आज धोनी चेन्नईत खेळणार शेवटचा सामना ?

12 May 2024 13:05:13
मुंबई,  
MS Dhoni चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काही वर्षांपूर्वी एक इच्छा व्यक्त केली होती की, त्याला सीएसके चाहत्यांसमोर त्याचा शेवटचा आईपीएल सामना चेन्नईच्या मैदानावर खेळायचा आहे. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सविरुद्धचा आजचा सामना धोनीचा चेन्नईच्या मैदानावरील शेवटचा सामना असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. वास्तविक, गेल्या सामन्यात सीएसकेच्या पराभवामुळे त्यांची प्लेऑफची गणिते थोडी बिघडली आहेत. आता या संघाला प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.  धोनीसाठी सुरक्षा तोडणाऱ्याला पोलिसांनी केले अटक
 
 
MS Dhoni
 
आज धोनी चेन्नईत खेळणार शेवटचा सामना ?  या संघाने येथून एकही सामना गमावला तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना मोठा फटका बसेल. जर सीएसके प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही तर धोनीचा चेन्नईतील हा शेवटचा सामना असू शकतो. MS Dhoni चेन्नई सुपर किंग्ज सध्या 12 पैकी 6 सामने जिंकून आयपीएल 2024 गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. सीएसकेला जास्तीत जास्त 16 पॉईंट्स गाठण्याची संधी आहे, जर टीम पुढच्या दोन सामन्यांपैकी एकही हरली तर त्यांची गाडी फक्त 14 पॉईंटवरच अडकेल, अशा परिस्थितीत ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाहीत. यानंतर त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
यानंतर चेन्नई सुपर किंग्जला मोसमातील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफसाठी पात्र ठरले तर चाहत्यांना एमए चिदंबरम स्टेडियमवर एकदा नव्हे तर दोनदा धोनीची झलक मिळू शकेल. वास्तविक, चेन्नईच्या या मैदानाला आयपीएल 2024 च्या क्वालिफायर-2 आणि अंतिम सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, हे दोन बाद फेरीचे सामने खेळण्यासाठी सीएसकेला प्रथम प्लेऑफसाठी पात्र व्हावे लागेल.  खळखळणारी, स्वच्छ नागनदी...तुम्ही पाहीलीत का?
Powered By Sangraha 9.0