नवी दिल्ली,
Manish Sisodia in liquor scam case मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन अटी बदलण्याची मनीष सिसोदिया यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली. जामिनाच्या अटींनुसार त्यांना आठवड्यातून दोनदा तपास यंत्रणांच्या कार्यालयात हजर राहावे लागत होते. सिसोदिया यांच्या विनंतीवरून न्यायालयाने आज ही अट हटवली. मात्र, कोर्टाने सिसोदिया यांना खटल्याला नियमित हजर राहण्यास सांगितले आहे.
हेही वाचा : दिल्लीत IMD चा कोल्ड वेव्ह अलर्ट...रात्रीचे तापमान 5 अंशांच्या खाली !
मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून न्यायालयाचे आभार मानले आहेत. सिसोदिया यांनी ट्विटमध्ये लिहिले - जामिनाची अट काढून दिलासा देणाऱ्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. Manish Sisodia in liquor scam case या निर्णयामुळे माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास तर आणखी मजबूत झाला आहेच, पण आपल्या घटनात्मक मूल्यांची ताकदही दिसून येते. मी न्यायव्यवस्थेचा आणि संविधानाप्रती असलेल्या माझ्या कर्तव्यांचा नेहमीच आदर करीन. जय भीम, जय भारत.