यंगिस्तान

मुंगी साखरेचा रवा...

समिधा पाठक7276583054 रविवारी सकाळी हातात कॉफीचा कप घेऊन आठवणींची एकेक शेंग सोलत बसली होती. सार जीवन एका चित्रपटासारखे डोळ्यासमोर उभे राहिले. आठवणी कोणत्याही असो, कशाही असो वर्तमान काळाला लुटून नेण्याचे जबरदस्त सामर्थ्य त्यांच्यात असते आणि विशेषतः रम्य आठवणी रंगवण्यात भान हरपून जातं. तेवढ्यात फोनची रिंग वाजली आणि मी भानावर आले. बालमैत्रिणीचा फोन होता. तिला म्हटले, मी आज तुझे काहीच ऐकणार नाहीये, तयार हो आपण फिरायला जाऊ. ती म्हणाली आज काय हे असे अचानक? मी म्हटले, काळाने बालपण हिरावून घेतले, पण बालमन ..

रामजन्मभूमी आणि वर्तमान पिढी!

सर्वेश फडणवीस8668541181 गेल्या पाच शतकांपासून हिंदूंच्या 25 हून अधिक पिढ्या ज्या मंदिराच्या उभारणीची चातकाप्रमाणे वाट पाहत आल्या आहेत, ज्या सहस्त्रावधी हिंदूंनी प्रभू श्रीरामाला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानून त्याच्यासाठी बलिदान केले, ज्या कोट्यवधी हिंदूंनी आपले आराध्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी भावपूर्ण प्रार्थना केल्या, उपासना केली, जीवनभर व्रतस्थ राहिले, तो ऐतिहासिक क्षण काळाचे द्वार ठोठावत होता. भविष्यातील तो भावविभोर करणारा सुवर्णक्षण अखेर दृष्टीस पडला, कारण सर्वोच्च ..

मानव आणि पर्यावरण

अंजली आवारी मानवी आयुष्य जगताना उपयोगी वस्तू निसर्ग मोठ्या तत्परतेने प्रदान करीत असतो. पण जेव्हा त्याची परतफेड करायची संधी येते, तेव्हा मात्र मनुष्य एक पाऊल मागे सरकतो. निसर्ग मानवाचा पालनकर्ता आहे. तो ज्याप्रमाणे आपली काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपल्या हातून जर चुका झाल्या तर नैसर्गिक संकटांच्या माध्यमातून तो आपले कानही पिळतो. दुष्काळ, भूकंप, त्सुनामी, पूर अशा विविध संकटांच्या माध्यमातून तो धोक्याच्या घंटेचा नादही करीत असतो. सध्या मनुष्यप्राणी उन्मत्त हत्तीसारखा वागतोय्‌. निसर्गाच्या घंटेचा ..

जिव्हाळ्याचा माणूस ‘पोस्टमन’

सर्वेश फडणवीस नुकतीच दिवाळी आटोपली. नातलग, मित्रमंडळी, गप्पा, भेटी-गाठी, फराळ हाच दिवाळीचा खरा आनंद. अशाच एका ठिकाणी गप्पांच्या ओघात पोस्टमनचा विषय निघाला. आज पोस्टमन बर्‍याच भागात कालबाह्य झाला तरी आधीच्या पिढीतील अनेकांचा तो जिव्हाळ्याचा माणूसच होता. घरातील प्रत्येक मंगल कार्याप्रसंगी त्याला भेटवस्तू दिली जायची. पण आज हा जिव्हाळ्याचा पोस्टमन दिसेनासा होत आहे.    ब्रिटिश काळापासून चालत आलेले टपाल खाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेले आहे. आजच्या एसएमएस, व्हॉट्‌सअॅप, ई-मेलच्या ..

लव्ह यू जिंदगी...

समिधा पाठक काय झालंय्‌ माझं आयुष्य यार. कोण होतो मी आणि काय झालोय्‌ मी! शाळा कॉलेजमध्ये काय लाईफ होतं यार. काय हवा होती माझी! क्लासमध्ये, होस्टेलमध्ये, मित्रांमध्ये आपलीच चलती असायची आणि आज बघा! पूर्ण एकटा पडलोय्‌ मी. जिच्यासाठी मित्रांना सोडले, ती सुद्धा मला सोडून गेली, कारण माझा गोल ठरलेलाचं नव्हता. तेव्हाच ठरवलं झाला तो अपमान पुरे आता. स्वतःच्या बळावर उभं राहायलाच हवं. मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपड करू लागलो आणि या नादात माझी उरली ..

फळांचे रस आणि आरोग्य

मीरा टोळे9225233263 आजकाल सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे. ऑफिस, घर सांभाळताना स्त्रियांची होणारी कसरत, कॉलेज, क्लासेस, अभ्यास, परीक्षा आदी सांभाळताना मुलांची होणारी तारांबळ, नोकरीतील वाढलेला ताण आणि कर्तव्ये, जबाबदार्‍या पार पाडताना पुरुषांना होणारा त्रास हे सगळे सहन करण्याची प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक ताकद टिकून राहावी याकरिता काहीतरी पौष्टिक गोष्टी शरीरात जाणे आवश्यक आहे.   शरीराला व्यायाम व्हावा, शुद्ध हवा मिळावी याकरिता अनेकजण सकाळी फिरायला जातात. फिरून झाले की ..

दिवाळी सणावरून घ्यावयाची शिकवण

मुकेश जुनघरे  दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवसाला विविध सकारात्मक गोष्टी घडून आलेल्या आहेत, यात एक अतिशय महत्त्वाचे म्हणजे सुखाची दुःखावर मात करणे हे होय. आपण दिवाळी का बरे साजरी करतो, याचे महत्त्व प्रत्येक िंहदू व्यक्तीला माहिती असणारचं, या दिवशी श्रीरामचंद्र आपल्या 14 वर्षांच्या वनवासावरून परतले होते, त्या 14 वर्षांच्या कठीण कालावधीत त्यांनी किती दुःख सोसले, त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकतं नाही. श्रीरामचंद्रांच्या आयुष्याबद्‌दल वा जीवनाबद्‌दल जरी अभ्यास ..

सामाजिक जाणिवांची दिवाळी!

सर्वेश फडणवीसदिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्सवाचा सण. भारतीय संस्कृतीत सणांची जी रचना आहे, ती इतकी जाणीवपूर्वक केली आहे, की- त्यावर विचार करायला गेलो तरी आपण या संस्कृतीचे पाईक आहोत याचा आंनद होतो. दिवाळी हा सण जगात कुठेही आणि कुठल्याही संस्कृतीमध्ये बघायला मिळणार नाही. पाच दिवस आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. समाजातील प्रत्येक घटक दिवाळी ही साजरी करतचं असते. काळानुसार बदल हा अपेक्षित आहेच आणि प्रत्येक बदलाचे स्वागत हे व्हायलाच हवेचं. यंदा असाचं छोटासा बदल करण्याचा प्रयत्न आपण करूया. छोटे व्यापारी ..

याला जीवन ऐसे नाव...

