आसमंत

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे...

आग्र्‍याच्या दरबारातील अपमान सहन न झाल्याने स्वाभिमानी शिवाजीराजांनी बाणेदारपणे केलेली िंसहगर्जना आपण मागील लेखात बघितली. सुदैवाने औरंगजेबाने कुठलीही कारवाई न करता रामिंसहाला सूचना केली की, त्यांस तुझ्या हवेलीवर घेऊन जा व त्याची समजूत घाल. पुढे काही..

चांद्रयान-2 अपयशातून यशाकडे...

चांद्रयानातील विक्रम लॅण्डर सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरण्यात अयशस्वी ठरले. पृष्ठभागापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर हे लॅण्डर विक्रम पोहोचले असतानाच त्याच्याशी संपर्क तुटला. या घटनेमुळे भारतीय अवकाश संशोधनातील संशोधकांबरोबरच कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांच्या मनात क्षणभर अपयशाची भावना निर्माण झाली. ती तशी निर्माण होणे साहजिकच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तिथे हजर होते. त्यांनाही क्षणभर निराशा लपवता आली नाही. सुदैवाने लवकरच सर्व जण सावरले. भावनांचा बहर ओसरल्यावर ..

विनोबांचे विचारपाथेय...

विदर्भातील ऋषितुल्य विनोबा भावे यांच्या जयंतीचे 125 वर्ष 11 सप्टेंबरपासून सुरू झाले. विनोबा आचार्य कुळीचे. अध्ययन आणि अध्यापनाचा हा मूळ िंपड, म्हणूनच आचार्य. विनोबांनी शंकराचार्य, ज्ञानदेव आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे ऋृण सदैव जोपासले. या विचाराच्या सूक्ष्म अवलोकनातून त्यांनी ‘साम्यसूत्र-अभिधेय परम’ अशी परमसाम्यांची एक क्रांतिकारी अभिनव संकल्पना जगाला दिली. 108 साम्यसूत्रे सांगत, एक सच्चा समन्वयवादी विचार अन्‌ विचारांना एक नवी दिशा दिली.   विनोबा म्हणजे ज्ञानतपस्वी. ..

स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती द्वेषाची कारणे...

उदय माहुरकर थोर क्रांतिकारक आणि ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेवरून निखळ हिंदुत्वाची ज्यात चर्चा आहे अशा ‘हिंदुत्व’ नामक पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची निंदानालस्ती करण्याची आपल्या देशात एक प्रथाच पडली आहे. सावरकरांसाठी आधी देश होता. देशापुढे कुठलीही गोष्ट, अगदी रिलिजनही नव्हता. असे असले तरीही समाजातील काही घटकांनी त्यांचा अतिशय द्वेषच केला. एवढ्यातच, कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी शाखा- एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या ..

5 ऑगस्टनंतरचा पाकिस्तान...

जम्मू-काश्मीरला (देशविघातक) विशेष दर्जा देणारे कलम 370 निष्प्रभ करून नरेंद्र मोदी सरकारने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. त्यातील बहुतांश पक्षी पाकिस्तानातील आहेत. हे कलम निष्प्रभ केल्यानंतर पाकिस्तानच्या ज्या वेळोवेळी प्रतिक्रिया आल्यात, त्यावरून पाकिस्तानमधीलच एक ज्येष्ठ राजकीय व त्यातल्या त्यात बरेचसे समतोल विश्लेषक नजीम सेठ यांनी पाकिस्तानचे वर्णन ‘मुंडके छाटलेले कोंबडीचे पिलू’ असे केले होते. अशा स्थितीत कुठे जावे आणि काय करावे, हेच पाकिस्तानातील सत्ताप्रतिष्ठानांना समजत नव्हते. तेव्हा ..

इन्कमटॅक्स नको, पण मग कोणता टॅक्स हवा?

यमाजी मालकर  पुण्यातील विश्वलीला न्यासने गेल्या 18 ऑगस्ट रोजी, राज्यसभा सदस्य आणि अर्थतज्ज्ञ सुब्रह्मण्यम्‌ स्वामी यांचे, ‘आर्थिक स्वातंत्र्य : आव्हाने आणि संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. सध्या सर्वाधिक चर्चा असणारा विषय असल्याने हजारभर नागरिक त्याला उपस्थित होते. रामजन्मभूमी आणि काश्मीर हा विषय नसताना त्यासाठी त्यांनी घेतलेला वेळ सोडला, तर व्याख्यान चांगले झाले. देशात आता संरचनात्मक बदलांची गरज आहे आणि ते केले तर भारतात प्रचंड संधी आहेत, असे त्यांचे मत पडले. इन्कमटॅक्स ..

शेत खाणारे कुंपण काढण्याची गरज!

सुमंत पुणतांबेकर कुंपणच शेत खात असेल तर? या प्रश्नाचे उत्तर शोधून कठोर उपाय करणे गरजेचे झाले आहे. देशात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. ज्या संस्थांवर भ्रष्टाचाराला आळा घालण्याची जबाबदारी आहे, त्याच संस्थांमधील काही लोक भ्रष्ट असल्याचे कटाक्षाने पुढे आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून सीबीआयने देशभरातील दीडशे ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली होती. यातली बहुतांश ठिकाणं ही सरकारी कार्यालयं होती, सार्वजनिक उपक्रमांची कार्यालयं होती. भ्रष्टाचारमुक्त ..

धुरंधर औरंगजेब

डॉ. सुमंत दत्ता टेकाडे शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण, असा प्रश्न विचारला तर हमखास जे नाव पुढे येते- ते म्हणजे ‘औरंगजेब!’ असे म्हणतात की जर तुम्हाला नायकाला समजून घ्यावयाचे असेल तर पहिले खलनायक समजावा लागतो. जसे राम समजून घेण्याआधी रावण समजावा लागतो, म्हणजे लक्षात येते की मायावी, सामर्थ्यवान, बुद्धिवान रावणासोबत लढताना रामचंद्रांना किती तयारी करावी लागली असेल. तसेच शिवाजीराजांना समजून घ्यायचे असेल तर कुटिल, धूर्त अन चाणाक्ष औरंगजेब समजून घ्यावा लागतो. तसे न केल्यास शिवाजीराजे ..

साहित्यातील श्रीगणेश...

संगीता वाईकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या।। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ असे म्हणून श्रीगजाननाला नमन करून ज्ञानेश्वरी या सर्वश्रेष्ठ ग्रंथाला प्रारंभ केला. गण म्हणजे समूह आणि जो समूहाचा अधिपती तोच गणपती. या समूहात कला, विद्या, खेळ, कष्टकरी, सर्वच प्रकारच्या माणसांना एकत्र आणणारा देव म्हणजे प्रत्यक्ष गणराय. बुद्धीची देवता आणि चौसष्ट कलांचा स्वामी म्हणजे देवांचा देव गजानन होय. गणपती ही देवताच ज्ञानाची, सर्व कलंची, विद्येची, प्रतिभेची ..

पुराच्या विळख्यातील महाराष्ट्र...

