बेछूट तरुणाईचे गंभीर प्रश्न

Pune-Youth-Porsche पिझ्झा-बर्गर खाऊ घालायचे का?

    दिनांक :31-May-2024
Total Views |
इतस्तत:
 
 
 
- विजय पांढरीपांडे
 
  
 
Pune-Youth-Porsche ‘आई कुठे काय करते' मालिकेतील ईशा अशी का वागते? हा लेख काही महिन्यांपूर्वी लिहिला होता. अशा लेखनाचे समाजावर फारसे काही परिणाम होत नसतात, हे बऱ्याच पदव्या घेऊनही आम्हाला कळलेले नाही. कारण या ईशाचे मालिकेतील वागणे दिवसेंदिवस सुधारण्याऐवजी तोल ढळल्यासारखे घसरपट्टीवरून दरीत कोसळते आहे. Pune-Youth-Porsche आता तर तिच्या सोबतीला पुण्याचे एक अतिश्रीमंत लाडावलेले बाळ सामील झाले आहे. या सहा महिन्यांनी अल्पवयीन असलेल्या बाळाचे प्रताप आता सर्वश्रुत झालेले आहेत. Pune-Youth-Porsche या अन् अशासारख्या सातत्याने होत असलेल्या घटना न्याय संस्थेला, पोलिस यंत्रणेला, कुटुंब व्यवस्थेला, शिक्षण प्रक्रियेला हजारो प्रश्न विचारीत आहेत? कोण कोण, कुठे, नेमके काय चुकते, असे हे प्रश्न आहेत. आपला आर्थिक मान वाढल्याने सर्वच समाज वर्गात सुबत्ता आली. भारतातील गरिबी आता नव्याने तपासावी लागेल इतका चंगळवाद बोकाळला आहे. Pune-Youth-Porsche कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही, अशी परिस्थिती आहे.  हेही वाचा : देशातील उष्णतेची लाट ठरली जीवघेणी...200 हून अधिक मृत्यू
 
 


Pune-Youth-Porsche
 
 
 
हेही वाचा : जागतिक तंबाखू निषेध दिवस विद्यार्थी शिक्षकांचे ऐकत नाहीत, घरी मुलं पालकांचे ऐकत नाहीत, नागरिक कायद्याला जुमानत नाहीत, पोलिसच नियमानुसार वागत नाहीत, मंत्री, अधिकारी, लोकनेते यांच्याबद्दल तर बोलायलाच नको... सत्तेपोटी आपण काहीही करू शकतो, आपल्या हाती अनिर्बंध सत्तेने मोकळे रान दिले आहे धुडगूस घालायला, अशी या लोकप्रतिनिधींची धारणा आहे. एकूणच समाजव्यवस्थेत अनागोंदी आहे. Pune-Youth-Porsche एकीकडे तंत्रज्ञानाची झेप, मूलभूत सुधारणा, जनहिताची कामे, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा याचे नगारे पिटले जात असले, तरी समाजाचे आरोग्य मात्र पार बिघडले आहे. न्याय-नीतिमत्तेच्या, चारित्र्य-संवर्धनाच्या बाबतीत चक्क काळोखी अंधार आहे. काळानुसार सगळे काही बदलत असताना कायदे का बदलत नाहीत? Pune-Youth-Porsche अल्पवयीन, नाबालिग कुणाला म्हणायचे? दोन-तीन महिने कमी असणाऱ्या अल्पवयीन बाळाने म्हणजे १६-१७ वर्षांच्या मुलाने दारू पिऊन, नशापाणी करून जर दोन-तीन तरुणींवर बलात्कार केला; नंतर त्यांचा खून केला, हे सारे सिद्ध झाले, तरी अल्पवयीन म्हणून त्याला बाल सुधारगृहात पाठवून वर पिझ्झा-बर्गर खाऊ घालायचे का? हे सारेच संतापजनक आहे. हेही वाचा : बेछूट तरुणाईचे गंभीर प्रश्न
 
 
 
