उन्हाळ्यातील वाळवण : पोह्याचे पापड

    दिनांक :25-Apr-2025
Total Views |
Poha papad recipe उन्हाळा म्हटलं की घराघरांत वाळवणींची लगबग सुरू होते. वाळवणाची ही परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. कैऱ्यांचं लोणचं, सांडगे, कुरडया, पापड असे अनेक चविष्ट पदार्थ उन्हाळ्यात तयार केले जातात. यामध्येच अजून एक खास आणि हलका खमंग पदार्थ म्हणजे पोह्याचे पापड. हे खुसखुशीत आणि कुरकुरीत पापड चहासोबत, जेवणासोबत किंवा हलक्या खाण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतात.
 
 
Poha papad recipe 
चला तर पाहूया ही पारंपरिक आणि सोपी रेसिपी…
पोह्याचे पापड – साहित्य Poha papad recipe
जाड पोहे – १ किलो
मिरी – २ टेबलस्पून
जिरे – २ टेबलस्पून
हिरव्या मिरच्या – ७-८ (चवीनुसार)
आलं – १ इंच तुकडा
मीठ – चवीनुसार
लिंबाचा रस – १/२ वाटी (चवीनुसार)
पाणी – अंदाजे २ लिटर
 
 
कृती :
 
 
1. पोहे निवडून स्वच्छ धुवा आणि थोडं पाणी शिंपडून सैलसर मोकळे करून ठेवा.
2. मिरी, जिरे, आलं आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून त्याची पेस्ट तयार करा.
3. एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा. त्यात ही वाटलेली पेस्ट आणि मीठ घालून उकळा.
4. पाणी उकळायला लागल्यावर त्यात पोहे घालून नीट मिक्स करा. पोहे मऊ होईपर्यंत हलवत शिजवा.
5. आच बंद केल्यावर त्यात लिंबाचा रस घालून एकत्र करा.
6. हे मिश्रण कोमट झाल्यावर हाताने किंवा मोठ्या चमच्याने पापडाच्या आकारात प्लास्टिकवर किंवा कापडावर थापून द्या.
7. उन्हात चांगले दोन दिवस सुकवून घ्या. पूर्ण सुकल्यावर डब्यात भरून ठेवा.
तळण्याची पद्धत :
 
 
तेल गरम करून त्यात हे पापड कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. गरम गरम चहा किंवा जेवणासोबत खायला मजा येते!
टीप:Poha papad recipe
हवे असल्यास थोडं तीळ किंवा ओवा देखील घालता येतो.
मिरच्यांचे प्रमाण चवीनुसार कमी-जास्त करू शकता.
उन्हाळ्याच्या सुट्टीत असा घरगुती पद्धतीने तयार केलेला पोह्याचा पापड केवळ चवीलाच नव्हे तर आठवणींनाही उजाळा देतो. आजच्या यंत्रयुगात अशा पारंपरिक रेसिपी जपणं म्हणजेच आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेणं होय.