वर्धा

२८ मार्च ला पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेतून फोडणार लोकसभा प्रचाराचा नारळ

      ..

भरधाव कारची दुचाकीला धडक

  वर्धा : भरधाव कारने उभ्या दुचाकीला धडक दिल्याने संतप्त जमावाने कारच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी नागठाणा मार्गावर घडली.  त्यानंतर वाहन थांबवून कार मालक डॉ. राजेश सरोदे व त्यांचा मुलगा अथर्व वाहनाबाहेर आले. याचवेळी संतप्त जमावापैकी काही व डॉ. सरोदे यांच्यात बाचाबाची झाली.  या प्रकरणी डॉ. सरोदे यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी काहींनी डॉ. राजेंद्र सरोदे व त्यांचा मुलगा अथर्व याला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमुद केले असल्याचे पोलिसांनी ..

वर्ध्यात निवडणुकीच्या पहिल्या दिवशी ९ नामांकने

  वर्धा, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नामांकन दाखल करण्याचा आज पहिला दिवस होता. आज पहिल्या दिवशी ९ उमेदवारांनी हजेरी लावली. या उमेदवारांनी २० अर्जाची उचल केली. आशिष सोनटक्के(स्वतः)अपक्ष - १ भास्कर नेवारे (स्वतः) अपक्ष - १प्रमोद भोगले यांनी (ज्ञानेश वाकुडकर - लोकजागर पक्ष यांच्यासाठी) - १पवन गोसेवाडे यांनी (चारुलता टोकस - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासाठी)- ४डॉ. धनराज वंजारी (स्वतः)- वंचित बहुजन आघाडी - ४राजेश बालपांडे (स्वतः)- अपक्ष -१प्रवीण गाढवे (स्वतः)- ..

ओव्हर टेकच्या नादात शिवशाहीची पुलाला धडक

वर्धा : सेलू निकट असलेल्या कान्हापुर जवळील पुलाला यवतमाळकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम एच 29 बी ई 0875 या क्रमांकाच्या शिवशाहीने धडक दिली. दुपारी साडेचार च्या दरम्यान ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालक हरिष विजयराव डाबरे याचे वाहणावरील नियंत्रण सुटले व बांधकाम सुरू असलेल्या पुलावर शिवशाही धडकली. या अपघातात मंगेश वंजारी 24. कौडसी चंद्रपूर, शबनम फिरदौस नेर 32, नदीम खान नेर 31, पुतलीबी खान नेर 60 सह आणखी दोण जण जखमी झाले असून सेवाग्राम येथील रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे. पुढील तपास सेलू पोलिस ..

मानवी सांगाडा आढळल्याने एकच खळबळ

कारंजा ( घा) : महामार्गालगतच्या पेट्रोल पंपाच्या मागील मोर्शी खरसखांडा मार्गावरील बाजूच्या शेतात मानवी सांगाडा आढळल्याने परीसरात एकच खडबड उडाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली .घटनेची सुचना मोर्शीचे पोलीस पाटील यांनी कारंजा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेसंबधी अनेक तर्कवितर्क लावले जात असून कारंजा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर मानवी सांगाड्याजवळ पोते आढळून आले असून डोक्याची कवटी व हातापायाची लांब हाडे पडल्याचे दिसून आले. सांगाड्याजवळच एक निळसर काळपट रंगाचा बर्मुडासारखा ..

संशयास्पद अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह

वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मुत्यु झाल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज समुद्रपुर: तालुक्यातील शेडगाव सेवाग्राम मार्गावर संशयास्पद अवस्थेत मृत बिबट्या आठळाल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबट्या वना नदिच्या डाव्या बाजूला वाघाडी नाल्यावर आढळला असून त्याचा मुत्यु वाहनांच्या धडकेने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागा कडून वर्तविली आहे. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान वर्धा येथिल रमेश घोडमारे हे गिरडला फरीद बाबाच्या टेकडीवर दर्शनाला जात असतांना वाटेत थांबले असता त्यांना ..

