चला चला, निवडणूक आली,पैसे कमावण्याची वेळ झाली..!

10 Apr 2024 21:33:46
तभा वृत्तसेवा
कळंब, 
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणा कामी लागलेल्या असून या निवडणुकीचा फायदा घेत आपले खिसे भरून घेण्याचा गोरखधंदासुद्धा काही यंत्रणांनी सुरू केल्याचे चित्र सध्या कळंब तालुक्यात आहे.
 
 
y10Apr-Taskari
 
 
आमदार डॉ. अशोक उईके निवडणूक काळात निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्या या व्यस्ततेचा फायदा घेत महसूल व पोलिस प्रशासनाने अवैध मार्गाने पैसा गोळा करण्याचा उद्योग सध्या सुरू केल्याची आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.  राष्ट्रनिर्माणात पोहरागडची भूमिका महत्वाची : राजश्री पाटील
 
 
कळंब तालुक्यातून बाभुळगाव व यवतमाळला मोठ्या प्रमाणात अवैध रेती पुरवठा होत आहे. या अवैध रेती पुरवठ्याला स्थानिक पोलिस ठाण्याचा खांदा मिळत असल्याने पोलिसांच्या खांद्याचा उपयोग करून सर्व रेती तस्कर गौणखनिजाची अवैध वाहतूक सुसाट करताना दिसत आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आज वणीत
 
 
दुसरीकडे मटक्यालासुद्धा या तालुक्यात ‘पोलिस ठाणे मान्यताप्राप्त' असे एक मोठे व्यवसायी स्वरूप आले आहे. मटका व्यवसायी कोणालाही जुमानत नाहीत. त्यांनी चौकाचौकात मटका व्यवसाय सुरू केला आहे, याकडेसुद्धा पोलिसांचे ‘अर्थपूर्ण' दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.  बाभुळगाव तालुक्यात वादळाचे थैमान
 
 
कळंब तालुक्यामध्ये रेती तस्करी, गौण खनिज उत्खनन अशा विविध मुद्यांवर विरोधी पक्ष ‘महाविकास'चे नेते निवडणूक प्रचारादरम्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत नाहीत. निवडणूक काळात महसूल व पोलिस प्रशासनातील काही मिळून अवैध व्यवसायींना अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहित करत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
काही सेतूधारकांनी कळंब शहरात दुकाने थाटून शासकीय कामाकरिता विद्यार्थी व पालकांना लागणारे कोणतेही कागदपत्र बनावट स्वरूपात देऊन तीन ते चार हजार रुपयांत पुरविण्याचा उद्योग सुरू केला आहे. या सर्व प्रकरणाला प्रशासन तर खतपाणी देत नाही ना, असे वाटू लागले आहे.
 
मतांचा जोगवा मागत असताना ज्या भागात राहतो त्या भागाचा सामाजिक विकाससुद्धा महत्त्वाचा आहे. सामाजिक आरोग्य जपले जाणार नाही का, अशीही चर्चा चौकाचौकामध्ये होत आहे. त्यामुळे सध्या जनता म्हणत आहे, ‘चला चला निवडणूक आली, पैसे कमावण्याची वेळ झाली..!'
Powered By Sangraha 9.0