नीता राऊत  दलाई लामा यांची काही वाक्यं वाचली की, माणूस आणि त्याची मानवीय विचारधारणा त्यांना फार आश्चर्यचकित करते. कारण माणूस आधी पैसा कमवण्याकरिता स्वत:च्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग कालांतराने तेच स्वास्थ्य ठीक करण्याकरिता तोच कमवलेला पैसा खर्च करत राहतो आणि नंतर तो त्याच्या भविष्याच्या चिंतेत राहतो, ज्यामुळे तो वर्तमान काळात जगायचं विसरून जातो. माणूस असे जगायला आणि विचार करायला लागतो की, जसे तो कधी मरणारच नाही! या सगळ्यात त्याचं जगायचं राहूनचं जातं आणि ज्याची त्याला कधीच जाण होत नाही. ..

संयमी आयुष्य

अंजली आवारी 8600291527 आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची गती पाहता ती वेगवेगळी असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण वेगळ्या गतीने मार्गक्रमण करीत असतो. कधी आपण मेट्रोच्या वेगाने एक एक शिखर सर करीत जातो, तर कधी बैलगाडीच्या वेगाने आयुष्याचा गाढा ओढावा लागतो. असेच, आयुष्यात कुठेतरी नियंत्रण येण्यासाठी संयमाची गरज असते.   ‘संयम’ हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. विशेषत: प्रेरणादायी पुस्तकांत िंकवा व्याख्यानात याचा नेहमीच वापर होतो व यशाची मुख्य गुरुकिल्ली म्हणून या शब्दाला फारच ..

मला फ्रीडम हवंय

‘‘कोणाचा फोन होता रे राज?’’‘‘अगं मित्राचा होता’’‘‘काय म्हणाला? आणि तू कुठे निघाला?’’‘‘काम आहे त्याचं थोडं आलोच मी जाऊन’’हा संवाद आज राज आणि त्याच्या आईमध्ये झाला. आईने दुसर्‍या दिवशी सकाळी चहा घेताना राजच्या बाबांकडे हा विषय मांडला.‘‘अहो! आजकाल आपला राज फार बदललाय हो, हल्ली पहिलेसारखा नाही वागत. कोणाचा फोन होता, कोण काय म्हणालं काहीच नाही सांगत. आधी शाळेतून आला की त्याचं चालू व्हायचं, ..

माणूस म्हणजे सुखदुःखाचे समीकरण

मुकेश जुनघरे  सुख म्हणजे काय सांगायचे झाले तर आपण लहान मुलाला खाऊ खाण्यासाठी काही पैसे दिले त्यावर तो खूप आनंदी होतो, हे सुख आहे. तर आपण लहान मुलाला अभ्यास न केल्यामुळे मारले की तो रडतो ते म्हणजे दुःख. चढ-उतार हे माणसाच्या आयुष्यात फार येतात आणि या चढ-उतारांमुळे तो पुढे जातो. यावरून त्याला सुख वा दुःख झेलण्याची ताकद मिळते आणि तो या छोट्या छोट्या गोष्टींवरून दुःखाचा सामना करण्यास तयार होतो. तुम्ही जर बघितले तर माणसात विविधता आढळून येते म्हणजेच बोलण्याची पद्धत, वागणूक, कपडे, तसेच विचार करण्याची ..

नेत्यांची कानउघाडणी करणारी ‘ती’

नितीश गाडगे नुकतेच अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्राचे जागतिक हवामान संमेलन पार पडले. यावेळी ग्रैता तुनबैर या एका 16 वर्षाच्या मुलीने जगातल्या सर्वच मोठ्या नेत्यांची तिखट शब्दात कान उघडणी केली. त्यामागचे कारण म्हणजे जगभरात झपाट्याने होत असेल हवामान बदल हे आहे. ग्रैता तुनबैर ही स्वीडनची नागरिक आहे. ग्रैताने संयुक्त राष्ट्रांच्या संमेलनात अतिशय संवेदनशील भाषण दिले. जगभरात झपाट्याने होत असलेल्या हवामान बदलला तिने सर्वच मोठ्या नेत्यांना जबाबदार ठरविले आहे. राजकारणापलीकडे जात ..

नवरात्रीची विविधता

अंजली आवारी   विविधतेने नटलेल्या भारतात नवरात्रोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करून तीची कृपादृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न भक्तांकडून होत असतो. यात प्रत्येक प्रदेशातील रितीरिवाजांप्रमाणे प्रत्येकाची उत्साह साजरा करण्याची पद्धत निरनिराळी आहे.   उत्तर भारतातील नवरात्र उत्सवउत्तर भारतात नवरात्र उत्सव रावणावर प्रभू रामचंद्रांचा विजय म्हणून साजरा केला जातो. दसर्‍याला रामलीला नाट्याचे सादरीकरण करून उत्सवाची सांगता केली जाते. विजयादशमी ..

तुमच्या वेडिंग फॉटोग्राफरला हे जरूर विचारा

गौरी घटाटे  लग्न संस्मरणीय करण्यात लग्नातले फोटो एक अत्यंत महत्त्वाचा हिस्सा असतो. लग्नातले फोटो हा प्रत्येकाच्या आयुष्यात जपून ठेवावा असा ठेवा असतो. त्यामुळेच तुमच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी तुम्ही कुठल्या फोटोग्राफरची निवड करता ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. सर्वप्रथम तुम्हाला नेमके काय हवे आहे आणि काय रुचते, ते तुम्ही तुमच्या फोटोग्राफर सोबत बोलणे आवश्यक आहे. योग्य फॉटोग्राफरची निवड करताना, खालील प्रश्न निर्णय घेण्यात तुमची नक्की मदत करतील.   1. ..

शिल्पांची मेजवानी- श्री मुरलीधर मंदिर...

सर्वेश फडणवीस नागपूर शहराचा इतिहास ऐतिहासिक असाच आहे. बरेच दिवसांत अशा वास्तू बघायला जाणे जमले नाही. पुन्हा एकदा गेलो तर हे मुरलीधर मंदिर बघितलं. या मंदिरात कृष्णाबरोबर रुक्मिणी व सत्यभामा आहेत आणि हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळते.   मुरलीधर मंदिर बरेच दिवस एकान्तात असेच होते. सोनेगाव विमानतळ भागात असल्याने कुणी सहसा तेथे जात नसे. पण आता एक रस्ता येथून सुरू झाल्यामुळे ही वास्तू बघण्याची इच्छा कायम होती. नागपुरातील ही मंदिरे म्हणजे स्थापत्यकृती, शिल्पप्रतिमा व सुशोभन यांचा परमोच्च ..

मानवी वागणूक...

मुकेश जुनघरे9049339068 माणसाने आयुष्यात कधीही लोभ करू नये. काही व्यक्तींना अशी सवय असते की, त्यांनी एखादे चांगले काम केले, तर ते प्रत्येकाला सांगत फिरत असतात- मी केले म्हणूनच असे झाले... मी केले म्हणूनच तसे झाले! अशा गोष्टी प्रत्येकांना सांगण्याची गरज आहे? हे आपल्या मनाला एकदा विचारून बघा! आणि मग जर सांगणे जरुरी असेल तर चांगले केले तेव्हाच का सांगायचे? वाईट केले तेव्हाही सांगा. जी गोष्ट चांगली झाली ती प्रत्येकांना सांगण्याची गरज नसते, ती न सांगतासुद्धा लोकांना माहिती होतेच! माणसाने कुठलीही गोष्ट ..