कारंजा नगर परिषदेतील कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

-शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या नगरसेवकावर कारवाई करा   कारंजा लाड, शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या नगरसेवकावर कारवाईच्या मागणीसाठी नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी आज १४ मार्च रोजी कामबंद आंदोलन पुकारले. या संदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानूसार कारंजा नगर परिषदेचे सदस्य तथा माजी उपाध्यक्ष एम. टी. खान यांनी बुधवारी (१३ मार्च)  न. प. कार्यालयात येऊन कार्यरत स्थापत्य अभियंता प्रविण मोहेकर यांच्यासोबत असभ्य भाषेत शिवीगाळ करून ..

आमदार दत्तक गाव उमरी मेघेची निवडणूक अविरोध

- गावकऱ्यांनी ठेवला नवीन आदर्श   वर्धा,गाव करी ते राव न करी ही म्हण प्रचलित आहे. असाच आदर्श शहरालगत असलेल्या उमरी मेघे येथील नागरिकांनी निर्माण केला. आमदार दत्तक गाव योजनेत समाविष्ट असलेल्या उमरी गावाने ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करीत आम्ही आदर्श आहोत असा संदेश सर्वाना दिला आहे. २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. त्यामध्ये वर्धा तालुक्यातील उमरी मेघे गावाचा सुद्धा समावेश होता. वर्धा शहरालगत असलेल्या ११ गावांपैकी उमरी एक मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे ..

वर्ध्यात २९८ ग्रामपंचायतींसाठी ५९०७ नामांकन अर्ज सादर

- सरपंच पदासाठी १४१६ नामांकन अर्ज    वर्धा,जिल्ह्यात २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. सरपंच पदाची थेट निवडणूक असल्याने २९८ सरपंच पदासाठी अखेरच्या दिवशी १४१६ अर्ज दाखल झाले. सदस्य पदासाठी एकूण ५९०७ नामांकन अर्ज उमेदवारांनी तहसील कार्यालयात दाखल केले. २४ तारखेला १०५९ केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे.   ग्रामपंचायत निवडणुका प्रत्यक्ष पक्षाच्या चिन्हावर नसल्या तरी पक्षांचा प्रभाव पॅनलवर असतो. गावात रात्रीच्या वेळी मतदारांची जुळवा-जुळव सुरू झाली आहे. प्रत्येक मत..

'गुगल-पे'चा वापर करून व्यापाऱ्यांना गंडा

नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज  वर्धा : डिजिटल पेमेंट सुविधेने आर्थिक व्यवहार जरी सोपे झाले असले तरी यामुळे फसवणुकीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्धेत गुगल-पे या डिजिटल पेमेंटच्या वापर करून तीन व्यापाऱ्यांना हजारोंनी गंडविल्याचे समोर आले आहे. पहिल्या घटनेत टायर विक्रेते रवींद्र कुचेवार यांना १२ हजारांचा चुना लावण्यात आला. स्विफ्ट गाडीचे टायर खरेदीसाठी त्यांना एका ग्राहकाने १२ हजार रुपये गुगल-पे द्वारे पाठविण्याचे ठरविले.   त्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात ..

अज्ञात रोगाने पाच जनावरांचा मृत्यू

-रोगाचे कारण अद्यापही अष्पस्टकारंजा,तालुक्यातील जऊरवाडा येथे अज्ञात रोगामुळे पाच जनावरे दगावली आहे. एका आठवड्यापासून अज्ञात रोगाची लागण जनावरांना झाली आहे यात काही जनावरांचा धर्ती पशुसंवर्धन दवाखान्यात उपचार सुरू आहे, तर पाच जनावरे मृत्युमुखी प..

