बंगालमध्ये खळबळ...भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेला आढळला

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
कोलकाता,
BJP worker's body found पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तीन जागांवर मतदान सुरू आहे. निवडणुकीदरम्यान पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे भाजप कार्यकर्त्याचा लटकलेला मृतदेह सापडला आहे. भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दीनबंधू माड्या असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. तो मोयना गावचा रहिवासी होता. त्याचा खून झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. टीएमसी कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप आहे.
 
अमरावतीत मतदान केंद्रांवर गर्दी  भाजप नेत्यांनी सांगितले की, बुधवारी दीनबंधू यांचे हत्येपूर्वी अपहरण करण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडल्याचे त्यांनी सांगितले. BJP worker's body found या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र, तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी सध्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. राज्यातील दार्जिलिंग, रायगंज आणि बालूरघाट या तीन लोकसभा जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मोयना येथे एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला. पुर्बा मेदिनीपूरमध्ये सहाव्या टप्प्यात मतदान सुरू आहे, मात्र त्याआधीच भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह आढळल्याने प्रकरण तापले आहे.  बंगालमध्ये खळबळ...भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेला आढळला