओबेरॉय याला आज अखेर जामीन मिळाला. मुंबई हायकोर्टाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर करणला सोडण्याचे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून करण जामिनासाठी प्रयत्नशील होता. करण ओबेरॉयच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी दिंडोशी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. या नंतर करणच्या कुटुंबीयांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावले. त्यावर आज सुनावणी झाली.  पीडित महिलेने करणवर बलात्काराच..

उद्या लागणार दहावीचा निकाल

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या. आज अखेर बोर्डानं दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करत अफवांवरील पडदा उठवला आहे. बोर्डानं उद्या म्हणजेच आठ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. उद्या दुपारी एक वाजाता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहाता येणार आहे. maharashtraeducation.commahresult.nic.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in.  या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.  गेल्यावर्षाही दहावीचा निकाल ..

अमित शहांना मिळाला वाजपेयींचा बंगला

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शासकीय निवासस्थान देण्यात आले आहे. लोकसभेच्या निवास वाटप समितीने हा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान वाजपेयी यांना ६-ए कृष्ण मेनन हे निवासस्थान देण्यात आले होते.   वाजपेयी यांचा या बंगल्यात १४ वर्षे मुक्काम होता. केंद्र सरकारने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आह. सुमारे एक महिन्याच्या दुरूस्तीनंतर शहा या शासकीय बंगल्यात रहायला जाऊ शकतात, असे शासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. सध्या शहा हे अकबर रोडवरील शासकीय ..

पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क: कोर्ट

नवी दिल्ली,पतीच्या एकूण पगाराचा एक तृतियांश भाग पत्नीला पोटगीच्या रुपात दिला जावा असा निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. मिळकतीच्या वाटपाचे सूत्र ठरलेले असून या अंतर्गत पतीवर कुटुंबातील आणखी कुणी अवलंबून नसल्यास पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडे राहतील, तर एक हिस्सा पत्नीला पोटगीच्या रुपात द्यावा लागेल, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने याचिकाकर्त्या महिलेच्या अर्जावर निर्णय देताना पगारातील ३० टक्के भाग पत्नीला देण्याचे आदेश दिले आहेत.  ७ मे २००६ या दिवशी या महिलेचा विवाह झाला होता. तिचे ..

NEET चा टॉपर नलिन म्हणतो दोन वर्षात एकदाही वापरला नाही स्मार्ट फोन

NEET च्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या नलिनने त्याच्या यशाचे गमक अखेर सांगितले आहे. नलिन म्हणतो, मी गेल्या दोन वर्षात एकादाही स्मार्ट फोन वापरला नाही. मी दिवसातले ७ ते ८ तास अभ्यास करत असे. मागच्या दोन वर्षात एकदाही स्मार्ट फोन वापरला नाही एवढंच काय विकतही घेतला नाही असं नलिनने सांगितलं आहे. तसेच मला अभ्यास करताना जे काही अडत असे ते शिक्षकांना विचारण्यात मला संकोच वाटत नसे. अभ्यास करण्याची चिकाटी आणि चांगले गुण मिळवण्याचे ध्येय यामुळे मी एवढं यश मिळवू शकलो असं नलिनने म्हटले आहे. मी अभ्यासावर पूर्ण ..

आंध्र प्रदेश सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री

- मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा निर्णयआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाच उपमुख्यमंत्री अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील असणार आहेत. जगमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधीमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली. देशात पहिल्यांदाच एखाद्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असणार आहेत. याआधी चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात दोन उपमुख्यमंत्री होते. यामधील एक मागासवर्गीय जाती ..

उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येला जाणार

'पहले मंदिर, फिर सरकार...' अशी घोषणा देत मागील वर्षी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा अयोध्यावारीसाठी सज्ज झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या दौऱ्याची तारीख ठरली आहे. त्यानुसार, येत्या १६ जूनला विजयी खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होणार आहेत.   शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मतभेद तीव्र झाल्यानं शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत ..

मालेगाव बॉम्बस्फोट : कोर्टात साध्वी प्रज्ञासिंहांचं उत्तर “मला माहिती नाही”

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात हजेरी लावली. कोर्टाने त्यांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यासंदर्भात काही प्रश्न विचारले यावर ‘मला माहिती नाही’, अशा स्वरुपाची उत्तरे त्यांनी कोर्टासमोर दिली. कोर्टाने गेल्या आठवड्यात मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, गुरुवारी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगत साध्वींनी कोर्टात हजेरील लावणे टाळले होते. त्यानंतर ..

