अर्थचक्रअसेट अॅलोकेशन केल्याशिवाय संपत्ती निर्माण करता येत नाही, यासंदर्भात आपण गेल्या सोमवारी माहिती घेतली. तसेच फिक्स डिपॉझिट आणि इक्विटी असे दोन प्रकार आपण पाहिले. उर्वरित प्रकारांची माहिती आज आपण घेणार आहोत. शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक प्रकारात म्युच्युअल फंड नावाचा एक प्रकार आहे. अनेकांची धारणा अशी आहे की, म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजारात पैसे गुंतविणे आणि त्यात प्रसंगी पैसे बुडतात. एक गोष्ट मी स्पष्ट करतो की, म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजारात गुंतवणूक नव्हे. त्यात अनेक पर्या
पुढे वाचा
- किशोर इंगळेभारतीय क्रिकेट संघाचा वर्ष 1980-81 चा ऑस्ट्रेलिया दौरा. पहिली कसोटी हरल्याने 1-0 ने भारत पिछाडीवर. दुसरी अनिर्णित. त्यामुळे तिसरी मेलबोर्न कसोटी भारतासाठी ‘करो वा मरो’ या स्थितीत. ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात जिंकायला 143 धावा हव्या आणि ते चौथ्या दिवसाच्या खेळाअंती 3 बाद 18 धावसंख्येवर. पाचव्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज कपिलदेव हॅमस्ट्रिंग मसल ताणली गेल्याने तंबूत होता. पण, पठ्ठ्याने परिस्थिती पाहून खेळण्याचा निर्णय घेतला. वेदनाशामक
फिरारेलढाई म्हटली की, सर्वांच्या बाहुमध्ये स्फुरण चढायला लागते. लढाईचा इतिहास वाचताना शरीराचे रोम रोम उत्तेजित होत असतात. त्यात असलेल्या युद्धातील इतिहासातील कारणे, सत्ताप्राप्तीचे व राज्य विस्ताराचे राजकारण, युद्ध रणनीती, त्यात आलेले यश-अपयश, सैनिकांची अफाट सेना, हत्ती, घोडे, भाले, तलवारी, त्या काळातले ते वीर, रथी-महारथी, योद्धे, प्रधान व सेनापतीची युद्धं जिंकण्याची अभेद्य रणनीती व त्यानंतर झालेले विनाशकारी युद्ध. नंतरचे परिणाम हे आपण लहानपणापासून वाचत व ऐकत आलेलो आहोत. लहानपणात वाचलेला इतिहास म्हणजे भूतका
अर्थचक्रएकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटच्या आठवड्यात आपण आहोत. येत्या शुक्रवारपासून नवीन वर्षाला प्रारंभ होणार आहे, त्यासोबतच आपण २०२१ ते २०३० या नवीन दशकातही प्रवेश करणार आहोत. वर्ष संपत असताना सरत्या वर्षाचा आढावा घेण्याची पद्धत असते. मी मात्र फक्त सरत्या वर्षाचाच नाही, तर गेल्या दोन दशकांचा विचार करतो आहे. गेल्या २० वर्षांत भारतात अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेत आणि आपण ते सर्व विसरलोही आहोत. मात्र, २०२० हे वर्ष कोणीच विसरू शकत नाही. त्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली
गीता जयंती ही एकमेव अशी जयंती आहे जिथे कर्ता, भोक्ता दोघेही नाही तर या दोघांच्या विचारमंथनातून जे नवनीत निघाले त्या गीतेची जयंती! भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये जो निष्काम कर्मयोग सांगितला तो त्यांनी प्रत्यक्ष जगून दाखवला. ‘न मे कर्मफले स्पृहा.’
आरोग्यहिवाळा आला की सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. सांधेदुखी वात रोगाच्या अंतर्गत येते. यात संधिवात, आमवात, स्पाँडिलायटिस, फ्रोजन शोल्डर, सायटिका, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी इत्यादी व्याधी येतात. हिवाळ्यातील शुष्क वातावरण आणि अतिशय थंडी, यामुळे वात रोग हटकून जोर काढतात. आपण मग सांधे शेकणे, सांध्यांवर लेप लावणे, काढा घेणे इत्यादी उपाय करू लागतो. असह्य वेदना असतात. त्यापासून सुटका मिळावी म्हणून मग आपण निरुपायाने वेदनाशामके, इंजेक्शने, ट्रॅक्शन वगैरे वगैरेंचा अवलंब करतो. काय हा सुद्धा त्रास, आ
आरोग्यज्ञान- वनमाला क्षीरसागरभारतीय पूजा व्यवस्थेत पंचामृताला खूप महत्त्व आहे. त्यात दूध, दही, तूप, साखर आणि मध या पाच गोष्टी असतात म्हणून त्याला पंचामृत म्हणतात. या पंचामृताने आपण आपल्या इष्ट देवतेला स्नान घालतो. कारण या सर्व गोष्टीत विज्ञान साठविले आहे. आज आपल्याला सर्व गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर लावून पाहण्याची सवय लागली आहे. पण आयुर्वेदात या सर्व गोष्टी रोग निवारणार्थ सांगितलेल्या आहेत म्हणून आज आपण त्यातील विज्ञान थोडे लक्षात घेऊ. गोमातेचे पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय. यांचा उपयोग आय
फिरारे- श्रीकांत पवनीकर सुरुवातीपासूनच अखंड भारतातल्या मुस्लिम राजवटीचा काळ बघितला तर हा संपूर्ण कालखंड रक्तरंजीत होता असे दिसते. राज्यकर्त्यांचे साम्राज्यवादी व विस्तारवादी धोरण, वारसायुद्ध, डावपेच, विविध लढाया, सुभेदारी व त्यातले वर्चस्व, कुरघोडी, प्रांतीय लूट यांनी हा कालखंड बरबटलेला होता. त्यातही औरंगजेबाचा 60 वर्षांचा कालखंड आहे आणि कारकीर्दीचा प्रत्यक्ष काळ इ.स. 1658 ते 1707 पर्यंत आहे. या 50 वर्षांच्या काळात त्याच्या नेतृत्वाखाली मोगल साम्राज्याचा प्रचंड विस्तार हिंदुस्थानात घडून आला आणि विशाल
फिरारेमुंबईहून विमानाने फक्त साडेतीन तासांत येते रंगरंगिली दुबई! एखाद्या आठवड्यापेक्षा कमी वेळ हातात असला, तरी परिवारासोबत सुटी घालवण्यासाठी एक पर्यटकानुकूल शहर. इथे विमानतळावर ‘पाम ट्री’ची खास सजावट दिसते. जगातील अतिव्यग्र विमानतळांपैकी एक असूनही प्रवाशांना जास्तीत जास्त सुखसोयी देण्याकडे प्रशासनाचा कल असतो. कस्टम क्लीअरन्स, सिक्युरिटी चेक, बॅगेज क्लेम इ. अत्याधुनिक यंत्रणा वापरल्यामुळे झटपट होत असते. ‘ड्रग्ज’ बाळगल्यास कठोर शिक्षा, या अर्थाचे बोर्ड जागोजागी दिसतात. विमानातून उतरल्य
अर्थचक्र -प्रसाद हेरंब फडणवीस आपल्याकडे सर्वत्र व्रत-वैकल्यं केली जातात. साधारणपणे महिलावर्ग वारांची व्रते करतात. त्यामध्ये 16 सोमवार व्रत, वैभवलक्ष्मी व्रत, संतोषीमाता व्रत यांचा समावेश होतो. या वारांच्या व्रतामध्ये जी कहाणी सांगितली जाते, त्याच्या शेवटी पुढील ओळी असतात-ऊतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका... कोणतेही व्रत करताना आपल्याला फळाची अपेक्षा असते, त्यामुळे फळ मिळाल्यानंतर हुरळून जाऊ नका, तसेच कामना पूर्ण नाही झाली तर नाराजही होऊ नका, असाच संदेश देण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट
-प्रशांत कपाळे10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. यंदाही तो केला. दुसर्या महायुद्धातील अत्यंत क्लेशकारक घटना घडल्यानंतर जगभरातील काही राष्ट्रसमूहाने, मनुष्यजन्माने मिळणार्या हक्कांची यादी तयार करण्यासाठी, संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य देशांचे प्रतिनिधी एकत्र जमले व मानवाधिकारांच्या विषयावर एकमत निर्माण केले. 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने मानवाधिकारांची सार्वभौम घोषणा जाहीर केली. मानवाधिकार हे सर्व मानवांना मनुष्यजन्माने मिळालेल
उद्योगमंत्र- धनंजय दातारव्यावसायिकाला सर्व प्रकारच्या विम्याचे कवच अत्यंत गरजेचे असते, ही गोष्ट माझ्या बाबांनी व्यवसाय माझ्या स्वाधीन करताना निक्षून सांगितली होती. स्वतःच्या आणि कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी आयुर्विमा, अपघात विमा व आरोग्य विमा घ्यावा; तर दुकान, गोडाऊन, घर, माल आणि मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणार्थ सर्वसाधारण विमा (जनरल इन्शुरन्स) घ्यावा. संकट कधीही सांगून येत नसल्याने आपण सावध राहणे कधीही श्रेयस्कर. विम्याचे पाठबळ असल्याने मी अनेक संकटांतून तरलो आहे. वर्ष 1996-97 मध्ये
विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) कोणत्याही पदासाठी असली, तरी इतिहास (History Subject ) विषयावरील प्रश्न त्यात हमखास असतातच. इयत्ता दहावीपर्यंत आपण इतिहास विषय (History Subject ) आपल्या अभ्यासक्रमाला अनुसरून शिकतोच. पुढे जे विद्यार्थी विज्ञान अथवा वाणिज्य शाखेकडे वळतात, त्यांचा या विषयाशी संबंध तुटत जातो; पण पदवी वा पदव्युत्तर शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा या विषयाची सखोल तयारी करणे आवश्यक ठरते. काहींना मग यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. कला विषया
कृषिभारत सद्यःस्थितीत शेंगा पोखरणार्या अळ्यांची (हेलीकोव्हर्पा) अंडी व पहिली अळी अवस्था दिसून येत आहे. शेतकरी बंधूंना या वर्षीच्या चांगल्या पावसामुळे तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यातील हवामान हे अंशत: ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी तापमान 2-30 सें. ने घट होण्याची शक्यता आहे. असे हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणार्या अळीच्या वाढीस पोषक आहे. त्यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणार्या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्
फिरारे भारतात नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेली, पर्यटकांना आकर्षिक करणारी अनेक स्थळे आहेत. त्यामुळेच विदेशी पर्यटकांची भारतात कायम रेलचेल असते. हिमाचल प्रदेशातील डलहौजी हे असेच एक पर्यटन स्थळ आहे. दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत सर्वत्र हिरवेगार गालीचे, डोंगरांच्या कुशीत वसलेली घरे, शहरातील गर्दीपासून दूर, शांत आणि रमणीय वातावरण असलेले, देवदार आणि ओक वृक्षांनी नटलेले हे थंड हवेचे ठिकाण सर्वांनाच आकर्षित करतं. हिमाचल प्रदेशातील चम्बा जिल्ह्यातील डलहौजीला भेट देण्याकरिता दरवर्षी लाखों देशी-विदेशी पर्यटक य
अर्थचक्र आपण नेटवर्थ म्हणजे काय आणि त्याबाबतीत असणारे सूत्र गेल्या आठवड्यात समजण्याचा प्रयत्न केला होता. साध्या भाषेतील ते सूत्र पुढीलप्रमाणे आहे. निव्वळ किंमत(Net Worth) = संपत्ती(Assests) - जबाबदारी(Liabilities). आज आपण प्रत्यक्ष नेटवर्थ कशी काढायची हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. उमेश बावडेकर नावाची एक व्यक्ती आहे. ते मूळ नागपूरचे आहेत, मात्र नोकरीनिमित्त नाशिकमध्ये राहतात. त्यांच्या घरी पत्नी जयश्री, आई, एक मुलगा आणि एक मुलगी असे पाच जणांचे कुटुंब आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीत
मोक्षार्थ आज जगात उत्क्रांतिवादाचा सिद्धांत बहुसंख्यांना मान्य झाला आहे. पृथ्वी या ग्रहावर काही कोटी वर्षांपूर्वी सजीवांची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी लागणारे भौतिक घटक जसे हवा, पाणी, खनिजे, विकिरण, तापमान, आर्द्रता वगैरे योग्य प्रमाणात उपलब्ध झाले. प्रथमतः विषाणू उत्क्रांत झाला व क्रमागत एकपेशीय जिवाणू! अनुकूल परिस्थितीत एकपेशीय जीवाणूंपासून अनेक पेशीय प्राणी व वनस्पती, यांनाच आपण एकत्रितरीत्या सजीव म्हणू, यांची निर्मिती होत गेली. परिस्थितीशी जुळवून घेत तर कधी संघर्ष करत अनेक जाती, प्रजाती उत्क्
देहाची तिजोरीसंधिवात म्हणजे रुमॅटॉईड आर्थरायटिस, हा सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे. यामध्ये सांध्यांना दीर्घकालीन वेदना व दाह होतो. आपल्या स्वतःची रोगप्रतिकारकशक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवातहोतो. आकडेवारी बघायची झाली तर, एक हजार लोकांमागे सात लोक संधीवाताने ग्रसित असतात. हा महिलांमध्ये दोन-तीन पटीने अधिक आढळून येतो. संधिवातकुठल्याही वयात होऊ शकतो; मात्र, 48 ते 60 वर्षे वयोगटात हा अधिक प्रमाणात आढळतो. संधिवातामध्ये सांध्यांच्या लाईनिंगवर (सायनोव्हियम) प
फिरारे हिंदू धर्मात कोणताही सण हा एकप्रकारे उत्सवच असतो. दोन उत्सव दहा-दहा दिवसांचे रहात असून हे दहाही दिवस अत्यंत आनंदात, श्रद्धेने आणि धार्मिकतेने साजरा करण्यात येतात. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणपती उत्सव. दुसरा म्हणजे श्री दुर्गा नवरात्रोत्सव. या उत्सवात जागरण, गरबा इत्यादी पारंपरिक कार्यक्रमांसोबत इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येतात. श्री देवीचे रूप अनेक आहेत आणि प्रत्येक देवीचे माहात्म्य वेगवेगळे आहे. काही ठिकाणी तर साक्षात स्वयंभू
नवरात्र विशेष- दिगंबर शं. पांडेया देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिताःनमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला पवित्रतम स्थान आहे. मातृशक्ती हे भगवंताचे साक्षात स्वरूप असून विविध देवीच्या स्वरूपातून त्याचा आविष्कार झाला आहे. ‘मातृशक्ती’ ही केवळ स्त्रीची शक्ती नसून ती संपूर्ण मानवजातीची, समाजाची व विश्वाची जननी आहे. सत्त्व, तम, रज गुणांनी त्रिगुणात्मक आदिशक्ती आहे. त्यामुळे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिगुणात्मक देवींना अनन्यसाधारण पूजत्व
देहाची तिजोरी तुम्ही करत असलेली प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असते. अनेकदा आरोग्याशी निगडीत अनेक साध्या सोप्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. गेल्या सहा महिन्यांपासून आपण सर्वच कोरोनाच्या जागतिक महामारीने ग्रासलो आहोत. आजवर या संसर्गाने कित्येक लोकांचे बळी घेतले आणि सुदैवाने अनेक लोक या आजारातून बरे सुद्धा झाले आहेत. सुरुवातीला तर लहान मुले आणि वृद्धांनाच या आजाराचा जास्त धोका होता, परंतु आजच्या स्थितीत आबालवृद्धांसोबतच तरुणांनासुध्दा या आजाराचा धोका वाढलाय्.
फिरारे -माला पारिसेसर्व मंगल मांगल्य । शिवे सर्वार्थ साधिके ॥शरण्ये त्र्यंबके गौरी । नारायणी नमोस्तुते ॥ विदर्भातील कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा. एकूण बावन्न शक्तिपीठांपैकी एक असलेले कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर नागपूरपासून पंधरा किमी दूर अंतरावर उत्तरेला तलावाच्या काठावर वसलेले आहे. एकूण सातशे वर्षे पुरातन हे मंदिर आहे. मातेची मूर्ती स्वयंभू असून जागृत आहे. अश्विन नवरात्रात फार मोठी यात्रा येथे भरते. कोराडीमध्ये अगदी मंदिराच्या शेजारीच औष्णिक विद्युत प्र
मोक्षार्थ कितीतरी योनीतून जीवाचा प्रवास झाल्यावर मनुष्य जन्म हा मोठ्या कष्टाने पूर्वसंचित कर्मामुळे प्राप्त होतो. हे शास्त्रविधान आहे. वेद, श्रृती, पुराणात हेच सांगितले असल्यामुळे त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा. जन्ममरणाचे हे चक्र अविरतपणे चालू असते, परंतु 84 लाख योनीनंतर मनुष्य जन्म मोठ्या पुण्याईनेच मिळतो. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।तस्मादपरिहायऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ भगवत् गीतेत सांख्ययोगात भगवान अर्जुनाला हेच सांगतात.जन्म आला म्हणजे मरण आहेच आणि म
देहाची तिजोरी कोरोनासंदर्भात अनेक प्रश्न जनमानसात आहेत. प्रश्नांची उत्तरे मिळाली की, अनाठायी भीती कमी होते. त्या अनुषंगाने निवडक पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी येथे केला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की, कोरोनाला योग्यपणे हाताळले तर त्यावर मात करता येणे शक्य आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर आता प्रत्येकाला अॅडमिट का व्हावे लागत नाही?उत्तर : सुरुवातीच्या काळात सामाजिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णाचे विलगीकरण अथवा त्यास भरती करवून घेत असे. मात्र, आता
