कुवैतमध्ये प्रथमच हिंदीत रेडिओ प्रसारण सुरू

22 Apr 2024 12:36:29
कुवेत, 
Radio broadcast in Kuwait कुवैतमध्ये प्रथमच हिंदीमध्ये रेडिओ प्रसारण सुरू झाले आहे. तेथे उपस्थित असलेल्या भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. दर रविवारी एफएम 93.3आणि एएम 96.3 वर कुवैत रेडिओवर हिंदी कार्यक्रम सुरू केल्याबद्दल भारतीय दूतावासाने कुवैतच्या दळणवळण मंत्रालयाचे कौतुक केले आहे. कुवैतने उचललेले हे पाऊल दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करणार असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.  केजरीवालांच्या विरोधात तिहारमध्ये षडयंत्र!

Radio broadcast in Kuwait
 विराट आणि अंपायर यांच्यात संभाषण सुरू असताना रिंकू चमकला, VIDEO सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भारतीय दूतावासाने सांगितले की, कुवैतमध्ये पहिल्यांदाच हिंदी रेडिओ प्रसारण सुरू झाले! 21 एप्रिल 2024 पासून दर रविवारी एफएम 93.3 आणि एएम 96.3 वर कुवैत रेडिओवर हिंदी कार्यक्रम सुरू केल्याबद्दल भारतीय दूतावास कुवैतीच्या दळणवळण मंत्रालयाचे कौतुक करतो. या पाऊलामुळे भारत-कुवेत संबंध आणखी घट्ट होतील असे म्हटले आहे. Radio broadcast in Kuwait कुवैतमध्ये सुमारे 10 लाख भारतीय राहतात. या अर्थाने हा देशातील सर्वात मोठा स्थलांतरित समुदाय आहे. कुवेतमध्ये भारतीयांना पसंतीचा समुदाय मानला जातो. अभियंता, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, शास्त्रज्ञ, सॉफ्टवेअर तज्ञ, व्यवस्थापन सल्लागार, आर्किटेक्ट, तंत्रज्ञ आणि परिचारिका या व्यावसायिकांव्यतिरिक्त किरकोळ व्यापारी आणि व्यावसायिक देखील येथे राहतात.  सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने हे काय केले...
चिन्मय मंडलेकरचा मोठा निर्णय...'ही' भूमिका करणार नाही ! (Video)  भारत हा कुवैतचा दीर्घकाळ व्यापार भागीदार आहे. 2021-2022 मध्ये, दोन्ही देशांनी राजनैतिक संबंधांचा 60 वा वर्धापन दिन साजरा केला. 17 एप्रिल रोजी कुवैतमधील भारतीय राजदूत आदर्श स्वैका यांनी कुवैतचे उपपंतप्रधान शेख फहाद युसूफ सौद अल सबा यांची भेट घेतली. यादरम्यान, भारतीय राजदूतांनी कुवैतने सुरू केलेल्या प्रवासी-अनुकूल उपायांचेही कौतुक केले. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली होती.  आचारसंहितेचे उल्लंघनप्रकरणी फाफ डू प्लेसिसला १२ लाखांचा दंड
 
Powered By Sangraha 9.0