यथा दृष्टी तथा सृष्टी...

अंजली आवारी  आपल्या सभोवतालच्या घटना आपल्याला एक दृष्टिकोन प्रदान करीत असतात. एक असा दृष्टिकोन, ज्यातून आपण संपूर्ण जगाकडे बघतो. जेव्हा आपणास एखादा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा हाच दृष्टिकोन आपणास तो निर्णय घेण्यास मदत करीत असतो. पण, हा दृष्टिकोन तयार कसा होतो, यासाठी आपली दोन ज्ञानेंद्रिये कार्यरत असतात- एक, डोळे आणि दुसरे, कान. आपण ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहतो व कानांनी ऐकतो, त्यामुळे आपण एका विचाराची निर्मिती करीत असतो. हाच विचार आपल्या मनावर बिंबविला जातो व आपणास एक दृष्टिकोन मिळतो.  ..

पर्यावरणपूरक गणेशविसर्जन

मीरा टोळे  ठरल्याप्रमाणे तिथीनुसार गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले. रोज बाप्पासमोर मनोभावे आरती, प्रसादाची धावपळ हे सगळं अगदी उत्साहाने भाविकांनी केले. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात बाप्पाला निरोप देण्याची वेळ केव्हा येऊन ठेपली हे कळतच नाही. जड अंतःकरणाने ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करीत बाप्पाला निरोप दिला जातो.   बाप्पाला निरोप देण्याकरिता प्रत्येक जण जशी तयारी करतो तसेच प्रशासनही सज्ज असते. निसर्गाची हानी न होता, विसर्जन कसे योग्य ..

शेतकर्‍याचा मुलगा ते इस्रोचे अध्यक्ष!

नितीश गाडगे भारताची चांद्रयान-2 मोहीम 95 टक्के यशस्वी पार पडली असताना, चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लॅण्डर केवळ 2.1 किलोमीटर दूर असताना इस्रोचा त्याच्याशी संपर्क तुटला. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इस्रो स्पेस सेंटरला भेट देत शास्त्रज्ञांना धीर दिला व त्यांचे मनोबल वाढविले. असे असले तरी विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटणे, हे शास्त्रज्ञांसाठी धक्कादायक होते. दरम्यान, इस्रोचे अध्यक्ष के. सिवन हे अत्यंत भावुक झाल्याचे आपण पहिले. पंतप्रधान मोदींनी त्यांची पाठ थोपटून त्यांना धीर दिला. चांद्रयान-2 मोहिमेच्या ..

औचित्य शिक्षक दिनाचे...

मीरा टोळे  भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस. हा दिवस त्यांना आदरांजली वाहण्याकरिता म्हणून संपूर्ण देशात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शिक्षकांचा गौरव केला जातो. डॉ. राधाकृष्णन्‌ यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.   देशाची नवी पिढी घडविण्यात शिक्षकांचा मोठा सहभाग आहे. समाजात वावरताना शिक्षणाबरोबरच त्या व्यक्तीवर झालेले ..

बाप्पांचे आवडते मोदक...

प्रमोदिनी निखाडे देश असो वा विदेश, सर्वत्र लाडक्या बाप्पांचे स्वागत उत्साहात, जल्लोषात केले जाते. ढोल-ताशांचा गजर, आरतीचे बोल, घंटांचा नाद, रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्येत काही दिवस मनाला शांतता आणि शरीरात नवचैतन्य प्रदान करते. दूर्वांची जुडी, मोदकांचा प्रसाद हे वातावरण सर्वत्र आनंददायी ऊर्जानिर्मिती करते. गणपतीबाप्पांच्या आवडीचे मोदक लाडक्या बाप्पाला अर्पण करण्याची लगबग असते. मोदक म्हणजे बाप्पाच्या नैवेद्यातील अत्यंत अप्रतिम प्रकार आहे. मोदक असल्यास खमंग, खुसखुशीत आवरण आणि उकडीचे असल्यास मऊ आवरण, ..

चला ‘सोशल’ बनूया !

सर्वेश फडणवीस8668541181 माणूस हा समाजशील प्राणी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो. तेव्हा प्रत्येक काळामध्ये किंवा संस्कृतीमध्ये त्याच्या या समाजशीलतेचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला हमखास दिसून येतं. अर्थात काळानुरूप जे काही सामाजिक, आर्थिक बदल होत गेले, त्यानुसार माणसाच्या संस्कृतीही बदलत गेल्या आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल नेटवर्किंग साईटच्या आविष्काराने तर अवघे जग जवळ आले आहे. जगाच्या या टोकावरील व्यक्ती दुसर्‍या टोकावरील व्यक्तीशी क्षणात सवांद साधू शकतो. सर्वात वेगवान प्रसिद्धीसा..

दुरावलेला निसर्ग

नितीश गाडगे  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी. इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त बुद्धिमत्ता असल्याने तो पृथ्वीवर अधिराज्य गाजवतोय्‌. बुद्धी चातुर्याचे निसर्गदत्त वरदान मनुष्याला मिळाल्याने त्याने विज्ञान आणि अध्यात्माचे अनेक पैलू उलगडले खरे, पण तरीही आज जगातल्या या सर्वात बुद्धिमान प्राण्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. पृथ्वीवर एकटा माणूस सोडला तर प्रत्येक घटक हा निसर्गाच्या नियमांचे पालन करतो. माणसासारखे बुद्धी चातुर्य न लाभणे हे कदाचित त्यांच्यासाठी वरदान असावे. जे ..

गोड गैरसमज!

नितीश गाडगे  स्वप्नातल्या आणि खर्‍या आयुष्यात कितीही फरक असला, तरी बर्‍याचदा आशादायी आयुष्य जगण्यासाठी स्वप्न इंधनाचे काम करते. गायत्रीच्या बाबतीतही असेच काहीतरी चालले होते. बीएस्सीच्या पहिल्या वर्षाला असलेल्या गायत्रीचे तिच्याच वर्गातल्या अक्षयवर एकतर्फी प्रेम होते. एकाच वर्गात असल्याने अक्षय तिचा तसा मित्र होता, पण त्यांच्यातली मैत्री अगदीच घट्ट वैगरे नव्हती. गायत्री सर्वसाधारण कुटुंबात वाढलेली. दिसायला अगदीच आकर्षक नसली, तरी तिच्या साधेपणात एक वेगळेच सौंदर्य दडलेले होते, तर अक्षय ..

काश्मीर... ज्ञानाच्या उगमाची गंगोत्री!

