मनोरंजन

‘अग्निहोत्र २’ च्या निमित्ताने रश्मी अनपटशी साधलेला खास संवाद

‘अग्निहोत्र २’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री रश्मी अनपट पुनरागमन करतेय. यानिमित्ताने तिच्याशी साधलेला खास संवाद…   ‘अग्निहोत्र २’ मधून तु नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत त्याविषयी...खरंतर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा मी भाग आहे याचा आनंद आहे. या मालिकेत मी अक्षरा ही व्यक्तिरेखा साकारतेय. अतिशय शांत, साधी ,सरळ आणि आपल्या तत्वांशी ठाम असणारी ही मुलगी आहे. अक्षराच्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडलीय ज्याचा संबंध ..

अभिनेत्री नेहा महाजन उत्कृष्ट 'सतार' वादक

अभिनेत्री नेहा महाजनने मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी आणि बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनल..

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचे निधन

  मुंबई,बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आघाडीचे स्थान प्राप्त करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची बहिणी सामा तामसीचे शुक्रवारी कर्करोगाने निधन झाले. ती गेल्या आठ वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र, शुक्रवारी पुण्यात तिने अखेरचा श्वास घेतला. सध्या नवाज त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामुळे अमेरिकेत आहे.   गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवाजने बहिणीसोबतचा एक फोटो समाज माध्यमावर शेअर केला होता. त्याने 13 ऑक्टोबरला टि्‌वटरवरून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ..

मराठीतही प्रदर्शित होणार ‘तान्हाजी’

मुंबई,‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट हिंदीसोबत आता मराठीतही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.   ‘हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का!’ असे दमदार संवाद आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग आमच्या रायबाचे,’ असे म्हणणार्‍या एकनिष्ठ तानाजींची शौर्यगाथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आता मराठीमध्येही पाहायला मिळणार आहे. याबाबत बोलताना अजय देवगण म्हणतो, ..

हनी सिंगच्या गाण्यावर नेहा कक्करचा डान्स

नवी दिल्ली,सिंगर नेहा कक्कर गाण्यांसोबतच तिचा डान्स आणि कॉमेडीसाठीही प्रसिद्ध आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात ती यो यो हनी सिंगच्या गाण्यावर धम्माल करत आहे. नेहा कक्करचा डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहत्यांनीही मोठी गर्दी केली. नेहा कक्कर तिच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण तिचा डान्सही चाहत्यांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. एका चाहत्याने नेहा कक्करचा डान्स इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.   ती स्वतः व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच ..

‘तुम बिन’ची अभिनेत्री सांभाळतेय कोट्यवधींचा व्यवसाय

पहिल्या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या काही अभिनेत्री नंतर मात्र इंडस्ट्रीत फार दिसत नाहीत. अशाच अभिनेत्रींपैकी एक असलेली संदली सिन्हाने ‘तुम बिन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपले सौंदर्य, निखळ हास्य, बोलके डोळे आणि अभिनयाने संदली सिन्हाने केवळ लोकांच्या मनावर राज्यच केले असे नाही तर या चित्रपटामुळे रातोरात तिचे नशीबही चमकले.  निर्माते, दिग्दर्शक अगदी डोळे बंद करून चित्रपटात घेऊ शकतात, अशी अभिनेत्री चित्रपटसृष्टीला मिळाली होती. पण, पहिल्या चित्रपटाने प्रसिद्धीच्य..

अभिनेत्री पूनम पांडेला बलात्काराची धमकी

मुंबई,हैदराबाद आणि उन्नावमधील घटनांनी देश हादरला असतानाच, बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेला बलात्कार आणि ॲसिड हल्ल्याच्या धमकीचे फोन येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पूनमने स्वत: टि्‌वट करून आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या टि्‌वटमध्ये तिने मुंबई पोलिस, मुख्यमंत्री कार्यालय आणि गुगललाही टॅग करून मदत मागितली आहे.   देशातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त होत असतानाच, अभिनेत्री पूनम पांडेने मला बलात्कार ..

बॉलिवुडचा खिलाडी सोडणार कॅनडाचे नागरिकत्व

नवी दिल्ली,बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने सात वर्षांपूर्वी कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले? याचा गौप्यस्फोट अक्षयने दिल्लीतील एका कार्यक्रमात केला. त्याशिवाय, आता पुन्हा भारताचा नागरिक होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. त्यासाठी त्याने भारताच्या पासपोर्टसाठी अर्ज केला आहे.   अक्षय कुमार अनेकवेळा नागरिकत्वाच्या मुद्यावरून टिकेचा धनी झाला आहे. कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारण्याविषयी तो म्हणाला, बॉलिवुडमध्ये माझे सलग 14 चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे आपली कारकीर्द आता धोक्यात ..

'हा' अभिनेता फक्त एका जाहिरातीसाठी घेतो 11 कोटी

मुंबई,आपण बॉलिवूड कलाकरांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या जाहिराती नेहमीच पाहतो. एखादी अभिनेत्री फेअरनेस क्रीमचे प्रमोशन करताना दिसते तर अभिनेता एखाद्या कोल्ड ड्रीकचे प्रमोशन करताना दिसतो. आपण मात्र जाहिरात पाहतो आणि सोडून देतो. परंतु, तुम्हाला माहित आहे, का एका जाहिरातीसाठी किती मानधन घेतात. जर ब्रँड एंडोर्समेंटमधून होणाऱ्या कमाईची यादी बनवली तर यात अभिनेता आमिर खान सर्वात वरच्या स्थानावर असेल.  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एका उत्पादनाचे प्रमोशन करण्यासाठी 11 कोटी रुपयांचे ..

नाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीची लढाई अजून वाढली

मुंबई,बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताचं नाव मीटू चळवळीमुळे सर्वांच्याच लक्षात राहिलं. या चळवळीत तिने नाना पाटेकरांविरोधात तक्रार नोंदवली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणातून पाटेकरांना क्लिनचीट मिळाली. आता पुन्हा एकदा तनुश्री लाइमलाइटमध्ये आली आहे. तनुश्रीने अंधेरीच्या रेल्वे मोबाइल मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयात 'प्रोटेस्ट' (निषेध) याचिका दाखल केली आहे. ही याचिका ओशिवरा पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या ब सारांश अहवाला विरोधात आहे. या अहवालानंतरच नाना पाटेकरांना क्लीनचिट मिळाली होती. अभिनेत्री ..

क्रांती रेडकर करणार कमबॅक!

लग्नानंतर मधल्या काळात संसारात रमलेली अभिनेत्री क्रांती रेडकर मनोरंजन विश्वापासून काहीशी लांब झाली होती. बऱ्याच दिवसांनंतर ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. गप्पा-गोष्टी आणि संगीताचा समावेश असलेल्या अनोख्या 'मैफिल' या टीव्ही रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन ती करणार आहे. क्रांतीने आजवर अनेक पुरस्कार सोहळ्यांसाठी सूत्रसंचालन केले आहे. परंतु, छोट्या पडद्यावर ती पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसेल. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  ..

अभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत

   नायिका किंवा खलनायिकेच्या भूमिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री नेहा जोशी एका वेगळ्या भूमिकेत लवकरच दिसणार आहे. एका आगामी हिंदी मालिकेत ती ही चरित्र भूमिका साकारतेय. ही मालिका म्हणजे, 'एक महानायक : डॉ. बी. आर. आंबेडकर'. या मालिकेत नेहा, भीमाबाई रामजी सकपाळ म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईची भूमिका साकारणार आहे. या निमित्तानं नेहा चरित्र भूमिकेत पाहायला मिळेल. ..

अक्षयसोबत भूमिका साकारणार मानुषी छिल्लर

मुंबई, बॉलिवूडचा खिलाडी आभिनेता अक्षय कुमारचे वेळापत्रक सध्या कमालीचे व्यस्त आहे. आगामी चित्रपट 'गुड न्यूज'मध्ये तो अभिनेत्री करिना कपूर खानसोबत दिसणार आहे. शिवाय 'सूर्यवंशी', 'लक्ष्मीबॉम्ब' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटांनंतर तो 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आहे. या चित्रपटात तो मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सोबत भूमिका साकारणार आहे.  या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चक्क ३५ भव्य सेटची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये ..

फिटनेसमध्ये कतरिनाची स्टार अभिनेत्यांना टक्कर

मुंबई,बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सिनेमांसोबतच तिच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखली जाते. प्रत्येक सिनेमात ती तिचे वेगळेपण जपते. तिचा वेगळा अंदाज नेहमीच पाहायला मिळतो. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेस व्हिडीओची खूप चर्चा आहे. ज्या व्हिडीओमुळे बॉलिवूडचे स्टार कलाकार सुद्धा हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये कतरिना फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्यांनाही टक्कर देताना दिसत आहे.  कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर ..

राज ठाकरेंकडून 'पानिपत'चे कौतुक!

मुंबई,येत्या शुक्रवारी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पानिपत' प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानिपत सिनेमाचे प्रदर्शनापूर्वीच कौतुक केले आहे. पानिपतच्या लढाईकडे कसे पाहायला हवे याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. मऱ्हाठेशाहीच्या शौर्याचा इतिहास म्हणून याकडे पाहावे आणि त्यासाठी पानिपत सिनेमा पाहायला हवा, अशी पोस्ट ठाकरे यांनी केली आहे.   या ट्विटमध्ये राज लिहितात, 'पानिपतची लढाई ही मऱ्हाटेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय ..

तुरुंगात कमावलेल्या पैशांचे काय केले, संजय दत्तने दिले उत्तर

मुंबई,बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपला आगामी चित्रपट पानिपतचे प्रमोशन करत करण्याकरिता 'कपिल शर्मा शो'मध्ये गेला होता. यावेळी त्याने स्ट्रगल, तुरुंगातील दिवस यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. नुकताच या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात संजय तुरुंगात कमावलेल्या पैशांचे काय केले, याबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसतो आहे.   शोमध्ये कपिलने संजयला प्रश्न विचारला की, तुरुंगात रेडिओवर प्रोग्राम सुरू केला आणि फर्नीचरही तयार केले. एवढे नाही तर कागदाचे लिफाफेही तू तयार करायचा. या सर्व गोष्टी ..

ईशान खट्टर आणि तब्बू 'या' वेबसिरीजमध्ये दिसणार एकत्र

मीरा नायरची वेब सीरिज 'ए सुटेबल बॉय'चा फर्स्ट लूक समोर आला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ईशान खट्टर आणि तब्बू अशी स्टारकास्ट असलेल्या या सीरिजचा हा फर्स्ट लूक ईशानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  यामध्ये त्याने आपल्यापेक्षा खूप वर्षांनी मोठ्या असलेल्या तब्बूसोबत काम केले आहे. या सीरिजमध्ये त्यांची काही रोमँटिक दृश्यंदेखील आहेत. त्यामुळे ईशान आणि तब्बू यांची वेगळी जोडी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय...