मान्सूनला उशीर, मात्र उत्पादकता वाढली-मुख्यमंत्री

यावर्षी मान्सूनला थोडासा उशीर झाला आहे, तरीही सरासरी इतका पाऊस पडेल असे आयएमडीने म्हटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मान्सून पुढील आठवड्यात दाखल होईल असा अंदाज आयएमडीने वर्तवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच मागील वर्षी राज्यात ७३ टक्के पाऊस पडूनही उत्पादकता वाढली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला तरीही आपली उत्पादकता वाढली ही समाधानाची बाब आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.  कापूस उत्पादकता १७ ..

निती आयोगाच्या पुनर्रचनेला पंतप्रधानांची मंजुरी

गृहमंत्री अमित शाहांचाही असणार समावेशपंतप्रधान नरेंद्र मोदींनी निती आयोगाच्या पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे. भारत सरकारसाठी एक थिंक टँक म्हणून निती आयोग काम करतो. त्यामुळे त्याला अधिक सक्षम करण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निती आयोगाचे अध्यक्ष असतील. राजीव कुमार हे उपाध्यक्षपदी कायम असतील तर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा यात कार्यकारी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. &nb..

आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

अमरावती,आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून 'रायतू भरोसा' योजना लागू होणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12,500 रुपये दिले जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपी सरकारची 'अन्नदाता सुखीभव' योजना रद्द केली आहे. आंध्र प्रदेशच्या आधीच्या सरकारनं फेब्रुवारी 2019ला निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत चंद्रबाबूंनी शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये देण्याचं ..

त्यावेळी वैमानिकाची पत्नीच होती नियंत्रण कक्षात

नवी दिल्ली,भारतीय वायुदलाचे एएन-32 मालवाहू विमान सोमवारी दुपारी बेपत्ता झाले. त्यावेळी या विमानाचे वैमानिक आशिष तन्वर यांची पत्नी नियंत्रण कक्षातच होती. तिने हा सर्व घटनाक्रम जवळून अनुभवला. एएन-32 ने दुपारी 12.25 च्या सुमारास आसामच्या जोरहट तळावरून अरुणाचल प्रदेशमधील मिचुका येथे जाण्यासाठी उड्डाण केले. त्यावेळी आशिष तन्वर यांची पत्नी संध्या वायुदलाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात कर्तव्यावर होत्या.   दुपारी एकच्या सुमारास विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर तासाभराने ..

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या भेटीचे नियोजन नाही : परराष्ट्र मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत भेटीचे कोणतेही नियोजन नसल्याचे भारतीय परराष्ट्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे पुढच्या आठवड्यात ही परिषद होणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रविशकुमार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत कुठल्याही स्वरुपात भेटीचे नियोजन ..

विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी जुलैमध्ये होणार निवृत्त

‘विप्रो’चे संस्थापक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अझीम प्रेमजी हे ३० जुलै रोजी निवृत्त होत आहेत. कंपनीने गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. अझीम प्रेमजी यांनी ५३ वर्षे कंपनीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आणि कंपनीला नव्या शिखरावर नेऊन पोहोचवले.   अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जागा त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी घेतील. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दाली नीमुचवाला हे ३१ जुलैपासून विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहतील, ..

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची उंची वाढली

- एस. जयशंकर यांचे प्रतिपादननवी दिल्ली,आंतरराष्ट्रीय पातळीवर मागील पाच वर्षांत भारताची उंची वाढली असल्याची जाणीव भारतीयांना झाली आहे, असे मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज गुरुवारी व्यक्त केले आहे. एखाद्या सनदी अधिकार्‍याने सरकारमधील महत्त्वाचे खाते सांभाळण्याचा हा दुर्मिळ योग आहे. परराष्ट्र व्यवहार सचिव म्हणून निवृत्त झालेल्या जयशंकर यांना नव्या जबाबदारीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, सरकार बाहेरून जसे दिसते त्यापेक्षा आतून वेगळे असते.   जागतिक संतुलनाचा काटा ..

अफवांवर विश्वास ठेऊ नका, दहावीच्या निकालावर बोर्डाचं आवाहन

लवकरच दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करू, सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. ७ जून रोजी दहावीचा निकाल लागणार असल्याच्या अफवा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.  मे महिन्याअखेरीस बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दहावीचा निकाल आज जाहीर होणार, अशी अफवा पसरली होती. दहावीच्या निकालाबाबत फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. तो ..

