कुकी अतिरेक्यांचा सीआरपीएफ जवानांवर हल्ला, 2 जवान शहीद

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
मणिपूर, 
jawans martyred शुक्रवारी रात्री उशिरा मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील नरनसैना भागात कुकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान शहीद झाले. एन सरकार आणि अरुप सैनी अशी मृत जवानांची नावे आहेत. मणिपूर पोलिसांनी सांगितले की, कुकी समुदायातील अतिरेक्यांनी 12:45 ते पहाटे 2:15 च्या दरम्यान नारनासैना या मेईतेई-बहुल गावाकडे गोळीबार केला.  कोलकाता आणि पंजाबने मिळून रेकॉर्ड बुकला हादरवले
 

jawans martyred 
 
99 मुलांची तस्करी करणाऱ्या पाच मौलवींना अटक  दहशतवाद्यांनी बॉम्बही फेकले. यादरम्यान नारानसैना येथील सीआरपीएफ चौकीच्या आत स्फोट झाला. मणिपूर पोलिसांनी दोन बॉम्बच्या स्फोटाला दुजोरा दिला आहे. jawans martyred यामध्ये सीआरपीएफच्या 128 व्या बटालियनचे इन्स्पेक्टर जाधव दास, सब इन्स्पेक्टर एन सरकार, हेड कॉन्स्टेबल अरुप सैनी आणि कॉन्स्टेबल आफताब हुसैन हे जखमी झाले. बिष्णुपूर जिल्हा अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघात येतो. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान 19 एप्रिलला येथे हिंसाचार झाला होता. यामध्ये 3 जण जखमी झाले. 26 एप्रिल रोजी बाह्य मणिपूर जागेसाठी काही भागात मतदान झाले होते. मतदान संपल्यानंतर काही तासांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला करण्यात आला.