सुधीर पाठक8888397727 यावेळी महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, अतिपूर्वेकडील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात न भूतो पूरस्थिती निर्माण झाली. अतिशय कमी दिवसात विक्रमी पावसाचा अनुभव यावेळी सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनी घेतला; तर त्याच वेळी मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयास सुरू होते. विदर्भात पाऊस पडला नाही असे नाही, पण तृषार्त भूमी धडपणाने शांतवलेली नाही. अशी स्थिती महाराष्ट्रात कधीही आली नव्हती. सामान्यत: महाराष्ट्रावर ..

करोगे याद तो हर बात याद आयेगी...

रत्नाकर लि. पिळणकरनिधनाच्या बातम्या कानावर येतात, वाचल्या जातात, पाहिल्या जातात. त्यावर लगेच धक्कादायक प्रतिक्रिया किंवा अस्वस्थता निर्माण होतेच असं नाही. कारण मृत्यू अटळ आहे. तो आसपास रेंगाळतच असतो आणि त्याच्या इच्छेनुसार तो ‘अंत:स्थ’ व्यक्तीला आपल्या सोबत नेतो. ती व्यक्ती कोण? यावर आपण आपल्या भावना व्यक्त करतो. खय्यामसाहेबांचं निधन झाल्याची बातमी कुणीतरी फोन करून लगेच मला कळवायला हवी होती, कारण तेवढ्याच वेगाने ती प्रसिद्धी माध्यमावर पसरली होती. परंतु, ती मला कुणी आमच्या संगीतक्षेत्रातील ..

सागरी जिहाद नि भारताची सुरक्षा व्यवस्था!

ब्रिगेडियर हेमंत महाजन जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तेथील दहशतवाद्यांना भारतात हल्ल्यासाठी चिथावत असल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानी यांनी स्वतः पुलवामासारख्या हल्ल्याची भीती यापूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर आता पाकिस्तान समुद्री जिहादचा कट आखत असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने सुत्रांच्या आधारे दिलं आहे. यानंतर नौदलासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना दहशतवाद्यांना समुद्री मार्गे भारतात ..

लोकसंख्यावाढ आणि मोदींचे आवाहन!

गजानन निमदेव  आपण स्वतंत्र भारतात राहात असलो आणि या देशाचे सर्वाधिकारसंपन्न नागरिक असलो, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्यापैकी प्रत्येक जण हा निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेमुळे मनुष्याचे जीवन सुकर झाले आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्र नव्हे, तर आश्रित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आज उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधनं पुढली किती वर्षे उपलब्ध राहतील आणि आपल्याला पुरतील, याचा अंदाज करणे कठीण आहे. परंतु, आज ज्या गतीने आपण नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी ..

प्रेरणादायी निसर्गयात्रा

अभय देशपांडे निसर्ग जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गेल्या काही वर्षांमधल्या बेजबाबदार मानवी कृत्यांमुळे पर्यावरणाचा ढासळलेला तोल सावरायचा असेल तर प्रत्येक माणसाने पुढाकार घेणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण वैयक्तिक सुखासाठी निसर्गाचा हवा तसा उपयोग करून घेतला. विकासाच्या चुकीच्या संकल्पना निसर्गाच्या मुळावरच उठवून एक प्रकारे आपण आत्मघात करवून घेतला. आता मात्र फार थोड्या संधी शिल्लक असताना शर्थीचे प्रयत्न करणं, ही गरज नसून प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही वस्तुस्थिती सातत्याने आणि प्रकर्षाने पुढे ..

काश्मिरी जनतेचा आर्थिक विकास

ब्रिगेडियर हेमंत महाजन9096701253 जम्मू - काश्मीरला विशेष दर्जा देणारे तसेच काश्मीर समस्येचे मूळ असणारे घटनेतील 370 वे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय धाडसी असा निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने इतिहास घडवला आहे. कलम 370 काढल्यामुळे देशाचे आणि कश्मिरी जनतेचे अनेक फायदे होणार आहेत, परंतु एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कश्मीरमध्ये आर्थिक विकासाचा दर वाढेल, यामुळे युवकांना रोजगार मिळेल आणि यामुळे त्यांचे दहशतवादाकडे जाण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल.   370 आणि काश्मिरी जनतेची ..

पाकिस्तानचे समर्थक कोण?

भारताद्वारे जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविणे आणि या राज्याच्या प्रशासकीय पुनर्गठनामुळे अस्वस्थ पाकिस्तानने पहिल्या आठवड्यातच जगातील सर्व दरवाजे खटखटविले. पहिली तक्रार अमेरिकेकडे केली. कारण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान एवढ्यातच भेट घेऊन आणि काश्मीरप्रश्नी मध्यस्थतेचे पिलू सोडून परत आले होते. अमेरिकी परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काश्मीर मुद्यावर त्यांच्या देशाच्या धोरणात कुठलेच परिवर्तन ..

काश्मिरी जिहाद पंजाबी पाकिस्तानच्या कुवतीपलीकडे!

विनय जोशी92602 4146 सध्या पाकिस्तानात दोन शक्तिशाली, पण परस्परविरोधी गट सक्रिय आहेत. या गैरपंजाबी अशा बलुच, पश्तुन, सिंधी लोकांमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात टोकाच्या क्रोधाची भावना आहे. कोणत्याही स्थितीत पाकिस्तानच्या काश्मिरी जिहादला समर्थन देण्याच्या ते मानसिकतेत नाहीत. दुसरा गट पंजाबी लोकांचा आहे, जो टोकाचा राष्ट्रवादी आहे आणि काश्मीरच्या कलम 370 च्या मुद्यावर भारताविरोधात तत्काळ सैनिकी कारवाई करण्यासाठी सैन्यावर दबाव टाकत आहे.   ही 1971 नंतरची पाकिस्तानी सैन्याची ..

नाईट वॉचमन!

नरेश माझा वर्गमित्र! लई-भारी हुशार गडी! पण कायम अस्थिर आणि चंचल. अखंड धावता जीव. मी त्याला ‘निवांतपण हरवलेला प्राणी’ असं नाव दिलं होतं. शाळा सुटल्यापासून आमची गाठभेट नाहीच, म्हणून शेवटी मी फेसबुकला विचारलं- ‘‘आपण यांना पाहिलंत का?’’ आणि हुडकला पठ्‌ठ्याला एकदाचा. व्हॉट्‌स नंबर घेतला. ऑडिओ, व्हिडिओे झाला. आता तसं खास काम काहीच उरलं नव्हतं. बस्स! समोरा-समोर बसून हातात हात गुंफून शिळोप्याच्या गप्पा लावायच्या होत्या ! पण प्रत्यक्ष भेटीचा योग जुळून येत नव्हता.&nbs..

शिवाजीराजांचा आपद्धर्म!

