आकांक्षा

तिचे हसणेही बोचणारे...

डॉ. वर्षा गंगणे   चेहर्‍यावरील हास्य ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल व सुंदर देणगी आहे. हसणारे चेहरे स्वत:सह इतरांचे चेहरेदेखील हसरे करून जातात, मने हलकी करून जातात. विज्ञानानेदेखील हास्य हे अनेक रोगांवरील विनामूल्य असणारे औषध आहे असे म्हटले आहे. दिलखुलास हसण्याने अनेक पेशी ताणल्या जाऊन मनावरील व मेंदूवरील ताण हलका होऊन जगण्याचा सकारात्मक संदेश मिळतो. म्हणून हसणे हा आपल्या दैनंदिनीचा एक अनिवार्य भाग असला पाहिजे, असे मत अनेकदा अनेक विचारवंत व अभ्यासकांनी वेळोवेळी व्यक्त केले ..

‘आई’पुढची आव्हाने...

संपदा महेश राजे  'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...' या ओळी आठवल्या की, प्रत्येक स्त्रीला स्वतःचे लहानपण आठवते. कारण ते रम्य दिवस आयुष्याच्या माळेतील मण्यांसारखे झरझर ओघळतात व रम्य ते बालपण केव्हा सरते ते कळतही नाही. कारण, आजी, आजोबा, काकू, आत्या यांच्या सहवासातील संरक्षण किंवा सुरक्षित बालपण आनंदात घालवण्यासारखे रम्यच होते. परंतु, बदलत्या काळापासून 21व्या शतकातील आव्हाने, नवीन आई झालेल्या मुलींना नक्कीच तारेवरची कसरत करायला भाग पाडतात. कारण, करिअर व संसार या दोन्ही आघाड्या ..

नवीन शिकत राहावं...

 प्रॉक्सी थॉट   पल्लवी खताळ-जठार  मस्कार मैत्रिणींनो! आजचा लेख हा सुरभी ठाकूर, शोभा गुरव आणि पद्मा कदम यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारा आहे. या लेखातून तुम्ही तुमची समस्या दूर करावी, ही विनंती. नवं शिकून आपण जुने झालो, असं वाटत असतानाच कुठंतरी खूप काही शिकायचं राहिलं, असं वाटायला लागतं नाही का? त्यात चाळीशी जवळ आल्यावर माझ्यासारख्या अनेक मैत्रिणींना याचे भान येते, मग काय विविध पुस्तके, माहिती नेट सर्फिंग करता करता त्यांना आपलं तर या सर्व संसारगाड्यात खूप काही नवनवीन ..

लहान मुलेही बुद्धीचे धनी असतात- तेव्हा...!

उज्ज्वला पाटील७५८८७४३७२४  पाच-सात वर्षांचा एक मुलगा, रोजच्याप्रमाणे माझ्याकडे एक खेळ खेळायला आला. त्या खेळात काही कार्डस्‌ होते. अर्ध्या कार्डस्‌वर गणितीय सूत्रे अंकस्वरूपात मांडली होती. ज्यामध्ये अगदी बेसिक- मूलभूत क्रिया करून उत्तर काढायचे होते जसे- ५+३=८ किंवा ४३=१२ आणि काही कार्डस्‌वर या उत्तरांची संख्या येणारी चित्रे काढली होती. उत्तरे असणारी कार्डस्‌ त्या सूत्रे असणार्‍या कार्डस्‌बरोबर मॅच करायची होती. थोडक्यात, ‘चित्रांच्या कार्डस्‌मधील ..

खाद्यसफर कोलंबियाची

पेपस चोर्रीऍडस (क्रिमी कोलंबियन पोटॅटोज)  साहित्य - ८ मध्यम आकाराचे बटाटे, १ क्युब व्हेजिटेबल स्टॉक (क्युब मिळाला नाही तर घरी केलेला व्हेजिटेबल स्टॉक वापरू शकता), १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, १ टेबलस्पून बटर, दीड कप टोमॅटो चिरून घेतलेले, १ जुडी पातीचा कांदा, २ लसूण पाकळ्या, १/२ कप डबल क्रीम, १/२ जुडी पालक धुऊन चिरून घेणे, १/२ कप किसून घेतलेले मोझरेला चीज, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा पार्स्ले.    कृती - बटाट्याची साले काढून घेणे. व्हेजिटेबल स्टॉक भांड्यात ..

तू घे भरारी...

