तरुण भारत विशेष

प्रज्ञासिंह यांची हकालपट्टी करायला हवी- नितीश कुमार

  पाटणा: महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणार्‍या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञािंसह ठाकूर यांची भाजपाने पक्षातून हकालपट्टी करायला हवी, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे.  प्रज्ञािंसह यांचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. त्यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करायलाच नको होते. केवळ शिस्तभंगाची कारवाई करण्यापेक्षा भाजपाने त्यांची तत्काळ हकालपट्टी करण्याबाबात विचार करायलाह हवा. तथापि, त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची की नाही, ..

एक्झिट पोल म्हणजे काय ?

एक्झिट पोल म्हणजे काय ?..

मोदी फक्त खोटा प्रचार करतात : पी चिद्म्बरम

  मुंबई: देशात पुन्हा भाजपा सरकार येणार नाही. सरकार विरोधात असलेल्या पक्षाचे बहुमतापेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असा दावा माजी केंद्रीय मंत्री पी चिद्म्बरम यांनी केला आहे. पाच वर्षांत रालोआ सरकारचे काम अपेक्षाभंग करणारे आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाचे मुद्दे आपल्या भाषणात बोलत नाहीत. शेतकरी कर्जमाफी, आर्थिक प्रगती, देशातील रोजगार यावर मोदी बोलत नाहीत. मोदी फक्त खोटा प्रचार करतात, असा टोलाही पी चिद्म्बरम यांनी लगावला.   भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल ..

वाराणसीतून लढायला आवडेल, निर्णय राहुल गांधींवर : प्रियांका

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी परवानगी दिल्यास, पंतप्रधान मोदी यांच्या वाराणासी मतदारसंघातून निवडणूक लढायला मला आवडेल, अशा शब्दात कॉंगे्रसच्या महासचिव प्रियांका वढेरा यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.राहुल गांधी यांनी आदेश दिल्यास, मी वाराणसीतून नक्कीच लढेल; पण हा निर्णय माझ्यावर नाही, तो पक्षाध्यक्षांनाच घ्यायचा आहे, असे त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.   प्रियांका यांनी यापूर्वीही वाराणासीतून लढण्याचे संकेत दिले होते. त्यावर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी प्रियांका ..

नमो टीव्हीमुळे संताप

    आगामी लोकसभा निवडणूक आणि देशातीच एकंदर राजकीय हवा पाहता प्रत्येक पक्षाने प्रचाराचं रणिंशग फुंकलं आहे. पंतप्रधानांपासून विरोधी पक्ष नेत्यांपर्यंत प्रत्येकाने मतदारांची भेट घेण्याचं सत्रही सुरू केलं आहे. या सार्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि पर्यायी भाजपचा वेगळ्या पद्धतीने प्रचार केला जात आहे. ‘नमो टीव्ही’ या वाहिनीवरून सर्वतोपरी नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचाच प्रचार सुरू असून, आता विरोधकांनी या विरोधात आवाज उठवला आहे.     ’नमो ..

'या' उमेदवाराने बनविला आहे निवडणूक हरण्याचा विक्रम

 सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. नवख्या उमेदवारांपासून ते अनुभवी दिग्गजांपर्यंत अनेकांनी निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे. अश्यात एक उमेदवार असाही आहे ज्याची ओळख निवडणूक हरणारा 'विक्रमवीर' अशी आहे. जाणून घेऊया हे 'विक्रमवीर' कोण आहेत. डॉ. के पद्मराजन असे तामिळनाडूतील या उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी स्वतःच आपल्या नावापुढे ‘ऑल इंडिया इलेक्शन किंग’ असे विश्लेषण लावून घेतले आहे.     छंद असल्यासारखे डॉ.पद्मराजन हे निवडणुकीला उभे राहतात आणि त्यांचा दारुण पराभव ..

