चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवस या रंगाचे कपडे करा परिधान, देवी होईल प्रसन्न

    दिनांक :07-Apr-2024
Total Views |
Chaitra navratri colours 2024  
नवरात्रीचा सण सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असतो. यावर्षी चैत्र नवरात्रीचे व्रत 09 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत पाळले जाणार आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत, दुर्गा देवीचे भक्त देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये रंगांचेही विशेष महत्त्व मानले जाते. Chaitra navratri colours 2024 नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीची पूजा करताना तिच्या आवडत्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या शैलपुत्रीपासून तर महागौरीची पूजा करताना कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावीत.  
 
Chaitra navratri colours 2024
 
पहिल्या दिवशी पिवळा रंग-
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग खूप आवडतो. या दिवशी माँ दुर्गेच्या या रूपाची पूजा करण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र सोबत पिवळ्या रंगाचे नैवेद्य करावे.  नवरात्रीमध्ये घरातील तुळशीची अशी करा पूजा
 
दुसऱ्या दिवशी हिरवा रंग -
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मातेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. असे मानले जाते की ब्रह्मचारिणी देवीला हिरवा रंग खूप आवडतो. अश्यावेळी देवीच्या या रूपाची पूजा करताना तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे.
 
तिसऱ्या दिवशी केशरी रंग-
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीला केशरी रंग खूप आवडतो. अशा स्थितीत हा रंग परिधान करून तुम्ही देवीची पूजा करू शकता.  राशीनुसार या रंगाच्या बांगड्या घाला...पतीची भरभराट घडवा !
चौथ्या दिवशी नारंगी रंग-
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते, देवी कुष्मांडा यांना नारंगी रंग खूप आवडतो. नारंगी रंग धारण करून कुष्मांडा देवीची पूजा केल्यास विशेष आशीर्वाद मिळतो. 8 एप्रिलला होणाऱ्या सूर्यग्रहणाचा 'या' राशींना लाभ
 
पाचव्या दिवशी पांढरा रंग-
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. देवीला पांढरा रंग खूप आवडतो. अशा स्थितीत तुम्ही पांढरे वस्त्र परिधान करून स्कंदमातेची पूजा करू शकता. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
 
सहाव्या दिवशी लाल रंग-
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते आणि तिला लाल रंग खूप आवडतो. देवीच्या या रूपाची  प्रसन्न करण्यासाठी तुम्ही लाल रंगाचे कपडे घालून तिची पूजा करू शकता. गुढी पाडव्याला 30 वर्षांनंतर या 4 राशींसाठी नशीब उघडणार
 
सातव्या दिवशी निळा रंग-
नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळे वस्त्र परिधान करून कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे केल्याने देवी प्रसन्न होते आणि आपल्या भक्ताला धन, सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देते.  चैत्र नवरात्री....यंदा आहेत अनेक शुभ योग!
 
आठव्या दिवशी गुलाबी रंग-
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरी देवीला गुलाबी रंग आवडतो. महागौरीची पूजा करताना गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावे. या राशींचे नशीब उजळवणार यंदाचा ''गुढी पाडवा'' !
 
नवव्या दिवशी जांभळा रंग-
नवरात्रीच्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते. देवी सिद्धिदात्रीला जांभळा रंग खूप आवडतो. या रंगांचे कपडे घालून तुम्ही देवीची पूजा करावी.  आज होणार संपूर्ण सूर्यग्रहण, जगात दिसणार या दुर्मिळ घटना...