धक्कादायक ! लखनौ विद्यापीठात IPS मुलीचा संशयास्पद मृत्यू

01 Sep 2024 18:09:13
लखनौ, 
लखनौच्या RMLNLU राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात अनिका रस्तोगी ही १९ वर्षीय विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत आढळून आली. अनिका एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती रात्री तिच्या खोलीत गेली होती, पण पुन्हा दरवाजा उघडला नाही. मुलीचे वडील एनआयए अधिकारी आहेत. लखनौच्या राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात अनिका रस्तोगी या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. खोलीत संशयास्पद स्थितीत मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. ती एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. वसतिगृहाच्या खोलीत ती बेशुद्धावस्थेत पडलेल्या अवस्थेत आढळली. अनिका ही आयपीएस संतोष रस्तोगी यांची मुलगी होती, जी सध्या दिल्लीतील एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) मध्ये आयजी म्हणून कार्यरत आहेत. अनिका रात्री तिच्या खोलीत गेली होती, त्यानंतर तिने दरवाजा उघडला नाही. तिच्या मित्रांनी ती  न दिसल्याने दरवाजा तोडला असता अनिका बेशुद्ध अवस्थेत आढळली.
 हेही वाचा : पाकिस्तान म्हणाला...भारत का रक्षा मंत्री बहुत तगड़ा है

ffg  
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला
मित्रांनी सांगितले की RMLNLU अनिकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशियाना पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शवविच्छेदन अहवालातच अनिकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. हेही वाचा : अजितदादा नाराज...आमच्याही कार्यकर्त्यांना रोखणं कठीण!
 
संशयास्पद मृत्यूनंतर विद्यार्थी चिंतेत
या संशयास्पद मृत्यूमुळे RMLNLU विद्यापीठ आणि पोलीस प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून अनिकाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचारी हादरले आहेत.
 
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा 
अनिकाच्या मृत्यूचे खरे RMLNLU कारण जाणून घेण्यासाठी सर्वजण पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. जे काही सत्य समोर येईल ते पुढे शेअर करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Powered By Sangraha 9.0