सर्वेश फडणवीस   शतकांपासून काश्मीरचे भारताशी सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक संबंध आहे. भारताची उज्ज्वल ज्ञानाची परंपरा काश्मीर शिवाय सुरूच होऊ शकत नाही. प्रख्यात कवी, साहित्यिक, खगोलतज़्ज्ञ, व्याकरणतज्ज्ञ व तत्ववेत्ता आचार्य अभिनवगुप्त यांच्या अथक अभूतपूर्व प्रयत्नांमुळे कर्तृत्वामुळे काश्मीरची ज्ञानपीठ, शारदापीठ अशी ओळख जगभरात निर्माण झाली. केरळच्या कालडी मधून आलेले आद्य शंकराचार्य जगद्गुरू म्हणून याच भूमीतून ओळखले जाऊ लागले अशा भव्यदिव्य ज्ञानाच्या परंपरेची गंगोत्री म्हणून ..

जबाबदारीचे भान गरजेचे

मीरा टोळे 9225233263  15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो, मनासारखे वागू शकतो, आपल्याला हवे ते करू शकतो. परंतु हे स्वातंत्र्य उपभोगत असताना ज्यांनी याकरिता हालअपेष्टा सोसून हा सुदिन आपल्याकरिता आणला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. इतक्या कष्टाने मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी आपलीच आहे.   आज आपण मुक्त स्वातंत्र्य उपभोगतो आहे. कुठल्याही प्रकारचे बंधन आपल्यावर नाही. ..

कलम 370 चा उगम!

अंजली आवारी 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्याची पहाट घेऊन येणार्‍या सर्व स्वातंत्र्यवीरांना माझे अभिवादन! 15 ऑगस्ट 1947 हा दिवस स्वातंत्र्य लढ्याचा विजय दिवस असल्यामुळे आपणा सर्वांसाठीच तो महत्त्वाचा आहे. याच महिन्यात ऐतिहासिक निर्णयांची लगबग सुद्धा दिसतेय्‌. अशाच एका ऐतिहासिक निर्णयाबद्दल म्हणजेच कलम-370 रद्द करण्याबद्दल जरा जाणून घेऊया.  भारतीय स्वातंत्र्य कायद्याने 18 जुलै 1947 ला भारत व पाकिस्तान ही दोन स्वातंत्र स्वसत्ताक राष्ट्रे निर्माण केली. या कायद्यामुळे संस्थानिकांवरील ब्रिटिश ..

मोदी आबा, हे असं का?

भक्ती जोशी9588453736 हो! मोदी आबाचं, कारण माझे आबा पण तुमच्याच वयाचे आहेत. माझे आबा मला लहानपणापासून नेहमी म्हणत असायचे- ‘‘खूप अभ्यास कर, मोठी हो आणि माझ्यासारखी शिक्षक हो!’’माझ्या आजोबांना मला कुठेतरी प्राध्यापक म्हणून बघण्याची इच्छा होती आणि मी ती पूर्ण करेल, असा त्यांना मी विश्वास दिला होता.   मला असे वाटते, मी उगाच त्यांना विश्वास दाखविला. मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकणार नाही. कारण हे सध्या नोकरीतले, परीक्षेचे आणि पास होण्याचे म्हणजेच टक्केवारीची पद्धत ..

पाऊस चहा आणि प्रेम

नितीश गाडगे  दुपारपासूनच रोहनचे मन ऑफिसच्या कामात लागत नव्हते. सारखं सारखं मनगटावरचं घड्याळ पाहत पाच कधी वाजतात, याची तो वाट पाहत होता. अखेर दिवसभराचा वर्क रिपोर्ट त्याने आपल्या बॉसला ई-मेल केला आणि कॉम्प्युटर शट डाऊन करून तो ऑफिसमधून बाहेर पडला. बाहेर आभाळ दाटून आले होते. कुठल्याही क्षणी पाऊस बरसेल, असे ते वातावरण! तो गाडीत बसला आणि घराच्या दिशेने निघाला. गाडीतला एफएम सुरू होता. रोहन आपल्याच विचारात मग्न होऊन गाडी चालवत होता, आणि एफएमवर ‘मेरा सया’ सिनेमातले ‘तू जहॉं जहॉं ..

तरुणांचा आनंदोत्सव- मैत्री दिन !!

सर्वेश फडणवीस आज आपण 21 व्या शतकात यशस्वी वाटचाल करतो आहोत. हे ‘यंत्र युग’ मानले जाते. आजच्या युगात तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असे असले तरी आजच्या युगातही नाते-संबंधांनाही तितकेच महत्त्व आहे आणि हेच नातेसंबंध जपणारे हक्काचे जीवाभावाचे नाते म्हणजे मैत्री. ऑगस्ट महिना उजाडला की वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे ‘मैत्री दिन’ साजरा करण्याचे. या महिन्यात पहिल्या रविवारी येणारा हा दिवस म्हणजे तरुणांचा जणू उत्सवच असतो. कॉलेजमधील उत्साहाच्या ..

खरंच मैैत्री आवश्यक आहे का?

मीनाक्षी वैद्य  मैत्री ही लहानपणापासूनच होत असते. अगदी नर्सरीत प्रवेश घेतला की सगळे जण आपआपल्या वयाच्या मुली-मुलांशी मैत्री करतात. मैत्री स्नेहाचा धागा आहे. या स्नेहाच्या धाग्यावरच आपण आपले पुढचे आयुष्य चढत असतो. कारण आपण शाळेत शिक त असतो, तेव्हा आपल्याला आपल्या मैत्रिणींच्या संपर्कात राहूनच बर्‍याचशा गोष्टीत अवगत होतात. त्यांंनी सांगितलेल्या कुठल्याही (चांगल्या) गोष्टींचे अनुकरण आपण आपण लवकर करतो. तीच गोष्ट आईने सांगितली, की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजेच काय आपल्या जीवनात मित्र-मैत्रीण ..

सैनिक- उद्यासाठी आज देणारा!

सर्वेश फडणवीस  26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. 20 वर्षांपूर्वी याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. 1999 च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू ..

आत्मविश्वास

मुकेश जुनघरे9049339068 माणसात असलेला आत्मविश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. आत्मविश्वासाशिवाय माणूस कुठलेही कार्य करण्यास असक्षम आहे. माणूस जशी कल्पना करीत असतो, तसा तो वागण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ती कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असतो, त्या प्रयत्नाने तो राजा सुद्धा बनू शकतो. परंतु त्याचाच एक नकारात्मक टप्पा म्हणजे अतिआत्मविश्वास! खरे सांगायचे झाले तर अतिआत्मविश्वास माणसाला शून्य बनवितो. जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की माणूस त्याच्या मनात निश्चित करीत आहे की माझ्यासाठी सर्व काही ..

जीवलग सखा-मोबाईल!

अंजली आवारी ‘मोबाईल’ आपल्या सर्वांच्या आयुष्यातला महत्त्वाचा मित्र! हा मित्र असा आहे, जो आपल्या आयुष्यात चांगल्या-वाईट प्रसंगांचा साक्षीदार आहे. आपल्या कुटुंबातील खूप जवळचा मित्र बनून जातो. वा आपण असही म्हणू शकतो की, एकमेकांशी जोडले जाण्याचं, आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक घटनेशी तो आपल्याला अलगदपणे जोडतो. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनात नेहमी जागृत राहतो. मोबाईलमधून व्हॉट्‌सॲप, फेसबुक, मॅसेन्जर, टि्‌वटर, लिंक्डईन यासारख्या माध्यमांद्वारे आपल्याला क्षणार्धात ..

