नवी दिल्ली,
Dry Day Order : दिल्लीतील मद्यप्रेमींना या महिन्यात दोन दिवस ड्राय डेचा सामना करावा लागणार आहे. देशाच्या राजधानीत दारूची दुकाने बंद राहतील. राष्ट्रीय राजधानी क्षेत्राशी संबंधित उत्तर प्रदेशातील काही भागातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एप्रिलमध्ये दोन दिवस ड्राय डे घोषित केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार दिल्लीत 24 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 ते 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दारूची दुकाने बंद राहतील.
दिग्गज आयटी कंपनीत मोठी घडामोड...भारतीय झाला सीईओ !
निवडणुकीव्यतिरिक्त 11 एप्रिलला ईद, 17 एप्रिलला रामनवमी आणि 21 एप्रिलला महावीर जयंती असल्यामुळे दिल्लीत दारूची दुकाने बंद राहतील. तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त २३ मे आणि बकरीदनिमित्त १७ जून हा ड्राय डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. दिल्ली सरकार दर तीन महिन्यांनी ड्राय डेची यादी जाहीर करते.
सरकारने जारी केला 'Dry Day'चा आदेश