फरहान- शिबानीने घेतली एकत्र 'क्रायोथेरपी'

मुंबई,अभिनेता फरहान खान आणि शिबानी दांडेकर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सगळ्यांना माहीत आहे. बॉलिवूड पार्टी असो किंवा कार्यक्रम, सगळीकडे दोघे जोडीने हजेरी लावतात. हे लव्हबर्ड सोशल मीडियावरदेखील तितकेच सक्रिय असून आपल्या चाहत्यांना नेहमी कपल गोल देत असतात. मात्र यावेळी हे लव्हबर्ड एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. नुकतच या दोघांनी सोशल मीडियावर '०क्रायोथेरपी'  घेत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. फरहानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. 'क्रायोथेरपी... ..

राणी मुखर्जी झळकणार पत्रकाराच्या भूमिकेत

मुंबई,सध्या समाजात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी राणी मुखर्जी पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. राणी तिच्या आगामी 'मर्दानी २' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारा भोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे आणि त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे.  याच संबंधित आपले मत परखडपणे मांडण्यासाठी ती वृत्तवाहिनीवर निवदीकेच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा राणी समाजात जागृतता ..

'जयेशभाई जोरदार' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई,प्रत्येक चित्रपटात आपल्या हटके भूमिकेने प्रेक्षकांना थक्क करणारा अभिनेता रणवीर सिंग आता आणखी एका दमदार भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. एकिकडे खेळाडू म्हणून क्रिकेटच्या मैदानावर एका चित्रपटासाठी घाम गाळणारा रणवीर, दुसरीकडे 'जयेशभाई जोरदार'चे पात्रही साकारत आहे.   यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच त्याने या चित्रपटाविषयीची माहिती दिली होती. दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्मा करत आहेत. तर, आदित्य चोप्रा यांच्या बँनरअंतर्गत हा चित्रपट साकारला जात आहे. ..

‘राधे’च्या चित्रीकरणादरम्यान रणवीर हुड्डा जखमी

चौकटी बाहेरील भूमिका साकारुन अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. रणदीप लवकरच सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. चित्रपटातील एका अॅक्शन सीनदरम्यान रणदीप जखमी झाल्याचे समोर आले आहे.   दोन दिवसांपूर्वी एका अॅक्शन सीनदरम्यान रणदीपला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ..

'तानाजी'चं पहिलं गाणं प्रदर्शित

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा मल्टीस्टारर तानाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं. शंकरा रे शंकरा हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित होताच अवघ्या काही वेळात ट्रेण्डही करू लागलं. सोमवारी याच गाण्याचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं होतं. गाण्यात अजय देवगण आणि सैफ अली खान या दोघांचा पावरफुल लुक दिसून येतो. टीझरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार अजयच्या दमदार संवादाने गाण्याची सुरुवात होतं.  गाण्यात अजय, सैफच्यासमोर नाचताना दिसत आहे. या गाण्याआधी १९ नोव्हेंबरला सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित ..

'दबंग ३' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

कोल्हापूर,सलमान खानचा बहुप्रतिक्षित दबंग ३ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'हुड हुड दबंग' या गाण्यामुळे हा वाद सुरू झाला. हिंदू जनजागृती समितीने या गाण्यावर आक्षेप घेतला असून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. काही दिवसांपूर्वी #BoycottDabangg3 हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेण्ड करत होता.   'हुड हुड दबंग' या गाण्यात साधू- संतांना नाचताना ..

महेश कोठारेंच्या सुनेचा मेकओव्हर

अभिनय आणि नृत्यात पारंगच असलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री व महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारेने  मेकओव्हर केला आहे. मेकओव्हर नंतर केलेल्या फोटोशूटमधला एक फोटो तिने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये उर्मिलाला ओळखणेही कठीण होत आहे. उर्मिलाचा हा मेकओव्हर नेटकऱ्यांसोबतच अभिनेत्रींनाही खूप आवडला आहे.  ‘स्त्रीकडे असलेली सर्वात मोहक संपत्ती म्हणजे आत्मविश्वास’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. या कॅप्शनप्रमाणेच तिच्या चेहऱ्यावरचा ..

आयुषमान गाठतोय यशाची पायरी !

आयुषमान खुराना दिवसेंदिवस यशाची एक एक पायरी चढतो आहे. आयुषमानच्या 'विकी डोनर', 'अंधाधून', 'बधाई हो', 'बाला', 'बरेली की बर्फी', 'आर्टिकल १५', 'ड्रिम गर्ल' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवले आहे. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या जाहिरातींमध्ये वाढ झाली आहे.   २०१८ मध्ये आयुषमान पाच उत्पादनांची जाहिरात करत होता. या वर्षात त्याच्याकडे वीस जाहिराती आहेत. यात मोबाइल फोन कंपनी, कपडे, महागडी घड्याळं, आयवेअर अशा नामांकित ब्रँडसचा समावेश आहे. त्यामुळे आयुषमानचा भाव सध्या चांगलाच वधारल्याचे दिसून ..