मानसिक तणाव घातकच!

प्रा. मधुकर चुटे  आपल्या देशात गेल्या काही वर्षांत, आपल्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअरच झाले पाहिजे, अशा अतिमहत्त्वाकांक्षेचे भूत पालकांच्या मानगुटीवर बसल्याने, हजारो किशोरवयीन मुलांचे भावी जीवन मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येते. आपल्या मुलावर आपल्या महत्त्वाकांक्षा सक्तीने लादू नका, त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिकू द्या, मुलांची होरपळ करू नका, अशी आवाहने शिक्षण आणि वैद्यकीयतज्ज्ञांनी वारंवार करूनही काहीही उपयोग झालेला नाही. इंग्रजी माध्यमातूनच आपल्या मुला-मुलींना शिकवायचे, ..

शाळेच्या सुखद आठवणी!

सर्वेश फडणवीस8668541181 शाळा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली, तरी शाळा आणि त्याच्या आठवणी या कायम हृदयाच्या एका कुपित असतात. शाळेतील कुणी, कुठेही आणि कधीही भेटले, तरी त्याचा सुगंध कायम दरवळवत असतो. शाळेविषयी वाटणारी आत्मीयता प्रत्येकात लपलेली असते, यात शंकाच नाही आणि ही आत्मीयता चिरकाळ टिकणारी सदैव नित्यनूतन मनस्वी आनंद देणारी असते.   शहरातील शाळा म्हणजे काही मजल्यांची विस्तीर्ण आणि मोठी इमारत असते. ग्रामीण भागात बर्‍यापैकी बैठीच, अगदी ..

खटल्यातील नाती

अंजली आवारी‘खटला!’ हा शब्द ऐकला की आपल्यासमोर संपूर्ण न्यायव्यवस्था उभी ढाळते. काळे कोट घातलेले वकील, ऑर्डर ऑर्डर करणारे न्यायाधीश, न्यायासाठी फिर्याद करणारे लोक, पोलिस कोठडीत असलेले आरोपी व सतत डोळ्यांवर पट्टी बांधून न्याय करणारी ती न्यायदेवता! असं चित्र डोळ्यांसमोर येतं. भारतीय न्यायव्यवस्था ही सार्वभौम व स्वतंत्र आहे. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेऊन प्रत्येक व्यक्ती न्यायाची मागणी करीत असतो. असं म्हणतात, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण, आज प्रत्येकावरच कोर्टात जाण्याची ..

चिंब भिजवणारा पाऊस!

सर्वेश फडणवीस  खूप दिवसांनी पुण्यात छान पाऊस अनुभवला. गर्मी आणि उन्हाळा चार महिने सहन केल्यानंतर त्याच्या येणाच्या चाहुलीने प्रत्येक जण जो आनंद अनुभवतो त्याची गोष्टच वेगळी आहे. गोष्ट नाही म्हणता येणार... पण मला जे काही वाटलं ते लिहितो आहे.   अचानक संध्याकाळी ढग दाटून आले होते. दिवसभर ते वातावरण मनावर दाटलेलं होतं. घरात एरवी कोणी नसताना सहसा कंटाळा येत नाही, पण काल खरच खूप उदास वाटत होतं सगळेजण त्याची चातकासारखी वाट बघत होते आणि थोड्याच वेळात तो आला... सगळ्यांचा जीवलग असा मित्र ..

‘तो’ पावसासोबत निघून गेला!

दीपक वानखेडे  आयुष्यभर ‘तो’ मातीत राबला. एकुलत्या एका पोराला शिकवून साहेब केला. आता पोराचा शहरात मोठा बंगला!एक दिवस पोरगा शहरातून आला, त्याला म्हणाला-‘‘माझ्यासोबत शहरात चला, ही जमीन विकून टाका!’’ साधाभोळा बाप तो! जमीन विकून टाकली. मोठी रक्कम पोराच्या खात्यावर जमा! त्याला वाईट वाटलं. हे गाव, त्याचं शेत आणि त्याच्या शेतातील पाऊस त्याच्या जिवापाड. पण मुलासमोर पर्याय नव्हता. गाव सोडताना त्याला धरून सारं गाव रडलं, म्हणालं-‘‘कायले जाता जी सयरात ? ..

पावसाकडे आग्रह

ज्योत्स्ना साने कुर्हेकर जगात कुठल्याही प्रियकरानं त्याच्या प्रेयसीची वाट पाहिली नसेल इतक्या आतुरतेनं सध्या सगळे जण पावसाची वाट पाहात होते... तो आता कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्हं दिसू लागली... त्याच पावसाला अगदी हक्कानं दिलेला हा एक छोटासा सल्ला आणि आग्रह...   वेशीपर्यंत आला आहेस... आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस... पटकन माप ओलांड आणि आत ये... गेल्या वेळसारखा कंजूषपणा नको... यंदा दिल खोलके बरस... दीर्घ काळापासून तुझ्यासाठी अवघी सृष्टी व्याकूळ झालीय... तिच्यासाठी ..

हरवलेलं मातृत्व...

अंजली आवारी  परवा सहज यू ट्यूबवर व्हिडीओ बघत असताना, अपर्णाताई रामतीर्थकार यांच्या भाषणाचा व्हिडीओ बघितला. त्याच क्षणी अंगावर काटा आला. त्यांनी त्या भाषणात आईच्या हरविलेल्या मातृत्वाची कहाणी सांगितली. एक आई जी करीयरवेडी, हुशार व कर्तृत्ववान आहे. पण, या सगळ्यात बाळाप्रती असलेलं तिचं कर्तव्य ती विसरली आहे. एका घरात दोन लहान मुलं आणि त्यांचे आई-वडील राहतात. मोठा मुलगा नवव्या वर्गात आहे व लहान मुलगा गतिमंद जन्माला आला. गतिमंद असल्यामुळे त्याला आईच्या विशेष काळजीची गरज होती. पण, ध्येयवेडी ..

पावसांच्या सरींनी हे मन बावरे...

अंजली आवारी8600291527 यावर्षीच्या कडक उन्हाळ्यानंतर आता चाहूल लागलीय ती पावसाच्या सरींची. सूर्यकिरणांनी झालेली अंगाची लाही लाही या थंडगार पावसाच्या सरींनी मनाला शांत करून जाते. तो थंडगार वारा, गडगडत्या ढगांचा आवाज, कडाडणारी व लखलखती वीज हे सर्व आपणास निसर्गातील बदलांची जाणीव करून देतात व त्या थंडगार पावसाच्या सरी मनाला विसावा देतात.   पावसाच्या सरींच कोरड्या पडलेल्या मातीशी मिलन झाल की, तो मातीचा दरवळता सुगंध मनाला अगदी भुरळ पाडून जातो. निसर्ग पुन्हा तेवढ्याच तत्परतेने नवी पालवी ..

तो आणि ती!