त्या दिवशी एक विचित्र घटना घडली. आमच्या कार्यालयात जाताना, एका परिसरात रस्त्यावर गर्दी उसळली होती व पूर्ण परिसरातले लोक कोणी दारातून, तर कोणी गच्चीवरून काय सुरू आहे, ते पाहत होते. तिथे विचारणा करताच उत्तर आले, बाबारे गाडी साफसूफ करून घे, सॅनिटाईझही करशील. आताच या रस्त्यावर एक 108 ची गाडी येऊन गेली. मग काय झालं, मी कुतूहलाने विचारले. तेव्हा मला सांगण्यात आले, दोन माणसे उतरली गाडीतून आणि अर्ध्या तासात कोरोनाबाधित आणि संशयितांना घेऊन गेली. पण मी मात्र वेगळ्याच विचारात पडलो. 108 वेळा देवाचे नाव घेतले
या देशात हिंदी भाषी आणि अहिंदीभाषी दोन्ही क्षेत्रांमध्ये एक मोठा वर्ग आहे, जो व्यक्तिगत चर्चेत, सार्वजनिक मंचावर, नेटवर एका विषयावर कायम आश्चर्य व्यक्त करत असतो की देशाची ही राजभाषा देवनागरी लिपीत लिहिली जात असूनही देवनागरी लिपीचा पूर्ण वापर ती का करीत नाही? ही राजभाषा ळ ला निषिद्ध का मानते, हा प्रश्न मी जेव्हा अनेक विद्वानांना विचारला तेव्हा मला सांगण्यात आले की लखनवी हिंदी किंवा खडी बोली जी ऐकताना उर्दूसारखी वाटते तिलाच अखिल भारतीय स्तरावरील प्रमाण हिंदी किंवा स्टॅण्डर्ड हिंदीचा दर्
विद्यार्थ्यांनो, आपली मातृभाषा कोणतीही असेल तरी जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. हे आपल्याला मान्य करावेच लागेल. शालेय शिक्षणातून आपण या भाषेशी परिचित होत जातो. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाला सुरुवात करतात त्यांना या भाषेचा फारसा त्रास होत नाही, परंतु अन्य विद्यार्थी विशेषत: ग्रामीण भागात इंग्रजी भाषेची भीती विद्यार्थ्यांच्या मनात कायम असते. कसेबसे 10 वी व 12 वीपर्यंत हा इंग्रजीचा गाडा ते कसाबसा हाकतात. पण पुढे पदवी शिक्षणात त्यांना याचा फार त्रास होतो. मग स्पर्धा परीक्ष
नागपूर,कोरोना महामारीच्या सावटामुळे सर्वत्र अनिश्चितता तसेच अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत देव, देश व धर्माकरिता समर्पित विश्व मांगल्य सभा नेहमीच प्रयत्नशील असते. म्हणूनच अधिक मासाचे औचित्य साधून ऑनलाईन ‘अधिकमास चिंतनमाला’ संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा या चतुःसूत्रीवर आधारित एक आगळावेगळा उपक्रम घेऊन येत आहे. जीवन व्यापन करणार्या भारतमातेच्या सुकन्यांची जीवनी ऐकण्याची संधी सर्वांना प्राप्त होणार आहे. प्रीतिलता वड्डेदार, रमाबाई रानडे, कमलाताई होस्पेट यासारख्या ज्ञात-अ
भगवान परशुरामांनी निर्माण केलेली भूमी म्हणजे कोकण. भारताचा पश्चिम किनारा आणि किनार्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्यामध्ये असलेला 720 किलोमीटर लांबीचा आणि 30 ते 50 किलोमीटर रुंदीचा भूमीचा पट्टा कोकण भूमी म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. कोकणची भूमी अपार निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या रांगा, आंबे, सुपारी, केळी, फणस, काजू, कोकम यांचे बगिचे आणि डोंगरउतारावर केलेली भातशेती, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई या कोकण भागातच आहे.
फुलायचे दिवस - सुरेखा दीक्षित ‘सा विद्या या विमुक्तये’ ही उक्ती आजही भारतातील काही शैक्षणिक संस्थांचे बोधवाक्य आहे. मुक्त करते ती विद्या. कशापासून मुक्त करते विद्या? अज्ञानापासून, बंधनापासून, दोषांपासून, अपूर्णतेपासून विद्या मुक्त करते. ‘शिक्षण’ हा शब्द विद्येच्या तुलनेत तोकडा वाटतो. एकविसाव्या शतकात तर त्याला फारच मर्यादित स्वरूप प्राप्त झाले आहे. चांगली उच्च पदस्थ नोकरी मिळावी, समाजात स्थान, पत, प्रतिष्ठा लाभावी यासाठी शिक्षण घ्यायचे. जीवनातील संघर्षाला यशस्वीपणे तोंड देत, नीत
मोक्षार्थ अखिल विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही वेदप्रणित प्रार्थना आहे. प्रार्थना ही बहुधा परमात्म्याचीच केलेली असते आणि असावी, कारण त्या प्रार्थनेतील भक्तिभाव, कारुण्य, सत्कार्यासाठी सहाय्यार्थ याचना या सगळ्या गोष्टी फलद्रुप करण्यासाठी एकमेव तो परमात्माच समर्थ असतो. वैदिक मंत्रांमध्ये आणि संतवचनांमध्ये सुद्धा ज्या प्रार्थना असतात त्यात जगत्कल्याणाच्याच प्रार्थना आणि याचना असतात. संत स्वतःसाठी, ‘तुझे भक्तिसुख देई मज प्रेम’ एवढीच याचनामिश्रित प्रार्थना करतात. पूर्ण जगाच्या सुख-शांतीसाठी
शालिवाहन शके १९४२ शार्वरीनाम संवत्सरातील अधिक अश्विन मास यंदा प्रारंभ होत असून तो १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत चालेल. पंचागात दरवर्षी चैत्र ते फाल्गुन अशी बारा मासांची रचना असते. मग हा अधिक मास आला कुठून? पंचांगात दर तीन वर्षांनी येणाèया या महिन्यास मलमास, पुरुषोत्तम मास qकवा धोंड्याचा मास असेही म्हणतात. वसिष्ठ सिद्धांतानुसार भारतीय qहदू दिनदर्शिका अथवा पंचाग हे सूर्य मास आणि चांद्र मास गणनेनुसार प्रचलित आहे. अधिक मास हा चांद्र गणनेचा अतिरिक्त भाग आहे. हा अतिरिक्त काळ बरोबर ३२ महिन
200 चा आकडा 50-60 पर्यंत घसरलासदर डायग्नोसिस सेंटरमध्ये सोशल डिस्टन्सिंग नागपूर, कोरोना विषाणूचे सावट शहरावर आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सं‘येत सतत वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे रुग्ण असलेला परिसर सील केला जात आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे महानगरपालिकेच्या सदर येथील डायग्नोसिस केंद्रात दररोज असणारी 200 ची रुग्ण सं‘या 50 ते 60 वर आल्याची धक्कादायक माहिती आढळून आली. सदर प्रतिनिधीने या डायग्नोसिस सेंटरला भेट दिली असता हे वास्तव समोर आले. उपराजधानीत कोरोना पॉझिटिव
वाचकांसाठी खास संपूर्ण तरुण भारत एका क्लिकवर डाउनलोड करा तरुण भारत पीडीएफ. जी आवृत्ती वाचायची असेल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती आवृत्ती वाचता येईल. > तरुण भारत नागपूर आवृत्ती Download Document> तरुण भारत अकोला आवृत्तीDownload Document > आजचा तरुण भारत वाचण्यासाठी क्लिक करा
वाचकांसाठी खास संपूर्ण तरुण भारत एका क्लिकवर डाउनलोड करा तरुण भारत पीडीएफ. जी आवृत्ती वाचायची असेल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती आवृत्ती वाचता येईल. > तरुण भारत नागपूर आवृत्तीDownload Document> तरुण भारत अकोला आवृत्तीDownload Document > तरुण भारत वाचण्यासाठी क्लिक करा
आजचा तरुण भारत वाचण्यासाठी खालील दिल्या लिंक वर क्लिक करा. वाचकांसाठी खास संपूर्ण तरुण भारत एका क्लिकवर डाउनलोड करा तरुण भारत पीडीएफ. > तरुण भारत नागपूर Download Document
वाचकांसाठी खास संपूर्ण तरुण भारत एका क्लिकवर डाउनलोड करा तरुण भारत पीडीएफ. जी आवृत्ती वाचायची असेल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती आवृत्ती वाचता येईल. तरुण भारत नागपूर आवृत्ती Download Documentतरुण भारत अकोला आवृत्ती Download Document
जगात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन तर राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारांनी घेतला आहे. परिस्थिती लक्षात घेता वृत्तपत्रांचे वितरण बंद करण्यात आले आहे. वाचक आणि जाहिरातदार यांना होणाऱ्या गैरसोयीसाठी आम्ही दिलगीर आहोत. तरुण भारतच्या सर्व वाचकांसाठी आणि ई पेपर वाचण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. > आजचा तरुण भारत ई-पेपर
धनश्री देशमुख पर्यटनाला जायचे तर कांही हटके गोष्टी पाहायला मिळाव्यात, अशी कोणाही पर्यटकाची इच्छा असते. नुसते पाहण्यापेक्षा त्या गोष्टीचा अनुभव घेता आला तर दुधात साखर पडते. अशाच एका अनोख्या प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर जर्मनीतील वुप्पर्टाल शहराला भेट द्यावी लागेल. जगातील सर्वात जुनी लटकती रेल्वे सेवा हे या शहराचे वैशिष्ट. आजही ही सेवा तितक्याच जोमाने सुरू आहे. 1901 पासून ही सेवा सुरू झाली व आजही रोज सरासरी 82 हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे दुसर्यार कोणत्याच देशात सार्वजनिक वाह