किशोरी शहाणे झळकणार वेब सीरिजमध्ये

मुंबई, मराठी बिग बॉसमध्ये चमकल्यानंतर एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे आता वेब दुनियेकडे वळल्या आहेत. 'चार्जशीट' ही नवी हिंदी वेब सीरिज त्या करत आहेत.  ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या एका बॅटमिंटनपटूच्या हत्या प्रकरणावर आधारित अशी ही कथा आहे. किशोरी यात गायत्री दीक्षित नावाची एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या भूमिकेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच काहीशी ग्रे शेड असलेली ही भूमिका त्या साकारत आहेत...

पिंजरा मालिकेतील अभिनेत्रीला अटक

‘पिंजरा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये झळकलेली अभिनेत्री सारा श्रवणला अटक करण्यात अली आहे. एका नवोदित अभिनेत्याला धमकी देऊन खंडणी उकल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी श्रवणला अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी तिला शिवाजी नगर न्यायालयामध्ये हजर केले. त्यानंतर न्यायालयाने तिची जामीनावर सुटका केल्याचे वृत्त आहे.  साराने ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात कटकारस्थान करुन विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती. तसेच ही तक्रार मागे घेण्यासाठी ..

डिंपल कपाडियाच्या आईचे निधन

मुंबई,चित्रपट सृष्टीतील जुन्या काळजी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेट्टी कपाडिया यांचे शनिवारी निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून बेट्टी कपाडिया आजारी होत्या. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने  हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.    बेट्टी कपाडिया यांचा विवाह गुजराती व्यापारी चुन्नीभाई कपाडिया यांच्याशी झाला होता. त्यांना डिंपल, सिंपल, रीम आणि मुन्ना अशी चार अपत्ये होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कुटुंबीयांसमवेत लोणावळा ..

'दुर्गावती' सिनेमात भूमी पेडणेकर 'हिरो'

मुंबई,अभिनेता अक्षय कुमारची गाडी सध्या फॉर्मात आहे. केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल्ल अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांनतर तो आणखी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयनं 'दुर्गावती' या नव्या सिनेमाची घोषणा केली असून इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टरही त्यानं लाँच केलं आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अक्षय कुमारनं चित्रपटाचं हटके पोस्टर लाँच केलं आहे. या फोटोत अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक हातात पाटी घेऊन उभे आहेत.   विशेष म्हणजे, ..

नेहा पेंडसे अडकणार विवाहबंधनात

मुंबई,प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नेहा तिचा प्रियकर शार्दुल सिंहसोबत पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये लग्न करणार आहे. बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत नेहाने तिच्या लग्नाची तारीख सांगितली. येत्या ५ जानेवारीला नेहा आणि शार्दुल लग्न करणार आहेत.  पुण्यात अगदी जवळच्या मित्र- परिवारामध्येच नेहा आणि शार्दुल लग्न करणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. याआधी दिलेल्या मुलाखतीत नेहाने स्पष्ट सांगितलं होतं की लग्नातल्या महत्त्वपूर्ण विधींवेळी साडी नेसण्याला प्राधान्य ..

'मर्दानी'साठी राणीने घेतले स्विमिंगचे धडे

मुंबई,सध्या 'मर्दानी २' ये चित्रपटामुळे अभिनेत्री राणी मुखर्जी चर्चेत आहे. तिने चित्रपटासाठी अनेक साहसी दृश्ये केली आहेत. पण, मर्दानी २ मधील एका साहसी दृश्यामुळे राणीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'मर्दानी-२'साठी तिला एक पाण्याखालचे दृश्य करायचे होते. या प्रसंगाशिवाय चित्रपट पूर्ण होणारच नव्हता. पण, राणीला असलेल्या पाण्याच्या भीतीमुळे ती हे दृश्य चित्रीत करण्यासाठी तयारच होत नव्हती. दिग्दर्शकांनी समजवल्यानंतर तिने भीतीवर मात करत हे चित्रीकरण पूर्ण केले.  'मर्दानी-२' ..

जेठालालसाठी परत येणार दयाबेन!

मुंबई, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सप्टेंबर २०१७ पासून या मालिकेपासून दूर आहे. मॅटर्निटी लीववर गेल्यानंतर काही महिन्यांनी मालिकेत पुन्हा यायला नकार दिला. आतापर्यंत अनेकदा दिशा मालिकेत परतणार असल्याची बातमी समोर आली. पण, त्यात तथ्य नसल्याचे तिने वेळोवेळी स्पष्ट केले. आता पुन्हा एकदा दिशा मालिकेत परत येण्याची चर्चा सुरू झाली आहे.  असे म्हटले जाते की, दिशा एका भागासाठी मालिकेत परत येऊ शकते. या भागात दयाबेन पती जेठालालसोबत ..

अमिषा पटेलवर फसवणूकीचा आरोप

मुंबई, बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात इंदोरमधील न्यायालयात १० लाख रुपयांचा चेक बाउन्स झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुराव्यांच्या आधारे कोर्टाने अमीषा पटेल विरोधात नोटीस बजावली असून २७ जानेवारी रोजी तिला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. इंदूर येथील एका युवतीकडून सिनेप्रोडक्शनच्या नावाखाली तब्बल १० लाख रुपये घेतले होते. यानंतर अमिषाने तिला परत १० लाख रुपयाचा चेक दिला जो बाउन्स झाला.  चेक बाउन्स झाल्यावर त्या युवतीने अनेकदा अमिषाकडे पैसे मागितले, पण अमिषाने ..

सलमानला ‘लवयात्री’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. हे प्रकरण त्याची निर्मिती असणाऱ्या ‘लवयात्री’ चित्रपटाशी संबंधित आहे. ‘लवयात्री’ या चित्रपटाविरोधात गेले वर्षभर कोर्टात खटला सुरु होता. सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना या चित्रपटाचे नाव, यातील गाणी व दृश्य यासंबंधी आता कोणालाही एफआयआर नोंदवता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच सलमान खानविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असेही न्यायालयाने सांगितले आहे. चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या ..

रेड चित्रपटातील अभिनेत्रीचे निधन

मुंबई,अभिनेत्री पुष्पा जोशी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांनी अभिनेता अजय देवगणच्या रेड चित्रपटात काम केले आहे. यात त्यांनी अभिनेता सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून भरघोस कौतुक करण्यात आले होते.   त्यांनी फेवीक्विकच्या जाहिरातीही काम केले होते. या जाहिरातीनंतर त्या स्वॅग वाली दादी म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी पुष्पा त्यांच्या घरात पाय घसरून पडल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर त्यांना ..

नसीरुद्दीन शाह यांचा तन्वीर पुरस्काराने सन्मान

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना रुपवेध प्रतिष्ठानचा २०१९ चा तन्वीर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रुपवेध प्रतिष्ठानच्या कार्यवाह दिपा लागू यांनी याबाबत माहिती दिली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषेदत त्या बोलत होत्या.  गेल्या पंधरा वर्षापासून रुपवेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिने सृष्टीतील कलावंताना तन्वीर सन्मान आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदाचा २०१९ चा तन्वीर सन्मान जेष्ठ अभिनेते ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, तर तन्वीर नाट्यधर्मी ..

मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यातील ‘रुसवा फुगवा’

  प्रेमाला वयाचे बंधन नसते आणि हे अगदी खरे आहे. याचाच प्रत्यय ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटातील ‘रुसवा फुगवा’ हे रोमँटिक गाणे पाहताना येतो. प्रेम फक्त तरुण तरुणींमध्येच असते, असा अनेकांचा गैरसमज असून हाच गैरसमज ‘रुसवा फुगवा’ गाण्यातून बदलणार आहे. मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यातून त्यांच्यातील प्रेम, एकमेकांविषयी असलेली ओढ सहज जाणवते. आपल्या रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी मोहन जोशी यांचे सुरु असलेले प्रयत्न आणि त्यांच्यातील गोड, ..

दीपिकाने उघडले आलियाच्या लग्नाचे गुपित

मुंबई, रणबीर कपूर-आलिया भट लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हे खरं आहे की खोटं हे त्यांनाच ठाऊक. मात्र, खुद्द दीपिकाने हे गुपित आता उघड केले आहे. एका कार्यक्रमाला दीपिका पदुकोण आणि आलिया एकत्र आल्या होत्या. त्यावेळी आलिया देखील लवकरच लग्न करणार आहे' असे दीपिका बोलून गेली. त्यामुळे आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे.  काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा उपस्थित होते. ..

सुपरस्टारची क्रेझ चाहत्यांचा अनोखा पराक्रम

हैदराबाद,दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू म्हणजे रेकॉर्ड ब्रेक करण्याची मशिनच आहे. तो आपल्या प्रत्येक सिनेमातून आधीचे स्वतःचे रेकॉर्ड ब्रेक करत जातो. त्याचा आगामी 'सरिलरू नीकेवरू' हा सिनेमा प्रदर्शित व्हायला ५० दिवस शिल्लक असताना त्याच्या नावावर अजून एका रेकॉर्डची नोंद झाली. सुपरस्टार महेश बाबूचा तब्बल ८१ फुटांचा कटआउट उभा करण्यात आला.   सुदर्शन ३५एमएम सिनेमागृहात या हटके अभिनेत्याचा ८१ फुटांचा कटआउट उभा करण्यात आला. असं म्हटलं जातं की, हैदराबादमधील आरटीसी क्रॉसरोड येथील ..

देवदत्त नागे बनला 'देवगण' नागे

मुंबई,'जय मल्हार' मालिकेमुळं प्रचंड लोकप्रियता मिळवलेला अभिनेता देवदत्त नागे आता 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेच्या निमित्तानं सुपरस्टार अजय देवगणसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. या चित्रपटात अनेख मराठी चेहरे दिसणार असून चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचे अनेक किस्से त्यांनी शेअर केले आहेत. असाच एक किस्सा देवदत्तनं शेअर केला असून चित्रपटाच्या सेटवर त्याला 'देवगण नागे' असं नाव पडलं होतं, याचा मजेशिर किस्सा त्यानं शेअर केलाय.अजय देवगण या ..

या सुपरस्टारने घेतलं चक्क १५ कोटींचं घर

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडाने नुकतंच एक आलिशान घर घेतलं. विजयने कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. अर्जुन रेड्डी, गीत गोविंदम, टॅक्सीवाला यांसारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर आता त्याने नवीन घरंही घेतलं. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणीत झाला असेल यात काही शंका नाही. सिनेमांमध्ये सतत मिळणाऱ्या यशानंतर आता त्याने १५ कोटींचं घर घेतलं आहे. विजयने हैदराबाद येथील जुबली हिल्स येथे एक भव्य घर विकत घेतलं. रिपोर्टनुसार विजयने जवळच्या कुटुंबियांसोबत गृहप्रवेश केला.  ..

सुबोध पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व ठिकाणी वावर असलेला अभिनेता सुबोध भावे लवकरच एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘तुला पाहते रे’ ही त्याची मालिका प्रचंड गाजली होती. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. यानंतर सुबोध छोट्या पडद्यावर कधी येणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपली असून सुबोध लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात झळकणार आहे.  महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा ..

कंगनाच्या चेहऱ्यावर किलोभर मेकअप

    अभिनेत्री आणि दाक्षिणात्य दिवंगत ज्येष्ठ नेत्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' हा चित्रपट लवकरच येतोय. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेत्री कंगना रनौट यामध्ये मुख्य भूमिकेत झळकतेय. नेहमी आव्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या कंगनाच्या 'थलायवी' रुपाबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. पण, टिझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची जितकी प्रशंसा झाली त्यापेक्षा त्यावर टीका जास्त झाली. 'चेहऱ्यावर एक किलोचा मेकअप लावल्याप्रमाणे ती दिसतेय. तिचं हे बनावट रुप बिलकूल आवडलं नाही' ..

साऊंड एडिटरच्या निधनानं अक्षय भावूक

मुंबई,बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये साऊंड एडिटर म्हणून काम पाहिलेल्या निमिष पिळणकरचं उच्च रक्तदाबानं ब्रेन हॅमरेज होऊन निधन झालं. निमिषच्या निधनानंर अभिनेता अक्षय कुमार यानं ट्विट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. 'निमिष पिळणकरच्या निधनाची बातमी समजली. अतिशय कमी वयात निमिषचं निधन झालं, ही मनाला चटका लावून टाकणारी बाब आहे. त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे' असं अक्षयनं म्हटलं आहे.निमिष अवघ्या २९ वर्षांचा होता. निमिषनं सलमान खानच्या 'रेस-३' या चित्रपटात पहिल्यांदा साऊंड एडिटर म्हणून ..

शिव आणि वीणाचा टिक टॉक व्हिडिओ व्हायरल

मुंबई,बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात ज्या जोडीची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विजेता ठरलेला शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप. शिव आणि विना यांनी बिग बॉसच्या घरात एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळं त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. त्यांच्यातलं हे प्रेम केवळ बिग बॉसच्या घरापुरतं आहे की, भविष्यातही ते एकत्र राहणार आहेत का? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात येत होते. परंतू या सर्व प्रश्नांना शिव आणि वीणा यांनी उत्तर दिलं आहे. बिग बॉसचा शो संपून दोन महिने उलटून गेले असले ..

शाहरुखच्या 'बॉब बिस्वास'मध्ये अभिषेक बच्चन

मुंबई,मोठा ब्रेक घेतल्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन एका भन्नाट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अभिषेक आणि शाहरुख खान एकत्र आले आहेत. दोघांची जोडी प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर झळकणार नसली तरी नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'बॉब बिस्वास' या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'नोमोशकर, एक मिनट'... हे ऐकल्यानंतर आजही एक चेहरा समोर येतो. तो म्हणजे २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहानी' चित्रपटातील 'बॉब बिस्वास' याचा. सुजॉय घोषचा 'कहानी' हा चित्रपट ..

गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांना न्यायालयाने ठोठावला दंड

उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील ग्राहक न्यायालयाने प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांना वेदनाक्षमक तेलाच्या खोट्या जाहिरातीसाठी २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हे तेल तयार करणाऱ्या कंपनीलाही दंड ठोठावण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तिने हर्बल तेल उत्पादक कंपनी आणि त्या तेलाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर गोविंदा व जॅकी यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. या खटल्यावर निर्णय देताना न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला आहे.   नेमकं प्रकरण काय होतं?२०१२ साली अभिनव अग्रवाल ..

राणीने केला रणवीरचा लूक कॉपी

मुंबई, रणवीर सिंह आपला लूक आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा तो इव्हेंट्ससाठी अतरंगी आउटफिट्स ट्राय करताना दिसतो. त्यामुळे अनेकदा तो ट्रोलही होतो आणि आउटफिट्सच्या चर्चाही होताना दिसतात. पण याचबरोबर रणवीर अनेकांचा फॅशन आयकॉनही आहे. आता अभिनेत्री राणी मुखर्जी रणवीर सिंहला कॉपी करताना दिसत आहे. सोशल मीडियावर रणवीर सिंह आणि रानी मुखर्जीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच या दोघांच्या आउटफिट्सवरून चर्चाही होत आहेत.  व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रणवीर आणि राणी एकसारख्याच ..

कंगनाकडून राम मंदिरावरील 'अपराजित अयोध्या' चित्रपटाची घोषणा

मुंबई,बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कंगनाचा हा चित्रपट अयोध्येतील राम मंदिरावर आधारीत आहे. 'अपराजित अयोध्या' असे या चित्रपटाचे नाव असून कंगना स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. राम मंदिर हा विषय देशातील संवेदनशील समजला जातो. नुकताच राम मंदिराच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.   या चित्रपटाची स्क्रिप्ट केवी विजेंद्र प्रसाद लिहित आहे. याअगोदर प्रसाद यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीची स्क्रिप्ट लिहिली आहे. हा चित्रपट पुढील ..

आशुतोष गोवारीकर यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिसांची फौज तैनात

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा 'पानिपत- द ग्रेट बेट्रेयल' हा ऐतिहासिक चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्याला मराठा साम्राज्याचा इतिहास आणि पानिपतच्या युद्धाची कथा पाहायला मिळणार आहे. परंतु, सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  गेल्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ..

'काहे दिया परदेस' फेम सायली संजीव झळकणार चित्रपटात

सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी... पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य... आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रूपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशीओ फिल्म्सची निर्मिती असलेला आणि शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  सायलीने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील तिची भूमिका अतिशय वेगळी आहे. या ..

चंदा कोचर यांच्या ‘बायोपिक’च्या प्रदर्शनावर बंदी!

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली हायकोर्टाने शनिवारी बंदी घातली. चंदा कोचर यांचे वकील विजय अग्रवाल आणि नमन जोशी यांनी संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादण्याची मागणी केली होती. हा चित्रपट चंदा कोचर यांचा बायोपिक आहे. चित्रपटाची कथा चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित आहे, असा दावा या वकीलांनी आपल्या याचिकेत केला होता.  'Chanda : A Signature that Ruined a Career' असे या चित्रपटाचे नाव आहे. अद्याप सीबीआय ..

राजकारणावर संतापले शरद पोंक्षे

शनिवारी महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. भाजप नेते देवेन्द्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या भूकंपानंतर राजकारणात एकच खळबळ माजली. या संपूर्ण राजकीय सद्यस्थितीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘थर्डक्लास राजकारण’ अशी धक्कादायक प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. फेसबुकवर ‘थर्डक्लास राजकारण’ असे लिहित त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.   एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी ..

मॉड लूकमध्ये होणार मधुवंतीची एन्ट्री

'भागो मोहन प्यारे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. मधुवंती नावाचं संकट मोहनच्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे तो थोडा सुखावला आहे. काही दिवस मालिकेपासून लांब असलेली मधुवंती म्हणजेच अभिनेत्री सरीता मेहंदळे नव्या रुपात मालिकेत दिसणार आहे. कारण लवकरच मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. येत्या काही दिवसात मधुवंती फोटो दिसत असल्याप्रमाणे मॉडर्न रूपात पाहायला मिळणार आहे.   ..

बॉक्स ऑफिसवर ‘बाला’चा बोलबाला

चित्रपट दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री’ सारखा भन्नाट विनोदी भयपट दिल्यानंतर ‘बाला’ हा अचूक मांडणी करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा कथाविषय असलेला ‘बाला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच हा चित्रपट तिकीटबारीबर चांगली कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला ..

‘थलाइवी’चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलाइवी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेत्री कंगना रणौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने हा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा जाहीर केली आहे. २६ जून २०२० रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   चित्रपटातील जयललिता यांच्या रुपातील कंगनाचा लूक थक्क करणारा आहे. हा बायोपिक तामिळ, ..

शबाना आजमींच्या आईचे निधन

मुंबई,सिने अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मातोश्री आणि प्रसिद्ध ऊर्दू शायर कैफी आझमी यांच्या पत्नी शौकत कैफी यांचं आज संध्याकाळी जुहू येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या ९१ वर्षाच्या होत्या. शबाना आझमी यांच्या कुशीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शौकत कैफी या जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 'उमराव जान', 'बाजार' आणि 'हीर रांझा' सारख्या गाजलेल्या सिनेमातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या होत्या.शौकत कैफी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वयोमानामुळे त्या उपचाराला प्रतिसादही ..

'ही' अभिनेत्री 'तारक मेहता'मधून बाहेर

मुंबई, गेल्या दशकभरापासून प्रत्येक घरात पाहिली जाणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका लोकांचे मनोरंजन करीत आहे. छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळे ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल क्रमांकावर आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील कलाकार काही कारणास्तव बाहेर पडत आहेत. सर्वप्रथम टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीने हा कार्यक्रम सोडला. त्यानंतर नीधी भानुशाली या मालिकेतून बाहेर पडली. 'दयाबेन' ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी आता मालिकेत दिसत नाही. ..

'विक्की वेलिंगकर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'विक्की वेलिंगकर' या चित्रपटात 'मास्क मॅन'चे भीतीदायक कारनामे आहेत. चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी यांच्यासोबत संग्राम समेळ हा प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले आहे. कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. 'विक्की वेलिंगकर' हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.  ..

'या' अटींवरच सुशांत स्वीकारतोय चित्रपट

वेब दुनियेची वाढती क्रेझ लक्षात घेऊन, अनेक सिनेनिर्माते आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू लागले आहेत. पण, सर्वच कलाकारांना ते आवडतं असं नाही. म्हणूनच अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी सिनेमे स्वीकारताना निर्मात्यांना एक अटच घालू लागला आहे. ‘आपला चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करू’ असं पत्रच तो निर्मात्यांकडून लेखी स्वरुपात घेतो. सिनेमाच्या करारातदेखील ही बाब ठळकपणे नमूद करण्याची मागणी सुशांतनं केली आहे.   ..

अभिनेता अर्जुन रामपालचा २१ वर्षांचा संसार मोडला

मुंबई,अभिनेता अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर जेसिया यांच्या घटस्फोटाची चर्चा अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. तब्बल २१ वर्षांच्या संसारानंतरअर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. बांद्रा येथील कोर्टात दोघांच्या सहमतीने घटस्फोटासाठी मंजुरी देण्यात आली. १९९८ साली अर्जुन रामपाल आणि पत्नि मेहर जेसिया विवाह बंधनात अडकले होते. या दोघांना माहिका आणि मायरा नावाच्या दोन मुलीसुध्दा आहेत. २०११ मध्येच अर्जुन आणि मेहेर घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर या दोघांनी ..

अमेय वाघची नवी वेब सीरिज ‘ब्रोचारा’ येतेय

मुंबई,टीव्ही-सिनेमात चमकल्यानंतर अभिनेता अमेय वाघ वेब दुनियेतही चांगलंच नाव कमावतोय. विविध वेब सीरिजमधल्या अमेयच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. अमेयचं नवीन काय? असा प्रश्न पडणाऱ्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. लवकरच तो 'ब्रोचारा' या नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चार अभिनेते यामध्ये मुख्य भूमिकेत असून, त्यातला एक अमेय आहे. 'लिटील थिंग्ज'फेम ध्रुव सेहगलसोबत अमेय यात स्क्रीन शेअर करणार असल्याचं कळतंय.  बहुचर्चित 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमधून अमेय ..

भल्लालदेवच्या वडिलांच्या घरावर छापे

नवी दिल्ली,बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवची भूमिका साकारणार्‍या राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू यांच्या घर आणि स्टुडिओसह अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत.   दग्गुबाती सुरेश बाबू यांचा हैदराबादमध्ये रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. ते टॉलिवूडचे मोठे निर्माते म्हणून ओळखले जातात. आयकर विभागाने हैदराबादच्या त्यांच्या निवासस्थानीही छापा मारल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू होती. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी महत्वाची कागदपत्रेही तपासली. ..

'धुरळा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई, महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू असतानाच ट्विटरवर काही मराठी कलाकारांनी सुरू केलेला #पुन्हानिवडणूक? या हॅशटॅगमुळे चांगलाच वादंग निर्माण झाला. या पोस्ट राजकीय नसून आगामी 'धुरळा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होत्या असे कलाकारांनी स्पष्ट केले आहे. याच 'धुरळा' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.  हव्वा कुनाची रं? ... हव्वा आपलीच रं! असे म्हणत दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या 'धुरळा' चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच गाजतो ..

सुष्मिता सेन दर आठ तासांनी घ्यायची स्टेरॉइड

मुंबई,बॉलिवूडमधील तंदुरुस्तीसाठी मेहनत घेणार्‍यांमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनचाही समावेश आहे. मनाला आनंद देईल असे आयुष्य जगण्यासाठी सुष्मिता ओळखली जाते. परंतु, तिच्या आयुष्यात एकवेळ अशी आली होती, जेव्हा मरणाच्या दारातून परत आली आहे.   सुष्मिताने याबद्दल एका मुलाखतीत सांगितले की, 2014 मध्ये ’निरबाक’ या बंगाली चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ती खूप आजारी पडली होती. तिला नेमके काय झाले हे डॉक्टरांनाही नेमके कळू शकले नाही. एके दिवशी तर ती अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तातडीने ..

मृणाल कुलकर्णी परीक्षकाच्या भूमिकेत

आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका कोणत्याही टीव्ही मालिकेमधली किंवा सिनेमामधली नाही. ही भूमिका एका परीक्षकाची आहे. संगीतविषयक एका आगामी रिअॅलिटी शोमध्ये राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदे यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या नव्या शोबद्दल प्रेक्षकांनाही उत्सुकता असेल.   ..

शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा; शरद केळकरचा व्हिडिओ व्हायरल

शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात मावळ्यांचे अनन्यसाधरण महत्व आहे, हे आपण जाणतोच. चित्रपटात नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अजय देवगण साकारणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी चित्रपटातील ..

'इफ्फी'त मराठी सिनेमांचा षटकार

देश-विदेशातील कलाकारांबरोबरच परदेशातील फिल्ममेकर्सना ज्या भारतीय सिनेमहोत्सवाची आतुरता असते तो ‘इफ्फी’ (दि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) चित्रपट महोत्सव लवकरच गोव्यात सुरू होतोय. या सिनेमहोत्सवाच्या यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी सिनेमांनी जोरदार षटकार ठोकला आहे. यातील ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात यंदा सहा मराठी सिनेमे झळकणार आहेत. त्यामुळे मराठी सिनेमा सातासमुद्रापार पोहोचण्यास मदत होणार आहे.  यंदा ‘इफ्फी’चे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे&nbs..

सायनाच्या बायोपिकमध्ये मानव कौल साकारणार महत्वाची भूमिका

मुंबई, भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या बायोपिकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार असून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंदची महत्वाची भूमिका अभिनेता मानव कौल साकारणार आहे.   परिणीतीच्या आधी अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाच्या जीवनपटात झळकणार होती. मात्र, तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटातून आपला पाय बाहेर काढला आहे. तिच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली. त्यानंतर चित्रपटातील ..

'तानाजी : द अनसंग वॉरियर'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई, 'हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का!' अशा दमदार डायलॉगसह 'तानाजी : द  अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असे म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींच्या शौर्याची गाथा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे.   पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. या कोंढाण्यावर पुन्हा भगवा फडकवण्याचे स्वप्न शिवरायांसह स्वराज्यातील प्रत्येकाने पाहिले आणि शिवरायांचा ..