'आमचे ड्रोन नेतान्याहूंच्या बेडरूमपर्यंत पोहोचू शकतात...',हिजबुल्लाची इस्रायलला धमकी

31 Oct 2024 16:12:05
बेरूत,
Hezbollah threatens Israel हिजबुल्लाचा नवा प्रमुख नईम कासिम याने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. हिजबुल्लाहचे ड्रोन नेतान्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचू शकतात, असे कासिमने म्हटले आहे. याशिवाय हिजबुल्लाहने इस्रायलला विशेष ऑफरही दिली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलसोबत युद्धविरामाचा मार्ग खुला केला आहे. कासिम म्हणाले की, इस्रायल त्यांच्या शहरांवर सातत्याने हल्ले करत आहे. पण हिजबुल्लाचे सैनिक घाबरणार नाहीत. ते मागे हटणार नाहीत, तर शत्रूचा जोरदार सामना करतील. आमचे ड्रोन नेतन्याहू यांच्या खोलीत कधीही प्रवेश करू शकतात. असे दिसते की नेतान्याहू यांची वेळ अद्याप आलेली नाही, यावेळी ते वाचले. हेही वाचा : हैवानियत! बंगालमध्ये मूक महिलेवर बलात्कार
 
 
Hezbollah threatens Israel
 
हेही वाचा : आता गाईंना 'भटक्या' नाही, तर ...म्हणावे लागेल !  
हिजबुल्लाच्या प्रमुखानेही धक्कादायक विधान केले आहे. बेंजामिनची हत्या इस्त्रायलीने केली असावी, असे नईमने सांगितले. आम्हीही इस्रायलला प्रत्युत्तर देत आहोत, त्यानंतर बेंजामिन घाबरला आहे. कासिमने याच महिन्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हिजबुल्लाहने केलेल्या ड्रोन हल्ल्याचाही उल्लेख केला. Hezbollah threatens Israel हिजबुल्लाहच्या ड्रोनने बेंजामिनच्या खिडकीला धडक दिल्याचा दावा केला. मात्र, यावेळी पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी घटनास्थळी उपस्थित नव्हते. हिजबुल्लाचा प्रमुख बनल्यानंतर नईम कासिमचे भाषण पहिल्यांदाच समोर आले आहे.
 
इस्रायलने गेल्या महिन्यात हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाहला ठार मारले होते. नंतर त्याचा उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन देखील मारला गेला. त्यानंतर आता नईम कासिम यांच्याकडे नव्या प्रमुखाची जबाबदारी आली आहे. इस्रायलच्या भीतीमुळे तो अज्ञात स्थळी लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. Hezbollah threatens Israel युद्धबंदीबाबत कासिम म्हणाले की, इस्रायलला त्यांच्या अटी मान्य कराव्या लागतील. त्यासाठी तो तयार आहे. माजी प्रमुख नसराल्लाह यांनीही इस्रायलला युद्धविराम देऊ केला होता. पण तुमच्या अटींवर अवलंबून. इस्रायलने कोणत्याही अटी मान्य करण्यास नकार दिला होता. लितानी नदीतून इस्रायलने माघार घ्यावी, अशी हिजबुल्लाची अट होती. हेही वाचा : गळ्यात विळा, पायाच्या बोटात कुलूप 400 वर्षांपूर्वीची पिशाचीनी!
 
Powered By Sangraha 9.0