वाशीम

धारदार शस्त्रासह बबलु खान याला अटक

- शहरात काही काळ तणाव   वाशीम,आगामी लोकसभा निवडणुक निर्भय वातावरणात पार पडाव्यात याकरीता जिल्हा पोलिस प्रशासनाने गेल्या तीन दिवसापासून गुन्हेगारीविरुद्ध धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, या मोहीमे अंतर्गत शहरातील कुख्यात गुन्हेगार बबलू खान याच्या घरी छापा मारला. त्याच्या घरातून पोलिसांनी धारदार शास्त्रे जप्त केली असून बबलु खान यास ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासन सतर्क असून, निवडणूक काळात अनुचीत प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्यावती..

गावठी दारूची विक्री करणारे गजाआड

मालेगांव,मालेगांव पोलिस ठाण्याच्या हद्दी सुरु असलेल्या अवैध धंदयावर उपविभागीय पोलिस अधिकारी पवन बनसोड यांनी मालेगाव पोलीस पथकासह आज धाडसत्र मोहिम राबविली. यामध्ये तालूक्यातील मेडशी येथे गावठी दारूची अवैध विक्री करताना दोघं जणांना रंगेहात पकडले.  त्यांच्याजवळून गावठी दारुच्या दोन कॅन जप्त करण्यात आल्या आहे.  सुभान गंगा गौरवे व रवि चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून ते मेडशी येथे राहात्या घरात गावठी दारुची विक्री करत होते.    जप्त ..

वाशिममध्ये बॉम्ब शोधक पथक सक्रिय

 वाशीम : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाशिममध्ये सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे. या अनुषंगाने शहरातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून  बसस्थानक, पाटणी मार्केट, शिवाजी चौक, बालाजी मंदिर इत्यादी ठिकाणी तपासणी करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अपर पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या आदेशानुसार तपासणी करण्यात आली. यापुढेही ..

भरधाव ट्रकने पादचाऱ्यास चिरडले

 मालेगाव : येथील नागरतास वळण मार्गावर टी पॉईन्ट जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एका पादचाऱ्यास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहिती नुसार, दुपारी १ वाजताच्या सुमारास मृतक संजय तोडी यादव हॉटेल मधुन चहा पिऊन रस्ता ओलांडत होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा ट्रक उभा होता. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्र . एच आर ५५ वाय २८१२ ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी होशीयारपुर पंजाब येथील ट्रक चालक दलजीत सिंग स्वर्ण सिंग लोभाणे याला अटक केली ..

पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप

पुराव्याअभावी एकाची निर्दोष मुक्तता वाशीम : पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळून मारल्याप्रकरणी आज न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.   याबाबत सविस्तर असे की, मृत्यूपुर्व अर्चना किशोर कवळे हिने दिलेल्या जबानीनुसार तिचे माहेर माळीपुरा कारंजा हे असून, रितीरिवाजाप्रमाणे माझे लग्न किशोर जनार्दन कवळे यांच्याशी झाले. मात्र, लग्नानंतर काही दिवस सुखाचे गेल्यानंतर पती किशोर हा चरित्र्यावर संशय घेऊन नेहमीच मारहाण करुन त्रास ..

ट्रकने दूचाकिस्वारास चिरडले

मालेगावनागपूर - औरंगाबाद महामार्गावरील मालेगाव शहरापासून काही अंतरावर डव्हा फाटयाजवळ आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान भरधाव ट्रकने दूचाकिला जबर धडक दिली. या अपघातात दूचाकिस्वाराचा जागीच मृत्यू झाला.   डव्हा फाटयावरून दूचाकि क्रंमाक एम. एच. ३७ एफ-५७७९ या दूचाकीने राजू चव्हाण हे खिर्डा गावाकडे जात होते, त्यांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दूचाकीसह ते ट्रकच्या चाकाखाली आले. यामध्ये राजू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहीती जऊळका पोलीसांनी दिली. पोलिसांनी ..

बेपत्ता दहा वर्षीय सुमितचा मृतदेह आढळला

वाशीम, दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या सुमित रामेश्‍वर आरु (वय १०) या बालकाचा गावालगतच्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर बालकाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचे बोलल्या जात असून, याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेवून पुढील चौकशी सुरु केली आहे.   फिर्यादी काशीनाथ रघुजी आरु रा. रिठद यांनी वाशीम ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, त्यांचा नातू सुमित रामेश्‍वर आरु हा २४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घरातून बाहेर पडला, त्यानंतर&nb..

किसान सन्मान निधी योजनेचा कारंजा येथे प्रतिनिधिक शुभारंभ

- आ. पाटणीसह लाभार्थी शेतकार्‍यांची उपस्थिती कारंजा लाड,कांरजा येथील पस कार्यालयातील सभागृहात आज सोमवारी सकाळी १० वाजता कारंजा तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने किसान सन्मान निधी योजनेचा प्रतिनिधिक शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी शेतकार्‍यांना सदर योजनेविषयी माहिती देवून त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले.    देशातील अल्पभुधारक शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावे या हेतूने सन २०१९-२० ..