गैरसमजच झाला असेल; शरद पवारांची सारवासारव

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठक व्यवस्थेवरून झालेल्या वादावर आता स्वतः पवार यांनीच पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पासवरून काहीतरी गैरसमज झाला झाला असेल, तो वादाचा मुद्दा नाही, विसरायला हवा अशी प्रतिक्रिया देत त्यांनी हा विषय संपल्याचे जाहीर केले.   शरद पवार हे 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते. राजधानी दिल्लीत जाऊनही त्यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्यानं अनेकांच्या ..

ASUS ला झटका; झेनफोन विक्रीवर भारतात बंदी!

नवी दिल्ली,दिल्ली उच्च न्यायालयाने ताइवान येथील स्मार्टफोन कंपनी ASUS वर भारतात 'झेन' आणि 'झेनफोन' ट्रेडमार्क असलेल्या उत्पादनांच्या विक्री आणि प्रचारावर बंदी घातली आहे. २८ मे २०१९ पासून पुढील ८ आठवडे आसुस कंपनीला झेन ट्रेडमार्क असलेले स्मार्टफोन्सची विक्री करता येणार नाही. त्यामुळे कंपनीला वेगळ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  टेलिकेयर नेटवर्क इंडिया प्राइवेट लिमिटेडने आसुसविरोधात 'झेन' ट्रेडमार्क वापरण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. टेलिकेअर नेटवर्क कंपनीने 'ट्रेड मार्क अॅक्ट १९९९' अंतर्गत ..

तेलंगणातले १८ पैकी १२ आमदार ‘टीआसएस’ मध्ये दाखल

हैदराबाद,लोकसभा निवडणुकीत सपाटून हार पत्करावी लागल्याचा परिणाम आत राज्या राज्यांत दिसू लागला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात राहणे धोक्याचे वाटू लागले असून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलिन करण्याचे पत्रच 12 आमदारांनी दिले आहे.  तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता असून त्यांच्याकडे 120 पैकी 91 जागांचे बहुमत आहे. तर एमआयएम 7 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत. काँग्रेसच्या ..

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या कारभारावर लोकायुक्तांचे ताशेरे

मुंबईतील ताडदेवच्या एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए गैरव्यवहारकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलीयानी यांनी आपल्या चौकशी अहवालात ताशेरे ओढले आहे. लोकायुक्तांच्या या अहवालामुळे मेहता यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. शिवाय विरोधकांनी भाजपावर देखीप टीका करणे सुरू केले आहे. या अहवलात मेहता यांना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे ..

संघाकडून शिका जनसंपर्क कसा ठेवायचा : शरद पवार

'जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवं. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,' असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आजपासून विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. पुण्यातील भोसरी मतदारसंघातून याची सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार यांनी संघ स्वयंसेवकांच्या कामाचं कौतुक केलं. त्यासाठी एका खासदारांनी सांगितलेला किस्साच ..

एअर इंडियाचा भोंगळ कारभार, आसन संख्येपेक्षा अधिकची तिकिटं दिल्यानं प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली,एअर इंडियाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एअर इंडिया या विमान कंपनीनं दिल्ली-गुवाहाटी या विमानानं प्रवास करणाऱ्या 20 प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे बोर्डिंग पास देण्यास नकार दिलेल्या त्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट होते. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, एअर इंडियानं प्रवासी आसन व्यवस्थेहून अधिक तिकिटं बुक केली आहेत. त्यामुळे ऊर्वरित प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात आलेला नाही. बोर्डिंग पास न दिल्यानं प्रवाशांनी एअरपोर्टवरच घोषणाबाजी सुरू केली. त्या प्रवाशांवर ..

कोर्टात हजर राहण्याची तारीख येताच प्रज्ञा सिंहांच्या पोटात दुखू लागले

भोपाळ,मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा ठाकूर यांना बुधवारी रात्री पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, एका कार्यक्रमासाठी त्यांना गुरावारी सकाळी सोडून देण्यात आले. प्रज्ञा या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत आणि त्यांना मुंबईतील एनआयए न्यायालयाने नुकतेच 7 जूनला हजर राहण्याचे आदेश दिले होते.  मिळालेल्या माहितीनुसार प्रज्ञा ठाकूर यांना आतड्याला संक्रमण झाले असून कंबर दुखी आणि उच्च रक्तदाब झाला आहे. डॉक्टर अजय मेहता यांनी, ..

RBI कडून मोठी भेट; आरटीजीएस, एनईएफटी शुल्क रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम अर्थात आरटीजीएस फंड ट्रान्सफर आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरसाठी (एनईएफटी) घेण्यात येणारे शुल्क रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँका देखील आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.   बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीच्या शुल्कात कपात करत या निर्णयाचा फायदा आपल्या ..