नीता राऊत आपल्या आयुष्यात जन्मतः आणि रक्ताच्या नात्याची अनेक माणसं असतात... पण आपल्या जन्मानंतर ज्या लोकांना आपण निवडतो, ज्यांच्या सोबत रहाणे, बोलणे, गोष्टी वाटून घेणे आपल्याला मनापासून आवडते त्या नात्याला मैत्रीचे, दोस्तीचे नाते म्हणतात. पण त्रास तेव्हा होतो, जिथे आजही या नात्याला व्यक्तीच्या लैंगिक गुणधर्मावरून एक अस्वच्छ नाते म्हणून गणले जाते. मुलगा मुलाचा चांगला मित्र राहू शकतो. मुलगी मुलीची जीवलग मैत्रीण राहू शकते पण एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांचे जीवलग असणे म्हणजे त्यांच्यात काही तरी शिजतंय्..

अपेक्षांचं ओझं!

 सर्वेश फडणवीस  अपेक्षा आणि ओझं दोन्ही शब्दांत कुठलीही साम्यता नाही. पण अपेक्षा आली की मानवी मन त्या अपेक्षांचं ओझं घेऊन दैनंदिन जीवनात वावरत असतं. असंख्य ओझ्याखाली ते असतंच पण प्रत्येकाच्या अपेक्षानं ते ओझं आणखी वाढतच जातं. त्यातून निर्माण होतो, फक्त न फक्त ‘दुरावा!’ या अपेक्षा कमी अधिक असतात पण त्याचं ओझं झालं, की मन दुर्लक्षित झाले म्हणूनच समजावे लागेल. आज जागतिकीकरणाचा प्रभाव यामुळे अपेक्षांचं ओझं सांभाळणे तसे कठीणच झाले आहे. आज 21 वे शतक हे तसे स्पर्धेचे युग आहे ..

ऋतुचक्र

नीता राऊत ऋतू बदलणे हा निसर्गनियम आहे. प्रत्येक ऋतूसोबत माणसाची जीवनशैली, त्याचे खानपान आणि राहणीमान सगळेच बदलते. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आता जूनच्या मध्यापासून पावसाचा ऋतू चालू होतो. पावसाळा हा अधिक लोकांचा आवडता ऋतू आहे आणि तो तसा असतोही. त्यामुळे तो आवडणं साहजिकच आहे. रणरणत्या उन्हात घालवलेल्या दिवसानंतर पावसाच्या सरी माणसाच्या शरीराला सुखवणार्‍या असतात. पावसावर सोशल मीडियामध्ये अनेक पोस्ट येतात. विशेषतः अनेक कविता रंगवल्या जातात या पावसावर. गंमतीने असेही म्हटल्या जाते की-‘आला ..

तरुणाई आणि मोदी सरकार!

सर्वेश फडणवीस  सतराव्या लोकसभेचा निकाल लागला आणि देशात पुन्हा स्थिर सरकार जनतेने प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. नरेंद्र मोदी या पंचाक्षरी विकासाच्या मंत्राला जनतेने जो पाठिंबा दिला, तो अद्भुत आणि ऐतिहासिक असाच आहे. त्याबद्दल येणार्‍या सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन! यंदाच्या निवडणुकीसाठी नवमतदारांची, विशेषत: तरुण मतदारांची संख्या लक्षणीय होती. यंदाच्या निवडणुकीत 89 कोटी 61 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र होते. जवळपास सात कोटी नवमतदारांपैकी किमान पाच कोटी मतदार मतदान करतील, ..

फॅशन कान्सची

- सृष्टी परचाके  कान्स फिल्म महोत्सवाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या एक नाही, दोन नाही, तर चक्क तीन-तीन अभिनेत्रींनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. आपल्या क्लासी आणि हटके लूकमुळे आज त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. दीपिका पदुकोण सलग चौथ्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली, तर कंगनाचे हे दुसरे वर्ष होते. बॉलिवूड आणी हॉलिवडूमध्ये आपल्या अभिनयाने आपला ठसा उमटवणार्‍या प्रियांका चोप्राने या वर्षी कन्समध्ये पदार्पण केले. भारतीय अभिनेत्रींनी परिधान केलेल्या विविध हटके आऊटफिटस्‌ची चर्चा ..

सोशल मीडिया एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

सर्वेश फडणवीस आज सोशल मीडियावरून जग अधिक जवळ आले आहे. प्रत्येकजण याचा पूर्णपणे वापर करतो आहे. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिले आहे व आपले विचार आणि त्याचे प्रगटीकरण हे अत्यंत प्रभावी शब्दात मांडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे. आज या माध्यमातून कुणाच्या खाजगी जीवनावर आपल्याला भाष्य करण्याची मुळात गरजच नाही. प्रत्येकाने त्याचे भान जपण्याची गरज आहे. आज अनेक कडक कायदे या माध्यमातही आहे पण आपण त्या कायद्याना न जुमानता अभिव्यक्त होण्यासाठी कायम तत्पर असतो. कडक कायदे असून ..

माणसातला देव डॉ. अब्दुल कलाम!

घनश्याम आवारीमित्रांनो, गरिबीमुळे शिक्षण सोडणारे अनेक व्यक्ती आपल्याला माहिती आहेत. परंतु गरिबीचा सामना करत स्वत:चं शिक्षण पूर्ण करणारे फार कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम! यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामीलनाडूमधील ‘रामेश्वरम्‌’ या गावी एका मुस्लीम परिवारात झाला. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांची आई गृहिणी तर वडील नाविक होते. त्यांचा परिवार मोठा होता आणि पैशांची आवक कमी होती. त्यामुळे दोन वेळेचे निट खायला मिळायचे नाही तर शिक्षण दूरच राहिले. ..

'मँगो मस्तानी'

प्रमोदिनी निखाडे7709825547 भारतातील रूचकर पौष्टिक खाद्यपदार्थ नेहमीच जगाच्या आकर्षणाचे केंद्र्र राहिलेले आहे. चव, पौष्टिकत्व, जीवनसत्वे यांचा अप्रतिम मेळ आपल्याला भारतीय खाद्यसंकृतीमध्ये दिसून येतो. मात्र यात अपवाद वा सत्यता अशी आहे की- तरुण पिढी पौष्टिक आहाराला दुर्लक्षित करून जंकफुडच्या जाळ्यात गुरफटलेली आहे. पारंपरिक पदार्थांचेे सेवन करणे कमीपणाचे वाटायला लागले आहे. ही मानसीकता समाजात दिसून येते आहे, ती तुम्ही-आम्हीच वाढवतो आहे, यात दृप्राय नाही. आकर्षक पॅकिंगला बळी न पडता गुणवत्तेला वाव ..

माधुरी स्टाईल

सृष्टी परचाके बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या स्टाईलसाठी ओळखले जात असून त्यांची हटके स्टाईल तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. चित्रपटामध्ये लूक आणि कपड्यांवर जास्त मेहनत घेण्यात येते. अनेक चित्रपट त्याच्यामध्ये परिधान केलेल्या कपड्यांमुळे गाजले आहेत. यात ‘मुघल-ए-आजम’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘जोधा अकबर’ सारख्या चित्रपटामध्ये हटके आणि महाग आऊटफिट वापरण्यात आले होते. आताही या आऊटफिट्स बद्दल चर्चा केली जाते.   माधुरी दीक्षित आजसुद्धा तिच्या स्टाईलमुळे युवा वर्गामध्ये ..

