SCO शिखर परिषदेपूर्वी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण हल्ला, 20 जणांचा मृत्यू

11 Oct 2024 09:58:41
बलुचिस्तान,            
Terror attack in Balochistan पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात बंदूकधाऱ्यांनी 20 खाण कामगारांची हत्या केली असून सात जण जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. अशांत बलुचिस्तान प्रांतात हा ताजा हल्ला देशाच्या राजधानीत होणाऱ्या एका मोठ्या सुरक्षा शिखर परिषदेच्या काही दिवसांपूर्वी आला आहे. पोलिस अधिकारी हमायून खान नसीर यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा बंदुकधारींनी दुकी जिल्ह्यातील कोळसा खाणीजवळील घरांवर हल्ला केला.

Terror attack in Balochistan
 
हेही वाचा : हरयाणा निकालाचा महाराष्ट्रात फायदा !
पोलीस अधिकारी हमायून खान नसीर यांनी सांगितले की, बंदुकधारींनी निवासी भागाला चारही बाजूंनी घेरले आणि गोळीबार सुरू केला. यातील बहुतांश लोक बलुचिस्तानमधील पश्तून भाषिक भागातील होते. मृतांपैकी तीन आणि जखमींपैकी चार अफगाण वंशाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. Terror attack in Balochistan सध्या कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दुकी जिल्ह्याचे राजकीय प्रमुख हाजी खैरुल्ला नसीर यांनी या घटनेबाबत प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही घटना बलुचिस्तान प्रांतातील दुकी जिल्ह्यात घडली. अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून अनेकांची हत्या केली. घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी सशस्त्र हल्लेखोरांनी खाणी आणि यंत्रसामग्री पेटवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
हेही वाचा : 2 डिसेंबरपासून 5 राशींच्या सर्व इच्छा पूर्ण होतील!  
याआधी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी पोलीस व्हॅनवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचे दोन पोलिस शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. Terror attack in Balochistan गस्तीदरम्यान पोलिस व्हॅनवर हा हल्ला झाला. संशयित दहशतवाद्यांनी अचानक व्हॅनवर हल्ला केला होता.
Powered By Sangraha 9.0