बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढतात 'ही' हिरवी फळं, जाणून घ्या फायदे

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
green fruits आजकाल वेगवेगळे आजार कमी वयातच लोकांना शिकार बनवत आहेत. त्यात हृदयरोगांनी मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोलेस्ट्रॉल हा शब्द आता सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे. चुकीची लाइफस्टाईल आणि फिजिकल ॲक्टिविटी न करणे यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं. ज्यामुळे हाय बीपी आणि हृदयरोगांचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं गरजेचं असतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक उपाय आहेत.
 

green fruit 
 
कोलेस्ट्रॉल नष्ट करणारी फळं...
1) कीवीमध्ये भरपूर फायबर असतं...
जे पचनासाठी चांगलं आणि सोबतच हाय बीपीही कंट्रोल करण्यास मदत करतं. कीवी फळाचं नियमित सेवन केल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल केलं जाऊ शकतं.  नागपुरातील 'त्या' नराधामाची फाशी कायम!
2) एवोकाडोही एक सुपरफूड मानलं जातं...
या फळाचं नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी केली जाऊ शकते. यात आढळणारे अनेक पोषक तत्व कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यास मदत करतात. जर तुम्ही दोन एवोकाडो रोज खाल्ले तर शरीरातील पन्नास टक्के बॅड कोलेस्ट्रॉल दूर केलं जाऊ शकतं.
3) आवळा आपल्या अनेक गुणांसाठी ओळखला जातो...  भारताचे 'हे' ३ रेस्टॉरंट आशियातील सर्वोत्कृष्ट !
यात व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. रोज तीन ते चार कच्चे आवळे खाल्ल्यास शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. तसेच याने इम्यूनिटीही वाढते.
4) पेरूमध्ये फायबर भरपूर असतं आणि यामुळे पचन क्रिया चांगली राहते...
याच्या सेवनानेही शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं. पेरूसोबतच पेरूच्या पानांमध्येही अनेक गुण असतात. यांच्या सेवनानेही कोलेस्ट्रॉल कमी होतं.green fruits
5) लालसोबतच हिरवं सफरचंद
आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं... यात आढळणारं पेक्टिन शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल साफ करण्यास मदत करतं. याने पचनही चांगलं होतं आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.