केवळ पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, हा गर्भश्रीमंतांना आलेला माज अन् पैशाची देवघेव करून त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचा सत्तेचा कैफ उतरविण्याची गरज आहे. यासाठी आता सुजाण समाजाने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. Pune-Youth-Porsche एरवी साध्या साध्या फालतू गोष्टीसाठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्षाचे युवा नेते म्हणा किंवा महिला मोर्चा म्हणा, यांनी सरकारला, तपास यंत्रणेला, न्याय व्यवस्थेला जाब विचारणे गरजेचे आहे. हे प्रश्न राष्ट्राच्या सुरक्षितेइतकेच, सामाजिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. समाज अशा विषाणूंनी रोगी असेल अन् दुबळा असेल तर राष्ट्र बलाढ्य कसे होणार? Pune-Youth-Porsche अर्थात वयात येणाऱ्या या मुला-मुलींना समजवायचे कसे, त्यांचे फालतू लाड नियंत्रित करायचे कसे, त्यांना शिस्तीत वाढवायचे कसे हे खरे प्रश्न पालकांपुढे, शिक्षकांपुढे आज आ वासून उभे आहेत. केवळ पदव्या मिळवून कुणी शिक्षित होत नाहीत. संस्कार, उत्तम चारित्र्य, भल्या-बुऱ्याचा विवेकी समज जास्त महत्त्वाचा आहे. आपापल्या कमाईच्या विश्वात रममाण असलेल्या पालकांचे तर याकडे दुर्लक्ष होतेच आहे किंवा समजून-उमजूनही ते पाऊले उचलण्यास असमर्थ आहेत.
 
 
 
 
शिक्षकाची वृत्ती ‘मला काय त्याचे' अशी बेपर्वाईची आहे. शिक्षण पद्धतीत होणारे बदल या कौटुंबिक नीतिशास्त्राची, संस्कार संवर्धनाची दखलदेखील घेत नाही, हे दुर्दैव म्हटले पाहिजे. Pune-Youth-Porsche याआधी आपण पाश्चात्त्य संस्कृतीला नावे ठेवत होतो. वाहवत चाललेल्या तिकडच्या ‘हिप्पी' विचारसरणीकडे पाहून बोटे मोडत होतो. आजचे आपले चित्र काय सांगते? आपण त्यांच्यावरही मात करतो की काय, अशी भीती वाटते. हे अतिशय गंभीर होत चालले आहे. मालिकेमधील ईशा काय किंवा पुण्याचा गर्भश्रीमंत बाप, आजोबांचा बाळ काय, यांची संख्या कोरोनाच्या विषाणूसारखी वेगाने वाढताना दिसते आहे. आपण कोरोनाची लढाई यशस्वीरीत्या लढलो. Pune-Youth-Porsche आता या नव्या तरुणाईत शिरलेल्या, वेगाने वाढणाऱ्या या अपप्रवृत्तीच्या विषाणूचा सामना करायचा आहे. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. मुलांना किती परसेंट गुण मिळतात, कुठे प्रवेश मिळतो, मिळत नाही याची चिंता करीत बसण्यापेक्षा त्याचे घरीदारी वागणे-बोलणे कसे आहे, तो किंवा ती कुठे जातात, काय करतात, कुणाशी कसे बोलतात, यावर लक्ष ठेवणे जास्त गरजेचे आहे.
 
 
 
Pune-Youth-Porsche लक्ष ठेवणे याचा अर्थ पोलिसी नजर नाही. नको ती दखलदेखील नाही. पण मुले तुम्हाला उत्तरदायी असायला हवीत. आमचे आयुष्य आहे, आम्ही वाटेल तसे वागू हे घरातून बाहेर पडल्यावर, मोठे, कमावते, स्वतंत्र झाल्यावर... आपण जेव्हा कुटुंब म्हणून एकत्र राहतो, तेव्हा घराच्या शिस्तीचे काही नियम असतात. खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे, कुठे जातो, कशाला जातो हे खरे सांगणे, दररोज घरात एकमेकांशी सर्वांनी संवाद साधणे, परस्परांच्या अडचणी समजून घेणे, तारस्वरात न बोलता समंजसपणे संवाद साधणे, एकमेकांच्या चुका शोधीत बसण्यापेक्षा आहे त्या समस्येवर सर्वमान्य तोडगा, सोल्यूशन शोधण्याचा प्रयत्न करणे, एकमेकांचे अधूनमधून कौतूक करणे, पण फालतू लाड न करणे... या अशा छोट्या छोट्या गोष्टी (छोटी छोटी बाते) आहेत, ज्या आपण अंमलात आणू शकतो. Pune-Youth-Porsche परिस्थिती हाताबाहेर गेलीय् असे मुळीच नाही. समस्या कोणतीही असो, त्यावर उत्तर हे असतेच. आपण समस्येचा भाग न होता उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर एक नव्हे, अनेक उत्तरे सापडतील. पण समस्याच नाही म्हणून दुर्लक्ष केले तर काही खरे नाही. वेळेतच सावध झाले पाहिजे सर्वांनी...
 
 
७६५९०८४५५५