निलेश जठार आजकाल शहरातून शांतता राहिलेली नाही, तशीच खेड्यापाड्यातूनही ती नाहिशी होत आहे. अशावेळी चार सुखाचे आणि परमशांततेचे क्षण घालवायचे असतील तर अजून एक ठिकाण जगाच्या पाठीवर आहे. म्हणजे तशी ठिकाणे अनेक आहेत, पण राहण्या- जेवण्याची तसेच निवासाची सुविधा होऊ शकते असे ठिकाण आहे अटलांटिक महासागरात. जगाच्या एका टोकावर स्कॉटलंडच्या शेटलँड द्विपसमूहाचा भाग असलेल्या फौला आयलंडला त्यासाठी भेट द्यावी लागेल. पाच हजार वर्षे जुन्या या बेटावर निरव शांतता आहे. नाही म्हणायला समुद्राच्या ल
समाजात अनेजण करांना कंटाळलेले दिसतात. सरकारी कररचना पटत नसल्याने त्यांचा या पध्दतीवरच रोष असतो. काहीजण कर देणार्यांपेक्षा कर भरण्याची गरज नसणार्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे नाराज असतात. फुकट्यांचा भार आम्ही का वहायचा, असा त्यांचा सवाल असतो. परिणामी, कररचना, करसंकलन, त्यातल्या त्रुटी हे विषय अनेकांच्या चर्चेत आढळतात. कर देणं आणि कर घेणं, ही अपरिहार्य प्रक्रिया आहे, याविषयी दुमत असू शकत नाही. करांपासून आपली सुटका नाही, कारण त्या निधीवरच देश चालतो आणि आपण त्याचे लाभधारक आहोत. पण ही प्रक्रिया अत
भारत आणि चीनमध्ये मोठा व्यापार आहे. त्यात आपण नव्वद अब्ज डॉलर किंमतीच्या मालाची आयात करतो तर 15 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात करतो. आपण बनवत असलेल्या औषधांसाठी लागणारा 85 टक्के कच्चा माल आपण चीनकडून आयात करतो. खरं तर अशा बाबतीत कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणं चुकीचंच आहे. कोरोना व्हारसच्या आताच्या साथीचं उदाहरण घ्या. कोरोना व्हायरस चीनमध्ये आला असताना पॅरासेटॅमलच्या गोळ्या भारतात 40 टक्क्यांनी महागल्या. भारताला औषध निर्यातीतलं आपलं स्थान कायम ठेवायचं असेल, तर त्यासाठी पर्यायी कच्च्या मालाची व्यवस्था कर
संजीव लाभेे कोणत्याही गोष्टीला एकदा आपली मानल्यानंतर, म्हटल्यानंतर त्या गोष्टीची प्रत आणि प्रतिष्ठा सांभाळणे, सौंदर्य जपणे ही आपली स्वाभाविकच महत्त्वाची जबाबदारी ठरते. मातृभाषेला माणसाच्या जीवनामध्ये माता आणि मातृभूमी इतकेच महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे मराठीची जपणूक सर्व दृष्टिकोन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे प्राथमिक कर्तव्य ठरते. त्यात योग्य तेच बोलणे व योग्य तेच लिहिणे आवश्यक असते. कारण तुमचे ऐकून व पाहून अन्य व्यक्ती वा पुढील पिढ्या भाषा शिकत असतात. महाराष्ट्राच्या ज्या भागात मोठी माणसे ‘
मृणाल भगत-दुर्गेे सर्वत्र तिमिराचे साम्राज्य पसरत होते. सहस्रांशु अस्तांचलाला जाताना आपल्या कवेत तिमिराला सामावून घेत होता. पश्चिमेला मावळत्या रविकिरणाचे कोमल रूप नेत्रांमध्ये साठवत त्या वसुंधरेच्या मिलनासाठी आतुर असलेला सहस्ररश्मी त्या चारुगात्रीला क्षितिजाच्या वर असूनही दूरस्थ वाटत होता. मिहिराच्या अस्तांचलाने संपूर्ण सृष्टीच जणू तिमिरमय जाणवत होती. त्या भानूच्या जाण्याने जणू ही चारुशिला लटक्या रागात आपले गाल फुगवून एखाद्या अल्लड बालिकेप्रमाणे रुसून बसलेली जाणवते आहे. &nbs
‘प्रार्थना’ हा ईश्वरभक्तीचा साधा, सोपा मार्ग आहे. राष्ट्रसंतांनी प्रार्थनेचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, कलियुगी भक्ती महिमान । भजन आणि संकीर्तन । यज्ञात श्रेष्ठ नाम जपयज्ञ । प्रार्थनेत आले ते सारे । मूर्ति उपासना आणि ध्यान । नवविधा भक्तीचा सार पूर्ण । प्रार्थनी सर्वचि साधेसाधन । सर्व जनांसि ।। (ग्रामगीता अ-27. ओ-93, 94) भक्तीच्या सर्वच साधनांमध्ये प्रार्थना हे श्रेष्ठ साधन आहे. कारण त्यत इतर सर्वच साधनांचा समावेश होतो आणि सर्वांसाठी प्रार्थना हे सहज येण्याजोगे साधन आहे. प्रार
आयुयातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या प्रयत्नांसोबतच विशिष्ट मंत्रही उपयुक्त ठरतात. बृहस्पती हे देवगुरू मानले जातात. बृहस्पतीच्या उपासनेमुळे ज्ञान, बुद्धी, कौटुंबिक सुख मिळतं, असं मानलं जातं. बृहस्पतीच्या उपासनेसाठी गुरूवार हा सर्वात उत्तम दिवस मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू हा शुभ ग्रह मानला गेला आहे. गुरू मंत्राच्या जापाने आयुष्यातल्या अडचणी दूर होऊ शकतात. गुरू मंत्र आणि बृहस्पतीच्या उपासनेविषयी जाणून घेऊ या. * ऊं ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे: नम: * ऊं ऐं श्रीं बृहस्पतये नम: * ऊं
अतिमद्यपानामुळे यकृतात चरबी जमा होते. यामुळे यकृताच्या पेशी आक्रसतात. या स्थितीला सिर्होसिस असं म्हटलं जातं. यामुळे यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. पण अत्यल्प किंवा अजिबात मद्यपान न करणार्या लोकांच्या यकृतात चरबी साठू शकते. याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज(एनएएफएलडी) असं म्हटलं जातं. ही स्थिती सिर्होसिसला कारणीभूत ठरू शकते. या विकाराविषयी... एनएएफएलडीच्या अनेक प्रसंगांमध्ये सुरूवातीला फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. पण ओटीपोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागा
प्रत्येक जोडप्याला पालक व्हायचं असतं. पण काही वेळा कुटुंब विस्ताराचा निर्णय घेतल्यानंतरही अपेक्षित परिणाम मिळत नाही. मग आपल्याला वंध्यत्वाच्या समस्येने तर ग्रासलं नाही ना, या शंकेची पाल मनात चुकचुकते. महिलांप्रमाणेच पुरूषांमध्येही ही समस्या असू शकते. पण एक तृतीयांश प्रकरणांमध्ये महिलांमध्ये दोष असण्याची शक्यता असते. शारीरिक दोषांप्रमाणेच जीवनशैलीशी संबंधित अनेक बाबीदेखील वंध्यत्वाच्या समस्येचं कारण असू शकतात. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वाच्या बहुसंख्य कारणांवर उपाय करणं श
महाराष्ट्रात कलिंगड हे पीक उन्हाळी हंगामात घेतलं जातं. या पिकाची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते. त्या शिवाय बागायती पीक म्हणून काही ठिकाणी रब्बी हंगामात कलिंगडाची लागवड केली जाते. अलीकडे मुंबईच्या बाजारात जवळ जवळ नऊ महिने कलिंगडे उपलब्ध असतात. कलिंगडाचे पीक यशस्वी होण्यासाठी लागवडीसाठी सुधारित किंवा संकरित जातींची निवड फार महत्त्वाची असते. त्यापैकी काही जातींची माहिती या ठिकाणी देत आहोत. शुगर बेबी : महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याची फळं मध्यम आकार
अविनाश जोशी ‘शेतीतही सोने पिकवता येतं. त्यासाठी आत्मविश्वास अन् मेहनत करण्याची जिद्द असावी लागते.’ हे उद्गार आहेत ढाणकीतील रेशीम उत्पादनातून विक्रमी उत्पन्न घेणारे दत्ता व अनिता सुरोशे या कष्टकरी जोडप्याचे. रेशीम उत्पादनात यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी विक्रमी उत्पादन घेण्याची ‘हॅट्रिक’ केली. महिला शेतकरी अनिता सुरोशे यांनी तर रेशीम अळीचे संगोपन जणू काही पीएचडी केल्याप्रमाणेच केले आहे. शेतात राबराब राबणार्या या जोडीने रेशीम उत्पन्नाने सोन्याला फि
पल्लवी जठार-खताळ पर्यटकांची खूप पसंती असलेली अंदमान निकोबार ही बेटे जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, पर्यटकनाशिवायही या बेटांची आणखीही आगळीवेगळी ओळख आहे. ही बेटे अनेक मनोरंजक बाबींशी निगडित आहेत. काय आहेत ही वैशिष्ट्ये? असे मानले जाते की, अंदमानच्या नावाचे मूळ संस्कृत आहे. म्हणजे हनुमान या शब्दाचा हा मल्याळीतला उच्चार आहे. मल्याळीत हनुमानाला हण्डुमन म्हणतात व त्यावरून अंदमान हा शब्द आला आहे. निकोबारचा अर्थ आहे नेकेड लोकांची जमीन. या बेटांवर असलेल्या मूळ आदिवासी जाती बाहेरच्या ल
