अंगणवाडीची झाली आनंदवाडी..!

13 Apr 2024 20:01:23
वाशीम, 
Anganwadi : ‘हसूया, खेळूया- आनंदाने शिकूया’ हे ब्रिद घेऊन वाशीम जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना बालस्नेही बनवण्याचा ध्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणुन झोडगा बु. (ता. मालेगाव) येथील अंगणवाडी ही जिल्ह्यातील पहिली बोलकी अंगणवाडी म्हणुन नावारुपास आली आहे.
 
 
ANGANWADI
 
 
 
 महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा: खा. भावना गवळी अंगणवाडी केंद्र हे लहान बालकांसाठी शारीरिक व बौद्धिक विकासाचे ऊर्जा स्त्रोत असते. ग्रामिण भागातील तसेच दूर्गम अशा गाव - खेड्यातील ही ऊर्जा केंद्रं बळकट करण्याचे मूलभूत काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे करीत आहेत. येणार्‍या शैक्षणिक वर्षापासुन जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्राना आकर्षक रंग आणि आवश्यक अशा बौध्दिक चित्ररुपी आशयाने सजवण्यात येणार आहे, ज्यामुळे त्या केवळ अंगणवाडी न राहता बालकांना आनंदवाडी भासतील आणि आनंदही वाटतील. याची सुरुवात झोडगा बु. येथील अंगणवाडी पासुन झाली आहे. सदर अंगणवाडीच्या आतील भिंतीवर अंगणवाडीतील बालकांसाठी ज्या ६० बाबी शिकणे आवश्यक आहे त्या सर्व बाबींचा मजकूर रंगवला गेलेला आहे. तसेच एका भिंतीवर आतील भागात स्तनदा मातांकरिता स्तनपानाच्या योग्य पद्धतीचे मुद्दे चित्रांकित केलेले आहेत. अंगणवाडीतील बोलया भिंतींमुळे बालकांचा शैक्षणिक, भावनिक ,मानसिक व शारीरिक विकास निश्चितच होणार आहे.  ८८ हजार महिला मतदार बजावणार मतदानाचा हक्क
 
 
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, कृषी अधिकारी गणेश गिरी, बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख आणि विस्तार अधिकारी तथा पालक कर्मचारी मदन नायक यांनी वारंवार मार्गदर्शन पाठपुरावा केल्यामुळे अंगणवाडीचे काम पूर्ण झाले आहे.
 
 
मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय वैभव वाघमारे सरांनी सतत मागील दोन महिन्यापासून दररोज दर तासाला बोलया अंगणवाडी करण्याबाबत पाठपुरावा केला त्यामुळेच त्यांची संकल्पना या माध्यमातुन साकार झाली. याचा जिल्ह्यातील तीन ते सहा वयोगटातील सर्व बालकांना निश्चितच फायदा होणार आहे.
मदन नायक, विस्तार अधिकारी
Powered By Sangraha 9.0