राजकीय

लोकसभा, विधानसभेबाबत युतीचे ठरले ;पुढील आठवड्यात होणार औपचारिक घोषणा

मुंबई, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपा युतीनेच लढविणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून निर्माण झालेले मतभेद संपुष्टात आले असून, लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 व भाजपा 25 जागांवर, तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागांवर लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुढील आठवड्यात मुंबईत येणार असून, मातोश्रीलाही भेट देणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर जागांबाबतची औपचारिक घोषणा करण्यात ..

राफेल समजून दाखवला एअरबस व्यवहाराचा ई-मेल; राहुल गांधी पुन्हा तोंडघशी

       नवी दिल्ली,     राफेल फोबियाने ग‘ासलेले कॉंगे‘सचे अध्यक्ष राहुल गांधी आज मंगळवारी पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी आज त्यांनी पत्रपरिषदेत एक ई-मेल सादर केला आणि राफेलमध्ये घोटाळा झाल्याचा हा आणखी एक पुरावा असल्याचे सांगून, मोदी यांना तुरुंगातच पाठवायला हवे, असे राहुल गांधी उत्साहाच्या भरात बोलून गेले; पण हा ई-मेल राफेलशी संबंधित व्यवहाराचा नसून, एअरबस आणि रिलायन्स डिफेन्स यांच्याशी ..

तृणमूल आमदाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

           कोलकाता,   पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच हन्सखली पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना निलंबित करण्यात आले आहे. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. सत्यजित बिश्वास हे कृष्णगंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. नाडिया जिल्ह्यात ..

महाआघाडीचे सरकार आले तर...रोज बदलतील पंतप्रधान : अमित शाह

           पणजी,   उद्या जर देशात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तर सोमवारी मायावती पंतप्रधान असतील, मंगळवारी अखिलेश, बुधवारी देवेगौडा, गुरुवारी चंद्राबाबू नायडू, शुक‘वारी स्टॅलिन, तर शनिवारी शरद पवार पंतप्रधान असतील आणि रविवारी देशाला सुटी असेल. याचाच अर्थ देशात दररोज पंतप्रधान बदलले जातील, असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांंनी महाआघाडातील घटकपक्षांवर तोफ डागली.  कॉंग‘ेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ..

पुतळ्यावर खर्च केलेले पैसे जनतेला परत करा; मायावतींना कोर्टाचे आदेश

           बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्मारकं आणि पुतळे उभारण्यावर खर्च केलेले जनतेचे सर्व पैसे परत करावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.    मायावती यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारकडून पुतळ्यांवर करण्यात आलेल्या खर्चाला आक्षेप घेत २००९ साली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सुमारे दहा वर्षांनंतर सरन्यायाधीश ..

घटनेच्या रक्षणासाठी सत्याग्रह सुरूच राहणार; ममता बॅनर्जी यांची भूमिका

        कोलकाता,  देशाची लोकशाही आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी माझा सत्याग‘ह सुरू राहणार असल्याची भूमिका बंगालच्या मु‘यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सोमवारी मांडली.रविवारी रात्री कोलकाता पोलिस प्रमुखांच्या चौकशीसाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांना अटक करण्यात आल्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी, केंद्र सरकार सीबीआयचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करून धरणे आंदोलन सुरू केले होत. त्यानंतर आज दोन जिल्ह्यांमध्ये तृणमूल कॉंगे‘सच्या कार्यकर्त्यांनी ..

ममता चोर, डाकूंच्या पाठीशी : चौधरी

            कोलकाता,  बंगालच्या मु‘यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीबीआयमधील वादात कॉंग‘ेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममतांना पािंठबा जाहीर केला असतानाच, या मुद्यावरून कॉंग‘ेसमध्ये फूट पडली आहे. बंगालमधील कॉंग‘ेसचे खासदार अधिररंजन चौधरी यांनी ममता ममता बॅनर्जी चोर आणि डाकूंच्या पाठीशी उभ्या आहेत, असा मोठा आरोप करून, राहुल गांधींनाच तोंडघशी पाडले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चौधरी म्हणाले ..

तेलंगणात भाजपा स्वबळावर लढणार;बंडारू दत्तात्रेय यांची माहिती

हैदराबाद, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा तेलंगणात कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही आणि सर्व 17 जागा स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते बंडारू दत्तात्रेय यांनी आज रविवारी येथे दिली.    भाजपाने यावेळी 400 जागा िंजकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, ते गाठण्यासाठी भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच भ‘ष्टाचारमुक्त सरकार दिले आहे. त्यांची लोकप्र..

वातानुकुलित खोलीत बसणार्‍यांना सहा हजाराचे मोल कळणार नाही;पंतप्रधानांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

लेह, माझ्या सरकारने देशभरातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली, पण कॉंगे‘स व अन्य विरोधकांनी त्यावरही टीका केली. दिल्लीत वातानुकुलित खोलीत बसणार्‍यांना गरीब शेतकर्‍यांसाठी सहा हजार रुपये किती मोलाचे आहेत, याचे महत्त्व कधीच कळणार नाही, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे चढविला.  लेह येथे विविध विकासात्मक योजनां..

नोटाबंदी एक महत्त्वपूर्ण निर्णय, जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढला- रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारच्या या अखेरच्या अधिवेशनात उद्या पीयूष गोयल संसदेत हंगामी अर्थसंकल्प मांडू शकतात. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारांसाठी अमेरिकेत गेल्याने गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा कार्यभार सोपवण्यात आले आहे. ' पहिल्या दिवसापासूनच सरकारचे ध्येय होते की, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सोयी-सुविधा पोहोचाव्यात. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून नवीन भारत बनविण्याचे संकल्प सोडले नाही.  तसेच ..

शंकरसिंह वाघेला यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत शंकरसिंह वाघेला यांनी अहमदाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  पूर्वाश्रमीचे भाजपा नेते अशी शंकरसिंह वाघेला यांची ओळख होती. त्याअगोदर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले होते. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाशी जवळीक साधली. आता स्वत:चे राजकीय ..

देशाचा विश्वासघात करणाऱ्यांना सोडणार नाही: नरेंद्र मोदी

चेन्नई : मदुरैमध्ये एका सभेला ते संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विश्वासघात करून, देशातील विविध बँकांचे पैसे बुडवून देशाबाहेर पळून जाणाऱ्यांना अजिबात सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. देशाचा पैसा बुडवून पळून जाणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवरही मोदींनी सडकून टीका केली आहे. मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या यांचा स्पष्ट उल्लेख करत मोदी म्हणाले की,' देशाचा विश्वासघात करून पळून जाणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही. देशाचे पैसे लुटणाऱ्यांना आम्ही शिक्षा देऊ' .    आर्थिक ..

निवडणूक आयोगावर विश्वास ठेवा;रविशंकर प्रसाद यांचे आवाहन

नवी दिल्ली: आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन्सचाच (ईव्हीएम) वापर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज शुक्रवारी समर्थन केले. निवडणूक आयोगावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. या घटनात्मक संस्थेच्या विश्वासार्हतेचा सन्मान करा, असे आवाहन प्रसाद यांनी केले.     आता मतपत्रिकेच्या युगात परत जाणार नाही. पुढील प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमचाच वापर होईल, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी गुरुवारी ..

मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकासाठी 100 कोटींचा निधीस मंगळवारी (२२ जानेवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. स्मारकाचे बांधकाम एमएमआरडीए करणार असून, सुरुवातीला खर्च एमएमआरडीए करणार असून नंतर सरकार तो खर्च देणार आहे.    बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आहे. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गणेशपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यासोबतच महापौर बंगल्याची जागा ..

स्मृती इराणींमुळे राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार ?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखाही अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरीही विविध राजकीय पक्षांच्यावतीने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात झाली असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता एका वृत्तवाहिनीने वर्तविली आहे.राहुल गांधी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढविली होती. मात्र, तेथे भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. या मतदार संघातून पुन्हा स्मृती इराणी याच भाजपाच्या उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ..

आर्थिक दुर्बलांच्या 10 टक्के आरक्षणाची अधिसूचना जारी

 नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आता 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. याआधीच 10 टक्के आरक्षणाचा कायदा गुजरात आणि झारखंड या राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.  उत्तर प्रदेशमध्येदेखील सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणारा कायदा सरकारने कॅबिनेटमध्ये पास केला आहे. या कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 13 जानेवारी रोजी मंजूरी दिली आहे. 9 जानेवारी रोजी हे बिल संसदेत पास झाले होते.या आरक्षणासाठी सध्या ..