वणी,
Adv. Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ गुरुवार, ११ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टॉकीजवळ पक्षप्रमुख अॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सत्ता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
चला चला, निवडणूक आली,पैसे कमावण्याची वेळ झाली..!
राष्ट्रनिर्माणात पोहरागडची भूमिका महत्वाची : राजश्री पाटील
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात राजेश बेले यांच्या प्रचाराने मुसंडी मारली असून त्यांच्या प्रचारार्थ ही खास सभा आयोजित केली आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचितचे जिल्हा अध्यक्ष नीरज वाघमारे, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा महासचिव मिqलद पाटील, शिवदास कांबळे, मंगल तेलंग, धम्मवती वासनिक, गौतम दारुंडे, कैलास धोटे, संघपाल कांबळे, प्रशिक मनवर, विलास करमनक, वैशाली गायकवाड यांनी केले आहे.
बाभुळगाव तालुक्यात वादळाचे थैमान