दत्तात्रेय काळे
उमरखेड,
Social Organization-Panpoi : दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक उपक्रम म्हणून विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेऊन जागोजागी पाणपोई सुरू करायचे. यंदा मात्र या सामाजिक संघटना गायब झाल्याचे चित्र असून, पाणपोईसाठी कुणी पुढे यायला तयार नसल्याचे चित्र आहे. त्यातच गल्ली-बोळात कूलिंग फिल्टर प्लँटचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी, वाटसरूंना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे.
चला चला, निवडणूक आली,पैसे कमावण्याची वेळ झाली..!
शहरातील मुख्य मार्गावर, चौकांमध्ये दरवर्षी पाणपोई थाटण्यात येत असे. या पाणपोईमुळे नैसर्गिकरित्या माठातील थंडगार पाणी पिण्यासाठी मिळायचे. परंतु, यावर्षी शहरातील पाणपोई आता कालबाह्य झाली असून प्लॅस्टिक बाटल्या आणि वॉटर कॅनचा वापर वाढला आहे.
राष्ट्रनिर्माणात पोहरागडची भूमिका महत्वाची : राजश्री पाटील
उन्हाळा सुरू झाला असताना उमरखेड शहरात एकही पाणपोई नसल्याने थंड पाण्यापासून पादचारी वंचित आहेत. या तालुकास्थानी ग्रामीण भागातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, बँका आदी ठिकाणी कामकाजासाठी ये-जा करणाèया नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मोठ्या संख्येने आलेल्या विद्याथ्र्यांची नेहमीच रेलचेल असते.
बाभुळगाव तालुक्यात वादळाचे थैमान
दरवर्षी शहरात सामाजिक संघटना व काही दाते पाणपोई उभारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असत. आता उन्हाळा सुरू झाला. तरीही मुख्य रस्ते अथवा चौकात एकही पाणपोई नाही. पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच सामाजिक संघटना मुख्य चौक, रस्ता, गर्दीच्या ठिकाणी पाणपोई उभी करत होते. परंतु, आधुनिकतेच्या आणि पाणी विक्रीच्या जमान्यात पाणपोई हरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा
सामाजिक संघटना व पुढार्यांनी आता शहरातील चौकाचौकांत पाणपोई उभारण्याची गरज आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. तालुक्यात परिसरातून येणाऱ्यांची मोठी संख्या आहे. शहरातील न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती यासह इतर सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी येणार्त्या, जाणाऱ्यांसाठी पाणपोईची सोय नसल्याने वॉटर कॅनचे आणि बाटलीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे.