पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुनगंटीवार यांना शुभेच्छा

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
Prime Minister Narendra Modi-Mungantiwar : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे भाजपा उमदेवार सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे श्री रामनवमी निमित्त शुभेच्छा पाठवल्या आहेत.
 
 
sAFK
 
  पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सुधीरजी, तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. हे पत्र तुम्हाला लिहित असताना, मला आशा आहे की तुम्ही कुशल मंगल आहात. भारतीय जनता पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला नेहमीच परिश्रम करताना पाहिले आहे. महाराष्ट्र सरकार आणि पक्षात विविध पदे भूषविताना तुम्ही समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य केले असून, राज्याच्या प्रगतीसाठी तुमचा अनुभव हा अमूल्य ठेवा आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि येथील जनतेच्या सेवेसाठी तुमचे प्रयत्न या परिसराला नव्या उंचीवर न्याल, असा विश्वास आहे.
 
 
तुम्ही लोकांचा पूर्ण आशीर्वाद घेऊन संसदेत याल आणि नवीन सरकारमध्ये आम्ही सर्व मिळून देशवासीयांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तुमच्यासारखे उत्साही सहकारी मला संसदेत बळ देईल. ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. तर आपले वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी आहे. यावेळी आम्हाला मिळालेले प्रत्येक मत हे 2047 पर्यंत एक मजबूत सरकार बनवण्याच्या आणि भारताचा विकास करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती देईल.
 
 
उन्हाचा तडाखा आणि इतर गैरसोयी सहन करूनही राष्ट्र उभारणीची ही संधी सोडू नका आणि शक्य असल्यास सकाळी लवकर मतदान करा. निवडणुकीतील विजयासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, असेही पत्रात नमूद आहे.