सुर्याटोला जळीतकांडात किशोर शेंडेला फाशी

    दिनांक :09-May-2024
Total Views |
गोंदिया,
Suryatola burning incident :  पत्नी, मुलगा व सासर्‍याला पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने आज 9 मे रोजी फाशीची शिक्षा सुनावली. 6 मे रोजी झालेल्या सुनावनीत आरोपीवर दोष सिद्ध झाले होते. किशोर श्रीराम शेंडे (42) रा. भिवापूर ता. तिरोडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शहराजवळील सूर्याटोला येथे 15 फेब‘ुवारी 2023 रोजी उघडकीस आली होती. किशोरच्या सततच्या जाचाला कंटाळून किशोरची पत्नी आरती (30) ही मुलांसह भिवापूर येथून माहेरी सूर्याटोला येथे आली होती. खबरदार बालविवाह लावाल तर !
  
 
 
fsjfk
 
 अवकाळी पावसाने पुन्हा उडवली दाणादाण घटनेच्या दिवशी किशोर याने घराच्या पडवीत झोपलेले सासरे देवानंद सितकू मेश्राम (52), घरात झोपलेली पत्नी आरती व मुलगा जय (4) यांच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. यात अर्धांगवायूनेग‘स्त देवानंत यांचा घटनास्थळीच मत्यू झाला. आरती व जय यांना उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम 302, 307, 436, 506 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला 16 फेब‘ुवारी 2023 रोजी भिवापूर शेतशिवारातून अटक करून त्याच्याकडून मोबाईल, पेट्रोलची डबकी, आगपेटी, दुचाकी, गुन्हा करतेवेळी वापरलेले कपडे जप्त केले. त्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल केले. साक्षी, पुरावे, आरोपीकडून हस्तगत मुद्देमाल, उपलब्ध वस्तुनिष्ठ पुरावे यावरून न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी आरोपी किशोरला 6 मे रोजी दोषी ठरविले. आज गुरूवारी या प्रकरणावर न्यायालयाने आरोपी किशोरला कलम 302 अन्वये फाशी व 10 हजाराचा दंड, कलम 436 अन्वये जन्मठेप, 10 हजाराचा दंड तसेच दंड न भरल्यास दोन्ही शिक्षेत 6 महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावली.  
 
 
सूर्याटोला येथे गतवर्षी फेब‘ुवारी महिन्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून गेले होते. देवानंद मेश्राम, आरती व जय यांचा मृत्यू झाला होता. स्वरागिनी ही घटनेच्या दिवशी आपल्या आत्याकडे झोपायला गेली होती. आरतीची आई ममता मेश्राम या त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झोपल्या असल्याने या दोघ्याही सुदैवाने बचावल्या. अल्पवयीन स्वरागिनी हिला फौजदारी प्रकि‘या संहितेच्या कलम 357 अ (2) च्या कक्षेत पालकाद्वारे भरपाई देण्याची शिफारस न्यायालयाने केली आहे तर दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर स्वरागिनीला देण्याचे न्यायालयाने नमूद केले.