संपूर्ण हिंदुस्थानवर आपली सत्ता असावी, अशी मोगलांची सुप्त आकांक्षा होती. अकबरापासूनच्या सर्व सुलतानांनी त्यासाठी आपली बरीच शक्ती पणालाही लावली होती. औरंगजेब तर दख्खनचा सुभेदार असतानाच हे स्वप्न पूर्ण करू इच्छित होता. पण पुढे दिल्लीचा सत्तासंघर्ष आणि त्यात स्थिरस्थावर व्हायला लागलेला वेळ, यामुळे त्याचे दक्षिणेकडे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत शिवाजीराजांनी झपाट्याने आपले पाय पसरायला सुरुवात केली. शिवाजी जर दख्खनमध्ये बलवत्तर झाला अन्‌ त्याने आदिलशाह व कुत्बशाहशी संधान बांधले, तर आवळलेली ही मूठ ..

समज-गैरसमज!

मानवी मन प्रत्येक घटनेमागचं कारण, मीमांसा शोधीत असते. अर्थातच, ही कारणमीमांसा काळाच्या कसोटीवर टिकणारी असतेच, असे नाही. असे असले तरी, असे समज त्याप्रमाणे एखाद्या घटनेची कारणमीमांसा शतकान्‌ शतके मानवी मनात घर करून असते. अशा अनेक घटनांचे वैज्ञानिक तत्त्वावर आधारित स्पष्टीकरण उपलब्ध आहे. तरी ते सर्वसामान्य माणसाने स्वीकारलेले असेलच, असे नाही. सूर्य आणि चंद्रग्रहण या घटनांबाबत अशी परिस्थिती आहे. नियमीत घडणार्‍या या खगोलशास्त्रीय घटनांबद्दल अद्यापही प्रचंड गैरसमज आहेत. या गैरसमजांचे मूळ मानवी ..

काश्मीर पुनर्रचना, संघाचा प्रस्ताव अन्‌ ऐतिहासिक निर्णय!

अखेर कलम 370 आणि कलम 35-अ रद्द करून, गृहमंत्री अमित शाह यांनी एक ‘नव काश्मीर’ जन्माला घातले अन्‌ इतिहासच घडविला. हा निर्णय केवळ ऐतिहासिकच नाही, तर दूरगामी परिणाम करणारा, राजकीय कलाटणी देेणारा धाडसी निर्णय होता. लोकांच्या शब्दांत मोदी सरकारचा खरा ‘छप्पन्न इंची छातीचा’ हा घेतलेला निर्णय म्हणावा लागेल. यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि अजित डोवाल या त्रिमूर्तीचे अभिनंदन आज सारा देश करतोय.     या ऐतिहासिक निर्णयामागची जी अदम्य राजकीय इच्छाशक्ती ..

कलम 370 चा लोप; राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने एक पाऊल!

‘‘माननीय पंतप्रधान, तुमचे हार्दिक अभिनंदन! मी माझ्या जीवनात हा दिवस बघण्याची प्रतीक्षा करीत होती.’’ माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या आकस्मिक निधनापूर्वी हे टि्‌वट केले होते. भावुक करणारे हे टि्‌वट, कोट्यवधी भारतीयांच्या भावनांना अभिव्यक्त करणारे आहे.     5 ऑगस्टला सकाळी भारताच्या राष्ट्रपतींनी एक संवैधानिक आदेश क्र. 272 जारी केला. यात महामहीम राष्ट्रपतींकडून अनुच्छेद 370 च्या उपबंध 1 द्वारा प्रदत्त अधिकारांचा उपयोग ..

महाराष्ट्राची सशक्त सहकार चळवळ!

 भालचंद्र कुलकर्णी भारतीय संस्कृतीत सहकार ही वृत्ती मुळातच दडलेली आहे. ती आजही तितकीच सहजपणे भारतीयांनी अंगीकारलेली आहे. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सहकार चळवळ रुजली आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा इतिहास 100 वर्षांपेक्षा अधिक आहे. सुरुवातीस प्रामुख्याने ग्रामीण भागातील सहकार चळवळ आता शहरी भागातदेखील मोठ्या दिमाखात काम करीत आहे. साखर कारखाने, सूतगिरण्या, दुध सोसायट्यांबरोबरच आता पतसंस्था, नागरी सहकारी बँकांचे मोठे योगदान ..

सहकारी बँकांसमोरील आव्हाने

प्रा. संजय भेंडेसहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. ते कुणीही नाकारूच शकत नाही. ‘स्टेट लेव्हल बँकर्स’ कमिटी म्हणून एक कमिटी आहे. ‘एसएलबीसी’ असे याला म्हणतात. याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्याला राज्यातल्या सर्व राष्टीयीकृत बँका आणि राज्यातील राज्य सहकारी बँका यांना तीन महिन्यातून एकदा बोलाविले जाते. आत्ताच एसएलबीसी झाली. मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला तेव्हा राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँकांचे कर्जपुरवठ्यातील योगदान 65 टक्के आहे, तर राष्ट्रीयीकृत ..

कर्ज व्यवस्थापन

धनंजय तांबेकर  मराठीत एक म्हण आहे, ‘चादर पाहून पाय पसरा.’ ही म्हण सी. डी. रेशोकरिता चपखल बसते. ठेवींच्या 60 ते 65% कर्ज वितरण (क्रेडिट-डिपॉझिट रेशो) आदर्श मानलं आहे. त्याला कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. ठेवीदारांना मागताक्षणी ठेवी परत करता याव्यात, याकरिता प्रस्तुत सी.डी. रेशो प्रमाण आपण पाळतो. या एका निकषावर मर्यादा असती तर ठीक, पण खरी गंमत पुढे आहे. एकीकडे सी.डी. रेशोचा मापदंड असतानाच खेळत्या भांडवलाचे (वर्किंग कॅपिटल) 65% इतकी रक्कम आपण कर्जस्वरूपात वितरित करू शकतो. हे प्रकरण इथेच ..

सहकारातून समृद्धीकडे...

भारतासारख्या प्रगतशील देशात विकासाची खरी संकल्पना सहकार चळवळीच्या माध्यमातूनच जनमानसात रुजली. सन 1904 मध्ये इंग्रजांनी पहिला सहकार कायदा आपल्या देशात लागू केला. त्यावेळची शेतकर्‍यांची दयनीय अवस्था बघता शेतकर्‍यांना डोळ्यांसमोर ठेवूनच त्यावेळच्या सरकारने हे पाऊल उचलले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्रात व त्या त्या राज्यात वेगवेगळे सहकार कायदे अस्तित्वात आले. स्वातंत्र्यानंतर सहकाराचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला. सहकाराचा आयाम बँका, पतसंस्था, कृषी व ग्रामीण सहकारी संस्था, साखर कारखाने, दुग्ध ..

भाजपाच्या संयमाची परीक्षा बघणारे कर‘नाटकी’ नाट्य!

सुधीर पाठक/8888397727 अखेर कुमारस्वामी सरकारने कर्नाटक विधानसभेतील आपले बहुमत 99 विरुद्ध 105 मतांनी गमावले. 14 महिन्यांचे एक अनैसर्गिक सत्तासमीकरण संपुष्टात आले. फक्त नकारात्मक बाबींवर आधारित सरकार टिकविण्यासाठी किती म्हणून तडजोडी कराव्या लागतात, याची साक्ष म्हणून वारंवार इतिहासात उल्लेख करावा लागेल, असा हा कालखंड कर्नाटकच्या राजकीय जीवनातून आता संपला आहे. अखेर लोकशाही जिंकली आहे. राजकीय जीवनातील सकारात्मकतेची सरशी झाली आहे. मात्र, ही सरशी होताना जेवढे म्हणून राजकीय रडीचे डाव रचले गेलेत तेवढे यापूर्वी ..