अंभोरे गटाच्या आरोपींना त्वरीत अटक करा अन्यथा जनआंदोलन - गाभणे समर्थकांचा मोर्चाद्वारे इशारा

शिरपूर जैन,अंभोरे गटाच्या मुख्य आरेापींना त्वररीत अटक करावी, अन्यथा जनआंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा ईशारा 23 फेब्रुवारी रोजी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून गाभणे समर्थकांनी दिला आहे. अंभोरे गटाच्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक व्हावी, यासाठी गाभणे समर्थकांनी शिरपूर येथे मोर्चा काढला होता.    शिरपूर येथे ढवळे विद्यालयासमोर क्षुल्लक कारणाहून गाभणे व अंभोरे यांच्यात वाद झाला होता. यामध्ये गाभणे गटाच्या तीन सख्ये भाऊ गंभीर जखमी झाले. त्यामुळे अंभोरे गटाविरुद्ध कलम 307 भादंविनुसार ..

शेतशिवारात आढळला दोन तोंडी साप

-आंतरराष्ट्रीय बाजारात सापाची किंमत लाखो रुपये -पोलिसांनी केले वनविभागाच्या स्वाधीन वाशीम,मंगरुळनाथ तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वारा जहांगीर येथील शेतशिवारात दोन तोंडया मांडूळ जातीचा साप असल्याची माहिती २० फेब्रुवारी चे रात्री ९ वाजता आसेगाव पोलिसांना मिळताच आसेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मांडूळ जातीच्या सापाला पकडून ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची किंमत लाखो रुपये आहे.     मंगरुळनाथ तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन ..

दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा वसूली निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात!

वाशिम,स्थानिक समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत वसूली निरीक्षक (कंत्राटी) योगेश कमलदास चव्हाण (३१) यास लाचलुचपत विभागाने ५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात जेरबंद केले आहे.   प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराकडून प्राप्त व्यवसाय कर्ज मंजूरीच्या फाईलला मान्यता देण्यासाठी वसूली निरीक्षक योगेश चव्हाण याने सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती त्यापैकी पाच हजारांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने चव्हाणला रंगेहात ..

बंजारा संघटनांकडून काँग्रेसचे खासदार खरगे यांच्या प्रतिमेचे दहन

मानोरा, शहरातील दिग्रस चौक येथे आठवडी बाजाराच्या दिवशी आज बुधवारी काँग्रेसचे राज्य प्रभारी खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी बंजारा समाजाचे शिष्टमंडळ दिल्लीत भेटण्यासाठी गेले असता त्यांनी बेताल वक्तव्य करुन समाज बांधवांना अपमानित केले. या घटनेचा निषेध म्हणुन विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी बंजारा क्रांती दलाचे युवा प्रदेश सरचिटणीस मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात त्यांच्या फोटो प्रतिमेचे दहन केले.   शिष्टमंडळाने खरगे यांना आगामी ..

पुलवामा शहीदांच्या सन्मानार्थ दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेऊन काढली रॅली - कडकडीत बंद पाळून केला हल्ल्याचा निषेध

मानोरा,पाकीस्तान समर्थीत आंतकवाद्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या बीएसएफ च्या जवानांच्या सन्मानार्थ आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांचा निषेध म्हणुन मानोरा शहर पुर्णपणे बंद ठेवण्यात आले. दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेवून सर्वपक्षियांच्यावतिने रॅली काढण्यात आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषाने नगरी दुमदुमून गेली होती. या बंदमध्ये व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत शहीदांना श्रध्दांजली अर्पण करुन दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.   प्रारंभी मानोरा ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडल्याने वाशीम दौरा रद्द; मुंबईला परतले

  वाशीम,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपला वाशीम दौरा रद्द केला आहे. औरंगाबाद विमानतळावर उपचार घेऊन मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले, देवेंद्र फडणवीस यांच्या आज बुलढाणा आणि वाशीम दौरा होता, मात्र बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपला पुढील दौरा रद्द केला.  मुख्यमंत्र्यांना ॲसिडिटीच्या त्रासामुळे वाशीम दौरा रद्द करावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी बुलडाण्यावरून औरंगाबादला येऊन त्यांनी विमानतळावर वैद्यकीय उपचार ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वाशीममध्ये - 300 कोटीच्या विकासकामाचे करणार लोकार्पण

वाशीम,महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उद्या 14 फेब्रुवारी रोजी वाशीम येथे येणार असून, या दौर्‍यानिमीत्त ते वाशीम शहर व जिल्ह्यातील 300 कोटीच्या विकासकामाचे लोकार्पण करणार असून, याशिवाय नविन 600 कोटीच्या विकासकामाचे भूमीपुजन करणार आहेत. त्यानिमीत्त येथील वाशीम येथील टेम्पल गार्डन येथे सभा होणार असून, या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष अशोक हेडा, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी केले आहे.     या सभेला विशेष अतिथी ..