मोठी बातमी...पूजा खेडकरच्या आईला पोलिसांनी केली अटक!

    दिनांक :18-Jul-2024
Total Views |
पुणे, 
IAS Pooja Khedkar Mother Arrest महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती रद्द झाल्यानंतर आता पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुळशीमधील शेतकऱ्यांना जमीनीच्या वादातून हातात पिस्तुल घेऊन धमकावल्याप्रकरणी पौड पोलिसांना रायगडमधून मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं आहे. महाड येथील हिरकणी वाडीमधील पार्वती हॉटेल (लॉज) मधून पहाटे पुणे ग्रामीण एससीबी पोलिसांनी मनोरमा यांना ताब्यात घेतले आहे. आपल्या ऑडी गाडीवर लाल दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. हेही वाचा : माकपाची गेल्या काही वर्षांतील घसरण
 
 
pooja
 
हेही वाचा : मुलाच्या छातीवर बसून आईने केली निर्दयीपणे मारहाण...VIDEO लाल दिव्याबरोबरच प्रशिक्षणार्थी असताना कार, स्वयीक सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केल्याचे पूजा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीबरोबरचे व्हॉट्सअप चॅट समोर आले. त्यातच दिव्यांग म्हणून मिळालेलं प्रमाणपत्रही वादात सापडलं. तसेच वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले. IAS Pooja Khedkar Mother Arrest असं असतानाच कारवाईसाठी पूजा यांच्या पुण्यातील घरी पोहोचलेल्या पोलिस आणि अधिकाऱ्यांचं वार्तांकन करायला गेलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी उद्धट वागणूक दिल्याने त्या सुद्धा चर्चेत आल्या. मनोरमा या चर्चेत आल्यानंतर त्याचा एक जुना व्हिडीओ समोर आला. हेही वाचा : रीलचा नाद महागात! मुंबईच्या ट्रैवल इन्फ्लुएंसरचा मृत्यू
प्रसारमाध्यम प्रतिनिधींना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकर यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ आठवड्याभरापूर्वी समोर आला. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर हातात रिव्हॉल्वर आणि सोबत बाउन्सर घेऊन जमिनीसाठी वाद घालत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा एका शेतकरी कुटुंबाला धमकावत असल्याचं सांगितलं जात आहे. खेडकर कुटुंबानं पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली आहे. त्याच ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांबरोबर झालेल्या वादाचा हा व्हिडीओ असल्याचं समजतं. IAS Pooja Khedkar Mother Arrest हा संपूर्ण प्रकार 2023 साली 5 जून रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या बाऊन्सर आणि हातात पिस्तूल घेऊन शेतक-यासोबत वाद घालताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदर शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेत पुणे पोलिसांनी मनोरमा यांना चौकशीसंदर्भात पूर्व तयारी केली होती. त्यांना अन्य एका प्रकरणात नोटीस देण्यात आल्यानंतर त्या पती दिलीप खेडकर यांच्याबरोबर पळून गेल्या.