चांद्रयान-2

डॉ. पंडित विद्यासागर चांद्रयान-2 मोहिमेची बीजे चांद्रयान-1 मध्ये रोवली गेली होती. चांद्रयान-1 मोहीम अनेक अर्थांनी यशस्वी ठरली होती. त्यासाठी भारतीय बनावटीचा अग्निबाण वापरण्यात आला होता. त्यापूर्वी पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडण्यासाठी अग्निबाणांचा उपयोग केला होता. चांद्रयान-1 मोहिमेमुळे आपण चंद्राच्या कक्षेत पोहचू शकतो, हे सिद्ध झाले. त्याचप्रमाणे ते यान चंद्राभोवती एक वर्षभर फिरवत ठेवण्यात भारत यशस्वी झाला. चांद्रयान-1 या मोहिमेत चंद्रावर अलगदपणे उतरता आले नाही तर निरीक्षणासाठीचे उपकरण चंद्रावर ..

अवकाश विज्ञानात भारताचे योगदान...

सम्राट कदम  भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चंद्रावरील महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करत आहे. आत्तापर्यंत मानवासाठी अपरिचित असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानातील रोव्हर प्रग्यान आणि लँडर विक्रम संशोधन करणार आहे. जगाच्या अवकाश विज्ञानाच्या वाटचालीतील ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. देशाच्या अवकाश विज्ञानातील प्रगती बघता, ही सर्व देशबांधवांसाठी अभिमानाची घटना ठरणार आहे. आपल्या देशाची अवकाशशास्त्रातील वाटचाल कधी आणि कशी सुरू झाली, त्याचा इतिहास काय आहे, आपल्या पूर्वजांनी ..

कथा चंद्रविजयाची...

मा. बा. मोडक शतकानुशतके पृथ्वी आणि चंद्र एकमेकांपासून लक्षावधी मैल अंतरावर अंतराळात फिरत आहेत. लोण्याच्या गोळ्यासारखा दिसणारा शुभ्र, शीतल चंद्र म्हणजे लहान मुलांचे आणि कविजनांचे फार मोठे आकर्षण! पण, हा चंद्र असा दुरूनच मुलांना आणि कवींना प्रेरणा देत राहील, आपल्या जवळपास कुणाला फिरकू देणार नाही, असेच आतापर्यंत सर्वांना वाटत होते आणि चंद्र व पृथ्वी यांच्यातील जवळजवळ दोन लक्ष मैलांच्या अंतरामुळे तर चंद्राजवळ जाणेच असंभवनीय आहे, असा सर्वसामान्य माणसांचा ग्रह झाला होता. परंतु, आहे त्यात समाधान ..

मानवी इतिहासांतील अपूर्व क्षण

50 वर्षांपूर्वी 22 जुलै 1969 रोजी प्रकाशित तरुण भारतचा अग्रलेख अनादिकालापासून भूतलावरील मानव ज्या चंद्राकडे आशेने पाहात होता, ज्याच्याबद्दल असंख्य कविकल्पना नित्य प्रस्फुरित होत होत्या, ज्याची वर्णने पुराणांतून आपण वाचत होतो, त्याच चंद्रलोकावर दोघा मानवांनी पाऊल ठेवल्याची व त्या अपरिचित भूमीवर अल्पकाळ वास्तव्य आणि वाटचाल केल्याची रोमहर्षक, चित्तथरारक घटना म्हणजे मानवाच्या विज्ञाननिष्ठेचा अत्यंत सुंदर आविष्कार होय. अनंतकाळापूर्वीपासून पृथ्वीच्या हृदयाचा जो हा भाग दूर अंतराळात एकाकी भ्रमण करीत ..

नेते-माफिया-अधिकारी आणि मोदी सरकार!

 गजानन निमदेव   ‘अच्छे दिन आनेवाले हैं,’ असा नारा देत नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्याच्या परिणामी 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीला स्वबळावर सरकार स्थापन करता येईल एवढ्या बहुमतापेक्षा अधिक 10 जागा मिळाल्या होत्या. 282 जागा जिंकणारा भाजप, हा पहिला गैरकॉंग्रेसी पक्ष ठरला होता. भ्रष्टाचाराला लगाम घालू, काळा पैसा सरकारी तिजोरीत आणू, अशी आश्वासनं मोदींनी दिली होती. ती पाळली नाहीत, अशी ..

तेलजहाजांची सुरक्षा!

ब्रिगेडियर हेमंत महाजन9096701253 इराण आणि अमेरिकेतील तणाव गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढला असून इराणवर युद्धाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कतारमध्ये पहिल्यांदाच एफ-22 स्टेल्थ फायटर विमाने तैनात केल्याने कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागच्या आठवड्यात इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. नाविकांची तेलवाहू जहाजांवर तैनातीसौदेशाच्या जहाज भवनमध्ये एक महत्त्वाची बैठक मागच्या आठवड्यात ..

सरकार नव्हे, समाज आहे संघाचा आधार!

डॉ. मनमोहन वैद्यसह सरकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निवडणुकीच्या काळात भारतात युद्धासारखे वातावरण दिसत होते. आता सारी धूळ बसल्यावर चित्र स्पष्ट झाले आहे. देशाच्या जनतेने एका राष्ट्रीय पक्षाला मजबूत समर्थन देऊन सत्तारूढ केले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीत, विभाजनवादी राजकारण करणार्‍या गटांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही अकारण आधारहीन आरोप लावले जात होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) यांच्या वक्तव्यांचा संदर्भ सोडून, कुठल्याही ..

पक्षपाताने अंध राजकीय विश्लेषकांना धडा

देवेंद्र कुमार •विजय चौथाईवाले 28 मे 2019 रोजी वाराणसी येथे आभारप्रदर्शनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील राजकीय विश्लेषक अजूनही 20 व्या शतकातच जगत आहेत. त्यामुळे 21व्या शतकाच्या भारतीय राजकारणातील वास्तवाची त्यांना कल्पनाच आलेली नाही. गेल्या पाच वर्षांतील तसेच नुकत्याच पार पडलेल्या 2019च्या सार्वत्रिक निवडणुकींचे योग्य विश्लेषण करण्यात राजकीय विश्लेषकांना जे सातत्याने अपयश आले, त्या संदर्भात कदाचित पंतप्रधानांनी वरील मत व्यक्त केले असावे. भारतीय समाजाचे सामाजिक व भौगोलिक ..

योग थेरपी नव्हे, कल्याणकारी जीवनशैली!

रोज काही व्यायाम होतो का? उत्तर माहीत असलेले असे काही प्रश्न आम्हाला विचारावेच लागतात. हो. रोज मी अर्धा तास योगा करतो. असं त्या प्रश्नाचं ठरावीक खोटं उत्तर ठरलेलं असतं. खोटं यासाठी की, तो योगा कधीतरीच योगायोगानं केला जातो, रोज नाही. तोही चोवीस तासातले फक्त अर्धा तास. प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की, आपल्या पूर्वजांनी योग व्यवहारात आचरला होता. प्राणायाम, ध्यान, कुंडलिनी जागृती, प्राणाचं उर्ध्वगमन अशा कितीतरी गोष्टी त्यांना अभ्यासानं प्राप्य झाल्या होत्या. युद्धातील ..