अवंतिका तामस्कर अझरबैजान या 95 टक्के मुस्लिम जनता असलेल्या देशात 300 वर्षांहूनही अधिक प्राचीन असे दुर्गा मातेचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अखंड ज्योती आहे व दरवर्षी येथे साधारण 15 हजारांहून अधिक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. येथे तेवत असलेल्या अखंड ज्योतीमुळे त्याला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते. हिंदू धर्मात अग्नी पवित्र व पूजनीय मानला गेला आहे व अग्नीचे वेगळेच महत्त्वही आहे. त्यामुळे या दुर्गा मंदिरात तेवणारी ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्
डॉ. वर्षा गंगणे कोरोना विषाणू (कोविड-19) आणि त्याचे परिणाम यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. कोरोनाचा अंतिम परिणाम मृत्यू असल्यामुळे एक भयाचे सावट जगात निर्माण झाले आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे जगाची अर्थव्यवस्था प्रभावित झाली असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय शोधण्याचे तातडीचे प्रयत्न व खबरदारी घेतली जात आहे. चीनमधून जगभर पसरत असलेला या विषाणूने जगभरात 93,524 संसर्गबाधित रुग्ण असून त्यापैकी 3,203 चा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमधे 80,282 रुग्ण असून 3000 च्या वर मृत्यूची नोंद करण्यात आली आहे (4-3-2020 रोजी)
सीए अभिजित केळकर ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ची स्थापना 1875 मध्ये दलाल स्ट्रीट (पथ) मुंबई या ठिकाणी झाली. भारतातील हे सर्वात जुने व प्रसिद्ध मार्केट आहे. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) अस्तित्वात येण्यापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमार्फत शेअरचे सर्व व्यवहार होत असत. 1995 पर्यंत ‘बीएसई’वर होणारे सौदे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमने होत नव्हते, मात्र 1995 पासून सर्व सौदे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमने होतात. ‘बीएसई’वर आज साधरणपणे 5000 पेक्षा ज्यास्त कंपन्या नोंदल्या गेल्या असून साधरण
संजिव लाभेे आपल्या मराठी माणूस ना नवजात शिशूचे नाव ठेवताना विचार करीत, ना दुसर्याला नावे ठेवताना! जे मनात येईल ते त्यावेळी करून मोकळा होतो. एका माणसाने आपल्या मुलाचे नाव ठेवले ‘रुधिर’ आणि मुलीचे नाव ‘रक्ताक्षी’! मी त्याला विचारले, काय रे बाबा, तुझे लाल रंगावर किंवा लाल पंथावर फार प्रेम आहे का? तो म्हणाला असे का विचारता? मी म्हटले, मुल मुलीची नावे अशी का ठेवली लाल वर्णाची? तो म्हणाला नावे मीच ठेवली माझ्या एका मित्राच्या मुलाचे नाव रुचिर आहे. त्यात थोडा बदल करून मी ‘र
पंकज पातूरकर आता करोना किंवा कोरोना वरून काय काय करोना, (आणि क्या मत करोना.) हे सांगितलं जात आहे. आपल्याच लोकांना नव्हे; तर इतर देशातसुद्धा हिंदू संस्कृतीच्या जीवन शैलीत किती मोठं विज्ञान आहे, हे या कोरोना व्हायरस टाळण्यासाठी जी नियमावली सांगितली आहे त्यातच हे सिद्ध होतं. साधारण जीवनात ‘आपला तो बाब्या, दुसर्याचा तो कारटा’, असं समीकरण असतं; पण स्वधर्म, परंपरा संस्कृती असले विषय आले की या विषयात ‘आपला तो कारटा आणि दुसर्या चा तो बाब्या’, असं मत आपण किती पुढारलेलो आहोत
रात्रीची शांत झोप अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येकाने रात्री किमान आठ तास तरी झोपायला हवं. पण आपण अनेकदा पर्याप्त झोप घेण्याकडे दुर्लक्ष करतो. सहाजिकच अपुर्या झोपेमुळे आरोग्यावर दुष्परिणाम दिसू लागतात. ते दूरगामी ठरण्याची शक्यता असते. म्हणूनच ही बाब गांभीर्याने हाताळायला हवी. अपुर्या झोपेमुळे मन एकाग्र होत नाही. कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. झोप झाली नसेल तर तुम्हाला अस्वस्थ वाटत राहतं. सतत झोप येत राहते. चहा-कॉफीसारखी उत्तेजक पेयं घेऊनही काही उपयोग होत नाही. या सगळ्याचा
डॉ. यादव गावळेे आपल्या आयुष्यात फर्निचर आणि तत्सम वस्तूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कितीतरी लोखंडी वस्तूंचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असतो. या वस्तूंचे ते मूळ स्वरूप मात्र नाही. कच्च्या लोहधातूपासून या वस्तू बनविल्या जातात. लोखंडी वस्तू बनविणार्या कारखान्यात अनेक मजूर काम करित असतात; पण त्यांचं जीवन कायम धोक्यात असतं. विशेषकरून त्यांचे डोळे. कारण लोखंडापासून वस्तू तयार करित असताना ‘वेल्डिंग’ची गरज असते. वेल्डिंग करत असताना गरम धातूच्या असंख्य ठिणग्या उड
डॉ. शरद सालफळे आपल्याला आपल्या आजाराबद्दल सारे काही समजते, असा पुष्कळांचा गैरसमज असतो. डॉक्टरांच्या कक्षात येवून आपल्या तक्रारी असे पेशंट सांगतात. स्वत:च स्वत:च्या आजाराचं निदानही करून टाकतात आणि काय काय तपासण्या करायच्या तेही तेच सांगून टाकतात. डॉक्टरांचे काम हलके करून टाकतात, म्हणजे डॉक्टरांना फक्त ‘प्रिस्क्रीप्शन’ लिहून देण्याचेच काम उरते! खरे तर, मनुष्य स्वभावाबद्दल आणि त्याच्या आजाराबद्दल अजून बरेच संशोधन व्हायचे आहे. त्यामुळे प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्सही प्रांजळपणे कबूल करतात क
'डायव्हर्टिक्युलिटिस’ हा पचनसंस्थेशी संबंधित विकार आहे. या विकारातील विविध स्थितींमुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. पचनसंस्थेशी संलग्न असणार्या अवयवांनजीक कप्पे निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवते. अशा कप्प्यांची निर्मिती हे डायव्हर्टिक्युलिटिसमागचं मूलभूत कारण ठरतं. आतड्यांच्या भित्तिकांमधले कमकुवत घटक बाहेरच्या बाजूला वाढल्याने कप्पे निर्माण होतात. हे कप्पे सुजले किंवा त्यात बॅक्टेरियांची वाढ झाली तर जंतूसंसर्ग होऊन डायव्हर्टिक्युलिटिस जडतो. डायव्हर्टिक्युलिटिसची लक्षणं सौम्य ते
सर्वेश फडणवीस- वैदिक काळात भारतात एक तत्त्व म्हणून, जीवनाचे एक अंग म्हणून भारतीय स्त्रीला हक्कासाठी लढण्याची कधी गरजच भासली नाही. सर्व हक्कांचे उद्दीष्ट असणारा सन्मान, प्रतिष्ठा आणि गौरव भारतीय स्त्रीला दिला जात होता आणि तिचे जीवन अतिशय समृद्ध होते. स्त्रीचे स्थान हे नेहमीच समाजाच्या विचारशैलीचे, प्रगतीचे आणि सार्थकतेचे निदर्शक राहिले आहे. नुकतेच एक पुस्तक हाती आले. विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून भारतीय स्त्रीजी
नितीश गाडगे प्रेमात आपल्या जोडीदाराचे मन राखण्यासाठी अनेकदा स्वतःच्या मनाविरुद्ध वागावे लागते. स्वतःच्या मनाविरुद्ध वागूनही जर जोडीदाराला आनंद मिळत असेल, तर यातसुध्दा एक वेगळेच समाधान असते. प्रेमात जोडीदाराच्या आनंदासाठी बर्याचदा आवाक्याबाहेरच्या गोष्टी करणारे बरेच आहेत, पण प्रेमाच्या नावाखाली एखादी व्यक्ती तुमचा गैरफायदा तर घेत नाही ना ? हे तपासणेही आवश्यक आहे. बर्याचदा भावनेच्या ओघात जाऊन काही गोष्टी केल्या जातात व भविष्यात त्याचा पश्चाताप होतो. या गोष्टी टाळता य
पल्लवी जठार-खताळ भारतात सर्वत्र होळी हा उत्सव मोठ्या आनंदात, जल्लोषात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा हा सण प्रत्येक प्रांतातील जाती-जमातींमध्ये विभिन्न पद्धतीनं साजरा केला जातो. त्यात होलिकोत्सव, धूलिकोत्सव व रंगोत्सव (होळी, धूळवड आणि रंगपंचमी) अशा तीन दिवसांच्या टप्प्यांमध्ये हा सण साजरा होतो. त्यातही कोकणात तर होळी पौर्णिमेच्या महिन्याआधीपासूनच या सणाची चाहूल लागते. िंसधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत (मच्छीमार) समाजाचा शिग्मोत्सव, हा अन्य प्रांतातील होलिकोत्सवापेक्षा खूपच आगळावेगळा आहे, कसा
संजय गोखले जंगलात पळस फुलला की सर्वदूर केसरी लाल रंगाची उधळण होते. या तेजस्वी लाल रंगामुळे या वृक्षाला इंग्रजीत ‘फॉरेस्ट लेम’ असे रास्त नाव दिले आहे. होळीचा सण जवळ आल्याची नांदी हे वृक्ष देतात. सर्वात जास्त उत्साहात होळी साजरी करणारे राज्य उत्तर प्रदेश; याचे राज्य पुष्प पळस आहे. पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग बनवून होळी खेळण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. फाल्गुनी पौर्णिमेला हा सण साजरा होतो, त्यामुळे भोजपुरी भाषेत या सणाला फगवा िंकवा फाग (फाल्गुनचा अपभ्रंष फाग) असे नाव आहे. गोवा येथे य
सीए अभिजित केळकर भारतात सध्या अधिकाधिक व्यवहार ऑनलाईन करण्याचं पेव फुटलं आहे. ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इंडिया’ सारख्या योजना आखून सरकारही ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी जागतिक स्तरावर बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीने सगळ्यांना गोंधळात टाकलं आहे. त्यात भरीस भर म्हणून नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा निर्णय देत त्यावर लादण्यात आलेले सर्व निर्बंध हटवले आहेत. काय आहे हे क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) ? भारतात जिथे आर्थिक साक्षरता मूळातच कम
सुधाकर अत्रे सध्या सर्वच बँका आपल्या थकीत कर्जाचे प्रमाण कमीत कमी असावे, यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यातल्या त्यात दरवर्षीच्या मार्च महिन्यात ताळेबंद व त्यानंतर होणारे ऑडीट यामुळे या महिन्यात कर्ज वसुलीवर जास्त भर असतो. यासाठी थकीत कर्जाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष कृषी कर्जाला सोडून अन्य कुठ्याल्याही कर्जाचे इंस्टॉलमेंट किंवा व्याज त्याच्या द्येय तारखेला न भरल्यास ती रक्कम अतिद्येय (ओव्हरड्यू) होते. असे खाते लगेच थकीत कर्ज (एनपीए) होत नसले, अतिद्येय झाल्यापासून प
मिलिंद महाजन आधुनिक युगात महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान, अंतराळ सैन्यदल, राजकारण, शासन आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या बुद्धिचातुर्य, क्षमतेच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. एवढेच नव्हे, तर त्या क्षेत्राचे नेतृत्व करत नवीन दिशा दाखविण्याचे कामही केले आहे. क्रीडा क्षेत्रातही अशा अनेक महिला खेळाडूंनी आपल्या क्रीडा नैपुण्य, क्षमता व कौशल्याच्या जोरावर यश संपादन केले आणि भारताचा लौकीक वाढविला आहे. कठ
डॉ. रंजन दारव्हेकर आई, तुम्ही कशाला अश्रू घालवता? जगातले कुठलेही कोर्ट त्या चौघांना वाचवू शकणार नाही... ‘तारीख पर तारीख’, हा शब्द काही नवा नाही. तो विनोदानं, तिरस्कारानं, उपहासानं, टपोरीपणानं वाचायची आणि अनुभवायची सवय झाली आहे सार्या जगाला! ...पण प्रत्येक तारीख आली की त्या चार चेहर्यांवर कसं भय असतं. त्यांच्या पोटात कसा गोळा उठतो? एक नाही, दोन नाही तर पंधरा दिवस... म्हणजे पुढच्या तारखेपर्यंत आणि जसजसा क्षण जवळ येतो तसा तसा तो घट्ट होत जातो. अश्रू त्यांचे गळून डोळ्यांची
यश या शब्दाची व्याख्या व्यक्तिगणिक बदलत जाते. आयुष्यातली ध्येयं गाठणं, उद्दीष्ट पूर्ण करणं म्हणजे काहींसाठी यश असू शकतं. एखाद्यासाठी साध्याशा क्रीडा स्पर्धेतल्या विजयापुरती यशाची संकल्पना मर्यादित असू शकते. आपलं जीवन अनंत अडचणी आणि अडथळ्यांनी भरलं आहे. त्यामुळे सर्व क्षमतेनिशी मैदानात उतरून प्रयत्न करत राहणं ही यशस्वी होण्याची गुरूकिल्ली ठरू शकते. अर्थात यश मिळवण्यासाठी स्वभावात, मानसिकतेत काही बदल करावे लागतात. त्याविषयी... नकारात्मकता सोडून इच्छाशक्ती वाढवायला हवी. काही सवयींम
वसंत मोरेश्र्वर दिढे(मामा) अध्यात्म या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. मोजक्या शब्दात अध्यात्म मांडता येणार नाही अन सांगताही येणार नाही. अध्यात्म हे जगायचे असते. अनुभवायचेही असते. जो अध्यात्म जगतो, त्याला मोक्ष प्राप्ती होते, हे निश्चित! आता अध्यात्म जगणे म्हणजे नेमके काय? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे म्हणून कार्य करतो, ते सगळे मनापासून करावे, प्राामणिकपणे करावे, नि:स्वार्थ भावाने करावे, इतरांच्या कल्याणासाठी करावे, याला म्हणतात अध्यात्म जगणे! स्वत:साठी तर सगळेच जगतात. नोकरी कर
एक होता कॅन्सर! रक्ताचा कॅन्सर! खूप मोठ्या संख्येने हा कॅन्सर लोकांना होत नसे. जंग जंग पछाडून ज्याचे उपचार डॉक्टर-शास्त्रज्ञ-रसायनतज्ज्ञांनी शोधावे, असा काही त्याचा दरारा नव्हता. पण शेवटी कॅन्सरच तो! ज्याला झाला त्याला तर त्याचा एकुलता एक जीव तीन-पाच वर्षांत गमवावा लागे! कर्करोगाच्या संशोधनाचा धगधगता यज्ञ पश्र्चिमेत चालू होता. एकीकडे कर्करोगाच्या पेशींची वैशिष्ट्ये, अगदी त्यांच्या अंतरंगातल्या जनुकीय माहितीपर्यंत पोचून उलगडण्याचा धडपड होती, तर दुसरीकडे निरोगी पेशींना अभय देऊन फक्त कर्करोगाचे शरसंधान करतील,
नाही रूप रूबाब सौष्ठव तसे आरोग्य नाही जरीदेहाचा मग लोभ काय म्हणूनी असावा तरी!कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या ‘मृत्यूला म्हणतो’ या कवितेचं मी नुसतं वाचनच केलं नाही, तर िंचतनही केलं. आपण रूपवान नाही, धनवान नाही, ज्ञानी नाही, कोणत्याही क्षेत्रातील नामवंत नाही. काहीच नसतानासुद्धा जगण्याचा मोह मात्र सुटला नाही. अपघाताने जन्म झाला आणि हाती काहीच नसताना जगलो. लोक जगतात तसे. एक गोष्ट लक्षात आली की, जे खूप धनवान होते, रूपवान होते, प्रसिद्ध होते तेसुद्धा जग सोडून गेले. आपणही एक दिवस मरणार आहोत. स्वतः
सर्वेश फडणवीस उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. वसंत ऋतूचे आगमन झाले आहे आणि आंब्याला मोहोर बहरलेला आहे. बहराच्या मोसमात दूर सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दाम्पत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे आणि आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदाखाली अधिक बहरतो आहे. आत्मचरित्र कायमच वेगळी प्रेरणा देत असतात. मेळघाटावरील मोहर : डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे हे मृणालिनी चितळे लिखित राजहंस प्रकाशन, प्रकाशित पुस्तकही याच प्रकारचे आहे. कोल्हे दाम्पत्याविषयी आणि मेळघाटात
मीरा टोळे सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे, तर दहावीची परीक्षा नुकतीच सुरू झाली आहे. हळूहळू विद्यापीठाच्या परीक्षाही सुरू होतील. परीक्षांचा काळ हा विद्यार्थी आणि पालक दोघांकरिताही अटीतटीचा असतो. वर्षभर मुलांनी केलेल्या मेहनतीला यश मिळावे या अपेक्षेत शिक्षक, पालक असतात. या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनाही आपल्या भवितव्याची काळजी असल्याने त्यांनाही ताण असतो. परीक्षा जवळ आली, की- विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रमाण वाढायला लागते. या ताणातूनच निर्माण होणारी भीती आणि नैराश्य य
शेतमालाच्या काढणीपश्चात नुकसानीचं प्रमाण कमी करणं, अधिक काळ टिकणार्या वाणांची लागवड, बागांमध्ये योग्य पद्धतीच्या मशागतीचा अवलंब, काढणी, हाताळणी, पॅकिंग, साठवणूक आणि वाहतुकीच्या योग्य पद्धतीचा अवलंब यासारख्या उपायांमुळे फळं आणि भाजीपाल्याचं काढणीपश्चात नुकसान कमी होऊ शकतं. शेतमालाच्या काढणीपूर्वी आणि नंतर रसायनांचा, संजीवकांचा आवश्यक मात्रेत वापर आणि विक्रीची योग्य पद्धत यातूनही हे नुकसान कमी केलं जाऊ शकतं. त्याच बरोबर शेतमालाची प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उप
