उपाश्या पोटी काय खावे?

पौष्टिक ब्रेकफास्ट

रिकाम्या पोटी मेंदूला ऊर्जा मिळवण्याची आवश्यकता असते. म्हणून पौष्टिक ब्रेकफास्ट करणे गरजेच आहे.

पाणी

सकाळी भरपूर पाणी प्या, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

भिजवलेले बदाम

रात्री भिजवलेले 5 बदाम सकाळी खाल्ल्याने मँगेनिज, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर, ओमेगा-3 मिळतात.

पपई

पपईमुळे पोट साफ होतं, कोलेस्टेरॉल कमी होतं, आणि व्हिटॅमिन ए असते ते डोळ्यांसाठी फायदेशीर असते व हृदयरोगाचा धोका कमी होतो.

मध

कोमट पाण्यात मध घालून सकाळी प्यायल्याने शरीराला मिनेरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात.

उकडलेली अंडी

उकडलेली अंडी खाल्ल्याने वजन कमी होतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं.

सब्जा

रात्री भिजवून सब्जा बिया सकाळी खाल्ल्याने प्रोटीन, फायबर, आणि कॅल्शियम मिळतात.

शेंगदाणे

शेंगदाणेदेखील रात्री भिजवून खाऊ शकता, हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.