अकोला,
Sangeeta Adhaau : जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमधील बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देण्यात येत असल्याची बाब उघड झाली असून या निकृष्ट आहाराचे जे नमूने तपासणी साठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले ते नमुने सुद्धा बदलून पाठविल्या गेल्याचा अत्यंत गंभीर आरोप जि. प. अध्यक्ष संगीता अढावू यांनी जि. प.च्या आजच्या सभेत केला असून गरोदर माता, बालकांच्या जीवाशी खेळू नका असा इशाराही संबंधित अधिकार्यांना दिला आहे. या प्रकरणी त्यांनी जि. प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अवकाळीमुळे 7 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी

आपल्या मुलांना देखील असा आहार तुम्ही खाऊ घालणार आहोत का? असा प्रश्न जि.प. अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी शुक्रवार 12 एप्रिलच्या जि. प.च्या स्थायी समितीच्या सभेत संतापून केला आहे. जि. प.च्या स्थायी समितीची सभा छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृहात शुक्रवार 12 रोजी जि.प अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गरोदर माता व पाच वर्षा आतील मुलांना अंगणवाडी मधून पुरविण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या मुद्यांवर समिती सदस्य मीना बावणे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला.
पातूर तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकार्यांनी केली पाहणी
या प्रकरणी हयगय केली जाणार नाही. आता आपण स्वतः हे नमुने घेऊन विभागीय आयुक्तांशी चर्चा करू व नंतर हे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवणार असल्याचे त्यांनी या सभेत सांगितले. सभेला जि. प.उपाध्यक्ष सुनील फाटकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, अतिरीक्त कार्यकारी अधिकारी विनय ठमके, समिती सदस्य चंद्रशेखर चिंचोळकार, गजानन पुंडकर, प्रकाश आतकड, मीना बावणे आदी उपस्थित होते.
अंगणवाडी पदभरती, शालेय पोषण आहार या संदर्भात यापुढे सर्व वादग्रस्त प्रकरणाची सुनावणी अध्यक्षांच्या दालनात व्हावी अशी मागणी केली त्यावर अध्यक्षांनी सर्व वादग्रस्त प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.