इशान किशनला बीसीसीआयची कडक शिक्षा

28 Apr 2024 13:02:34
मुंबई,   
Ishan Kishan मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन हा आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला, त्यामुळे त्याला फटकारण्यात आले आणि त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला. शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल 2024 च्या 43 व्या सामन्यात किशनने चूक केली.  १ वर्षे १० महिने वयाच्या ऱ्हीहान घोलपचा राष्ट्रीय विक्रम

Ishan Kishan
 
आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "इशान किशनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 गुन्हा केला आहे. किशनने या गुन्ह्यासाठी सामनाधिकाऱ्यांनी लावलेला दंड मान्य केला आहे. लेव्हल 1 स्तरावर मॅच रेफरीचा निर्णय निर्णायक असतो.आर्टिकल 2.2 मध्ये क्रिकेटच्या प्रतिष्ठेच्या बाहेर असलेल्या कोणत्याही कृतीचा समावेश आहे, जसे की स्टंपला लाथ मारणे, जाणूनबुजून कोणत्याही वस्तूचे नुकसान करणे. Ishan Kishan यामध्ये खेळाडूंकडून जाहिरात फलक, सीमारेषा, ड्रेसिंग रूमचे दरवाजे, काचेच्या खिडक्या आणि इतर गोष्टींचे नुकसान समाविष्ट आहे. यामध्ये क्रिकेट उपकरणे, मैदानी उपकरणे किंवा कपड्यांचे नुकसान करणे देखील समाविष्ट आहे.  रात्री चुकूनही उष्टी भांडी ठेवू नका, नाहीतर....
मात्र, आयपीएल आयोजकांनी किशनचा गुन्हा उघड केलेला नाही. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध इशान किशनची कामगिरी चांगली झाली नाही. डावखुरा फलंदाज 14 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 20 धावा करून बाद झाला. मुंबई इंडियन्सला शनिवारी दिल्ली कॅपिटल्सकडून उच्च धावसंख्येच्या सामन्यात 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.  निवडणूक ड्युटीवर जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या बसला धडक, 2 ठार
Powered By Sangraha 9.0