नवे तंत्रज्ञान आणि रोजगारांची निर्मिती

- डॉ. भरत झुनझुनवाला एटीएम आल्यामुळे बँकेतील रोखपालाच्या नोकर्‍या कमी झाल्या. मोबाईल फोन आल्यामुळे एसटीडी बूथचा धंदा पार लयाला गेला. अशी अंतहीन अनेक उदाहरणे आहेत. मात्र, नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे जर काही रोजगार संपुष्टात येत असतील, तर अनेक नवीन प्रकारच्या रोजगारांचीही निर्मिती यामुळे होत असते, हीदेखील वस्तुस्थिती आहे. याचाच अर्थ, नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगारावर मोठे संकट कोसळलेले नाही. उदाहरणार्थ, एटीएम आले तर त्याच्या देखभाल, दुरुस्ती व संचालनक्षेत्रात नवीन नोकर्‍या निर्माण झाल्या. ..

बद‘सुरत!’

डॉ. सुमंत दत्ता टेकाडे9923839490 महाराज सुरतेवर आक्रमण करण्यास निघाले हे आपण मागील लेखात बघितले. पौष शु. व्दितीयेला (6 डिसेंबर 1663) राजांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन देवाधिदेव महादेवाचे दर्शन घेतले. तिथून राजे गुजराथेकडे दौडत निघाले. इतक्या मोठ्या संख्येत सेना कुठे निघाली, याची शंका येऊ नये म्हणून आपण औरंगाबादेवर आक्रमण करायला निघालो आहोत, अशी हूल राजांनी उडवून दिली. आणि स्वतः मात्र जव्हार, रामनगरमार्गे सुरतची वाट धरली. तिकडे गुजराथ प्रांतात राजांनी अफवा उडवून दिली की मोहोबतखानाच्या आदेशानुसार पट्टणचे ..

एका रस्त्याची आत्मकथा!

विवेक सकदेव9326906049 मध्यंतरी ‘तरुण भारत’ तसेच इतर वर्तमानपत्रांमध्ये नागपुरातील रस्त्यांबद्दल बरेच चर्चितचर्वण व छायाचित्रे येत होते. तेव्हापासून माझे व लेखकाचे हितगुज सुरू होते. मी लेखकाला विनंती केली की- माझी आत्मकथा तुमच्या लेखणीतून उतरते का बघा! म्हणजे सर्वांना माझ्या व्यथा कळतील. मित्रांनो, माझा जन्म कधी झाला, हे जरी मला आठवत नसले, तरी तो रामायण-महाभारत घडण्याच्या आधी नक्कीच झाला. कारण राम माझ्या अंगावरूनच वनवासात गेले तर महाभारतासाठी माझाच वापर झाला. मला आठवते- माझ्या ..

हँग ग्लायडर...

कॅप्टन निलेश गायकवाड9420286000धाडसी खेळ, धाडसी कर्तब या मानवाला कायम आकर्षण असणार्‍या गोष्टी आहेत. त्यातच हवाई कर्तब, खेळ तर रोमांचाचा शिखरावर आहेत. ‘हँग ग्लायडर’ हा असाच एक रोमांचकारी खेळ आहे. या ‘हँग ग्लायिंडग’चा शोध सर्वात पहिले चीनमध्ये सहाव्या शतकात लागला होता. त्यावेळी त्यांनी जे पहिले ‘हँग ग्लायडर’ बनवले ते सर्व साधारण वजन असणार्‍या माणसाला पेलवू शकेल असे होते.   हलकेअल्युमिनिअमचा पातळ कागद किंवा नायलॉन असणार्‍या पात्यानेबनलेल..

मोदींचे धक्के!

विलास पंढरी9860613872 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाला 282 जागा मिळवत, पूर्ण बहुमताच्या जोरावर पंतप्रधान होत जबरदस्त धक्का देणार्‍या मोदींनी गेल्या पाच वर्षांत अनेक धक्के दिले आहेत. त्यातील काही वादग्रस्त ठरले असले, तरी विरोधकांना नामोहरम करणारे ठरले, हेही खरे आहे. निवडणूक जिंकताच, सामान्य माणसाप्रमाणे छोट्या घरात राहणार्‍या आपल्या आईचा आशीर्वाद घेणे, स्वतःला प्रधानसेवक संबोधणे, संसदेत पाऊल टाकण्यापूर्वी संसदेला डोकं टेकवून केलेला नमस्कार, अचानक पाकिस्तानमध्ये जाऊन नवाझ ..

बंधुभावाची जगन्नाथपुरी...

भारताच्या पूर्व किनार्‍यावर या विश्वाचा सारा पसारा धारण करणारा जगजेठी जगन्नाथ समुद्राकडे एकटक बघत उभा आहे. ही नगरी दाक्षिणात्य वैष्णव परंपरेत 108 दिव्यदेशम्‌ स्थळांपैकी एक म्हणून भक्तप्रिय आहे. कारण या ठिकाणी सगळ्या 12 अळवारांची (दाक्षिणात्य वैष्णव संत) प्रतिभा जगन्नाथाच्या दर्शनानं जागृत झाली. त्या सर्व विष्णुभक्तांनी या मंदिरात आपापलं भक्तिकाव्य प्रस्तुत केलं. 12 व्या शतकात होऊन गेलेले आणि भारतीय भक्तिआंदोलनाला मधुराभक्तीचं वळण देणारे संस्कृत कवी जयदेवाचं स्फूर्तिस्थानही हेच आहे. याच ..

मूकस्तंभ

तसा त्यांचा आमच्याकडे येण्याचा रोजचा नित्यक्रमच असायचा. ते साधारण सकाळी आठ वाजता यायचे. एक-दीड तास आरामात बसायचे, वर्तमानपत्र वाचायचे. आमचा मोठा वाडा होता. समोरच मोठा व्हरांडा आणि व्हरांड्यासमोर विस्तीर्ण अंगण होते. अंगणाच्या एका बाजूला गाई, बैल, म्हैस त्यांचे पाडस यांनी भरलेला मोठा गोठा होता. व्हरांड्यात काही फर्निचर होते आणि हॉलमध्ये मात्र मुख्य बैठक होती. ते मात्र व्हरांड्यातच बसायचे. त्यांना तेथे मोकळा वारा लागत असावा किंवा मोकळे वाटत असावे. ते मधूनच आकाशाकडे बघायचे. तर कधी गोठ्यात, तर ..

हिंदुत्वसाधकांच्या तपाचे फळ!