बाबा फरीद टेकडीवर वाहन उलटले

-१३ भाविक जखमी, २५  बचावलेगिरड,येथिल बाबा फरीद दर्गा टेकडीवर दर्शनाकरीता जात असलेले वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात १३ प्रवाशी जखमी झाले असून १२ जण बचावले आहे. ही घटना आज सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. सर्व जखमी भाविकांना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा येथिल चिंचोलकर कुटुंबीय बाबा फरीद दर्गात दर्शनाकरीता जात होते. टेकडीवरील मध्यवर्ती रस्त्याच्या वळणावर टेकडीवर जात असताना, वाहन चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटले, ..

कारंजात उद्यापासून राज्यस्तरीय बालगट खंजरी भजन स्पर्धा

-४० हजारांची १० बक्षिसे कारंजा घाडगे, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गुरूदेव अमृतगिरी महाराज बाल भजन मंडळ व गुरूदेव सांस्कृतिक कला क्रीडा भजन मंडळ कारंजा घाडगे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बालगट खंजीरी भंजन स्पर्धेचे आयोजन २ व ३ मा..

वर्ध्यात स्वाइन फ्लूने इसमाचा मृत्यू

सिंदी(रेल्वे),वर्ध्यात सध्या स्वाईन फ्लूची साथ असून शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रहिवाशी सुनील कळमकर यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कळमकर यांचा सिंदी परिसरातील खेडे गावात सोप, सुपारी, हळद, मसाला इत्यादी विक्रीचा व्यवसाय आहे. कळमकर यांना १६ फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने ते हिंगणघाट येथे डॉ. प्रकाश लाहुती यांच्याकडे गेले असता त्यांना तपासणी करून औषधी देण्यात आली. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी पुन्हा कळमकर यांना छातीत दाटून येऊन दम येऊ लागला.    डॉक्टरांनी ..

भाकरे महाराज जन्मोत्सव शोभायात्रेत हरिनामाचा गजर

कारंजा घाडगे,संत भाकरे महाराज संस्थांनचे वतीने भाकरे महाराज जन्मोत्सवानिमित्य अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी भव्य पालखी शोभायात्रेत कारंजा परिसर हरिनामाच्या गजरात निनादला. भाकरे महाराज सेवाश्रम कारंजा येथे जन्मोत्सवानिमित्य २१ फेब्रुवारी पासून आयोजित सप्ताहात विविध भंजन मंडळांनी भजने सादर केलीत. तसेच शारदादेवी चांडक यांनी भागवत कथा वाचन केले. सुभाष पवार,रामदास गोरे,गुलाब ढोले,हेमंत मस्के यांनी दैनंदिन हरीपाठ व काकडा आरती सादर केली. गुरूवारी भाकरे महारांजांची पालखी शोभायात्रेने कारंजा ..

वर्ध्यात मराठी राजभाषा दिन उत्साहात

- बसस्थानक परिसरात आयोजन   हिंगणघाट,गेल्या हजार वर्ष्यात अनेक आक्रमणे झेलून आणि सोसून मराठी भाषा जेथे जेथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे ताठ मानेने नांदते आहे. हा भाषेचा स्वाभिमान जगाला सांगण्याचा हा दिन आहे असे मत बिडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले. ते येथील बस स्थानक परिसरात आयोजित मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात बोलत होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख संजय घुसे तर उदघाटक म्हणून डॉ प्रा रवींद्र ठाकरे, तसेच युवा साहित्यिक ..

क्रुझर दुचाकीला धडक देत पलटली, १८ जखमी

-वायगाव ( ह) शिवारातील घटना   समुद्रपूर,भरधाव जाणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहतुक करणाऱ्या क्रुझर गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देत रस्त्याच्या बाजूला पलटली. यामध्ये गाडीमधील १६ प्रवासी जखमी झाले तर दुचाकीस्वार शिक्षक व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना आज सायं ५.३० वाजताच्या दरम्यान घडली.    प्रवासी वाहतुक करणारी चारचाकी क्रमांक एम.एच. २७ एसी ४५३३ क्रुझर गाडी समुद्रपूरवरून प्रवासी भरून गिरडकडे जात होती. वायगाव ( हळद्या ) शिवारात क्रुझरचे एक दार ..