केंद्र सरकारनं तेल आयातीवर लादलेले निर्बंध आणि वाढवलेल्या आयातकराचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. गेल्या चार वर्षांनंतर सोयाबीनला चांगला भाव मिळत असून बाजारपेठेत एक प्रकारे सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे. सोयाबीनचा भाव येत्या काही दिवसात पाच हजार रुपयांचाही टप्पा ओलांडेल, असे संकेत मिळत आहेत. सध्या बाजारपेठेत सोयाबीनचा भाव सौद्यात 4300 रुपये तर पोटलीत 4200 च्या आसपास आहे. सोयाबीनचा हमीभाव 3710 रुपये जाहीर झाला आहे. हमीभावापेक्षा चढया भावानं बाजारपेठेत सोयाबीन विकलं जात आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष
शहरे म्हणजे- सर्व सुखसुविधा असा समज आज जगात दृढ झाला आहे, मात्र चीनमधील जियांगचिनजवळचे ‘हुआझी’ हे छोटेसे गाव जगातील बड्या शहरांनाही या बाबतीच मागे टाकेल. चीनच्या उत्तर तटावर असलेल्या या गावात 2 हजार लोक राहतात व त्यांचे वार्षिक सरासरी उत्पन्न 1 लाख युरो म्हणजे 80 लाख रुपयेे आहे. म्हणजेच येथील सर्वच नागरिक लक्षाधीश आहेत.चीनच्या जियांगचिन भागातील हुआझी हे समाजवादी गाव म्हणून 1961 ला स्थापन केले गेले. त्यावेळी या गावचे शेतीउत्पन्न अगदीच सुमार दर्जाचे होते. कम्युनिस्ट पार्टीचे माजी अध्यक्ष वू रेनवाओ
हिमाचल प्रदेशातील निसर्गसौंदर्याने संपन्न अशा कसोल या गावात भारतीय पर्यटकांना राहण्यासाठी बंदी आहे. इतकेच नव्हे तर येथे भारतीय पुरुषांना तर ‘नो एंट्री’च आहे. हा भाग मिनी इस्त्रायल म्हणून ओळखला जातो व येथे इस्त्रायली नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. हे एकूण गाव आपण इस्त्रालयमध्ये आलो असाच फिल देते. येथे भारतीय पर्यटकांना कुणी हॉटेलमालक खोलीच देत नाहीत, त्यामुळे येथे पर्यटकांना मुक्काम करणे अडचणीचे जाते. अर्थात असा कोणताही कायदा येथे नाही मात्र येथील स्थानिक पर्यटक व्यावसायिकच प
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते दादाभाई नवरोजी यांनी 1876 मध्ये 1867-68 या वर्षासाठी केली. वस्तू व सेवाकर्मे यांचे उत्पादन, ही राष्ट्रीय उत्पन्नामागील मूलभूत कल्पना आहे म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करावयाचे म्हणजे वस्तू व सेवाकर्मे यांच्या प्रवाहाचे मापन करावयास पाहिजे, असे त्यांनी म्हटले तसेच यासाठी जे माप वापरायचे ते असे असले पाहिजे की, त्यामुळे निरनिराळ्या वस्तू व सेवाकर्मे यांची माणसाला असलेली गरज आर्थिक दृष्टिकोनातून मोजली गेली पाहिजे. मानवी गरजा भागविण्यासाठी वस्तू व स
मागील वर्षी, एक एप्रिल 2020 पासून देशातील दहा राष्ट्रीयकृत बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या राष्ट्रीयकृत बँका निर्माण करण्याची घोषणा सरकारने केली होती. एकत्रीकरण व विलिनीकरण या शब्दांची गल्लत झाल्यामुळे हे एकत्रीकरण कायदेशीरदृष्ट्या, एक एप्रिल 2020 पासून होऊ शकणार नाही, असे ठाम मत माध्यमातून मांडल्या जाऊ लागले. विलिनीकरणाची प्रक्रिया किचकट व वेळकाढू तर बँकिंग कायदा 1970 व 1980 नुसार केंद्र सरकारला, रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्याने राष्ट्रीयकृत बँकांच्या एकत्रीकरण करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सरकारने हा मार्ग
केसांशी निगडीत समस्यांवर उपाय म्हणून मेहेंदी वापरण्याची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आली आहे. अगदी आजीपासून ते तरुण नातीपर्यंत सर्वच मुली आणि आता मुलेही केसांच्या आरोग्यासाठी मेहेंदीचा वापर करणे पसंत करताना दिसतात. मेहेंदी वापरल्याने केसांवर रंग तर चढतोच, पण त्याशिवाय मेहेंदीमध्ये असलेली अनेक पोषक तत्वे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पूर्वीच्या काळी आणि अजूनही काही ठिकाणी मेहेंदीच्या झाडांची पाने वाटून तो लेप केसांना लावण्याची पद्धत होती. पण आजकाल मेहेंदीची पाने वाळवून त्यापासून तयार केलेली मे
आपण आपल्या शरीरावर अनेक दबाव आणत असतो आणि त्याने कुरकुर करायला सुरुवात केली तर त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचा अपरिहार्य परिणाम आपल्यावर होतो पण नेमकेपणाने सांगायचे- तर तो परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. कारण शरीराला ओव्हर टाईम करावा लागला तर जादा रक्त पुरवावे लागते आणि ती जबाबदारी हृदयावर असते. आपल्या देशात बायकांना फार काबाडकष्ट करावे लागतात. त्यामुळे या देशातल्या 50 टक्के महिला या कोणत्याही क्षणी हृदयविकाराला बळी पडतील अशी शक्यता असते. ही शक्यता कमी करण्यासाठी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.
द. वा. अंबुलकर आता परीक्षेचे दिवस आहेत म्हणून ही खास चर्चा... मेंदूची बांधणी फार कौशल्याने केलेली दिसते. सामान्य आधुनिक माणसाला, कामापुरते तरी वैद्यकीय ज्ञान असावे. मानवी मेंदू हाडांच्या छानशा ऐटीन उर्फ ‘क्रेनियम’ मध्ये बसवलेला असतो. त्याचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम्स व आकारमान तेवढेच घनसेंटीमीटर असते. मेंदूची वाढ ( किंवा विकास) पहिल्या सहा वर्षातच होते. मेंदूत दशलक्ष न्यूरॉन्स असतात. सगळ्या ऐच्छिक क्रियांवर यांचा ताबा असतो. दृष्टी, चव, ध्वनी, स्पर्श, बोलणे वगैरे सर्व ज्
सर्वेश फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अदम्य स्वातंत्र्य, प्रीती, अतुल धैर्य, प्रज्ञा, प्रतिभा, हौतात्म्याविषयीचे आकर्षण, भावनात्मकता, इत्यादी गुणांच्या मिश्रणाने बनले होते. त्याच्या ठिकाणी प्रबळ ज्ञान लालसाही होती. सावरकर जे काय म्हणून माहिती आहेत ते केवळ क्रांतिवीर, अंदमानात छळ सहन करणारे राष्ट्रभक्त म्हणूनच माहिती आहेत. मात्र या त्यांच्या ओळखीच्या पलीकडे अत्यंत उदात्त ध्येयवादी, साहित्यिक, कवी हृदयाचा अथांग महासागर, महाकवींच्या ताकदीचा साहित्यक ही सावरकरांची ओळख आहे. 26 फेब्रुव
आजकाल शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढत आहे. जवळपासच्या अनेक खेड्यांना या शहरीकरणाच्या प्रक्रियेपासून वाचवणं शक्य नाही. अशा परिस्थितीत शहरालगत एखादं ग्रामीण पर्यटनस्थळ वसवणं तसं कठीण आहे. असं पर्यटनस्थळ दूरच्या ग्रामीण भागात वसवण्यात आल्यास त्या ठिकाणी वाहतुकीच्या िंकवा तत्सम सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. शिवाय, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि निवासाच्या उपयुक्त सुविधा याबाबीही गरजेच्या ठरणार आहेत. या सर्व सुविधांनी युक्त पर्यटनस्थळ प्रत्यक्षात आल्यास तिथं पर्यटकांचा ओढा आपोआप वाढेल आणि त्याद्वारे संबंध
कृषी क्षेत्रात या ना त्या कारणांनी जैव उत्तेजकांचा वापर केला जातो. त्यामुळे जैव उत्तेजकांचं असं वेगळेपण राहिलं आहे. मात्र, या संदर्भातही काही समस्या समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर देशभरातील वापरल्या जाणार्या बिगर नोंदणीकृत जैव उत्तजेकांना मान्यता देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला. त्याच बरोबर या संदर्भातील खत नियंत्रण आदेशात दुरुस्ती करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. छोट्या उद्योजकांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं. कायद्याची मान्यता नसलेल्या; परंतु शेतीमध
फ्रान्समध्ये गेलात तर एका अनोख्या रस्त्याला भेट देण्यास विसरू नका. हा रस्ता दिवसातून दोन वेळा दोन तासांसाठी खुला असतो व पाहता पाहता पाण्यात दिसेनासा होतो. दिवसातल्या ठराविक दोन वेळा सोडल्या तर बाकी पूर्ण वेळ हा रस्ता भरतीच्या पाण्यात बुडालेलाच असतो. मेन लँड ते नॉइरमॉंटियर बेटाला जोडणारा हा रस्ता पॅसेज टू गोईस म्हणजे चपला बूट ओल्या करत पार करायचा रस्ता या नावाने ओळखला जातो.हा रस्ता साडेचार किलोमीटर लांबीचा आहे व 1701 साली तो प्रथमच नकाशावर दाखविला गेला. फ्रान्स
