दयाबेन येणार होणार मोठा सस्पेन्स

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
मुंबई
dayaben return छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील दयाबेन हे पात्र प्रेक्षकांच्या सर्वाधिक लाडक्या भूमिकांपैकी एक मानले जाते. अभिनेत्री दिशा वकानी यांनी साकारलेल्या या भूमिकेने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, 2017 मध्ये मातृत्व रजेवर गेल्यानंतर दिशा वकानी यांनी मालिकेत पुनरागमन केले नाही. गेल्या जवळपास नऊ वर्षांपासून दयाबेनच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
 
 

dayaben return teased in taarak mehta ka ooltah chashmah new promo 
मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये दयाबेन गोकुळधाम सोसायटीत परतणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या प्रोमोमुळे पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही या पुनरागमनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रोमोच्या सुरुवातीलाच dayaben return  जेठालालचा मुलगा टप्पू आनंदाने धावत घरी येतो आणि बापूजी तसेच जेठालाल यांना उत्साहाने, "आई येणार आहे का?" असा प्रश्न विचारतो. हे ऐकताच जेठालालच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. आपल्या लाडक्या दयाच्या पुनरागमनाची शक्यता ऐकून तो भावूक आणि आनंदित झाल्याचे दाखवण्यात आले आहे. गोकुळधाम सोसायटीतही दयाबेनच्या स्वागताची चर्चा सुरू झाल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.दयाबेन परत येणार असल्याची चाहूल लागताच जेठालाल आपल्या जिवलग मित्र तारक मेहता यांच्याकडे धाव घेतो. यावेळी तो आनंद व्यक्त करत, "दया आली की तिच्या हातचा मस्त राजवाडी चहा पिणार," असे म्हणताना दिसतो. दयाच्या आगमनाच्या कल्पनेने जेठालाल, टप्पू आणि बापूजी तिघेही आनंदात असल्याचे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.मात्र, या आनंदाच्या वातावरणात निर्मात्यांनी एक मोठा सस्पेन्सही कायम ठेवला आहे. तारक मेहता यांना या बातमीबद्दल शंका असल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. ते जेठालालला, "मला वाटतं, यावेळीही सुंदरलाल दयाभाभींना घेऊन येणार नाही," असे सांगतात. त्यामुळे दयाबेनच्या पुनरागमनाबाबत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीहीdayaben return  मालिकेत दयाबेनच्या पुनरागमनाची चर्चा अनेक वेळा रंगली होती. प्रत्येक वेळी दयाबेनचा भाऊ सुंदरलाल, जेठालालला दया परत येणार असल्याचे आश्वासन देत असे. मात्र, शेवटच्या क्षणी तो एकटाच गोकुळधाम सोसायटीत पोहोचत असल्याने जेठालालसह प्रेक्षकांचीही निराशा होत असे. मालिकेच्या निर्मात्यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे कथानकातील ट्विस्ट दिले आहेत. त्यामुळे यावेळी खरोखरच दयाबेन मालिकेत पुनरागमन करणार की पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.