• - तरुण विजयनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने मिळविलेल्या जबरदस्त आणि अभूतपूर्व विजयामुळे केवळ भारतच नव्हे, तर जगाच्या राजकारणात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. अन्य देशांमध्ये असे मूलभूत परिवर्तन आणण्यासाठी शेकडो वर्षे लागली आणि त्यासाठी रक्तरंजित क्रांतीही अनिवार्य ठरली. मात्र, भारताच्या हिंदू सांस्कृतिक प्रवाहाने बोटावर गंध लावून राष्ट्रपरिवर्तनाला प्रारंभ केला आहे. विकासकार्यांमुळेच सत्ता प्राप्त झाली, हे या निवडणुकीतील निकालांवरून दिसून येत आहेच. पण, यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात ..

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावी उत्तरेकडे!

शास्ताखानावरील अकल्पित छापा हा खानासकट औरंगजेबाचीही झोप उडविणारा ठरला. शिवाजी राजांची निर्भयता किती उच्च कोटीची असावी, याचा अंदाज इथे येतो. हा छापा शिवाजीराजांच्या शास्त्रशुद्ध युद्धतंत्राचा उत्कृष्ट नमुना होता. राजांना स्वतःच्या सामरिक शक्तीच्या मर्यादा माहिती होत्या. त्यामुळे समोरासमोरच्या लढाईमध्ये खानाच्या फौजेला आव्हान देणे, हा मूर्खपणा ठरला असता. पण राजांनी युद्धाच्याच पवित्र्यात उभ्या असलेल्या खानाच्या छावणीमध्ये शिरून त्या अवाढव्य मोगल सेनेच्या अधिपतीवर घाला घातला अन खानाला पुण्यातून दूर केले. ..

उडते व्हाईट हाऊस ‘एअर फोर्स वन!’

कॅप्टन निलेश गायकवाड9420286000  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांरिता बनविलेले एक विशेष विमान म्हणजे- ‘एअर फोर्स वन!’ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत किंवा परदेशात जिथे जिथे जातात, तेव्हा ते ‘एअर फोर्स वन’ नेच प्रवास करतात किंवा असंही म्हणता येईल की- ज्या क्षणाला राष्ट्राध्यक्ष विमानात दाखल होतील, त्याला ‘एअर फोर्स वन’ संबोधिल्या जाईल. राष्ट्राध्यक्ष जर सैनिकी विमानातून प्रवास करणार असतील तर त्याला ‘आर्मी वन’ म्हंटले जाईल व हेलिकॉप्टरने ..

घटना ओलांडून बघताना...

मनीषा अतुल9823262966 तू विचारलंस की, मला आज सारख्या त्या ज्योतीकाकू का आठवताहेत? आणि त्याचा विचार करायला गेले तर लक्षात आलं की, हे आठवण्याची लिंक फारच मोठी आहे की.नेमकी कुठून कुठे गेली ते मलाही नीट उमगत नाहीये, पण प्रयत्न करतीये तेच शोधण्याचा. आ..

हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले सर्जिकल स्ट्राईक!

शिवदीपस्तंभ  डॉ. सुमंत दत्ता टेकाडे9923839490 मागील लेखात आपण बघितले की- शास्ताखानाविरुद्ध महाराजांनी निर्णायक आघाडी उघडली. लाल महालावर छापा घालण्याचा विचार मुकर्रर करण्यात आला. 1000 मावळ्यांपैकी निवडक 400-450 मावळे राजांच्या सांगाती राहणार होते. चैत्र शु. अष्टमीला (5 एप्रिल 1663) रात्रीच्या अंधारात ही सेना पुण्यात दाखल व्हावयाची होती. ही जशी रामनवमीच्या आधीची रात्र होती तशीच ती पवित्र रमझानमधली छटा चांदची (सहाव्या चंद्राची) रात्र होती. इस्लाममध्ये मान्यता आहे की या महिन्यात सूर्योदयापूर्वी ..

जे आहोत, ते तर आधी होऊ द्या

डॉ. मनमोहन वैद्य भारताची जीवनदृष्टी (View of Life) जगात वैशिष्ट्यपूर्ण (Unique) आहे. कारण या जीवनदृष्टीचा आधार आध्यात्मिक (Spirituality) आहे. आणि म्हणूनच ही दृष्टी एकात्म व सर्वांगीणही आहे. याच कारणामुळे भारत सत्याचे अनेक रूपं पाहतो, त्यापर्यंत पोहचण्याचे मार्ग वेगवेगळे असले तरीही ते सर्व समान आहेत, हे मानतो. यामुळेच तो अनेकतेत एकता बघतो आणि विविधतेत ऐक्य प्रस्थापित करू शकतो. तो विविधतेला भेद समजत नाही. प्रत्येक व्यक्तीत, चराचरात एकच आत्मतत्त्व विद्यमान आहे, म्हणून आम्ही सर्व परस्परांशी जुळलेलो ..

हे जीवन सुंदर आहे !

जीवनरंगमो. बा. देशपांडे9850599307 हे जीवन सुंदर आहे! वाह! दर्शनी भागात किती अप्रतिम शीर्षक आणि त्याखाली चला-नव-जीवनाकडे वळू या! उषःकाले नवजीवनम! हे भावगर्भ प्रेरक ब्रीदवाक्य.. किती कलात्मकतेने कोरलंय्‌ बघा तरी! नव्या वास्तूवरील हे नूतन नाव बघून जो तो तोंड भरून स्तुती करीत होता. रंगराज आर्ट्सचा कलाकार रतन रणदिवे याने स्वयंप्रेरणेने हे सुंदर नामशिल्प स्वतः खपून, जीव लावून, अर्जंट म्हणून सहयोगाच्या भावनेतून, रात्रीचा दिवस करून कोरले होते. त्याला कारणही तसेच होते म्हणा! पूर्वीपासून फावल्या ..

अद्भुत! अकल्पनीय!! अनाकलनीय!!!

शिवदीपस्तंभ  डॉ. सुमंत दत्ता टेकाडे9923839490  शास्ताखानाचा जाच स्वराज्याला सुरू झाला होता. खानाची सेना म्हणजे 77 हजारांचे घोडदळ, अगणित पायदळ, अमाप खजिना, तोफा, दारुगोळा, शस्त्रसामुग्री यांनी परिपूर्ण अशी बादशाही सेनाच होती. स्वतः खानाला बादशाह औरंगजेबाची प्रतिकृती मानण्यात येत असे. औरंगजेबाची आई मुमताज-उल-जमानीचा हा सख्खा भाऊ होता. शाहिस्तेखान! खान-इ-खानान, अमील-उल-उमराव, नवाब-ए-आझम, मिर्झा, अबू तालिब शाहिस्ताखान. शहाजहान बादशाह असताना आपल्या मुलीकरवी त्याने शास्ताखानाच्या बायकोला ..

अनाकलनीय पवार!

विलास पंढरी9860613872 मुंबई बॉम्बस्फोटांच्या वेळी मुस्लिमबहुल मशीदबंदर परिसरात बॉम्बस्फोट झाल्याचे सांगणे व तसे सामाजिक सलोख्यासाठी केल्याचे समर्थन करणे, सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वावरून पक्ष सोडणे व नंतर जुळवून घेणे, पुलोद आघाडी करून मुख्यमंत्री- मंत्रिपद मिळवणे, फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा देणे, माढा मतदारसंघातून लढायचे जाहीर करून अचानक माघार घेणे आणि आता बारामतीत राष्ट्रवादी हरल्यास लोकांचा मतदानप्रक्रियेवरील विश्वास उडेल असे केलेले वक्तव्य... अशा अनाकलनीय घटनांचे शिल्पकार म्हणजे ..

