महाराष्ट्रात लागणार आचारसंहिता...या तारीखेला मतदान आणि मतमोजणी?

    दिनांक :28-Sep-2024
Total Views |
मुंबई,
Election date in Maharashtra महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.राज्यात 15 ते 17 ऑक्टोबर पर्यन्त आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. तर 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी  महाराष्ट्रात दाखल झाले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अधिकारी आजपासून 28 सप्टेंबर पर्यन्त महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आजपासून निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यास सुरुवात करणार आहे. आढावा दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाचा आढावा घेणार आहे. राज्यातील पोलिस अधिकारी व सनदी अधिकारी सोबत महत्वाची बैठक आज केंद्रीय निवडणूक अधिकारी घेणार आहे.
 
28 सप्टेंबरला सकाळी साडे नऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक घेणार आहे.  दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आधिकारी रात्री उशिरा मुंबईहून दिल्लीकडे रवाना होतील. Election date in Maharashtra निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्व विभागाला विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा पथक आचार संहिता व निवडणूक तारीखचा अहवाल तयार करून मुख्य निवडणूक आयुक्तकडे अहवाल सादर करणार आहे.