hamida banu गुगलने शनिवारी, 4 मे रोजी भारतीय कुस्तीपटू हमीदा बानू यांच्या स्मरणार्थ एक डूडल जारी केले, ज्यांना भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीपटू मानले जाते. गुगल डूडलच्या वर्णनात असे म्हटले आहे की, “हमिदा बानू त्यांच्या काळातील ट्रेलब्लेझर होत्या, आणि त्यांची निर्भयता संपूर्ण भारत आणि जगभरात लक्षात ठेवली जाते. त्यांच्या क्रीडा कर्तृत्वाच्या बाहेर, त्या नेहमीच स्वतःशी प्रामाणिक राहिल्या." T20 विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिजला धक्का
1954 मध्ये या दिवशी झालेल्या कुस्ती सामन्यात हमीदा बानूने अवघ्या 1 मिनिट आणि 34 सेकंदात विजय नोंदवला व नोंदवल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. त्यांनी प्रसिद्ध कुस्तीपटू बाबा पहलवानचा पराभव केला. पराभवानंतर, बाबा पहलवान व्यावसायिक कुस्तीतून निवृत्त झाले . बंगळुरूस्थित अतिथी कलाकार दिव्या नेगी यांनी चित्रित केलेले हे डूडल, भारतीय कुस्तीपटू हमीदा बानूला पार्श्वभूमीत स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांनी वेढलेले, पार्श्वभूमीत 'Google' लिहिलेले चित्रित करते. निज्जरच्या मारेकरीचे लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन!