शहराचे सांस्कृतिक वैभव सुरेश भट सभागृह

- नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून साकार

    दिनांक :27-Nov-2023
Total Views |
नवोदय नागपूरचा 
 
 
नागपूर, 
Nitin Gadkari : कवी सुरेश भट केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे भूषण होते. कविता, गझल या खजिन्याद्वारे त्यांनी साहित्यविश्वात एक वेगळा ठसा उमटविला. Suresh Bhat Auditorium सुरेश भटांच्या स्मृती नागपूरकरांच्या कायम स्मरणात राहाव्यात, या उद्देशाने महापालिकेतर्फे रेशीमबाग परिसरात अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असे सुरेश भट सभागृह बांधण्यात आले. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याच संकल्पनेतून हे सभागृह आकाराला आले, हे विशेष. 14 जानेवारी 2011 मध्ये कवी ‘सुरेश भट ऑडिटोरियम’चे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या हस्ते करण्यात आले. आर्किटेक्ट अशोक मोखा यांच्या संकल्पनेतून साकारलेले व अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे हे सभागृह आहे.

Nitin Gadkari
 
‘ब्रिस्बेन’फेम खुर्च्या
ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध ब्रिस्बेन स्टेडियममधील रंगीबेरंगी खुर्च्यांसारख्या खुर्च्या Suresh Bhat Auditorium सुरेश भट सभागृहात लावण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांची संख्या कमी असल्यास या रंगीबेरंगी खुर्च्यांमुळे सभागृह भरलेले आहे, असा भास होतो. Nitin Gadkari  सभागृहाचे दोन भाग करण्यासाठी झुलते पार्टिशन लावण्यात आले आहे. तीस मीटर उंच असलेल्या या सभागृहाची कूलिंग व्यवस्थाही अत्यंत अत्याधुनिक आहे. सभागृहाच्या छतावर हवेला थंड करणारी उपकरणे लावण्यात आली आहेत. सभागृहातील संपूर्ण स्टेजची जागा 3 हजार चौ. मी. असून, प्रत्यक्ष स्टेज 250 चौ. मी. आकाराचा आहे. 150 स्पॉट व इतर लाईट्स, साऊंड सिस्टीम आणि माईक लावण्यात आले असून, येथे जवळपास पाच विंग आहेत.
 
 
म्यूरल्स अन् पेंटिंग
सभागृहाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच पेंटिंग्ज लक्ष वेधून घेतात. ‘सुन्या सुन्या मैफलीत,’ ‘आज गोकुळात’ या सुरेश भट यांच्या कवितांच्या ओळींवर हे पेंटिंग्ज तयार करण्यात आले आहेत. थोडे आत गेल्यास Suresh Bhat Auditorium सभागृहाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला वर भिंतीवर प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत चन्ने यांचे म्यूरल्स लावण्याचे काम सुरू आहे. ‘गे मायभू तुझे मी’ आणि ‘रंगुनी रंगात सार्‍या’ या कवितांवर हे म्यूरल्स आधारित आहेत.
 
 
हेलिकॉप्टर पंखा
सभागृहाच्या Suresh Bhat Auditorium आत प्रवेश करताच प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजूला एक भलामोठा पंखा लक्ष वेधून घेतो. तिसर्‍या मजल्यावर असलेल्या या पंख्याची खालचा संपूर्ण परिसर थंड करण्याची क्षमता आहे. नागपुरात हा एकमेव आणि तितकाच अनोखा पंखा आहे.
 
दोन मजली पार्किंग
रस्त्याला लागूनच असलेल्या या Suresh Bhat Auditorium सभागृहात दोन मजली पार्किंग व्यवस्था आहे. चारशे चारचाकी गाड्या या जागेत पार्क करता येतील एवढी त्याची क्षमता आहे.