95 मुलांची तस्करी करणाऱ्या पाच मौलवींना अटक

    दिनांक :27-Apr-2024
Total Views |
बिहार, 
Human Trafficking बिहारच्या विविध जिल्ह्यांमधून 95 मुलांना बसमधून सहारनपूरला घेऊन जाणाऱ्या पाच मौलवींना राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने शुक्रवारी पकडले. मुले नऊ ते बारा वयोगटातील आहेत. या सर्वांना लखनौमधील मुमताज आश्रयगृहात ठेवण्यात आले आहे. पोलिस मौलवींची चौकशी करण्यात आणि संपूर्ण रॅकेटची माहिती घेण्यात व्यस्त आहेत.  चार विमानतळांवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

Human Trafficking
आयोगाचे सदस्य डॉ. शुचिता चतुर्वेदी यांनी सांगितले की, मिशन मुक्ती फाऊंडेशन नवी दिल्लीचे संचालक वीरेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार, बिहारच्या अररिया आणि पूर्णिया येथून आणलेल्या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. बाल कल्याण समितीच्या सदस्या डॉ. सुचिता चतुर्वेदी यांना बिहारमधील अररिया आणि पूर्णिया येथून सहारनपूरमधील देवबंदमध्ये अनेक मुलांना बेकायदेशीरपणे नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. Human Trafficking त्यांनी मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. यानंतर अयोध्या पोलिसांच्या युनिट आणि टीमने शहरातील बडी देवकाली येथे हायवेवर एक बस अडवली. बसमध्ये  मुले आढळून आली. त्याच्यासोबत पाच मौलवी होते. संयुक्त पथकाने सर्व मुलांना आणि मौलवींना चौकशीसाठी सिव्हिल लाईन्सला नेले, जिथे तासनतास त्यांची चौकशी झाली.
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना कुठे नेले जात आहे, याची माहिती नव्हती. मौलवींनी दिलेली माहितीही खोटी निघाली. बालकल्याण समितीचे सर्वेश अवस्थी म्हणाले, मौलवींकडे मुलांच्या पालकांची नावे आणि संमतीपत्रही नाही. अनेक मुलेही अनाथ आहेत.