चालत्या ट्रकला आग

  वर्धा:    तळेगाव येथील सत्याग्रही घाटात कांदा घेऊन जात असलेल्या एका ट्रकला बुधवारी सकाळी १० च्या सुमारास अचानक आग लागली. चाळीसगावचे रहिवासी असलेल्या नामदेव सोममिरे या शेतकऱ्याच्या ३५० कांद्याच्या गोण्या घेऊन जात असलेल्या ट्रकला घाटात अचानक आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक थांबवून क्लिनर व अन्य शेतकऱ्यांना सूचना दिली. आगीच्या घटनेची माहिती तळेगाव पोलिस ठाण्याला दिल्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. हे दल येईपर्यंत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून ..

समुद्रपुर पोस्ट ऑफिसमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा

समुद्रपूर, ग्रामीण भागाचा कणा असलेले उप टपाल घर डिजिटल झाले, पण पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पिण्याचे पाणीच  उपलब्ध नाही. तसेच, आता उन्हाळ्याची चाहूल लागत असून आगामी काळात आणखी त्रास होण्याची शक्यता आहे.   विशेष लक्ष पुरवून पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.    समुद्रपूर येथील पोस्ट ऑफिस मूळ बाजारपेठेपासून खूप दूर असल्याने व वस्तीत असल्याने येणाऱ्या ग्राहकाला उन्हाळ्याच्या सुरुवातीस पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्रास सहन करावा ..

आंजी मोठी गावात सिलेंडरचा स्फोट

आंजी मोठी,आज सकाळी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान बाजार चौक वार्ड क्रमांक २ मध्ये राहत असलेल्या कलावतीबाई रेवतकर यांच्या घरी  सिलेंडरचा स्फोट झाला त्या स्फोटात संपुर्ण घर जळून राख झाले. कलावतीबाई ह्या अंगणवाडीत काम करतात, त्या सकाळी आपली दीनचर्या आटपून अंगणवाडीत कामाकरीता गेल्या होत्या. यानंतर त्यांच्या घराला अचानक आग लागल्याचे समजते.    त्या घरी एकट्याच राहतात. आगीनंतर त्यांच्या घरातील सर्व साहीत्य जळाले आहे. गावात आगीची माहीती  पसरताच गावातील ..

समुद्रपूर पोलिसांचा शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

 समुद्रपूर : पुलवामा दहशदवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. एरवी पोलीस म्हंटले की त्यांच्याकडे नाकारात्मक दृष्टिकोनातून पहिल्या जाते, परंतु समुद्रपूर पोलिसांनी कर्मचाऱ्यांच्या सहभागातून निधी जमा करून १ लाख १ हजारांची मदत शहिदांच्या कुटुंबियांना केली. पोलिसांच्या या उपक्रमाची परिसरात कौतुक होत आहे.   समुद्रपूर पोलीस स्थानकाचे ठाणेदार प्रवीण मुंडे, ३ पीएसआय आणि ४३ कर्मचारी असे एकूण ४७ जणांनी आपापल्या ..

आगीत सोन्याचांदीचे दुकान खाक

   हिंगणघाट - स्थानिक टिळक चौकात एम के पोहेकर ज्वेलर्सला आग लागून फर्निचर व सोन्या चांदीचे तयार आभूषणे जळाल्याने अंदाजे साडेपाच लाखाचे नुकसान झाले आहे .प्राप्त माहिती नुसार मनोज खुशाबराव पोहेकर यांच्या दुकानात दागिने घडणावळीचे काम सुरू असतांना आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ही आग लागली. यावेळी गॅस सिलेंडर चा पाईप लिकेज झाल्याने ही आग लागल्याची माहिती पोहेकर यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने इतर दुकानांची हानी टळली .  ..