वेड #PUBG चे

•सर्वेश फडणवीस8668541181  उन्हाळ्याची सुटी चालू आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी सध्या या गेमचे नाव आहे. सध्या सगळीकडे ‘पबजी’ या गेमची चर्चा आहे. या गेमचे अनेक मुलांना व्यसनच लागल्यासारखे ते खेळताना दिसतात. मात्र या पबजीमुळे पुन्हा एकदा वेड्यासारखी गेम खेळणारी ही मुले नवनवीन धोक्यांना आमंत्रण देताना दिसतं आहेत. या गेमचे व्यसन अतिशय वाईट आहे. आपल्या पंतप्रधान यांनी पण या खेळाच्या बाबतीत चिंता व्यक्त केलेली आपण जाणतोच.   ‘पबजी̵..

फॅशन पेस्टल कलर्सची

सृष्टी परचाके फॅशनिस्टा :  उन्हाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी हटके रंगाचा वापर करावा. सध्या पेस्टल रंग ट्रेंडिंगमध्ये असून या रंगाचे आऊटफिट परिधान केल्यास थंडावा मिळतो. बदलत्या ऋतू प्रमाणे फॅशनमध्ये बदल केले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाच्या धारा सुरू होतात, त्यात जाड कापडाचे कपडे असतील तर अंगाची अक्षरशः लाही-लाही होते आणि त्यामुळे दुपारच्या वेळचा उकाडा तर सहन होण्यापलीकडे असतो. प्रत्येकाला पेस्टल रंग शोभून दिसत असून या रंगामध्ये अनेक आऊटफिट बाजारात उपलब्ध आहे. तरुणांसाठी पेस्टल रंग ..

सॉरी! मी व्यस्त आहे!!

डॉ. पूजा फाळके मला लिहिणं वगैरे असं खूप काही जमत नाही. पण वाटतं कधी कधी मनातलं बोलाव, लिहावं आणि पोहोचवावेत आपले विचार चारचौघांपर्यंत! हल्ली पूर्वीसारखी नात्यांमधली ओढ कमी होत चाललेली दिसते आणि म्हणून हा सर्व प्रपंच. नेमकं कुठलं कारण असावं ? खूप कामाचा व्याप, भविष्याची चिंता, घरातले कलह, की आपण आजच्या स्पर्धेत मागे पडतोय्‌ हा न्यूनगंड? कारण कुठलेही असू देत, शेवटी यातून निष्पत्ती काय, याकडे आपण बघायला हवं. सध्या एक शब्द फार प्रचलित आहे.‘बिझी!’ बहुतांश लोकांचं एक वाक्य ठरलेलेच ..

तीव्र उन्ह आणि नागपूरकर!

 खास बात सर्वेश फडणवीस8668541181 पुण्या-मुंबईच्या लोकांसमोर नागपूरचे नाव काढले तर सर्वप्रथम ते नाक मुरडतात, कारण नागपूरचा उन्हाळा! बापरे! इतक्या गर्मीत कसे राहतात हे लोकं ? असाच विचार ते करतात. पण नागपूरकर मात्र हा उन्हाळा चांगलाच ‘एन्जॉय’ करतात. पुणेकरांच्या भाषेत सांगायचे तर नागपूर हे अजूनही तसे म्हंटले तर स्वतंत्र घराचे शहर आहे. संध्याकाळी अंगणात किंवा गच्चीवर पाईपने पाणी शिंपडायचे मग घराच्या अंगणात किंवा गच्चीवर खाट किंवा खुर्च्या ठेवून निवांत कुटुंबातील सदस्य ..

कूऽऽल फॅशन

फॅशनिस्टा - सृष्टी परचाकेउन्हाळ्यात आऊटफिट निवडताना बराच गोंधळ होतो. तसेच शोभणारे फुटवेयर आणि मेकअपचे योग्य निवड करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. उन्हाळा म्हणजे रखरखत ऊन, उष्णतेमुळे अंगाची झालेली लाही आणि घशाला पडलेला कोरड हे जणू समीकरणचं झाले आहे. असे असले तरीदेखील हाच असा एकमेव ऋतू आहे, ज्यामध्ये आपण विविध स्टाईलिश आऊटफिट परिधान करू शकतो. त्यामुळे सध्याच्या काळात उन्हाळा म्हणजे फॅशनच्या दृष्टीने खरा ऋतू आहे. उन्हाळ्याचे दिवस अगदी प्रत्येकालाच नकोसे वाटत असतात. भर दुपारी उन्हामध्ये जर कामानिमित्त ..

प्रेम, संशय, संकोच!

प्रेम म्हणजे काय? त्याची व्याख्या वा त्याचे भाव, त्याची सुंदरता, त्याची गांभीर्यता या सगळ्या गोष्टी लिहिण्यासारख्या वा वाचण्यासारख्या नाही उरल्यात, असं मला वाटते, कारण यावर आपण सगळेच शाळेच्या, महाविद्यालयाच्या सहित्याच्या विषयातून, अनेक चित्रपटांच्या माध्यमातून पाहत आलोच आहोत आणि जवळपास आपण सगळेच या प्रेमाच्या भावनेतून कधी ना कधी गेलोच आहोत आणि जातच राहू... एकदा एका मित्राशी गप्पा मारताना तो सहजच बोलला, की इथे खरं प्रेम असते ते एका आईच्या आपल्या मुलांवर आणि ते फक्त आईचं मुलांवर, बाकी तर एक गरज, ..

आयुष्यभर मैत्री जपणारी गोष्ट-पुस्तक!

 खास बात - सर्वेश फडणवीस  नुकताच 23 एप्रिल ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून सगळीकडे उत्साहाने साजरा झाला. पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे असते. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. प्राजक्ताची फुले माळताना दोरासुद्धा रंगीत होतो, गंधित होतो, त्याचप्रमाणे चैतन्यमय अक्षरे वाचत राहिल्याने मन सजीव होते. प्रत्येक घरात देवघर असते, त्याप्रमाणे एक कोपरा तरी ग्रंथाने, पुस्तकाने भरला तर अनेक मने विचारांनी, ..

मैत्री एक ऑक्सिजन!

मैत्री ही युगायुगांपासून चालत आली. कृष्ण-राधा असो की आपल्यासारखी! मैत्रीच्या अथांग सागरात विश्वासाची ‘नाव’ महत्त्वाची असते. तिच्या सहाय्याने हा सागर पार होईल. मैत्री हा दोन अक्षरी शब्द खूप काही सांगतो. नातं रक्ताचं नसून त्याहीपेक्षा मोठं असतं, कारण त्यात आपुलकी, विश्वास, माया असते.  ऑक्सिजन का बरं म्हटलं असेल मी? मैत्री ही एक ऑक्सिजनच आहे, असं मी म्हणते. मैत्री जी मुलांची मुलीसोबत िंकवा मुली मुलींची, कुणाचीही असो, मैत्री हे एक नातं आहे, ज्यात सवयी जुळल्या, विश्वास निर्माण झाला ..

शोधलं तर सापडतं!