  ऋचा मायी  एक रम्य संध्याकाळ... एका फॅमिली फ्रेंडच्या वाढदिवशी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक वेगवेगळे मराठी लोकं भेटले. तिथे आलेली एक गोड, निरागस मुलगी पूर्णवेळ माझ्यासाठी एका आश्चर्यापेक्षा कमी नव्हती. काय वेगळं होतं तिच्यात? प्रकर्षाने जाणवणारं होतं तिचं व्यक्तिमत्त्व! आयुष्यात असलेल्या ताणाविषयी सतत बोलणारे लोकं काही नवीन नाहीत... म्हणून नवीन वाटला तो तिचा हसरा चेहरा, तिचे बोलके डोळे आणि प्रत्येक गोष्टीबद्दलची चेहर्‍यावरची प्रचंड उत्सुकता! मी तिच्याशी बोलायला ..

गृहिणीमाहात्म्य...

परवा एक ऐतिहासिक चित्रपट पाहात होते. त्यातल्या राणीला दागदागिने घालून देणे, तिची वेणी घालून देणे, अगदी आंघोळसुद्धा तिच्या दासी करून देत होत्या. माझा मुलगा म्हणाला, ‘‘काय हे आई, या राण्यांना काहीच कामं नाहीत. त्यांची सर्व कामं करायला दासी. त्यांना नुसतं बसून कंटाळा नसेल येत का? आणि असं काही न करता राहणं किती बोअरिंग...’’ मी त्याला म्हणाले, ‘‘आजच्या फुटपट्‌ट्यांनी त्या वेळी आयुष्य मोजायची नसतात. त्या वेळी परिस्थिती वेगळी, त्यांचे ताणतणाव वेगळे आणि आजही अतिश्रीमंत ..

निवडणूका मतदान आणि महिला

२०१९ च्या लोकसभेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. साहजिकच वातावरण तापलेलं आहे, समाजमन ढवळून निघतंय. आपल्या देशातील लोकशाहीव्यवस्थेत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे; तसेच त्याच्याशी निगडित असणार्‍या राजकारणाला आणि ज्याच्या आधारे निवडणुका संपन्न होतात त्या मतदानालाही. या सगळ्यांमध्ये महिलांचे स्थान कुठे आहे, महिला या सगळ्यांकडे कुठल्या पद्धतीने पाहतात, त्या यात कुठे व कशा सहभागी होतात, हे पाहणे जसे आवश्यक आहे तसेच रंजकदेखील आहे.भारतात राजकारण िंकवा सत्ताकारण आणि महिला यांचे नाते तसे जुने ..

लावणीचा वारसा

यमुनाबाईंनी आपल्या लावणीचा वारसा महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षाला दिला आहे. भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार यमुनाबाई वाईकरांना लाभले. पारंपरिक अदेची लावणी सादर करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांची लावणीची कारकिर्द अतिशय तेजस्वी होती. लावणीच्या इतिहासात यमुनाबाईंचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल. कारण कथ्थकचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक ..

मातृत्व!

पल्लवी खताळ-जठार  नमस्कार! अकोल्याच्या सुजाता कोपस्कर, नागपूरच्या वंदना राऊत आणि पूजा दुधांकर यांच्या प्रश्नांवर आज मी एक घडलेल्या किस्स्यांवरून उत्तर देण्याच्या प्रयत्न करतेय्‌. अर्थात तुम्हाला तुमच्या समस्यांचे निवारण या लेखातून होईल, अशी मला अशा आहे.   मागच्या वर्षी माझ्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आणि आम्ही शिक्षिका जरा मोकळ्या झालो. मी ठरवले पेंिंडग कामे निपटून टाकायचे म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी मी आरटीओच्या रांगेत लागले. पुढे अनेक बायका ..

सखींची विज्ञानसेविका डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

 एकटीनं  भारतातील बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहते. तिथल्या स्त्रियांना रोज अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. त्यातल्या निदान काही समस्या आपण विज्ञानाच्या मदतीने दूर करू शकतो, या ठाम विश्वासाने डॉ. प्रियदर्शिनी कर्वे विज्ञानक्षेत्रात काम करतात.प्रियदर्शिनी या कृषिसंशोधन आणि समुचित तंत्रज्ञानात महत्त्वाचं कार्य करणार्‍या डॉ. आनंद कर्वे यांच्या कन्या आणि पुरातत्त्वशास्त्राच्या संशोधक डॉ. इरावती कर्वे यांच्या नात. फिजिक्समध्ये पदवी मिळवल्यावर त्यांनी, चुलीसाठी योग्य इंधन मिळवण्याचा ..

बास्केटबॉलचा उगवता तारा सिया देवधर!

आठड्यातली स्त्री; महेंद्र आकांत; काळ असा होता की, नागपूर-विदर्भाला आंतरराष्ट्रीय खेळाडूंची वानवा होती. मात्र, अलीकडच्या काळात ही वानवा दूर झाली आहे. पाहिजे तसे इन्फ्रास्टक्चर अजूनही नागपूर शहरात नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिथेंटिक ट्रॅक नाही, ॲस्टो टर्फ नाही, वूडकोर्टचे आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम नाही. अशाही विपरीत परिस्थितीत नागपुरातील खेळाडू आपले परिश्रम आणि कौशल्याच्या भरवशावर आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत आहेत. नागपूर बास्केटबॉलच्या क्षितिजावरही अश..

यांच्या अटकेची ती संध्याकाळ...

 वृन्दा पाचपोर  गेली दीड वर्षे आणिबाणीतील संघर्षनायिकांचे हे सदर मी नियमित वाचते आहे. वाटलं, आपणही काही सांगावं. आजवर ही संधीच कुणी दिली नव्हती. त्या काळांत सोसलेले सारे कढ मनांतल्या मनात दबून होते. आता ती संधी मिळाली आहे...  आणिबाणीचा काळ हा माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचा होता. जणूकाही देवाने माझी सत्त्वपरीक्षाच घेतली होती. १९७५ साली आणिबाणी लागली. आमचे घर रघुजीनगर (सक्करदरा) येथे आहे. ज्या दिवशी आणिबाणी लागली त्या दिवशी मी माझे पती रामकृष्ण उर्फ प्रकाश पाचपोर व माझा ६ महिन्यांचा ..

ऑनलाईन शॉपिंगचे फॅड...

- डॉ. रिता विवेक सोनटके   शॉपिंग हा तसाच बायकांचाच सोस असतो असे अजिबातच नाही. पुरुषांनाही शॉिंपग करायला आवडतं, मात्र चर्चा स्त्रियांचीच अधिक होते. एक मात्र खरं की स्त्रियांना व्यवहार चातुर्य नाही, असा समज आहे. मात्र तोही समज चुकीचाच आहे. कुठलाही व्यवहार करताना स्त्रिया जास्त जागरुक असतात. शॉपिंगच्या बाबत त्या जास्त चिकित्सक असतात. विशेत: कपड्यांची खरेदी करताना त्या जास्तच चौकस असतात. एकतर स्त्रियांचे रंगाचे भान अधिक चांगले असते. पुरुषांचे ठरलेले रंग आहेत. त्या पलिकडे ते जात नाहीत. त्या तुलनेत ..

दीपाच्या ‘कर्मा’मध्ये तेजाची ओवाळणी

आठवड्यातली स्त्री - मिलिंद महाजन   २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्स प्रकारात दीपा कर्माकरने पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणारी खेळाडू म्हणून इतिहास रचला. रशिया, अमेरिकासारख्या सराईत जिम्नॅस्टचे आव्हान स्वीकारत दीपाने प्रॉडुनोव्हासारख्या कठीण जिम्नॅस्टिक्स प्रकारात उत्तम प्रदर्शन केले. थोडक्यात तिचे पदक हुकले मात्र तिने समस्त जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील मातब्बरांनीही तिच्या प्रदर्शनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पाचवेळची ऑलिम्पिक विजेती रोमानियाची ..

कबाब

कबाब..

आणिबाणीतील संघर्षनायिका

Artical of Vijay mukund babde..

पत्र लिहिण्यास कारण की-

पत्र लिहिण्यास कारण की-..

पॉलिॲमोरी आणि विवाहसंस्था

पॉलिॲमोरी आणि विवाहसंस्था ..

आणिबाणीतील संघर्ष : एक स्मरण...

आणिबाणीतील संघर्ष : एक स्मरण.....

मर्ढेकरांच्या कवितेतील स्त्री

मर्ढेकरांच्या कवितेतील स्त्री..

कौमार्य चाचणी... कशाला?

कौमार्य चाचणी... कशाला?..

माचीवरला बुधा

माचीवरला बुधा..

नात्यांची वीण सैल होतेय्‌...

नात्यांची वीण सैल होतेय्‌.....

स्त्रीचे अर्थार्जन : कालचे व आजचे...

स्त्रीचे अर्थार्जन : कालचे व आजचे.....