देशातील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थंडावला !

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 लोकसभा जागांवर 1206 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20 जागांसाठी निवडणूक होत आहे.  बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 'या' जागांवर "कांटे कि टक्कर"...
 
 
zsf
 
 
 
केरळमध्ये सर्वाधिक ५०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघारीनंतर येथील 20 जागांसाठी एकूण 194 उमेदवार रिंगणात आहेत. कर्नाटकात 491 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा जागेसाठी सर्वाधिक ९२ जणांनी उमेदवारी दाखल केली होती.  'डावे पक्ष आणि काँग्रेस घेत आहेत PFIचा पाठिंबा'
 
 
 
या राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे
 
 
 
टीप: पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातील 15 विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. या मतदारसंघातील 13 विधानसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातही मतदान होणार आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जागेवर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार होती. मात्र बसप उमेदवाराच्या मृत्यूनंतर आता तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी निवडणूक होणार आहे.  अस्वस्थतेनंतर गडकरी पुन्हा भिडले प्रचाराला!
 
 
या जागांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.
 
 

2nd phase
 
 
आसाम: दारंग-उदलगुरी, दिफू, करीमगंज, सिलचर आणि नौगाव.
 

बिहार: किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूर आणि बांका.
 

छत्तीसगड: राजनांदगाव, महासमुंद आणि कांकेर.
 

जम्मू आणि काश्मीर: जम्मू लोकसभा.
 

कर्नाटक: उडुपी-चिकमगलूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बेंगळुरू ग्रामीण, बेंगळुरू उत्तर, बेंगळुरू मध्य, बेंगळुरू दक्षिण, चिकबल्लापूर आणि कोलार.
 

केरळ: कासारगोड, कन्नूर, वडकारा, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम, पोन्नानी, पलक्कड, अलाथूर, त्रिशूर, चालकुडी, एर्नाकुलम, इडुक्की, कोट्टायम, अलाप्पुझा, मावेलिक्कारा, पठाणमथिट्टा, कोल्लम, अट्टिंगल आणि थिंघटमरु.
 

मध्य प्रदेश: टिकमगड, दमोह, खजुराहो, सतना, रेवा आणि होशंगाबाद.
 

महाराष्ट्र: बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी.
 

राजस्थान: टोंक-सवाई माधोपूर, अजमेर, पाली, जोधपूर, बारमेर, जालोर, उदयपूर, बांसवाडा, चित्तोडगड, राजसमंद, भीलवाडा, कोटा आणि झालावाड-बारा.
 

त्रिपुरा: त्रिपुरा पूर्व.
 

उत्तर प्रदेश: अमरोहा, मेरठ, बागपत, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ आणि मथुरा.
 

पश्चिम बंगाल: दार्जिलिंग, रायगंज आणि बालूरघाट.