फटाके फोडले, हॉर्न वाजवले पण उपयोग काय वाघ तर बहिरा होता!

26 Sep 2024 14:11:37
पिलीभीत,
tiger was deaf उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये मानवभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाची टीम जंगलात पोहोचली होती. वाघाला पकडण्यासाठी 13 दिवसांपासून ऑपरेशन सुरू होते. वाघिणीला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून सातत्याने शोध सुरू होता. तब्बल 13 दिवसांनंतर वनविभागाच्या पथकाने वाघिणीला पकडले आहे. या वाघाने आतापर्यंत 10 जणांचा बळी घेतला आहे. वनविभागाच्या पथकाने पकडलेली वाघीण बहिरी असल्याचे सांगण्यात येत आहे. वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फटाके फोडून आणि वाघाजवळ हॉर्न वाजवल्यानंतरही ती प्रतिक्रिया देत नाही.
 हेही वाचा : मोठी कारवाई...रितिका मालूला अटक
 
tgiger
 
पिलीभीतमध्ये वनविभागाच्या पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर मानवभक्षक वाघिणीला पकडले आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते. वाघाने आतापर्यंत 10 जणांवर हल्ला करून ठार केले आहे. पिलीभीतच्या कालीनगर तालुक्यातील सहा गावात वाघाने दहशत पसरवली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पकडलेल्या वाघाला ऐकू येत नाही. tiger was deaf याचीही चाचपणी सुरू आहे. फटाके फोडून आणि वाघाजवळ भोंगे वाजवूनही तो प्रतिक्रिया देत न्हवता. हेही वाचा : 'स्टेल्थिंग' म्हणजे काय...कायदा प्रणालीत एक ही कायदा नाही ?
 
वाघ पूर्णपणे सुदृढ दिसत असून त्याच्या शरीरावर कुठेही जखमेचे चिन्ह नाही. 13 दिवसांच्या ऑपरेशननंतर वाघाला पकडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तपासणीनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ही वाघीण शारीरिकदृष्ट्या निरोगी असल्याचे आढळून आले. मोठ्या आवाजात दीर्घकाळ राहिल्याने तो बहिरे झाल्याचे समजते. पुढील चाचणीसाठी हा अहवाल वैद्यकीय तपासणी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीनंतरच काही निर्णय घेतला जाईल.
Powered By Sangraha 9.0