शस्त्रक्रिया सोडून डॉक्टर नर्ससोबत सेक्स करण्यात व्यस्त!

13 Sep 2025 10:41:35
लंडन,
Shameful act of Pakistani doctor ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टर येथील टेमसाईड हॉस्पिटलमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अपमान सहन करावा लागला आहे. १६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या या घटनेत पाकिस्तानी वंशाचे भूलतज्ज्ञ डॉ. सुहेल अंजुम (वय ४४) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. रुग्णाच्या पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. अंजुम यांनी रुग्णाला भूल दिल्यानंतर ऑपरेशन थिएटर सोडले आणि जवळच्याच दुसऱ्या थिएटरमध्ये एका नर्ससोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वर्तनाचे साक्षीदार झालेल्या नर्स एनटी यांनी तत्काळ ही बाब नोंदवली. सुमारे आठ मिनिटांनंतर ते परत ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी आले.
हेही वाचा: 'त्या' महिला होत्या म्हणून... 
 

Shameful act of Pakistani doctor 
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, अंजुम यांनी कबूल केले की त्यांच्या कृतीमुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. जरी कोणतीही हानी झाली नाही, तरीही ही घटना वैद्यकीय नैतिकतेला धक्का देणारी होती. Shameful act of Pakistani doctor त्यांनी या घटनेमागे स्वतःच्या वैयक्तिक समस्यांचा उल्लेख केला. मुलीचा अकाली जन्म, कमी वजन आणि त्यासोबत आलेला कौटुंबिक तणाव. द इंडिपेंडेंटनुसार, डॉ. अंजुम यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये टेमसाईड हॉस्पिटल सोडले आणि पाकिस्तानात परतले. मात्र त्यांनी पुन्हा युकेमध्ये आपली वैद्यकीय कारकीर्द सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “ही एक वेळची चूक होती आणि पुन्हा कधीच होणार नाही,” असे त्यांनी मेडिकल प्रॅक्टिशनर्स ट्रिब्यूनल सर्व्हिस समोर स्पष्ट केले.
 
साक्ष देताना अंजुम म्हणाले, ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे. मी माझ्या रुग्णालाच नाही तर स्वतःलाही आणि माझ्या सहकाऱ्यांनाही निराश केले. या कृतीमुळे नर्स एनटीलाही अनावश्यक अडचणीत यावे लागले. डॉ. अंजुम यांनी भावनिक स्वरात स्पष्ट केले की मुलीच्या अकाली जन्मामुळे त्यांच्या कुटुंबात तणाव निर्माण झाला होता आणि पत्नीशी नातेसंबंध तुटक झाले होते. त्यांनी सर्व संबंधितांची माफी मागून “ही चूक सुधारण्याची मला संधी द्यावी, अशी विनंती केली. या प्रकरणामुळे केवळ टेमसाईड हॉस्पिटलचीच नाही, तर पाकिस्तानच्या वैद्यकीय क्षेत्राचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली आहे.
Powered By Sangraha 9.0