क्रीडा:

क्रीडा

नाडकर्णींना श्रद्धांजली म्हणून भारतीय संघाने बांधली काळी पट्टी

बंगळुरू,भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या वन-डे सामन्याला बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदाता सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा गोलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने आपल्या हातावर काळी पट्टी लावत मैदानावर पाऊल टाकले. भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे शुक्रवारी निधन झाले होते. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने काळी पट्टी लावलेली आहे.  नाडकर्णी यांनी १९५५ ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. तर त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद..

ज्या वयात खेळाडू करिअरची सुरुवात करतात तेव्हा माझे करिअर संपले : इरफान पठाण

मुंबई,टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने शनिवारी (04 जानेवारी)सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण आहे. मात्र प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात हा क्षण येतच असतो, असे पठाणने यावेळी म्हटले. परंतु निवृत्तीच्या निर्णयाबात इरफानने आज अजून एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.  इरफान म्हणाला की, लोक 27-28 वर्षांचे असताना करिअरची सुरुवात करतात. परंतु त्या वयात माझे करिअर संपले. इरफानने त्याच्या वयाच्या 19 व्या वर्षी टीम इंडियात स्थान ..

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडला ३-० ने ‘व्हाईटवॉश’; मार्नस लाबूशेन मालिकावीर

सिडनी, फिरकीपटू नॅथन लायनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची मिळालेली साथ याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. दमदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबूशेनला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला.   ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५४ धावांची मजल मारल्यानंतर लायनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावांवर गडगडला. ..

मुलगी आरती करते, म्हणून टीव्हीच फोडून टाकला – शाहिद आफ्रिदी

इस्लामाबाद, गेले काही दिवस दानिश कनेरिया हे नाव चर्चेत आहे. पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया फिरकीपटू म्हणून खेळत होता. पण दानिश हिंदू असल्याने त्याला पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंच्या रोषाला आणि त्रासाला सामोरे जावे लागले. पाक खेळाडू त्याला अतिशय हीन दर्जाची वागणूक देत होते, असा गौप्यस्फोट शोएब अख्तरने केला. त्यामुळे पाकिस्तानातच हिंदू आणि मुस्लीम असा भेदभाव केला जातो, अशी टीका भाजपा खासदार गौतम गंभीरने केली. त्या मुद्द्यावर वातावरण तापलेले असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा ..

अजिंक्य रहाणे म्हणतो 'या' कारणामुळे दिल्लीकडून खेळण्याचा निर्णय घेतला

 मुंबई,आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव नुकताच कोलकाता शहरात पार पडला. लिलावात ३०० हून अधिक खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. त्याआधी प्लेअर ट्रान्स्फर विंडोमध्ये संघमालकांनी काही महत्वाच्या खेळाडूंची अदलाबदल केली. यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने आपला महत्वाचा फलंदाज अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे दिले. लिलाव पार पडल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच याबद्दल भाष्य केले आहे. गेली काही वर्ष अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाचा महत्वाचा हिस्सा होता. मात्र २०१८-१९ च्या हंगामात अखेरच्या ..

दानिश कनेरिया पैशांसाठी काहीही बोलू शकतो – जावेद मियाँदाद

इस्लामाबाद, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या जावेद मियाँदादने, दानिश कनेरियावर टीका केली आहे. दानिश हा पैशांसाठी काहीही करु शकतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकं त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत, मियाँदाद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रीया दिली.  त्यांना नेमकं काय सिद्ध करायचे आहे हेच समजत नाही. पण कनेरियाबद्दल विचारत असाल तर तो पैशांसाठी काहीही करु शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे लोकंही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवत आहेत, ज्याच्यावर फिक्सींगमुळे बंदी घालण्यात ..

बुमराहची फिटनेस टेस्ट एनसीएमध्येच होणार – सौरव गांगुली

कोलकाता, दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेस टेस्टबद्दल गेल्या काही दिवसांबद्दल चर्चा सुरु होत्या. बंगळुरुची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बुमराहची फिटनेस टेस्ट करण्याबद्दल उत्सुक नसल्याची माहिती समोर आली होती. बुमराहनेही एनसीएमध्ये जाण्याऐवजी स्वतःचे खासगी डॉक्टर आणि ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली सराव करण पसंत केलं होतं. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या सर्व प्रकरणावर आपलं मत मांडत, बुमराहला एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावीच लागेल असं स्पष्ट केलं ..