सचिन तेंडुलकरचे असे विक्रम जे मोडणे अशक्य

24 Apr 2024 17:19:41
मुंबई,
Sachin Tendulkar Records : सचिन तेंडुलकर जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे. सचिनच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत जे आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकला नाही. आज आम्ही तुम्हाला अशा विक्रमांबद्दल सांगणार आहोत जे कोणत्याही फलंदाजासाठी तोडणे सर्वात कठीण काम असेल.  IPL दरम्यान हा स्टार खेळाडू होणार संघाबाहेर
 
SACHIN
 
 
सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 शतके आहेत. सचिनचा हा विक्रम गेल्या 12 वर्षात एकाही फलंदाजाने मोडला नाही. हा विक्रम मोडणे हे आगामी अनेक दशकांतील सर्वात कठीण काम असेल. विराट कोहली सचिनच्या या विक्रमाच्या सर्वात जवळ आहे. त्याच्या नावावर 80 शतकांची नोंद आहे. हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला अजून 20 शतकांची गरज आहे.  क्रिकेट पुन्हा कलंकित...'या' संघाच्या मालकावर फिक्सिंगचा आरोप
 
जेव्हा जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलतो तेव्हा सचिन तेंडुलकरचे नाव अग्रस्थानी येते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 34357 धावा केल्या आहेत. या यादीत सक्रिय खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश आहे. त्याच्या नावावर 26733 धावा आहेत. अशा परिस्थितीत त्याला सचिनला मागे टाकायचे असेल तर त्याला अंदाजे ७६२४ धावा कराव्या लागतील, जे सोपे काम नाही. सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. त्याने एकूण 664 सामने खेळले आहेत.  देशातील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थंडावला !
 
सचिन तेंडुलकरने 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. सचिनचा हा विक्रम आज कोणत्याही खेळाडूने मोडला नाही. हा विक्रम मोडणे आजच्या क्रिकेटपटूंसाठी अशक्यप्राय काम आहे. अशा परिस्थितीत सचिन तेंडुलकर या बाबतीत आघाडीवर आहे.  अशी करा आंब्याची पुरणपोळी
 
कसोटी क्रिकेटमध्येही सचिन तेंडुलकर शतकांच्या बाबतीत खूप पुढे आहे. त्याच्या नावावर एकूण 51 शतकांची नोंद आहे. अशा परिस्थितीत सचिनचा हा विक्रम मोडणे सोपे काम नाही. सक्रिय खेळाडूंमध्ये केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ आघाडीवर आहेत. त्याच्या नावावर 32 शतके आहेत.
Powered By Sangraha 9.0