लोकसभा निवडणुकीत काट्याची तिरंगी लढत सरासरी 60 टक्के मतदान

26 Apr 2024 20:46:23
बुलढाणा, 
Lok Sabha Elections : बुलढाणा लोकसभा मतदार संघात महायुतीचे प्रतापराव जाधव तसेच महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर, शेतकरी युवा नेते अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात काट्याची तिरंगी लढत आज झालेल्या मतदानातून दिसून आली आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 21 उमेदवार पक्ष व अपक्ष चिन्हावर रिंगणात होते.  बुलढाणा प्रशासकीय इमारत मतदान केंद्रावर गोधळ(Video)
 
 
 
sfsf
 
 
मेहकर मतदार संघात 3 नवरदेवांनी केले मतदान  आज दि. 26 एप्रिल रोजी जिल्ह्यात एकूण 17 लाख 82 हजार मतदार होते. एकूण 11 तालुक्यात 1 हजार 962 मतदान केंद्रावर 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी याशिवाय 5 हजार पोलिस बंदोबस्त मतदान प्रक्रियेसाठी सज्ज होते. मतदान केंद्राच्या ठिकाणी 144 कलम लागून करण्यात आली असून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आली होती. सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. 11 वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर संथगतीने मतदान सुरु होते. दुपारी 4 वाजेपर्यंत 42 टक्के तसेच सायंकाळी 5 पर्यंत 53 टक्के मतदान झाले. शेवटच्या एका तासात मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या बुलढाणा व मोताळा येथील मतदारांना अवकाळी वादळी वार्‍याच्या पावसाचा त्रास सहन करावा लागला.
 
 
 
अनेकजण अडकून पडले. त्यामुळे बुलढाणा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वात कमी 42 टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात 1962 मतदान केंद्रापैकी 67 केंद्रावर मत मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाली होती. कंट्रोल हेड 26 मत मशीन बुलेट युनिट 13 मशीन, व्हि.व्हि पॅड मशीन 28केंद्रात बिघाड झाल्याने निवडणुक अधिकार्‍यांच्या व पथकाच्या मदतीने तांत्रिक बिघाड दूर करून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती.प्रत्येक केंद्रावर दोन मशीन ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारसंघ निहाय झालेले मतदान बुलढाणा मतदार संघ (42.67 टक्के), चिखली (53.21), सिंदखेडराजा (53.31), मेहकर (58.72), खामगांव (55.83), जळगाव जामोद (49.55) सरासरी 52.24 टक्के झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सरासरी 63 टक्के मतदान झाले होते. यंदा 60 टक्के पर्यंत हा आकाडा जाईल अशी शक्यता माहिती अधिकारी यांनी सांगितली.
 
 
Powered By Sangraha 9.0