'त्या' विद्यार्थ्याला विमानाच्या पायलट सीटवर पाहून शिक्षिकेचे डोळेच पाणावले

नवी दिल्ली,मोठेपणी आपल्याला काय बनायचंय असा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना केला असेल. तुम्हालाही तुमच्या शिक्षकांनी हा प्रश्न विचारला असेलच. नकळत्या वयात त्यावेळी अनेकांनी डॉक्टर, इंजिनिअर, पायलट अशी विविध क्षेत्रातील पदांची नावे घेतली असतील. मात्र त्या वयात शिक्षकांना दिलेलं उत्तर प्रत्यक्षात पूर्ण झालं तर? अनेक वर्षानंतर तुमचे ते शिक्षक तुम्हाला भेटले तर त्यांना देखील याचा आनंद होईल.  अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. सुधा सत्यन नावाच्या शिक्षिका एअर इंडियाच्या विमानाने ..

निसर्गायन पुस्तकाचे प्रकाशन थाटात

निसर्गायन पुस्तकाचे प्रकाशन थाटात..

नितीन गडकरी यांची तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट

   नागपूरचे भाजपाचे लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या रामदासपेठ येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना बहुमताने निवडूण देण्याचे आवाहन केले. नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. नितीन गडकरींनी नागपूर लोकसभा मतदार संघाचा जो सर्वांगीण विकास केला आहे त्याची चर्चा जगभरात आहे. स्थानिकांना रोजगार ते मध्यमवर्गीयांना हक्काचे घर अश्या अनेक प्रश्नांवर त्यांनी वैय्यक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावले आहे. नागपूर शहराचे नाव ..

तुम्हालाही लागला आहे का प्लॅस्टिकच्या खुर्चीचा करंट ?

 बऱ्याच वेळ प्लास्टिकच्या ख्रुर्चीवर बसल्यानंतर दुसऱ्या एखाद्या वस्तूला स्पर्श झाल्यास, कारमधून उतरतांना दाराला हात लागल्यास तुम्हालाही कधी करंट लागल्याचा अनुभव आला आहे का ? याचे उत्तर जर 'हो' असेल तर मग ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे.      करंट लागल्याचा हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल, पण नेमके असे का होते या मागचे विज्ञान जाणून घेणे आवश्यक आहे. या मागचे नेमके कारण म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे. ज्याला आपण मराठीत स्थिर ऊर्जा म्हणू शकतो. प्रत्येकच ऊर्जा ही लहानातल्या ..

२३ मार्च : भारतीय इतिहासाला कलाटणी देणारी तारीख!

अभिवादन - सतीश भा. मराठे९४२२४७७६६८   इतिहासात काही तारखांना प्राप्त झालेले महत्त्व देशाच्या भाग्याला कारणीभूत ठरतात. यातीलच एक तारीख म्हणजे २३ मार्च. १९३१ सालचा २३ मार्च हा दिवस लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात इतर दिवसांसारखाच उजाडला. हा दिवस भारताच्या इतिहासातील निर्णायक दिवस ठरणार असून ब्रिटिश राजवटीची मृत्युघंटा ठरेल, असे सूर्योदयाला वा कोणालाही वाटले नव्हते. याच संध्याकाळी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. ७ ऑक्टोबर १९३० रोजी या ..

...म्हणून पुसली जात नाही मतदानाची शाई

निवडणूक म्हणजे एकप्रकारचा उत्सव असतो. प्रत्येक पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या निवडणुका एखाद्या उत्सवाप्रमाणे असतात. या उत्सवात उतरणारा प्रत्येक राजकीय पक्ष मतदात्यांना खुश करण्यासाठी विविध घोषणांचा पाऊस पाडतो. मग आपणही कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे यावर चर्चा करु लागतो. पाहता पाहता मतदानाचा दिवस उजाडतो आणि मतदाता मतदान केंद्रावर पोहोचतो. तेथे मतदान करण्यापूर्वी आपल्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते. चला तर मग जाणून घेऊयात या निळ्या शाईचा इतिहास.  १९५१- ५२ साली आपल्या देशात ..