राज्य राखीव पोलिस दलाची नागपूर ते मुंबई जनजागृतीपर सायकल रॅली - १३ दिवसात १५० जवान गाठणार ९३८ किलोमीटरचा पल्ला

कारंजा घाडगे,राज्य राखीव पोलिस दलाच्या नागपूर ते मुंबई सायकल जनजागृती मिरवणूकीचे २२ फेब्रुवारीला कारंजा घाडगे येथे आगमन झाले असता उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.यावेळी आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराळे कारंजा येथील ठाणेदार व पोलिस कर्मचारी तसाच गुरूकूल काॅन्व्हेंटचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.   येथील गुरूकूल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सादर करून उपस्थितीतांना थक्क करून सोडले.२३ फेब्रुवारी ला तळेगाव ..

समुद्रपूर खरेदी विक्री संस्थेतर्फे शहीद जवानांना श्रध्दाजंली

समुद्रपूर, पुलवामायेथे झालेल्या भ्याड आतं की हल्यात ४२ पेक्षा जास्त जवान शहीद झाले . या शहीद जवानांना आज समुद्रपूर खरेदी विक्री संघाच्या मासीक सभा सुरु होण्या अगोदर संधाचे अध्यक्ष ॲड. सुधिर बाबू कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली वीर जवानांना श्रद्धांजल..

वर्धा जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

- ३ पोलिस निरीक्षकांची नागपूर ग्रामीणमध्ये बदलीवर्धा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम व पोलिस महासंचालकाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ३ ठाणेदार व ८ पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षांची प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षकांना मिळालेल्या ..

मुलाचे प्रेम बेतले आईच्या जीवावर.. मुलीचा भाऊ व वडिलाकडून महिलेचा खून

आर्वी,सहा महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या मुलगा आणि मुलीचा पत्ता लागत नसल्याने संतापलेल्या मुलीचा भाऊ आणि वडिलाने मुलाच्या आईचा धारदार शस्त्राने वार करून खुन केला. ही घटना येथील भाईपूर पुनर्वसन येथे घडली. बेबी मेंढे (५०) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलाचे प्रेम हे आईच्या जीवावर उठल्याने या घटनेने समाजमन पुन्हा एकदा सुन्न झाले.   बेबी मेंढे या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या कवडगव्हान येथील रहिवाशी होत्या. ६ महिन्यापूर्वी बेबीच्या मुलाचे आणि गणेश काळे यांच्या मुलीचे प्रेम प्रकरण सुरू ..

पुलगावात पाकिस्तान मुर्दाबादचे नारे : पुलगाव बंद शांततेत !

पुलगाव येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी आज शनिवारी बाजारपेठ कडेकोट बंद ठेवून निषेध नोंदविला.      नगरात सकाळीच आज चौकात विविध पक्षाचे युवा कार्यकर्ते गोळा झाले.व त्यांनी काल ठरल्याप्रमाणे बंद पुकारला.या बंदला व्यापाऱ्यांनी ही चांगला प्रतिसाद दिला.सकाळीच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर, माजी नगराध्यक्ष मनीष साहू,चंद्रकांत पवार,भाजप व्यापारी आघाडीचे सुधीर बांगरे, ..

वर्ध्यात महिलेचा दिवसा ढवळ्या खून

हिंगणघाट,येथील संत तुकडोजी वार्डात राहणाऱ्या रिता प्रमोद ढगे (वय ४५) या विवाहित महिलेच्या घरात जवळच राहणाऱ्या एका इसमाने शिरून चाकूने हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सेवाग्रामला नेले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. दिवसा ढवळ्या झालेल्या या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.    ही घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. रिता प्रमोदराव ढगे ही महिला दुपारी घरी स्वयंपाकघरात एकटी असताना घराजवळच राहणारा वाल्मिक लक्ष्मणराव चंदनखेडे याने घरात ..