 चेतन गाडगे जग फार वेगात बदलत आहे. इतक्या वेगात की ते बदल ते योग्य की अयोग्य कळेनासे झालेत. अशीच एक बदलत्या जागाची भेट म्हणजे सोशल मीडिया. घरातील प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आज सोशल मीडियावर आहे, अगदी लहानग्या बंडूपासून कुलकर्णी आजोबांपर्यंत. पण अतिरिक्त सोशल मीडियाचा प्रभाव हा आजच्या तरुण पिढीला खरं जग विसरायला भाग पाडत आहे. सोशल मीडिया हे खरं जग नाही आहे, खरं तर सोशल मीडिया हे जगच नाही आहे.   रोज होणार्‍या फॅन्सी इव्हेंटचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणे गरजेचे असते आणि ..

जगूया आनंदाने!

 खास बात सर्वेश फडणवीस८६६८५४११८१  नवीन वर्षाचे सर्वदूर उत्साहात स्वागत झाले. नवीन वर्षाचा ताजेपणा, नवीन वर्षाचा नवोन्मेष आणि इच्छा, आकांक्षा, संकल्प सारे काही नवीन असते. नवीन वर्षाच्या निर्धारासाठी नव्या प्रेरणा घेऊन येणारे नवे वर्ष, नवा आनंदही घेऊन येतो आणि या आनंदाची कास धरत आपल्याला पूर्ण वर्षभराची दमदार व यशस्वी वाटचाल करायची असते.  ‘आनंद’ हा शब्द उच्चारताना, ऐकताना किंवा वाचताना माणसाला ज्या अनुभूतीची जाणीव होते, त्याचेच नाव ‘आनंद!’ आनंद ..

सण पारंपरिकतेचा

चैत्राची सुरुवात ज्या दिवसाने होते, तो दिवस म्हणजे ‘गुढीपाडवा!’ हा सण प्रत्येक िंहदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढी उभी करावी असे मानतात. गुडीपाडवासाठी पारंपरिक वेशभूषा उत्तम असून यामध्ये अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या सणानिमित्त अनेक जणांची भेटी-गाठी होत असून अनेक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाते. या निमित्त आपण चांगलं दिसायला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. गुडीपाडवाला महिलांसाठी नऊवारी आणि पैठणीसारखे पर्याय ..

चैत्र पाडवा...

मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. सकाळी उठून सडासंमार्जन, अंगणात सुंदर रांगोळ्या काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. सकाळपासूनच घरात गुढी उभारण्याची लगबग सुरू असते. सर्वजण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात.1 जानेवारीला आपले व्यावहारिक नववर्ष सुरू होते. परंतु त्याचे स्वागत मात्र आपण आळसाने करतो. कारण 31 डिसेंबरला रात्रभर िंधगाणा घातल्यावर सकाळी लवकर उठणे शक्य नसते. गुढीपाडव्याला मात्र याच्या अगदी उलट वातावरण असते. घराघरात उत्साहाने या दिवसाचे स्वागत केले जाते. ..

वर्षप्रतिपदा - रमणीयतेचा उत्सव

गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ! नवीन वर्षाची सुरुवात. राम अयोध्येत आले तो दिवस! चैत्री श्रीराम नवरात्र! वासंतिक देवी नवरात्र आरंभ, विक्रम संवत आरंभ. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस! वसंत ऋतूचा आरंभ! या काळात निसर्गाचे नवे रंग-रूप बघायला मिळतात. आंब्याचा मोहराचा सुगंध याच काळात पसरतो. व सर्व उत्सवांचे प्रवेशद्वार म्हणजे वर्षप्रतिपदा!या दिवशी शुचिर्भूत होऊन दाराला तोरण बांधावे. देवपूजा करून गुढी उभारावी. खरं तर सोबत ध्वजही उभारावा. सातत्याने होणार्‍या परकीय आक्रमणामुळे ध्वजाचा ..

आल्लाददायक लस्सी

फाल्गुन गेला की वातावरणात बदल होतो, उष्णतेचे प्रमाण वाढते. गरम वारे, भाजून काढणारे ऊन्ह या तडाख्यात विसावा देणारे आणि शरीराला तरलता प्रदान करणारे ग्रीष्मातील शीतपेय आहे. या पेयांमध्ये विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. यातीलच एक प्रकार म्हणेज लस्सी आहे. पारंपरिक लस्सीला वेगवेगळी चव देऊन आपण पित असतो. आजच्या तरुणाईला म्हणा वा लहान मोठे सर्वांना या पारंपरिक पदार्थांना त्याच्या आवडीचा टच आला की- मग पार्टीत असो वा घरी ते आवडीने प्यायले जातात. तर मग आज आपण पारंपरिक लस्सीला आवडीप्रमाणे दिल्या जाणार्‍या ..

उत्सव लोकतंत्राचा!

विज्ञानभवनातून, येणार्‍या लोकतंत्र उत्सवाचा शंखनाद झाला. सूर्यास्तसमयी झालेला शंखनाद येणार्‍या सूर्योदयाच्या विजयीपर्वासाठी सज्ज होतो आहे. लोकतंत्राचा हा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्याला अधिक सजग आणि जागृत राहायला हवे.   आपल्या संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आपला मतदानाचा अधिकार हक्काचा अधिकार आहे. प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदानाच्या दिवशी मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.आपल्या संविधानाने जी लोकशाही मान्य केलेली आहे त्याचा उत्सव साजरा करण्याचा ..

पोहे

पोहे बहुदा न्याहारीत घेतला जाणारा पदार्थ आहे. पाहुण्यांच्या स्वागताकरिता किंवा मन जोडण्याच्या कार्यक्रमाकरिता या ना त्या निमित्ताने सर्वत्र ‘पोहे’ खाल्ले जातात. तसेच पोह्यांपासून विविध आणि उत्तम पदार्थ आणि तेही झटपट तयार होणारे आहे. खाणे आणि खाऊ घालणे हा नुसता छंद नाही, तर तो उत्कृष्ट व्यवसायदेखील आहे आणि पोहे हा सुरुवातीपासून त्यातलाच एक पदार्थ राहिला आहे. साध्या पोह्यांनी कित्येकांचे आयुष्य पालटले आहे, त्यांना आधार दिला आहे. पोह्याच्या याच प्रवासातील काही प्रकार आणि नवनवीन पदार्थदेखील ..

उन्हाळा आला त्वचा सांभाळा

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा टॅन होऊ शकते. सूर्यकिरणांमुळे त्वचा टॅन होत असून हातावर आणि चेहर्‍याच्या त्वचेवर काळे डाग पडण्याची शक्यता असते. तसेच बदलत्या हवामानाचा सुद्धा आपल्या आरोग्यवर थेट परिणाम होत असतो. शरीरात पाण्याची कमी झाल्यास याचा, सरळ परिणाम त्वचेवर होतो. उन्हाच्या तीव्र झळांमुळे केवळ रंगच नव्हे, तर त्वचेचा पोत खराब होणे, सावळी होणे, घाम-अस्वच्छतेमुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये इन्फेक्शन होणे, त्वचा ..

रोल

रोल..