साप्ताहिक राशीभविष्य

    दिनांक :21-Apr-2024
Total Views |
साप्ताहिक राशीभविष्य 
 
 
SR
 
मेष (Aries) : जुन्या संबंधांना उजाळा
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता एखादे नवे काम हाती घेण्यासाठी सुयोग्य असा हा काळ दिसतो आहे. जीवनातील रोजची कामे सुखासुखी पार पडत राहणार. त्यात कसलाही अडथळा वा अडचणी संभवत नाहीत. व्यवसायात असणार्‍यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळावे. लाभ होईल. काही नवीन ओळखी होतील; त्याचप्रमाणे जुन्या संबंधांना नव्याने उजाळा मिळेल. जुने मित्र-मैत्रिणी, परिचित व्यक्ती वगैरेंची अचानक भेट होऊन जुन्या स्मृती दृढ होतील. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले एखादे कार्य ओळखीतून पूर्ण होऊ शकेल.  पानिपतमधील तरुणाचे कॅनडात शवविच्छेदन
शुभ दिनांक - 21, 23, 26, 27.
 
 
वृषभ (Taurus) : जीवनात चांगल्या संधी
या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता या आठवड्यात विशेषतः काही चमत्कार वाटावेत असे काही घटनाक्रम अनुभवास येऊ शकतील. त्यामुळे आपली रास सध्याची सर्वोत्कृष्ट रास ठरू शकेल. या काळात जीवनातील चांगल्या संधी आपल्याला लाभू शकतात. त्यांचे सोने करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयास हवेत. कारण भाग्यही उजळण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. राजकारणादी क्षेत्रातील मंडळींना मैदानात कर्तृत्व सिद्ध करून दाखविता येईल. काहींना व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो.  नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरचा अपघात
शुभ दिनांक - 21, 22, 24, 26.
 
 
मिथुन (Gemini) : विशेष स्वरूपाचा खर्च
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता या आठवड्यात आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आलेला पैसा वेगवेगळ्या वाटा शोधून खर्च वाढवणार आहे. ‘खर्चाला वाटा हजार’ असे आपण म्हणतो; त्यासोबतच आपणास काही विशेष स्वरूपाचा खर्च करावा लागणार आहे. परिवारातील मंगलकार्य, एखादी मोठी खरेदी, शिक्षणावरील खर्च असे काही विशेष निमित्त समोर येऊ शकतात. व्यापार-व्यवसायात काही नवीन गुंतवणूक वा व्यवसायाच्या विस्ताराचा कार्यक्रम राबवू शकता. घरात महिला वर्गाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 25.
 
 
कर्क (Cancer) : कष्टाचे चीज होणार
या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता आपला तसेच आपल्या जवळच्या व्यक्तीचा, जोडीदाराचा भाग्योदय होण्यास अनुकूल योग दिसतात. आपण आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज करणारा हा काळ असू शकतो. परीक्षेच्या निकालांमधून अपेक्षित यश मिळू शकते. उच्च शिक्षणासाठीचे मार्ग प्रशस्त होतील. नोकरी-व्यवसायात वैयक्तिक स्वरूपाचे यश मिळवून सहकार्‍यांकडून प्रशंसा होईल. अधिकारी वर्ग खूश राहील. पगारवाढ, पदोन्नती यासारखे लाभ मिळू शकतात. सामाजिक, राजकीय क्षेत्रात कामाची दखल घेतली जाईल. परिश्रमाचे कौतुक होईल. मानसन्मान, गौरव लाभेल.
शुभ दिनांक - 21, 22, 24, 25.
 
 
सिंह (Leo) : खर्च डोईजड होऊ नये
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता व्यावसायिक आणि कौटुंबिक कामात आपली ओढाताण होण्याची शक्यता आहे. कामाची भाऊगर्दी राहील. कोणाकडे लक्ष द्यावे याचा गोंधळ उडेल. परिणामी प्रचंड धावपळ व दगदग होऊनही व्यवसाय व कुटुंबात आपल्याबाबत असमाधानाची भावना राहील. आर्थिक बाजू मजबूल राहील; मात्र पाहुणे मंडळी, मंगलकार्ये यात आपला सहभाग राहील. त्यात खर्चाचा काही वाटा उचलावा लागू शकतो. हे सारे करताना खर्च डोईजड होणार नाही याचे भान ठेवावयास हवे. नसत्या लष्कराच्या भाकरी भाजणे नको.  सनरायझर्स हैदराबादने T20 क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास
शुभ दिनांक - 21, 23, 26, 27.
 
 
कन्या (Virgo) : चौफेर यश मिळावे
या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता हात घालाल त्या क्षेत्रात यश मिळू शकेल. दैनंदिन कामात कसलाही उणेपणा येणार माही. अडचणी जाणवणार नाहीत. आपल्या वा जोडीदाराच्या भाग्योदयामुळे आनंद व उत्साह अनुभवाल. काही युवकांचे बरेच दिवसापासून सुरू असलेले नोकरी मिळविण्याचे प्रयत्न या काळात पूर्णत्वास जाऊ शकतील, किमान त्या दिशेने काही सकारात्मक हालचाल होताना दिसेल. कुटुंबातील विवाहयोग्य मुला-मुलींचे शुभमंगल ठरावे. नवपरिणितांना अपत्य योग येऊ शकतो. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. साप्ताहिक राशीभविष्य
शुभ दिनांक - 21, 22, 24, 25.
 
 
तूळ (Libra) : खर्चामुळे तारेवरची कसरत
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता या आठवड्यात आपल्याला आवक आणि जावक असा पैशाचा मेळ जमवताना तारेवरची कसरत करावी लागू शकते. विशेषतः महिलांना गृहखर्चाची सांगड घालताना जरा आवडी-निवडीवर बंधने घालावी लागू शकतात. खर्चाच्या प्राधान्यक्रमात बदल करावा लागू शकतो. हौस-मौजेला मुरड घालावी लागू शकते. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या नोकरदारांना कसब व क्षमता दाखवून पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. तिचे वेळीच सोने करावे. प्रलंबित कमे, अडलेला पैसा मार्गी लागू शकेल.  राजस्थानमध्ये भीषण अपघात, 9 ठार
शुभ दिनांक - 21, 23, 25, 27.
 
 
वृश्चिक (Scorpio) : अनुकूल बदल घडणार
या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले एकूणच ग्रहमान आपल्यासाठी बरेच सुलभ ठरणारे आहे. त्यामुळे प्रतिकूल वातावरणातून आपली सहजी सुटका होईल. उलट काही वैशिष्ट्यपूर्ण योगांमुळे आपल्या दैनंदिन जीवनमानात अनुकूल बदल घडून येऊ शकतील. आधी केलेल्या गुंतवणुकीतून आता उत्तम स्वरूपाचा लाभ होऊ शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. व्यवसाय विस्तार, व्यवसायात बदल किंवा काही नवी वाढीव गुंतवणूक करावीशी वाटत असल्यास या काळाचा कौल घेता येईल. आवक चांगली होणार असल्यामुळे जीवनमान उंचावेल. कुटुंबासाठी काही विशेष करून दाखवू शकाल. मोेठी खरेदी संभवते.
शुभ दिनांक - 21, 22, 23, 25.
 
 
धनु (Sagittarius) : योजलेल्या कामात यश
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता हा आठवडा आपणास मनात योजलेल्या कामात यश देणारा ठरू शकतो. त्यामुळे आपण सर्व लहान-मोठ्या कामात थोड्याशा मेहनतीने, काहीशा प्रयत्नाने, युक्तीने सहज मोठे यश मिळवू शकाल. विशेषतः तरुण वर्गाला नोकरी-व्यवसाय व विवाहादी योगांच्या दृष्टीने चांगला लाभ होऊ शकतो. कुटुंबातील तरुण-तरुणींच्या विवाहविषयक हालचालींना गती प्राप्त होईल. काहींचे योग लवकरच जुळून येऊ शकतात. घरगुती कार्यासाठी काहींना अचानक प्रवासाचा योग संभवतो.  
शुभ दिनांक - 21, 23, 24, 27.
 
 
 
मकर (Capricorn) : मोठेपणा मिळण्याचे योग
या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता आपणास अतिशय उत्तम योग लाभणार असल्यामुळे अखेरच्या टप्प्यातील साडेसातीचा फारसा प्रभाव किमान या काळात जाणवणार नाही. आपण ठरवलेली कामे अपेक्षेनुसार सफल होतील. आपल्या योजनांमध्ये यश मिळावे. कुटुंबातील सदस्यांचे प्रश्नही कौशल्याने मार्गी लावता येऊन त्यांनाही समाधान मिळवून देता येऊ शकेल. मान-सन्मान, कुटुंबात मोठेपणा मिळण्याचे योग संभवतात. काहींना विविध कार्यक्रम वा समारंभाची बोलावणे येऊन मान वाढू शकतो. आपल्या नोकरी- व्यवसायात यश व समाधानाचे एक पर्व सुरू व्हावे.
शुभ दिनांक - 21, 22, 24, 27.
 
 
 
कुंभ (Aquarius) : आत्मविश्वास वाढविण्याची गरज
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता, आपणास सध्या मिळत असलेल्या उत्तमोत्तम संधी अशाच कायम राहाव्या असे वाटत असेल तर आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे. सध्या राशिस्वामी शनी आपल्या राशीत आहे व तो आपणाकडून जरा अधिक मेहनतीची अपेक्षा बाळगून आहे. त्यामुळे प्रबळ विश्वासाने केलेल्या कामांना यश मिळणारच. आपली कामे सफल होऊ लागतील. व्यवसायातील कामकाज, खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होताना दिसतील. नोकरी-व्यवसायात कोणतेही नवे धाडस करावयाचा मोह सध्या आवरला पाहिजे.
शुभ दिनांक - 22, 23, 25, 26.
 
 
 
मीन (Pisces) : खर्चिक राहणीमान आवरा
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता सध्या आपण मौज-मजा-चैन करण्याच्या मनस्थितीत असू शकता. पैशाची आवक सुरळीत आहे. त्यात खंड पडावयाचा नाही. जावक मात्र किती असावी हे आपल्यालाच ठरवायचे आहे. मात्र, सध्या आपले राहणीमान खर्चिक होत चालले आहे. त्यामुळे मौज-मस्तीत किंवा सहज खर्चाच्या प्रवृत्तीमुळे आपले अंदाजपत्रक बिगडू नये याची काळजी घ्यायला हवी. व्यसनांच्या आहारी जाऊ नये. अनावश्यक खर्चास कात्री लावता आली तर बरे. मित्रमंडळीत आपली लोकप्रियता वाढेल, मात्र त्यातील खरे-खोटेपणा जाणून घेतला पाहिजे.
शुभ दिनांक - 22, 24, 25, 26.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746