यवतमाळ

पुसद: जेट किड्स च्या सी.बी.एस.ई १० वी बोर्डचा सलग चैथ्या वर्षी उत्कृष्ट निकाल.

जेट किड्सची उत्कृष्ट निकालाची परंपरा सलग चैथ्या वर्षी कायमनंदिनी भंडारी 98 टक्के गुणसाहिल खके 97.2 टक्के गुणइंद्रेष सिंग 97 टक्के गुणपुसद: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली अर्थात सीबीएसई बोर्डचा वर्ग 10 वीचा निकाल काल ऑनलाइन जाहीर करण्यात आला यावर्षी एकूण 18 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. स्थानिक देव बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित पुसद येथील एकमेव सीबीएसई स्कुल असल्यामुळे सर्वांचे लक्ष जेट किड्स इंटरनॅशनल स्कुलच्या निकालाकडे होत्या तरी अपेक्षेप्रमाणेच सलग चैथ्या वर्षी वर्ग 10 वी ..

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

देवळी : तालुक्यातील दापोरी शेतशिवारात वासुदेव ठाकरे ( ६५ ) हे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यवर रानडुकराने हल्ला केला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले.उपचाराकरीता त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता दुपारी २ वा. त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे ४ एकर शेती असुन या व्यवसायावर पत्नि,मुलगा व सुन हा परीवार त्यांच्या मागे आहे होता.शासनाकडुन अजुन पर्यंत कुठलीच मदत त्यांचे पर्यंत पोहचली नाही. त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मीळावी ही आशा आहे.   ..

यवतमाळमध्ये भीषण अपघातात तीन ठार

हिंगोली/तभा वृत्तसेवा,  चंद्रपुरातील महाकाली देवीचे दर्शन घेवून गावी परतत असताना यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव जवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात ट्रकने टाटा मॅक्स गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. यातील जखमी नववधूस उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना रस्त्यातच तिचा दुर्दवी मृत्यू झाला.  लक्ष्मीबाई भारत उपरे (६०), सानिका किसन भोपाळे (१३) ह्या दोघी जागीच ठार झाल्या. तर गंभीर जखमीमध्ये नववधू साक्षी देवीदास उपरे (१९) हिला उपचारासाठी ..

वणीत आयपीएल सट्ट्यावर पुन्हा धाड, चार बुकींना अटक

वणी: वणीत सुरू असलेल्या आयपीएल सट्टा जुगारावर वणी पोलिसांनी कार्यवाही केली आहे. शनिवारी रात्री झालेल्या या कार्यवाहीत चार बुकींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन दिवसांआधी चिखलगाव येथे धाड टाकून आयपीएलवर सट्टा चालवणा-या काही बुकींना अटक केली होती.    आयपीएल वर सट्टा चालवणा-या बुकींचा वणीत चांगलाच धंदा सुरू आहे. शनिवारी राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैदराबाद यांच्यात 20-20 चा सामना होता. या सामन्यावर प्रत्येक बॉलसाठी आणि सामन्यासाठी ..

‘शिवशाही’ चालकाच्या अरेरावीमुळे प्रवासी त्रस्त

  पांढरकवडा: शिवशाही बसचे तिकीट सामान्य बसच्या तिकिटापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे या गाडीत बसणारा सामान्य ग्राहक गाडीतील वातानुकूलित यंत्रणा सुरू असावी, अशी माफक अपेक्षा करणारच. परंतु या गाडीतील चालक ही यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैशांची अपेक्षा ठेऊन ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवत आहे.   याबाबत वाहकाला तक्रार पुस्तिका मागितली असता वातानुकूलित यंत्रणा सुरू करतात, असा अनुभव काही प्रवाशांना आला आहे. याबाबत वाहक मोहोड याने तक्रार पुस्तिका देण्यास ..

यवतमाळ : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर वडकीजवळ अपघात, तीन जणांचा मृत्यू, १२ जखमी

     ..

अपक्ष उमेदवार परशराम आडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

मानोरा, यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार परशराम भावसींग आडे यांचे विरोधात संताचे फोटो व नागरिकांना आवाहन केल्याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार परशराम भावसींग आडे यांनी एका वृत्तपत्रात २९ मार्च रोजी प्रचाराच्या शुभारंभाची जाहीरात प्रकाशीत केली. या जाहीरातीमध्ये नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यासोबतच संताचे फोटो छापले होते. ..

यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

 यवतमाळ : जिल्ह्याला सलग दुसर्‍या दिवशीही वादळी पावसाने झोडपून काढले. यवतमाळसह मारेगाव, पुसद, उमरखेड तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास वादळासह पाऊस कोसळला. मुळावा, मारेगाव येथे काही ठिकाणी बोराएवढ्या गारा पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळली. वादळी पाऊस व गारपिटीमुळे रबीतील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी अद्यापही शेतात ठेवलेला गहू व हरभरा ओला झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.   उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह ..

साई (ई) गावकर्‍यांच्या मतदानावर बहिष्कार

   नाला सरळीकरणाची मागणी महागाव: तालुक्यातील काळीदौलत जिल्हा परिषद सर्कलमधील साई (ईजारा) येथील नाला सरळीकरण करण्याची गावकर्‍यांनी मागणी केली आहे. गावाला लागून असलेल्या नाल्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरत आहे. त्यामुळे नाल्याशेजारी असलेले शेतकरी माधव भांगे, रामराव भांगे, प्रल्हाद लोखंडे, देवानंद भांगे, रमेश भांगे, सुदर्शन भांगे यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पाण्यामुळे जमिनी खरडून जात असून प्रत्येक वर्षी किमान साठ ते सत्तर एकर जमिनीवरील पिकांना त्याचा फटका बसत आहे.गुलाब जाधव, प्रमोद ..

भावना गवळींचा नामनिर्देशन पत्र भरण्याचा मुहूर्त ठरला

  यवतमाळ: यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी सोमवार, 25 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र भरणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. स्थानिक अवधूतवाडी व्यायामशाळा पटांगणातून सकाळी 11 वाजता नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी रॅलीला सुरुवात होणार आहे.    यावेळी पालकमंत्री मदन येरावार, शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, आ. राजेंद्र ..

होळीनिमित्त यवतमाळ ब्लड डोनर्स तर्फे रुग्णांना फळवाटप

 यवतमाळ: सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष करुन रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारी संस्था यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशन यवतमाळच्यावतीने होळी उत्सवानिमित्त्य वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.तसेच 21 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान रंगोवोत्सवानिमित्त भोजनाच्या कार्यक्रमाच्या भोजन पासचे वितरण रुग्णांच्या नातेवाईकांसाठी करण्यात आले. मागील 6 वर्षांपासून यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनच्या वतीने धुलीवंदनानिमित्त आगळेवेगळे उपक्रम राबवून होळी व रंगोत्सव साजरा ..

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात या दोन उमेदवारांची चर्चा

  यवतमाळ: यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नेणार्‍या दोन व्यक्तींच्या नावांची चर्चा येथील राजकीय वर्तुळात होत आहे. येथील ख्यातनाम ॲड. जीवन पाटील आणि भाजपाचे कार्यकर्ते परशराम आडे यांनी आपल्या नावाने लोकसभा उमेदवारी अर्ज नेले असून ते चर्चेचा विषय झाले आहेत.    या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून जीवन पाटील यांचे नाव सुरवातीपासूनच चर्चेत आहे. परंतु, या ठिकाणी आता माणिकराव ठाकरे यांचे नाव कॉंग्रेसने अधिकृतपणे जाहीर केल्यामुळे जीवन पाटील ..

मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

मधमाश्यांपासून सुटका करतांना ह्रदयविकाचा आला झटका दिग्रस:  येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे तथा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुधाकर गडकर यांच्यावर शेतातील मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांपासून सुटका करतांना धाप लागल्याने ह्रदयविकाचा तिव्र झटक्यात त्यांचे क्षणात निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.     सुधाकर गडकर यांनी गुरुवार, २१ मार्चला रंगपंचमी निमीत्ताने जवळच्या शेतात आपल्या मित्रांना ..

यवतमाळ : समाज कल्याणच्या सहायक उपायुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विशाल बापूराव कुबडे याच्या विरोधात दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

     ..

T-4 वाघिणीचा मृत्यू फास लागल्याने

  शव विच्छेदन अहवालात पुष्टी  यवतमाळ : पंडरकावडा वन्यजीव अभियारण्या अंतर्गत टिपेश्वर अभयारण्य क्षेत्रात १७ मार्चला  T-4 वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या वाघिणीचा मृत्यू गळ्यात तार अडकून फास लागण्याने झाल्याचे शव विच्छेदन अहवालात समोर आले आहे. कक्ष क्रमांक १३३ मध्ये पाणवठ्याजवळ जखमी अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तिला बेशुद्ध करून पशु चिकित्सालयात आणले. दरम्यान रस्त्यातच रात्री ८ वाजता या वाघिणीचा मृत्यू झाला. रात्र झाल्याने शव विच्छेदन ..

‘जगदंबा’च्या विद्यार्थ्यांनी साकारली रेसिंग कार

 जालंधर येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वाहनाचे प्रात्याक्षिक यवतमाळ:  स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी चार महिन्यांच्या अथक परिश्रम, अभ्यास, तंत्रज्ञान यांच्या बळावर अत्यंत माफक किमतीत गो-कार्ट या रेसिंग कारची निर्मिती करून पंजाबमधील जालंधरच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथील आंतरराष्ट्रीय ‘गो-कार्ट चॅम्पियनशिप’मध्ये सहभाग नोंदविला आहे.    ‘फार्म्युला वन’ या जागतिक स्तरावरील वेगवान स्पर्धेचे ..

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण; ' वंदे मातरम ' म्हणण्याची सक्ती

यवतमाळ:  शिक्षणासाठी आलेल्या जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास वाघापूर परिसरातील वैभव नगर परिसरात घडली.  3 ते 4 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झालेले विद्यार्थी लोहारा पोलिसात तक्रार देण्यासाठी पोहोचले आहेत. युवा सेनेच्या कार्यकर्त्याची पोलिसांनकडून धरपकड सुरू...

विद्या केळकर यांना पुरस्कार

यवतमाळ,  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या 23 व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात 2017-2018 चा महाराष्ट्रातून देण्यात येणारा सुशीलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार बाबाजी दाते महिला बँकेच्या अध्यक्ष विद्या शरद केळकर यांना प्रदान करण्यात आला.   बाबाजी दाते महिला बँकेच्या अध्यक्ष विद्या केळकर यांच्या स्नुषा मीरा केळकर, बँकेच्या मु‘य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, राजश्री सेवलकर, शीला हिरवे यावेळी सोबत होत्या. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र ..

दिग्रसला सर्व धर्मियांचा निषेध मोर्चा- शाळा महाविद्यालय व बाजारपेठ स्वयंस्पुर्तीने बंद

दिग्रस - जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सिआरपीएफचे ४१ जवान शहीद झाले या घटणेच्या निषेधार्थ, आज संपूर्ण दिग्रस शहराने कडकडीत बंद पाळला.    शहिदाना श्रद्धांजली व भ्याड हल्ल्याचा येथील सर्व धर्मियांनी निषेध म्हणून मोर्चा काढला, हजारो नागरिकांनी पाकिस्तानी कारवाईचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पाकीस्थानचा ध्वज जाळून आपल्या भावना व्यक्त करीत 'भारत माता की जय ' च्या जयघोषात येथील शिवाजी चौक येथून निघालेले मोर्चेकरु शहराच्या मुख्य ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पांढरकवडा येथे

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महिला बचत गटांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील महिला बचत गटांची यशोगाथा सांगितली. 16 तालुक्यांमध्ये 1320 गावांमध्ये आज सुमारे 74 हजार कुटुंबांना चांगले जीवनमान यामुळे प्राप्त होत आहे. हे महिला बचत गट केवळ स्वत:ची प्रगती करीत नसून, समाजाची आणि पर्यायाने देशाची प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.   मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात 34 हजार गावांमध्ये आज महिला बचत गटांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. ..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पांढरकवड्यात

पांढरकवडा,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, 16 फेब्रुवारी रोजी पांढरकवडा येथे सकाळी 10 वाजता स्वयंसहायता समूह (बचत गट) महिलांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.     या महामेळाव्यात महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूजल वाहतूक, जलसंधारण व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास ..