विदर्भ

हेल्पलाईनवर स्वतःहून माहिती दिलेल्या चौघांना कोरोना

- लवकर निदान होवून उपचार सुरु झाल्याने प्रकृती स्थिर   वाशीम,कोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान होवून उपचार सुरु झाल्यास रुग्ण बरे होण्याची शक्यता अधिक आहे. याउलट परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यास डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याने अशा बाधित व्यक्तींचा मृत्यूही होवू शकतो. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच स्वतःहून पुढे येवून माहिती देण्याचे, आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले होते. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा प्रशासना

पुढे वाचा

भामरागडमधील गर्भवती महिलेच्या मृत्यू संदर्भात तक्रार दाखल

- पाथ फाउंडेशनचा पुढाकारचामोर्शी,गेल्या काही दिवसात भामरागड तालुक्यात संतप्त करणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. तुरेमर्का गावातील नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला रस्ते व आरोग्य सेवे अभावी तब्बल २३ किमी जंगलातून व नदीनाल्यांना ओलांडून दवाखान्यात दाखल व्हावे लागले. तर दुसरीकडे गुंडेनूर गावातील चार महिन्याच्या गरोदर महिलेला सुद्धा रस्ते व आरोग्य सेवे अभावी तब्बल ७ किमी खाटेवरून जंगलातून व पामुलगौतम नदी ओलांडून लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्राप्त सुविधा उपलब्ध नसल्याने तिला भामर

पुढे वाचा

वनजमिनीच्या अतिक्रमणाची तपासणी करूनच कारवाई करा

-विजय वडेट्टीवार यांचे निर्देशतभा वृत्तसेवाचंद्रपूर, वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना देण्यात आलेल्या जमिनीच्या पट्ट्याची आधी तपासणी करून नंतरच अतिक्रमण हटविण्याबाबतची कार्यवाही अपेक्षित आहे. त्यामुळे प्रथम तपासणी करून नंतर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.सध्या वनविभागामार्फत अतिक्रमण करणार्‍यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. या संदर्भात काही प्रकरणे पोलिसातदेखील दाखल

पुढे वाचा

बाधित एका रुग्णाचा मृत्यू ; आठ नव्या रुग्णांची भर

- सात रुग्णांची कोरोनावर मातगोंदिया,तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड हेल्थ सेन्टर येथे गंभीर अवस्थेत दाखल 40 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला.जिल्ह्यात आज नव्याने आठ कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले आहे तर सात रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे. जिल्ह्यात रोजगाराच्या निमित्ताने आखाती देशात गेलेले जिल्ह्यातील व्यक्ती स्वगृही परतत आहे.ह्याच व्यक्तींमध्ये बधितांचे प्रमाण जास्त आहे.कतार या देशातून जिल्ह्यात परतलेल्या चार व्यक्तींसह जिल्ह्यातील अन्य चार व्यक्ती अशा एकुण आठ व्यकतींचे

पुढे वाचा

डोनगाव मध्ये किराणा दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह

डोनगाव,  येथे आज एक किराणा दुकानदार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर व्यक्ती अकोल्याहून आलेला असता डोणगाव मध्ये येउन लक्षने आढळुन आल्यानंतर खाजगी दवाखान्यात गेला व त्यानंतर दुसरबीड येथे गेला होता तेथुन स्वतःमध्ये लक्षणांची वाढ झाल्याने सिंदखेडराजाला खाजगी रुग्णालयांमध्ये गेला असता तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे रुग्णास कोवीड सेंटर देउळगाव राजा येथे हलविले व तेथुन बुलढाणा येथे सदर व्यक्तीच्या रॅपिड टेस्ट निगेटिव्ह ल्यानंतर होम कॉरंटाइन राहण्यास सा

पुढे वाचा