बाभुळगाव तालुक्यात वादळाचे थैमान

-गारपीटीने शेतातील गहू, कांदा, तीळ मातीत -अनेक घरावरील टिनछप्पर उडाले

    दिनांक :10-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
Babhulgaon storm : तालुक्यामध्ये मंगळवार, ९ एप्रिलला संध्याकाळी वादळासह पावसाचे थैमान घातले. त्यामुळे अनेकांच्या घरातील छप्पर उडून गेले. मोठमोठी झाडे मुळापासून पडली. त्यामुळे अनेक गावांना जाणारे रस्ते बंद झाले होते.
 
y10Apr-Garpeet
 
 
काढणीला आलेला गहू, कांदा व तीळ गारपीट व वादळी पावसामुळे नेस्तनाबूत झाले. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकèयांना मदत करावी, अशी शेतकèयांची मागणी आहे.  राष्ट्रनिर्माणात पोहरागडची भूमिका महत्वाची : राजश्री पाटील
 
बाभुळगाव तालुक्यामध्ये संध्याकाळी ५ वाजता गारपीटसह वादळी पावसाची सुरुवात झाली व सातच्या दरम्यान पाऊस थांबला. रात्री ८ च्या दरम्यान पुन्हा रौद्र रूप धारण करून वादळासह पावसाची सुरुवात झाली. या वादळामुळे प्रत्येक गावामध्ये शेतशिवारातील मोठमोठी झाडे मुळापासून उन्मळून पडली.  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आज वणीत
 
त्यामुळे अनेक गावांमध्ये जाणारे रस्ते बंद झाले. बाभुळगाव तहसील कार्यालयासमोर फूटपाथवरील काही दुकाने उडून गेली. जागोजागी विजेच्या तारांवर झाडे पडल्यामुळे तारा व खांब तुटले. त्यामुळे ९ तारखेच्या रात्रीपासून १० तारखेला संपूर्ण दिवसभर विद्युत पुरवठा बंद होता.  बाभुळगाव तालुक्यात वादळाचे थैमान
 
त्यामुळे अनेकांचे फोन बंद झाले, संपर्क तुटला, रस्त्यावरील पडलेली झाडे व तुटून पडलेले इलेक्ट्रिक खांब व तार जोडण्याची कामे वेगाने सुरू आहे. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरापर्यंत वीज येईल, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत होते.
 
बाभुळगाव शहरामध्ये नुकतेच उभारलेले सौर ऊर्जा दिव्यांचे खांबही उन्मळून पडले, पाणीपुरवठा बंद आहे, बँक कार्यालयांची कामे ठप्प झाली आहेत.