पुलगावात वाळू माफियांवर कारवाई; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :09-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Sand mafia in Pulgaon : वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दोन वेगवेगळ्या कारवाईत 23 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून जप्त केलेला मुद्देमाल देवळी तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. अरविंद केजरीवालांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव
 
 
saDJ
 
 
महाकाल मंदिरातील आगीत होरपळलेले सत्यनारायण सोनी यांचा मृत्यू   वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचला असता एम. एच. 32 ए. 6763 क्रमांकाचा ट्रॅक्टर, एम. एच. 32 ए. 6764 क्रमांकाची ट्रॉली वाळू भरून येत होती. पोलिसांना बघताच चालक, मालक व एक अल्पवयीन मुलगा वाहन सोडून पसार झाले. पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, एक दुचाकी, दोन मोबाइल असा 8 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करून शुभम लोखंडे रा. कवठा झोपडी, प्रवीण गवते रा. नाचणगाव व अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला.  दुर्गमध्ये बस अपघातात केडिया कंपनीच्या १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
 
 
दुसर्‍या कारवाईत पोलिसांनी सतीश नान्हे, रा. नाचणगाव, ट्रॅक्टर मालक जगदीश मस्के, रा. पुलगाव, चालक शुभम सरवे, रा. नाचणगाव, ट्रॅक्टर मालक बबलू मेंढे पुलगाव यांच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली आणि वाळू असा 15 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करून या सर्वांवर गुन्हे दाखल केले. या दोन्ही कारवाईत 23 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासाकरिता देवळी तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.