मॅकडॉनल्‍ड बर्गरमध्ये किडे, तक्रारदाराला भरापाई म्हणून मिळाले ७० हजार

पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीला मॅकडॉनल्‍ड बर्गर खाल्यामुळे रूग्णालयात जावं लागले होतं. प्रत्यक्षात त्या व्यक्तिने कीडा असलेले बर्गर नकळत खाल्लं ज्याबद्दल त्याला नंतर रुग्णालयात गेल्यानंतर समजलं होतं. त्यानंतर त्या व्यक्तीनं याबबात मॅकडॉनल्‍डकडे याची तक्रार केली होती. मात्र, कंपनीनं हरेरावी करत त्या व्यक्तीला टाळलं. त्या व्यक्तीनं त्यानंतर ग्राहक मंचाकडे धाव घेतली. तब्बल पाच वर्षानंतर ग्राहक मंचानं भारतीय मॅकडॉनल्‍डला त्या व्यक्तीला ७० हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहे.  दिल्लीजव..

रेपो दारात ०.२५ टक्के कपात; गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार

वाढती अन्नधान्य महागाई आणि मंदावलेला विकास यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील दुसरे द्विमासिक पतधोरण गुरुवारी जाहीर झाले आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतरची व्याज दर बदला.या बैठकीत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. या आधी रेपो रेट ६ टक्के होता जो आता ५.७५ टक्के करण्यात आला आहे.  देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतात, त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. ..

येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

 स्कायमेटचा अंदाज   तभा ऑनलाईन टीम  मुंबई, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. ती म्हणजे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या आठवडाभरात तो राज्यातही दाखल होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थीती निर्माण झालेली असल्याने बळीराजासह सर्वचजण पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, यंदाचा मान्सून हा कमजोर राहिल असे भाकीतही हवामान तज्ज्ञांनी वर्तवले आहे. हवामानाचा पूर्वानुमान ..

प्रत्येकवेळी प्रयोग यशस्वी होतातच असे नाही: अखिलेश

लखनऊ,बसपा नेत्या मायावती यांनी समाजवादी पक्षाबरोबरची आघाडी तोडल्यानंतर सपा नेते अखिलेश यादव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो. त्यामुळे अनेकदा प्रयोग करावे लागले होते. अनेकदा प्रयोग अयशस्वी होतात. मात्र त्यातून कुठे कमी पडलो हे कळतं, असं सांगत बसपासोबतही असाच एक प्रयोग केला. तो अयशस्वी ठरला. मात्र आमच्या चूका त्यातून दिसून आल्या असं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं. तसेच भविष्यात मायावतींसोबत पुन्हा आघाडी करण्याचे संकेतही दिले.  मी म्हैसूरमध्ये अभियांत्रिकीचे ..

थंपी व रॉबर्ट वढेरांच्या बयाणात प्रचंड तफावत

- ईडी मागणार कोठडीनवी दिल्ली,विदेशात बेहिशेबी संपत्ती खरेदी करणारे रॉबर्ट वढेरा आणि त्यांचे जवळचे व्यावसायिक मित्र सी. सी. थंपी यांच्यातील बयाणांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. कॉंगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे खाजगी सचिव माधवन्‌ यांनी वढेरा यांची माझ्यासोबत ओळख करून दिली, अशी माहिती थंपीने ईडीला दिली, तर वढेरांनी मात्र, अमिरातला जाताना विमानात मी थंपीला भेटलो होतो, अशी माहिती मंगळवारी ईडीच्या अधिकार्‍यांना दिली.   रॉबर्ट वढेरा यांनी दुबई व लंडन येथे बेहिशेबी ..

पवार रुसले आणि चुकीच्या ठिकाणी बसले

मोदी सरकारच्या दुसऱ्या शपथविधी कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना पाचव्या रांगेतील पास दिल्याने मानापमानाचे नाट्य घडले होते. अपमानास्पद वागणूक दिल्याचे कारण सांगत पवारांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. मात्र, या वादावर आता राष्ट्रपती भवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून शरद पवारांना पाचव्या रांगेचा नव्हे तर पहिल्याच रांगेतील व्हीव्हीआयपी पास देण्यात आला होता, असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही ..

येत्या ४८ तासात केरळमध्ये मान्सून येण्याची शक्यता

- स्कायमेटने वर्तवला अंदाजवाढते तापमान आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. ती म्हणजे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या आठवडाभरात तो राज्यातही दाखल होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थीती निर्माण झालेली असल्याने बळीराजासह सर्वचजण पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, यंदाचा मान्सून हा कमजोर राहिल असे भाकीतही हवामान तज्ज्ञांनी वर्तवले आहे. हवामानाचा पूर्वानुमान वर्तवणारी संस्था स्कायमेटचे वैज्ञानीक ..

ईदच्या दिवशी गळाभेट घेणं इस्लाममध्ये निषिद्ध, दारुल उलूम देवबंदचा फतवा

सहारनपूर,उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये इस्लामिक शिक्षण देणारी संस्था दारुल उलूम देवबंदनं ईदच्या पार्श्वभूमीवर फतवा जारी केला आहे. ईदच्या दिवशी एकमेकांची गळाभेट घेणं हे इस्लामच्या विरोधात आहे. दारूल उलूम देवबंदचा फतवा आता चर्चेचा विषय ठरला आहे. दारूल उलूम देवबंदच्या खंडपीठाला पाकिस्तानच्या एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की, ईदच्या दिवशी गळाभेट घेणं हे मोहम्मद साहेबांच्या तत्त्वात बसते काय, त्यावर देवबंदनं ते त्यांच्या तत्त्वात बसत नसल्याचं सांगितलं आहे.  तसेच जर कोणी गळाभेट घेण्यासाठी आले ..

पंतप्रधानांसाठी अजगराच्या चामड्यापासून तयार केला बूट, ५० हजारांचा भरावा लागला दंड

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ईदची भेट देण्यासाठी एका चर्मकाराला बूट तयार करणं चांगलं महागात पडलं आहे. पाकिस्तानमधील नूरुद्दीन या चर्मकारानं अजगराच्या चामड्यापासून इम्रान खान यांना भेट देण्यासाठी एक बूट तयार केला. पण तो बूट इम्रान खान यांच्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच त्याच्यावर कारवाई झाली. पख्तूनख्वा वन्यजीव विभागनं त्याला तब्बल ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  पेशावरमधील जहांगीरपुरा बाजारामध्ये चर्मकार नूरुद्दीन यांची दुकान आहे. अजगराच्या चामड्यापासून बूट तयार केल्याचं समजताच ..

ईदच्या निमित्तानं 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

नवी दिल्ली,नरेंद्र मोदी सरकारनं ईदच्या निमित्तानं मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकारनं प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली, त्यानंतर मुस्लिम समुदायातील 5 कोटी मुस्लिमांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत लाभ मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि पारदर्शी करण्यात आली ..

मुंबईच्या नावे नकोसा विक्रम, जगात अव्वल

मुंबईतील वाहतूक हा आता सार्वजनिक आणि सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. एकेकाळी शिस्तबद्ध सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई शहरात सध्याची सर्वत्र पसरत चाललेली वाहतूक कोंडी ही सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरली आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीने आता जागतिक विक्रम केला आहे. कारण जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर म्हणून मुंबईची ओळख झाली आहे. त्यामुळे नको असलेला विक्रम मुंबईच्या नावे झाला आहे.  ‘टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८’च्या सर्व्हेतून हा निष्कर्ष समोर आला आहे. जगभरातील ५६ देशांतील ..

व्हॉट्सअॅपमध्ये शोधला बग; भारतीय विद्यार्थ्याला बक्षीस

नवी दिल्लीः प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये एक बग शोधून काढल्यामुळे एका भारतीय विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात आले आहे. बग म्हणजे अॅपमधील एक छोटीशी चूक किंवा कमतरता होय. व्हॉट्सअॅपमधील कमतरतेचा शोध लावण्याची किमया केरळमधील अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव अनंतकृष्णा आहे. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या व्यक्तीच्या नकळत दुसरी व्यक्ती त्याच्या व्हॉट्सअॅपमधील माहिती किंवा डेटा नष्ट करण्याची सूट मिळत असे. म्हणजेच आपल्या नकळतपणे व्हॉट्सअॅपचा वापर करणारी व्यक्ती ..

गायीचे दूध २ रुपयांनी महागणार

अमूलच्या दुधाच्या दरात झालेल्या वाढीनंतर आता अन्य दूध उत्पादकांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात आज खासगी सहकारी दूध उत्पादकांच्या बैठकीत दूधदरवाढीचा निर्णय घेण्यात आला.   यानुसार गायीच्या दुधाचे दर २ रुपये प्रति लिटर दराने वाढणार आहेत. नवे दर ८ जूनपासून लागू होणार आहेत. अमूल, मदर डेरी कंपनीच्या दुधाचे दरही अलीकडेच दोन रुपये प्रति लिटर दरांनी वाढले आहेत. तत्पूर्वी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. ..