‘यती’च्या निमित्ताने मोदी व लष्कराला विरोध...

तरुण विजय  भारतीयांच्या आस्था, निष्ठा व श्रद्धास्थानांवर आघात करण्याची एकही संधी, तिरस्कार आणि द्वेषाने अंध झालेली स्वयंघोषित सेक्युलर नाझी मंडळी सोडत नाहीत. भारतीय लष्कराच्या एका तुकडीने हिमालयातील बर्फाच्छादित उंच पर्वतराजींमध्ये यतीची पावले पाहिली आणि त्याविषयी माध्यमांना माहिती दिली. मात्र, ही संधी साधून या स्वयंघोषित सेक्युलॅरिस्टांनी लष्कराची खिल्ली उडविली व या निमित्ताने मोदींवर हल्ला चढविण्याची संधीही या तथाकथित पुरोगामी लोकांनी सोडली नाही. यहुदींची कत्तल केल्यानंतर हिटलरला जसा (विकृत) ..

मराठी पराक्रमाची शर्थ 'पावनखिंड'

शिवदीपस्तंभ डॉ. सुमंत दत्ता टेकाडे9923839490 महाराजांनी सिद्दी जौहरची कशी फजिती केली, ते आपण मागील लेखात पहिले. आता तर राजे फार दूर निघून गेले होते. मसूदने अजून त्वेषाने पाठलाग सुरू केला. राजांची तुकडी आता मठ गजापूरजवळ पोहोचली. अजून फक्त ८ मैल म्हणजे १३ किलोमीटर अंतर उरलेले होते. आता वेगाने निघायचे अन्‌ विशाळगड गाठायचा, एवढेच काम शिल्लक राहिले होते. राजांचे निर्दोष नियोजन सफल झाले होते. मराठ्यांचा उत्साह त्या थकव्यातही ओसंडून वाहत होता. एक अशक्यप्राय गोष्ट त्यांनी जीवावर उदार होऊन ..

निसर्गाक्षरानं केलेल्या नोंदी...

आम्हाला इथे पोहोचून जेमतेम दोन दिवस तर झाले आहेत खरे, पण शाल्मलीसाठी हे दिवस आयुष्यभराचा आनंद घेऊन आल्यासारखे वाटताहेत. आपण चित्रात काढायचो ना तसेच डोंगर, दर्‍या, विद्याचा खूप जुना वाडा, बाजूने वाहणारी नदी... काय नाहीये इथे? निसर्गाचा स्वर्गच आहे हा..

न्याय योजनेतील धोके!

विलास पंढरीसत्तरच्या दशकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ‘न्याय स्कीम’च्या माध्यमातून गरिबी हटावचा नारा दिला आहे. महिन्याला 12 हजार रुपयांहून कमी उत्पन्न असणार्‍या देशातील 20 टक्के गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली होती व नंतर जाहीरनाम्यातही तसा उल्लेख करण्यात आला. या स्कीमबाबत अर्थतज्ज्ञांशी विचारविनिमय केला असून, ..

संरक्षण खर्चवाढीच्या सापळ्यात भारत; मग जीवनमान कसे सुधारणार?

यमाजी मालकर  [email protected] देशाच्या संरक्षणावर सरकारी तिजोरीतील किती रक्कम किंवा किती टक्के निधी खर्च केला पाहिजे, याविषयी जगात कधीच एकमत होऊ शकत नाही. पण हा खर्च किती प्रचंड आहे आणि जग कसे या खर्चाच्या सापळ्यात अडकले आहे, हे यासंबंधीचे जे आकडे बाहेर येतात, त्यावरून म्हणता येईल. विशेषतः ज्या आशियाई आणि आफ्रिकी देशांत सर्वसामान्य नागरिक आपल्या प्राथमिक गरजाही भागवू शकत नाहीत, असेदेशही आपला संरक्षण खर्च कमी करू शकत नाहीत. जागतिकीकरणाच्या लाटेत व्यापाराच्या दृष्टीने सर्व जग एक होते ..

सागरी सुरक्षा मजबूत करण्याची गरज

 राष्ट्ररक्षा •ब्रिगेडियर हेमंत महाजन9096701253 श्रीलंकेमध्ये ‘ईस्टर संडे’ला दहशतवाद्यांनी घडवून आणलेले मृत्यूचे तांडव हे भारताच्याच अगदी जवळ घडले. तीस वर्षे धुमाकूळ घालणार्‍या ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम’सारख्या जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवादी संघटनेचा समूळ निःपात करण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीलंकेमध्ये गेले दशकभर पूर्ण शांतता होती. तामिळी दहशतवादाने पुन्हा डोके वर काढू नये म्हणून प्रसंगी मानवाधिकारांची वगैरे तमा न बाळगता अत्यंत कडक उपाययोजना केली गेली. ..

शिवरायांचे आपात्कालीन व्यवस्थापन!

शिवदीपस्तंभडॉ. सुमंत दत्ता टेकाडे9923839490  शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडामध्ये अडकून पडले होते. दिवसामागून दिवस उलटत होते. सिद्दीचा वेढा ढिला पडण्याची लक्षणे दिसेनात. नेतोजी पालकरांचे प्रयत्नही अपुरे पडत होते. शाहिस्ताखानाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केलेलीच होती. इंग्रजांपासून स्वराज्याचे सारेच अहितिंचतक हर्षातिरेकाने वेडावले होते. त्यांना खात्रीच होती की- शिवाजी आता सिद्दीच्या तडाख्यातून वाचायचा नाही. सारेच स्वराज्य अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर तरंगत होते. महाराजांना एक गोष्ट कळत होती ..

धरा कापते आहे...!

गजानन निमदेव  22 एप्रिल रोजी जगभर वसुंधरा दिवस पाळण्यात आला. गेल्या 45 वर्षांपासून हा दिवस पाळण्यात येतो, साजरा केला जातो. पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठीची पायाभरणी म्हणजे वसुंधरा दिवसाचे आयोजन असते. पर्यावरणसंवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला या आयोजनाने नवसंजीवनी मिळत असते. यंदाही नेहमीप्रमाणेच वसुंधरा दिवस साजरा झाला. ही धरती कशी संकटात सापडली आहे, यावर भाषणं झाली. संकटात सापडलेल्या वसुंधरेला बाहेर काढण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत, यावरही सारासार ..

राष्ट्रवाद प्रज्ञासिंग विरुद्ध दिग्गीराजा

सुधीर पाठक8888397727 भोपाळ या लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने त्यांच्याच पक्षातील वाचाळवीर व कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय गुरू दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली. दिग्गीराजा हे त्यांच्या मुस्लिम अनुनयासाठी तसे कुप्रसिद्ध आहेत. 9/11 ला अमेरिकेतील ट्विन टॉवरवर हल्ला झाला व ते उद्ध्वस्त झालेत. त्या संपूर्ण कटाचा सूत्रधार लादेन होता. या लादेनला पुढे अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे घुसून संपविले. त्या लादेनला ‘लादेन’जी असे आदरार्थी संबोधन वापरणारे संपूर्ण भारतात फक्त ..

