चार विमानतळांवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,  
Bomb threats to airports देशातील चार विमानतळांना काल बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. कोलकाता विमानतळासह देशातील चार वेगवेगळ्या विमानतळांवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा ई-मेलद्वारे करण्यात आला आहे. ही बातमी समजताच प्रशासनात खळबळ उडाली. सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा ईमेल २६ एप्रिल रोजी प्राप्त झाला होता, ज्यामध्ये देशातील चार वेगवेगळ्या विमानतळांवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
 
Bomb threats to airports
 
कोलकाता आणि पंजाबने मिळून रेकॉर्ड बुकला हादरवले  माहिती मिळताच विमानतळांवर कसून चौकशी करण्यात आली आणि नंतर ही धमकी अफवा असल्याचे निष्पन्न झाले. काल जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळालाही बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यानंतर सर्वत्र घबराट पसरली होती. शुक्रवारी दुपारी विमानतळाच्या अधिकृत फीडबॅक आयडीवर धमकीचा ईमेल आला. Bomb threats to airports यानंतर विमानतळ सुरक्षा कर्मचारी आणि बॉम्ब निकामी पथकाने शोधमोहीम राबवली. सायबर टीमही घटनास्थळी पोहोचली. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. मेलमध्ये लिहिले होते की, मी बेंगळुरूमध्ये बसलो आहे, जमल्यास मला पकडा. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांतील अशा प्रकारची ही तिसरी धमकी आहे.