48 तासांनंतरही हवाई दलाचे AN-32 बेपत्ताच

सोमवारी हवाई दलाचे AN-32 हे विमान बेपत्ता झाले होते. त्यानंतर सर्वच यंत्रणांनी शोधमोहिम सुरू केली होती. हवाई दलाचे AN-32 हे विमान बेपत्ता होऊन 48 तासांचा कालावधी लोटला आहे. परंतु या विमानाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान हवाई दलाची विमाने, हेलिकॉप्टर आणि सैन्य दलाच्या मदतीने या विमानाचा शोध सुरू आहे. तसेच इस्रोदेखील उपग्रहाच्या मदतीने या विमानाचा शोध घेत आहे.  भारतीय हवाई दलाचे AN-32 हे विमान सोमवारी दुपारी एक वाजता बेपत्ता झाले होते. या विमानाने दुपारी 12.25 मिनिटांनी आसाममधील ..

‘जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा’, ममतांचा नवा नारा

कोलकाता,तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने बुधवारी (5 जून) ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आहे. त्यावेळी त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. 'त्यागाचे नाव हिंदू आहे, इमान म्हणजे मुसलमान, प्रेम म्हणजे ख्रिश्चन तर शिखांचे नाव आहे बलिदान. असा आहे आपला प्रिय हिंदुस्तान याचे रक्षण आम्ही करू. जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा आणि हा आमचा नारा आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ..

मोदी सरकारकडून CCSची स्थापना

- अमित शहा, एस. जयशंकर यांचा समावेश नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने 'कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी' (CCS) म्हणजेच सुरक्षेतेच्या मुद्द्यासांठी कॅबिनेट कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या समावेश आहे. अमित शहा आणि एस. जयशंकर यांना पहिल्यांदाच या कमिटीत स्थान मिळाले आहे. तर राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामण यांचा मोदी सरकार -1 मध्ये असताना सुद्धा ..

ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांचा गोळीबार; एक महिला ठार

पुलवामा : जगभरात ईद शांततेत साजरी केली जात असताना काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पुलवामातील एका घरामध्ये ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांनी घुसून गोळीबार केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी पुलवामातील ज्या घरात घुसले होते त्या घरामध्ये ईद साजरी केली जात होती. त्यांना कळण्याच्या आतच दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला आणि फरार झाले. यामध्ये नगीना नावाची महिला ठार झाली असून भारतीय जवानांनी या दहशतावाद्यांची शोधमोहिम ..

इंडिगोचे पहिले विमान पाकिस्तानमार्गे भारतात

बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ भारताने उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने भारताला हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर 30 मे पर्यंत ही बंदी वाढवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. अखेर पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र खुले करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री भारताचे पहिले विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून दिल्लीत दाखल झाले. अहमदाबाद नजीक असलेला टेलेम एंट्री पॉईंट पाकिस्तानने रविवारी संध्याकाळी खुला केला. त्यानंतर दुबई ते दिल्ली जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने या हवाई क्षेत्रातून ..

लघु उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार- नितीन गडकरी

 खात्याची सूत्रे स्वीकारलीनवी दिल्ली: देशात आयात होणार्‍या वस्तू ग्रामीण भागातील लघु उद्योगांच्या माध्यमातून तयार करून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा भर राहील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मंगळवारी या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर केले.उद्योग भवन येथे गडकरी यांनी राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्या उपस्थितीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अरुण कुमार ..

हुवाईसोबतचा करार इन्फोसिस पुन्हा तपासणार

-इतर कंपन्याही करणार अनुकरण बंगळुरू: अमेरिकेने चीनमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी हुवाईवर प्रतिबंध लादल्यावर या देशाच्या कायद्यांमध्ये अडकू नये यासाठी आता इन्फोसिसदेखील हुवाईसोबतच्या कराराचे पुनर्लोकन करीत आहे. भारतातील माहिती व तंत्रज्ञान कंपन्या इन्फोसिसचे अनुकरण करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.मागील महिन्यात अमेरिकेने हुवाई कंपनीवर प्रतिबंध लादत या कंपनीचा समावेश स्वतंत्र यादीत केला आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे या चिनी कंपनीला हार्डवेअरची खरेदी-विक्री, सॉफ्टवेअर ..