शहाणे करुनि सोडावे सकलजन!

अफझलखान वधानंतर महाराजांनी उडविले तुफान आपण मागील लेखात अनुभवले. राजांनी पन्हाळगडासारखा भक्कम गड एका झटक्यात हस्तगत केला. राजांची ही धडक इतकी विलक्षण होती की- आदिलशाहीला धड विचार करायलाही उसंत मिळत नव्हती. रोज दररोज काही न काही जाण्याच्याच बातम्या पोहोचत..

पुन्हा एकदा संघ आणि गांधीजी

सध्या 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या संस्कृती व परंपरेनुसार प्रचाराची भाषणेही देत आहेत. एका पक्षाच्या नेत्याने म्हटले की, या निवडणुकीत जनतेला गांधी िंकवा गोडसे यांच्यात निवड करायची आहे. एक गोष्ट मी पाहिली आहे. जे गांधीजींचे खरे अनुयायी आहेत, ते स्वत:च्या आचरणावर अधिक लक्ष देतात. ते कधी गोडसेचे नावही घेत नाहीत. संघातही गांधीजींची चर्चा तर अनेक वेळा होताना पाहिली आहे; परंतु गोडसेच्या नावाची चर्चा मी कधी ऐकली नाही. परंतु, स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी गांधीजींच्या ..

चौघी जणी

कथानयन आज बरेच दिवसांनी माहेरी जायला निघाली होती कारण काल तिच्या बालमैत्रिणीचा प्रियलचा अचानक फोन आला होता की- सर्व बालमैत्रिणी यावर्षी मंगळागौरी निमित्त माहेरी येणार आहेत. सर्व मैत्रिणीं मिळून धमाल मजा करायची आहे. नयनचे गाव यायला अजून बराच अवकाश होता. परंतु तिचं मनपाखरू कधीच माहेरच्या सुखाच्या अंगणात जाऊन विसावलं होतं. तिच्या डोळ्यासमोर आली प्रियल. ती छान गाणं म्हणायची. स्वातीचा नक्कल करण्यात हात धरणारा कुणी नव्हता. अंकिताला शास्त्रीय नृत्याची फार आवड होती. नृत्य करताना ती आपलं देहभान हरपून जायची. ..

पुरोगामी रामगिरी

 अभिमानस्थळपुरोगामी याचा शब्दश: अर्थ आहे पुढे जाणारी/रा. आज जरी या शब्दावर मळभ दाटलं असलं, तरी काळाच्या पुढे जाऊन विचार करून ते कृतीत उतरवत इतरांकरता नवा आदर्श निर्माण करणारी व्यक्ती पुरोगामी म्हणवली जाते. हे पुरोगामित्व महाराष्ट्राच्या मातीत आहे, यात शंका नाही. इसवीसनपूर्व पहिल्या शतकात जिच्या नावाचं नाणं टांकलं गेलं ती सातवाहन साम्राज्ञी नागणिका याच महाराष्ट्रातली. तिच्यानंतर जवळपास चारशे वर्षांनंतर याच महाराष्ट्राच्या भूमीत एक अशी राजमाता झाली जिची राजमुद्रा या भूमीत 20 वर्षं तळपत होती.  ..

अंतराळात युद्धक्षमता वाढविण्यासाठी...

ब्रिगेडियर हेमंत महाजन/९०९६७०१२५३  मिलिटरी कमांड जरुरी हेरगिरीसाठी वापरल्या जाणार्‍या उपग्रहांमुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. समजा एखाद्या शत्रू राष्ट्राने आपल्या एका उपग्रहाचा नाश केला किंवा असा एखादा उपग्रह सोडला, की त्याच्याकडून लेझर रेज वा काही शस्रे वापरून आपले उपग्रह नाश करण्याचा प्रयत्न केला, तर त्या स्थितीत संरक्षणात्मक पावले उचलणे भाग असते. संभाव्य प्रतिकारासाठी आणि बचावासाठी आपली एक तयारी, क्षमता सिद्ध असावी लागते. आणिबाणीची परिस्थिती उद्भवलीच तर सिद्ध झालेले ..

जगभरच उष्णतेची लाट

 पर्यावरण  - अभय देशपांडे  जागतिक तापमानवाढीचे विविध परिणाम हवामानबदलाच्या स्वरूपात समोर येत आहेत. ठिकठिकाणी येणार्‍या उष्णतेच्या लाटा प्रदूषण कमी करण्याची गरज सातत्यानं व्यक्त करत आहेत. यंदाचं वर्ष 2018 पेक्षाही अधिक तापमानाचं वर्ष आहे. भारतासह जगभरात सर्वत्रच लोक यामुळे त्रस्त झाले आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या वातावरणानुसार पावसाची वाट पहात आहेत. प्रदूषणामुळे होत चाललेली जागतिक तापमानवाढ दर वर्षी अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. यंदा भारतातली परिस्थिती पाहिली ..

गांधी आडनावाचे आणि नोटांच्या गड्‌डीत बांधलेले...

हितेश शंकर/८१७८८१६१२३ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्याधिकारी (ओएसडी) प्रवीण कक्कडसहित अश्विन शर्मा आणि प्रतीक शर्मा यांच्या ठिकाणांवरील आयकर विभागाच्या छाप्यांचा परस्परसंबंध जसजसा उघड होत आहे, त्याने सोनिया, राहुल व प्रियांका, रॉबर्टसारख्या कर्णधारांसमवेत अहमद पटेलसारख्या निकटस्थांची झोप उडाली आहे. गांधी आडनावाच्या आड, देशातील सर्वात ‘वृद्ध पक्षा’ला बळकाविणारे निष्पाप दिसणारे चेहरे, जेव्हा तपास संस्थांच्या कारवाईला राजकीय बदला म्हणून सांगत, भ्रष्टाचार समाप्त करण्याच्या ..

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

 विश्र्वास पाठक/९०११०१४४९० कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अनुक्रमे अमेठी आणि रायबरेली या उत्तरप्रदेशातील लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवारी अर्ज भरले आहेत. कॉंग्रेसने प्रियांका गांधी-वढेरा यांना ‘आयकॉनिक’ चेहरा म्हणून उत्तरप्रदेशात पुढे केले आहे. असे असले तरी अमेठी आणि रायबरेली या कॉंग्रेसच्या परंपरागत मतदारसंघांमधील गांधी घराण्याच्या लोकप्रियतेला आता ओहोटी लागली आहे. प्रियांका गांधी तरुण आहेत, दिसायला सुंदर आहेत, हे खरे असले तरी माजी पंतप्रधान ..

एक तरी लेक असावी

बाळा, आज आमच्या जन्माचं सार्थक झालं असंच म्हणतो मी. तू मुलगी असूनही आमचं नाव उज्ज्वल केलंस.दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर दूरदर्शन आणि वृत्तपत्राच्या पत्रकारांना आत्मविश्वासाने उत्तरे देणार्‍या तुला पहाताना तुझी आ..