मध्यप्रदेशातील निसर्गाच्या कुशीत व सुमारे 1700 फूट खोलीच्या दर्यांमधून वसलेले पाताळकोट हे ठिकाण आजही शहरी जीवनापासून कोसो दूर आहे व म्हणूनच ते नितांत सुंदर व निसर्गाच्या कुशीत नेणारे ठिकाण ठरले आहे. एकूण 12 गावांच्या या परिसरातील काही गावे आजही दुर्गम म्हणावी अशी आहेत. येथील घनदाट जंगलामुळे कित्येक ठिकाणी दोन तासांपेक्षा अधिक काळ सूर्यकिरणे पडत नाहीत तर येथील दाट, उंच व भलेथोरले वृक्ष महाभयंकर राक्षसांची आठवण करून देतात.सातपुडा पर्वतरांगांच्या दरीतला हा भाग आदिवासी वस्तीचा आहे. येथील अनेकांना शहर म्हणजे काय
सुधाकर अत्रे एक फेबु्रवारी 2020 ला सादर केलेल्या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात घोषित केलेल्या लघु व मध्यम उद्योगांच्या कर्जाच्या फेररचनेच्या योजनेला डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली व रिझर्व्ह बँकेला त्यासंबंधी सर्व बँकांना दिशा निर्देश देण्याची सूचना केली. रिझर्व्ह बँकेने अकरा फेब्रुवारी 2020 ला परिपत्रक काढून सर्व बँकांना व गैर बँकिंग वित्तीय संस्थाना या संबंधी सूचना केली.योजनेचा मूळ गाभा मागीलवर्षी एक जानेवारीला घोषित योजने नुसारच आहे. थोडक्यात- यो
डॉ. वर्षा गंगणे भारत हा जैवविविधता तसेच विविध प्रकारचे हवामान असलेला देश आहे. मानव निसर्गाची सर्वाधिक चिंतनशील, अनुपम तसेच अनाकलनीय अशी रचना आहे. मानवाच्या जन्मापासून तो निसर्गाच्या विविध रूपांशी व घटकांशी समायोजन करण्याचा प्रयत्न करीत असलेला दिसून येतो. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाची भौगोलिक रचना व स्थीती वेगळी असलेली दिसून येते. त्या-त्या ठिकाणच्या हवामानानुसार त्या-त्या क्षेत्रातील कृषी व्यवसाय, तंत्रज्ञान, व्यापार, वाहतूक, संचार व्यवस्था इत्यादींचा विकास झालेला दिसून येतो. विकासाच्या संकल्पन
ओमप्रकाश ढोरे9423427390 उन्हाळा म्हटला, की- प्रत्येकाला नको नकोसा वाटतो. अंगाची लाहीलाही होते. जीव कासाविस बेचैन होतो. अंगातून घामाच्या धारा सतत वाहत असतात. जीव पाणी पाणी होतो. सगळं वातावरण गरम झालेलं असते. उष्मांकामुळे जीवित हानी होते. प्रत्येक जण या उन्हाच्या झळां पासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय आपल्या आर्थिक क्षमते नुसार करताना दिसतात. प्राणी, पक्षी, झाडे ही याला अपवाद नाहीत. उन्हाळ्यात सगळं वातावरण भकास, उजाड, रखरखलेलं बनलेलं असल्यामुळे दुपारच्या वेळी चिटपाखरू देखील दृष्टीस पडत नाही. निर्जन व
अलका माईणकर9403114658 माझ्या आयुष्यात दुःखाची कमी नाही... लहानपणापासून तर आजतागायत दुःखाने माझी पाठच सोडलेली नाहीये. अगदी जिवलग मित्र, मैत्रीणीसारख ते माझ्या वाट्याला आलंय्... पण, काय आहे न माझ दुःख हे हसरं आहे... दुःखात तर सगळेच रडतात; पण माझ्या दु:खाला मी हसण्याने न्हाऊ घालते. माझ्या दुःखाला सारखं वाटत असत आपण सुखासोबत खेळावे, बागडावे, सर्व ऋतूमधे हरखून जावे... हिवाळ्यात गुलाबी थंडीची शाल पांघरावी तर उन्हाळ्यात फुललेल्या गुलमोहराच्या पायघड्यावरून चालावे. माझ्या दुः
शरीरातल्या लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होणं हे काही व्याधींच लक्षण असतं. त्यामुळे यासंदर्भात वेळीच उपचार घ्यायला हवेत. सर्वसाधारण रक्तपेशींच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या लाल रक्तपेशींना मायक्रोसिस्टोसिस (microcytosis) असं म्हटलं जातं. शरीरात पुरेशा हिमोग्लोबिनची निर्मिती झाली नाही तर मायक्रोसिटिक ॲनिमिया होतो. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात पुरेशा हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही. लक्षणं- प्राथमिक स्तरावर या विकाराची लक्षणं दिसून येत नाहीत. विकाराच्या पुढच्या टप्प्यांमध्ये लाल रक्तपेशींच
आजकाल फास्ट फूडच्या सेवनाकडील ओढा बराच वाढला आहे. त्यातच तेलकट, मसालेदार जेवण घेतलं जातं. मग अशा जेवणानंतर मळमळणं, आम्लपित्त, ढेकर येणं अशा पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. अशा वेळी अवघ्या काही सेकंदात बरं वाटण्याचे दावे करणार्या अँटासिड गोळ्या तसंच टॉनिक्स घेतली जातात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची ॲटासिड्स उपलब्ध असली तरी प्रत्येकाची कार्य करण्याची पद्धत एकच असते. अँटासिडमध्ये कॅल्शियम, ॲल्युमिनिअम, मॅग्नेशियम आणि सोडियम बायकार्बोनेट हे घटक असतात. अशा गोळ्या किंवा टॉनिक वारंवार घेण्या
सर्वेश फडणवीस पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे- इतिहासातील अलौकिक व्यक्तिमत्त्व. 19 फेब्रुवारी तारखेप्रमाणे छत्रपतींची जयंती! ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे तीन शब्द नुसते उच्चारले, की- सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकीक असे दुसरे छत्रपती शिवाजी राजे सापडणार नाहीतच. जगातल्या साहसी, पराक्रमी आणि दिग्विजय अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत दिपस्तं
सुहास लुतडे एका गावात एक धोंडीबा नावाचा शेतकरी राहत होता. त्याला एकूण चार मुले होती. त्यांची नावे अजय, विजय, राहुल आणि ओम असे होते. ते त्या गावातील सुखी कुटुंब होते. आजवर त्याने शेतात कष्ट करून संसार केला होता. चारही मुलांचे लग्न करून तो मोकळा झाला होता. मोठ्या घरात नातवंडे बागडत असे. पाहता पाहता काळ लोटत गेला. तो म्हातारा होऊ लागला. आता त्याला शेताची कामे जमेना. पुढे तो आजारी राहू लागला. आपला लवकरच मृत्यू होणार, ही बाब त्याने उमजली होती. त्याने सर्व मुलांना जवळ बोलावले आणि काही सांगण्याचा प्रयत्
राज्यात डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यास सुरुवात झाली आहे. या उतार्यांवरून आता राज्यातील कोणत्या शेतकर्यानं किती क्षेत्रावर, कोणतं पीक घेतलं, याची माहिती प्रशासनाला समजणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळात पीक विमा वा अन्य मदत देताना या माहितीचा उपयोग होणार आहे. ही योजना रब्बी हंगामापासून राज्यभर राबवण्यात येणार असून महसूल विभागनिहाय राज्यातील सहा तालुक्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जमिनीचा महसुली लेख ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं गाव नम
कधी पाऊस, कधी धुकं तर कधी उन्हाची तीव्रता यामुळं निर्यातक्षम डाळिंबांचं संरक्षण करण्यासाठी शेतकर्यांनी संपूर्ण बागांवर प्लास्टिकच्या आच्छादनावर भर दिला आहे. याचं कारण बदलत्या हवामानामुळं डाळिंबाला तडे जातात. तसंच फळांची प्रत खालावल्यामुळं निर्यातीसाठी नाकारली जाण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी प्लास्टिकच्या आच्छादनाचा उपाय करण्यात येत आहेत. यावर्षी राज्यात अवकाळी पावसानं बरेच दिवस ठाण मांडलं होतं. त्यामुळे मृग बहारात आलेली फळ या अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त झाली. यातच अजूनही ढगा
शुभम वाघमारे छत्तीसगढच्या बस्तर भागातील चित्रकूट येथे असलेला चित्रकूट धबधबा एखाद्या चित्रकाराने त्याच्या कुशल कुंचल्याने रेखावा तसा देखणा तर आहेच; पण तो देशातला सर्वात मोठा आणि सुंदर धबधबाही आहे. गोदावरीची उपनदी इंद्रावतीवरचा हा धबधबा लांबीला पाऊण किलोमीटर व 90 फुट उंचीचा आहे. विशेष म्हणजे वर्षभर हा धबधबा सतत कोसळत असतो व प्रत्येक ऋतूप्रमाणे त्याचे रूपडे बदलत जाते. धोधो पावसात तो लालगडद रंगाच्या पाण्याने उफाणत असतो तर उन्हाळ्यात चांदण्या रात्री दुधासारखा सफेद रंगात फेसाळतो. पावसा